Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

विदर्भ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विदर्भ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, जून १०, २०२३

विदर्भातील या जिल्ह्यात पाऊस  | Monsoon Arrives in Kerala

विदर्भातील या जिल्ह्यात पाऊस | Monsoon Arrives in Kerala


अमरावती, नागपूर, यवतमाळ ,भंडारा, वर्धा येथे तुरळ ठिकाणी आगामी काही तसेच  कडकडाटसह वादळ आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात अद्याप मान्सून दाखल झाला नसला तरीही अनेक जिल्ह्यात मान्सुन पाऊस बरसत आहे, तर पूर्व विधार्भात देखील आज ढगाळ वातावरण राहून भंडारा जिल्ह्यात #पाऊस बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला होता.

एक आठवड्याच्या विलंबानंतर मान्सून गुरुवारी केरळमध्ये दाखल (Monsoon Arrives in Kerala) झाला असून, जूनच्या तिसऱ्या आठवड्यात मान्सून विदर्भात दाखल होण्याची शक्यता आहे.

८ जुलैपर्यंत मान्सून संपूर्ण देशात सक्रिय होणार आहे. आज ८ जून रोजी विदर्भात सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे  होते. नऊ जून रोजी  विदर्भामध्ये अमरावती, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर आणि गडचिरोली मध्ये ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दहा जून रोजी अमरावती, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली मध्ये ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

नऊ जून रोजी अमरावती, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी विज कडकडाट आणि सोसाट्याचा वारा ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास राहण्याची शक्यता आहे. दहा जून अमरावती, वाशिम, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया मध्ये विजांच्या  कडकडाट आणि सोसाट्याचा वारा ताशी 30 ते 40 किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. विदर्भात पुढील पाच दिवस कमाल तापमानात मोठी वाढ होणार नाही. 


मॉन्सूनची केरळमध्ये दाखल होण्याची नेहमीची तारीख एक जून अशी असते. मात्र, यंदा एल निनोच्या प्रभावामुळे मॉन्सून बंगालच्या उपसागरातही मॉन्सून चार दिवस उशिरानेच दाखल झाला होता. मात्र त्यानंतर आलेल्या बिपोरजॉय या चक्रीवादळामुळे त्याच्या प्रगतीत अडथळा निर्माण झाला होता. अखेर गुरुवारी मॉन्सून केरळमध्ये सात दिवसांच्या उशीराने दाखल झाला. 

मंगळवार, एप्रिल १८, २०२३

विदर्भातील वातावरण बदलले;  30 ते 40 किलोमीटर प्रति तास हवेचा वेग असणार IMD  Maharashtra Weather Indian Meteorological Department

विदर्भातील वातावरण बदलले; 30 ते 40 किलोमीटर प्रति तास हवेचा वेग असणार IMD Maharashtra Weather Indian Meteorological Department

भारतीय हवामान विभाग (IMD) प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार विदर्भामध्ये पुढील पाच दिवसात पाऊस येण्याची शक्यता आहे. दीर्घ मुदतीच्या अंदाजानुसार विदर्भात 23 ते 29 एप्रिल दरम्यान हवामान स्थिती सरासरी पेक्षा जास्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.    Maharashtra Weather



चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात म्हणजेच 19 ते 23 एप्रिलदरम्यान आकाश अंशिक ढगाळ राहून 20 ते 23 एप्रिल रोजी एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे. दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 20 ते 22 एप्रिलदरम्यान एक दोन ठिकाणी वादळ वारा आणि हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  वादळ वारा होत असताना हवेचा वेग 30 ते 40 किलोमीटर प्रति तास असेल.  Indian Meteorological Department


भंडारा जिल्ह्यामध्ये 20 21 22 एप्रिल रोजी विधानसभा होऊन हलक्या स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस अंशतः आकाश ढगाळ राहून 19 ते 22 एप्रिल दरम्यान तृणक आणि एक दोन ठिकाणी अति हलके आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील चार दिवसात तुलक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याने पावसापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन देखील केले आहे. 


नागपूर जिल्ह्यामध्ये भारतीय हवामान विभागाच्या जिल्हास्तरीय अंदाजानुसार 19 ते 23 एप्रिल दरम्यान आकाश अंशिक ढगाळ राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीमध्ये हलक्यातील मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता देखील आहे. 


