रक्तदान करण्याचे हे आहेत फायदे
दि. १४ फेब्रुवारी २०१९
फेसबुक लिंक http://bit.ly/2MUNFQl
सध्याच्या लोकसंख्येच्या २ टक्के प्रमाणात जरी इच्छेने रक्तदान केले तर रक्तपेढीत कधीच रक्ताचा तुटवडा जाणवणार नाही किंवा रक्ताच्या एका थेंबावाचून कुणाचे प्राण जाणार नाहीत. मानवाने आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कितीही प्रगती केली तरी कृत्रिमपणे रक्त तयार करता येत नाही. मानवाला फक्त मानवाचेच रक्त चालते, म्हणून रक्तदान ही अमूल्य सेवा आहे.रक्तदान श्रेष्ठदान असे म्हटल जाते. कारण तुमच्या रक्तदानाने कुठल्या गरजू व्यक्तीचे प्राण वाचवले जाऊ शकते.आजकाल ऐच्छिक रक्तदानाने वाढदिवस साजरा करण्याची जीवनशैली बरेचसे युवक अंगीकार करीत आहेत. मित्रमंडळीसमवेत शासकीय रक्तपेढीत जावून रक्तदानाने म्हणजेच जीवनदान देवून वाढदिवस साजरा होत आहे. रक्तपेढीत ‘बर्थ डे डोनर्स क्लब'ची संकल्पना रुजवत आहे. अनेक जण विचार करतात की आम्ही रक्तदान का करावे, त्याने आम्हाला काय फायदा होणार? रक्तदानाचे फायदे पाहता तुम्ही स्वतःहून नियमितपणे रक्तदान कराल.नियमित स्वरुपात रक्तदान केल्यास अतिरिक्त लोह नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.त्यामुळे शरीरातील आर्टरी ब्लॉकेज कमी होतो. त्यामुळे रक्तदान करणाऱ्यामध्ये हार्ट अटॅकचा धोका ८८ टक्क्यांनी कमी होऊन जातो.
नियमित रक्तदान करणारे लोक खूप कमी प्रमाणात दवाखान्यात भर्ती होत असतात. राक्तदात्याला हार्ट अटॅक, हार्ट स्ट्रोक आणि कॅन्सर सारखे आजार होण्याची शक्यता फार कमी असते.जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर ते तुम्ही रक्तदान करून देखील करू शकता. रक्तदान हे फिट राहण्यासाठी एक योग्य आणि सुरक्षित पर्याय ठरू शकतो. एका वेळी रक्तदान केल्याने शरीरातील ६५० कॅलरीज कमी होतात, त्यामुळे जर तुम्ही दर तीन महिन्याला रक्तदान केले तर तुमच्या किती कॅलरीज कमी होतील पहा.रक्तदानामुळे कॅलरीज बर्न होतात आणि वजन घटण्यासही मदत होऊ शकते. शरीरात लाल रक्तपेशींचा स्तर योग्य प्रमाणात येण्यासही मदत होते. यादरम्यान, पौष्टिक आहार आणि नियमित व्यायाम करुन वजन नियंत्रण आणले जाऊ शकते. पण म्हणून वजन कमी करण्यासाठी रक्तदान करणे हा योग्य मार्ग ठरू शकत नाही. रक्तदानाची प्रक्रिया केवळ निरोगी आरोग्य राखण्याचे माध्यम आहे, वजन घटवण्याच्या योजनेतील हिस्सा नाही. ,रक्तदानाआधी तुमचे चेक-अप केल्या जाते. ज्यामध्ये तुमच्या शरीराचे तापमान, पल्स रेत, ब्लड प्रेशर आणि हिमोग्लोबिन इत्यादीची तपासणी केली जाते. त्यानंतर रक्त टेस्ट साठी पाठवले जाते, ज्यामध्ये तुमच्या रक्तावर १३ वेगेवेगळे टेस्ट केले जातात. त्यामुळे जर तुम्हाला कुठला आजार झाला असेल, किंवा तुमच्या शरीरात कशाची कमी असेल तर ते तुम्हाला लगेचच कळत ई तेही फ्री.आपल्या शरीरात ५ ग्राम एवढे Iron असते. Iron जास्तकरून रेड ब्लड सेल्स आणि बोन मॅरोमध्ये असते. जेव्हा तुम्ही रक्तदान करता तेव्हा १/४ एवढे Iron निघून जाते. पण ह्या Iron ची कमतरता एका आठवड्यात तुमच्या जेवणातून भरून निघते. त्यामुळे शरीरातील Iron चे संतुलन बनून राहते. तसेही शरीरात जास्त Iron ब्लड वेसल्स साठी हानिकारक असते.
एका व्यक्तीच्या रक्ताने तीन लोकांचा जीव वाचवला जाऊ शकतो. रक्तदान प्रक्रियेमध्ये रक्तदानापूर्वी तुमचे रक्त आणि आरोग्याची वैद्यकीय तपासणी केली जाते. रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी तपासली जाते, संसर्ग, आजारांची तपासणी केली जाते. रक्तचाचणीद्वारे एखादी व्यक्ती रक्तदान करण्यास सक्षम आहे की नाही, याची माहिती मिळते.मग आता जर आपले रक्त दान केल्याने इतरांना तसेच आपल्यालाही फायदा होत असेल तर रक्तदान का करू नये…
=========================
🥀ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🎖 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव 🎖
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
. ϻÃĤĮŤĮ