शिक्षकांनी गुणवत्तेत तडजोड करू नये- मा.खास.निवेदिता माने
______________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
______________________________
दि १३ फेब्रुवारी
शिक्षक हा देशाचा कणा असून, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासह संस्कार देण्याची वेगळी व्यवस्था निर्माण करावी, असे आवाहन माजी खासदार निवेदिता माने यांनी केले.मिणचे ताा.हातकणंगले येथील आनंदगंगा शिक्षण प्रसारक मंडळ च्यावतीने आयोजित "आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान" कार्यक्रम वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या.
अतिग्रे येथील संजय घोडावत शैक्षणिक संकुलाच्या आवारात हा कार्यक्रम पार पडला.
मा.खास. माने वहिनी यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त शिक्षकांना गौरवण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. चे शिक्षण सभापती प्रविण यादव हे होते.
मा.खास.माने म्हणाले,'समाज घडविण्याचे काम शिक्षक करत असतो. विद्यार्थ्यांना इतरांना बरोबर घेऊन कसे जावे, त्याचे शिक्षण त्यांनी द्यायला हवे. पुढील पिढी शिक्षणातून घडणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी गुणवत्तेत कमी करता कामा नये.
प्रविण यादव म्हणाले,तानाजी पोवार यांनी माणसे जोडण्याचे काम केले. प्रतिकूल परिस्थितीशी झगडणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात पोवार कुटुंब कमी पडलेले नाही.
आज (शनिवारी) झालेल्या कार्यक्रमाला हातकणंगले पं. समिती चे सभापती डॉ. प्रदिप पाटील,उपसभापती राजकुमार भोसले,संजय घोडावत पॉलिटेक्निकचे प्राचार्य विराट गिरी,ट्रस्टी विनायक भोसले,शिक्षक संघाचे राजाराम वरूटे,उपस्थित होते.
आनंद गंगा फौंडेशनचे संस्थापक तानाजी पोवार आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,शिक्षकाने अनेक नेते घडविले. डॉक्टर, अभियंते, वकिल निर्माण केले. शिक्षक विद्यार्थ्यांना आपली संपत्ती मानतात. शिक्षकांमुळेच आपणाला दिशा मिळते. आई-वडिलांपेक्षा सर्वात जास्त काळ विद्यार्थ्यांचा शिक्षकांसोबत व्यथित होतो. शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्याला घडवितात. समाजात शिक्षकांचा आगळ-वेगळ स्थान आहे.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक, सामाजिक,उद्योग व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.

माजी खासदार निवेदिता माने यांना नुकतिच अमेरिका युनिव्हर्सिटीची डॉक्टरेट मिळाली असल्याचे आजच समजले.त्याचे आौचित्य साधुन कार्यक्रमात तानाजी पोवार सर यांच्या पत्नी सौ.वांसती पोवार यांच्या हस्ते माने वहिनिंचा सत्कार करणेत आला.-9890875498