पुढील पाच दिवसांमध्ये कमाल तापमान 40° ते 41° अंशापर्यंत जाण्याची शक्यता असून, किमान तापमान 22° ते 23° अंशापर्यंत राहण्याची शक्यता आहे.  पुढील 48 तासांमध्ये विदर्भमध्ये कमाल तापमानामध्ये फारसा बदल होणार नाही. त्यानंतर पुढील तीन दिवसानंतर दोन ते चार अंशापर्यंत घट होईल. किमान तापमान पूर्व विभागामध्ये पाच दिवसांमध्ये कमाल तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही. मात्र पावसाचा अंदाज असल्याने गारपीट शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.  Indian Meteorological Department

मंगळवार, फेब्रुवारी २८, २०२३

यशस्वी कराटे खेळाडूंना बेल्ट व प्रमाणपत्र देऊन सन्मानित

यशस्वी कराटे खेळाडूंना बेल्ट व प्रमाणपत्र देऊन सन्मानित

महाराष्ट्र शासनाद्वारे आयोजित शालेय राज्य क्रीडा कराटे स्पर्धेमधे कू. ईश्वरी चंद्रशेखर कडू यांचा सत्कार


बोधी बुडोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य धामणगाव रेल्वे येथे आयोजित कराटे बेल्ट परीक्षा घेण्यात आली व उत्तीर्ण खेळाडूंना बेल्ट व प्रमाणपत्र वितरण धामणगाव रेल्वे येथे मोठ्या उत्सवात पार पडला स्थानिक तालुक्यात कराटे संस्कृती रुजवून तरुणांमध्ये आत्मरक्षन व बोधी बुडोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया संयुक्त विद्यमानाने 26 फेब्रुवारी 2023 रोजी कराटे बेल्ट परीक्षा घेण्यात आले.


या परीक्षेसाठी मुख्य परीक्षक भंते धम्मासार, कांबळे मुकेश कुमार पोलीस अधिकारी आदिलाबाद तेलंगणा ब्लॅक बेल्ट 7th दान व  सह मास्टर आकाश पवार ब्लॅक बेल्ट 4th दान व मास्टर प्रेम कुमार ब्लॅक बेल्ट 2nd दान  आदीलाबाद तेलंगणा . मास्टर राहुल सर ब्लॅक बेल्ट, मास्टर अंगरिश कांबळे ब्लॅक बेल्ट, संध्य्या पवार ब्लॅक बेल्ट, प्रतूषा चौहान ब्लॅक बेल्ट, अनुष्का ब्लॅक बेल्ट, दीपिका ब्लॅक बेल्ट  आदिलाबाद तेलंगणा, येथून आले होते .बोधी बुडोकान कराटे असोसिएशन महाराष्ट्र अध्यक्ष सचिन मून ब्लॅक बेल्ट 2nd दान  हे मुख्य प्रशिक्षक व सचिन चौधरी व मास्टर प्रतिभा नागलवाडे हे सुद्धा परीक्षक म्हणून उपस्थित होते. 

तब्बल सहा  तास चाललेल्या या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी आपले कराटे कला व प्रात्यक्षिक सादरीकरण केले. उपस्थित उद्घाटन प्रसंगी प्रमुख उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष भंते धम्मासार (महाराष्ट्र चीफ) भारतभाऊ चिकाटे (माजी सैनिक ) कुंभारे साहेब  (सामजिक कार्यकर्ते )व संचालन सूत्र अद्वैता वैद्य व सोनाली गुप्ता यांनी केले . प्रमुख पाहुणे यांनी दीप प्रज्वल करून कार्यक्रमाची सुरुवात केली व त्यांच्या हस्ते बोधी बुडोकान कराटे धामणगाव रेल्वे ची विद्यार्थ्यांनी कू. ईश्वरी चंद्रशेखर कडू राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धे बारामती पुणे येथील  तीने  दुतीय क्रमांक पटकावला. व नॅशनल चॅम्पियनशिप  KCR कप  हैद्राबाद, ऑनलाइन काता मधे धामणगाव रेल्वे तिल कराटे चमू कू. रुकया बोहरा गोल्ड मेडल, साक्षी अतलकर गोल्ड मेडल, सुहानी कोडमकर गोल्ड मेडल, व धर्य नागलवाडे यांना सुद्धा बेल्ट व गोल्ड मेडल देऊन  यांना शाल व पुष्प गुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. समापन प्रसंगी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते बेल्ट व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले . व पाहुण्यांचे आभार प्रदर्शन सौ .प्रतिभा नागलवाडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वी साठी सचिन चौधरी सर, प्रफुल बारसे सर , शिलानद झामरे , व सर्व बोधी बुडोकान कराटे च्या टीम ने प्रयत्न केले.

शुक्रवार, फेब्रुवारी २४, २०२३

आर्थिक विवंचनेतून शिवसेना नेत्याची आत्महत्या | ShivSena leader commits suicide due to financial issue

आर्थिक विवंचनेतून शिवसेना नेत्याची आत्महत्या | ShivSena leader commits suicide due to financial issue




प्रतिनिधी
प्रदीप झूटी/ कारंजा घाडगे
कारंजा तालुक्यातील
आजनादेवी येथील शेतकरी माजी सरपंच माजी पंचायत समिती सदस्य, शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते विष्णू तेजरावजी खवशी वय 49 यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा मुलगी म्हातारे आई-वडील आहे त्यांची मुलगी सीएच्या अंतिम वर्षाला आहे त्यांच्याकडे 25 एकर शेती आहे..


विष्णू खवशी यांनी आजनादेवी येथे पाच वर्ष सरपंच असताना गावाच्या विकासात्मक योजना राबवून गावाचा विकास केला त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्य असतानी योग्य त्या प्रकारे आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता.



गेल्या दोन वर्षांपूर्वी भारतीय स्टेट बँक शाखा कारंजाचे जवळपास 32 लाख रुपये त्यांच्यावर कर्ज होते त्यानंतर त्यांनी नऊ लाखांमध्ये हे कर्ज सेटलमेंट केले त्यानंतर भारतीय स्टेट बँक शाखा कारंजांनी पुन्हा त्यांना 2022 मध्ये पाच लाखाचे कर्ज दिले मुला मुलीचे शिक्षण शेतीला लागणारापैसा यामुळे ते सतत आर्थिक विवच्यनेत राहत असत सेटलमेंट करण्यासाठी त्यांनी नऊ लाख रुपये बँकेत जमा केली होती ती खाजगी सावकाराकडून घेतले असल्याचे बोलले जात आहे त्याचप्रमाणे शेतीमध्ये सतत नापिकी असल्यामुळे शेतात लागलेला खर्च सुद्धा दोन वर्षापासून येऊ शकला नाही त्यामुळे त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपविले..विष्णू खवशी यांच्या अकस्मित निधनाने आजनादेवी येथे मोठी शोक कळा पसरलेली आहे त्यांच्या मृत्यूने सगळीकडे हळहळ व्यक्त करत आहे.

ShivSena leader commits suicide due to financial issue



निष्ठावान शिवसैनिक हरपला
कारंजा तालुक्याच्या दृष्टिकोनातून त्याचप्रमाणे ग्रामीण भागातून माजी सरपंच तसेच माझी पंचायत समिती सदस्य यांच्या कार्यकाळात त्यांनी गावाच्या विकासात्मक दृष्टिकोन ठेवून गावाच्या प्रगतीसाठी ते सतत कार्यरत असायचे शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी ती सतत झटत असायचे राष्ट्रीय महामार्गाचा चक्काजाम असो की महावितरण कार्यालयावर बंडी बैलाचा धडक मोर्चा असो यामध्ये यांचा मोठा सहभाग होता विष्णू पाटलांच्या मृत्यूमुळे शिवसेनेचे मोठे नुकसान झाले आहे ते कधीच भरून न येण्याजोगे आहे
संदीप भिसे
शिव सेना माजी तालुका संघटक कारंजा

बुधवार, फेब्रुवारी २२, २०२३

नक्षलवाद्यांनी जंगलात लपवून ठेवलेल्या 02 रायफली जप्त  Naxalites

नक्षलवाद्यांनी जंगलात लपवून ठेवलेल्या 02 रायफली जप्त Naxalites

नक्षलवाद्यांनी जंगलात लपवून ठेवलेल्या 02 रायफली गडचिरोली पोलीस दलाने केल्या हस्तगत

Naxalites  



नक्षलवाद्यांच्या घातपाती कारवायांवर प्रतिबंध घालण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचे नक्षलविरोधी अभियान तीव्र केले आहे. टीसीओसी कालावधीत नक्षलवाद्यांकडून देशविघातक कृत्यांना वेळीच आळा घालण्याच्या दृष्टीने पोलीसांकडून प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात येत असून, आज गडचिरोली पोलीस दलाने नक्षलवाद्यांनी जंगल पुरुन ठेवलेल्या २ रायफली जप्त केल्या.

सविस्तर वृत्त असे की, दिनांक २१/०२/२०२३ रोजीचे सकाळी १०:०० वा. चे सुमारास उपविभाग पेंढरी अंतर्गत पोस्टे जारावंडो हददीतील जंगल परिसरात मिळालेल्या गोपनिय खबरीच्या आधारे गडचिरोली पोलीस दल, सिआरपीएफ व एसआरपीएफ चे अधिकारी व जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना नक्षलवाद्यांनी जंगलात लपवून ठेवलेल्या ०२ रायफली हस्तगत केल्या. हस्तगत करण्यात आलेल्या रायफलीत ०१ सिंगल बॅरल १२ बोअर रायफल व ०१ एसएसआर रायफलचा समावेश आहे. naxalites in gadchiroli


सदर अभियान पोलीस अधीक्षक नीलोत्पल अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि सुजीतकुमार चव्हान, प्रभारी अधिकारी पोस्टे जारावंडी, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पोनि, धर्मेंद्र कुमार व राज्य राखीव पोलीस दलाचे पोउपनि श्री. कांदळकर व जवान यांनी यशस्वीरित्या पार पाडले. naxalites in gadchiroli



सोमवार, फेब्रुवारी २०, २०२३

एक दिवसीय पत्रकार प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद | Smile Foundation and Vani Bahuguni News Portal

एक दिवसीय पत्रकार प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद | Smile Foundation and Vani Bahuguni News Portal

वणी, चंद्रपूर, मारेगाव, मुकुटबन येथील नवोदित पत्रकारांना केले मार्गदर्शन


स्माईल फाऊंडेशन व वणी बहुगुणी न्युज पोर्टलतर्फे (Smile Foundation and Vani Bahuguni News Portal) येथील वसंत जिनिंग सभागृहात आयोजित एक दिवसीय पत्रकार प्रशिक्षण शिबिराला नवोदित पत्रकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात वणी, मारेगाव, झरी तालुक्यासह पांढरकवडा व चंद्रपूर येथील सुमारे 60 शिबिरार्थी सहभागी झाले होते. शिबिराचे उद्घाटन माजी आमदार वामनराव कासावार यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष हे वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे होते.


कार्यक्रमाला प्रा. दिलिप अलोणे, वसंत जिनिंगचे संचालक प्रकाश म्याकलवार, घनश्याम निखाडे, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर देवानंद साखरकर, डॉ. महेंद्र लोढा, पत्रकार संतोष कुंडकर, प्रेस वेलफेअर असोशियसनचे तुषार अतकरे, दर्पण पत्रकार संघाचे अध्यक्ष जब्बार चिनी, जागृत पत्रकार संघटनाचे संदीप बेसरकर, न्यूज मीडिया असोशियसनचे दीपक छाजेड, पत्रकार सुनील पाटील, गजानन कासावार, परशुराम पोटे, गजानन कासावार, सुशील ओझा, सुरज चाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. दोन सत्रात आयोजित या कार्यशाळेत यवतमाळ येथील ज्येष्ठ पत्रकार अंकुश वाकडे, दिनेश गंधे, चंद्रपूर येथील डिजिटल मीडिया तज्ज्ञ देवनाथ गंडाटे यांच्यासह, श्रीवल्लभ सरमोकदम, जब्बार चीनी, जितेंद्र कोठारी, निकेश जिलठे यांनी उपस्थित शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन केले. Digital Media Publisher Newsportal Editor Training workshop 



उद्घाटन प्रसंगी बोलताना वामनराव कासावार यांनी देशातील आजची पत्रकारिता यावर भाष्य करत आजच्या काळात पत्रकारांनी नि:पक्ष पत्रकारिता करून लोकशाही मजबूत करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात आशिष खुलसंगे यांनी पत्रकार हा समाजाचा आरसा असून पत्रकारांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून पत्रकारिता केली तर समाज सुधारणा आणि विकासाला बळकटी मिळेल असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात निकेश जिलठे यांनी पत्रकारितेची ओळख व बातमी लेखन या विषयावर तर श्रीवल्लभ सरमोकदम यांनी बातमीतील भाषा, न्यूज ऍन्गल या विषयावर मार्गदर्शन केले. शोध पत्रकारिता या विषयावर जब्बार चीनी यांनी मार्गदर्शन केले.
Digital Media Publisher Newsportal Editor Training workshop 

दुस-या सत्रात दिनेश गंधे यांनी गेल्या 30 वर्षांत पत्रकारितेत होणारे बदल, बातमी करताना येणारी विविध आव्हाने या विषयावर खुमासदार शैलीत मार्गदर्शन केले. तर अंकुश वाकडे यांनी जगभरातील पत्रकारितेचा थोडक्यात आढावा घेत बातमीचा सोर्स, व्यावसायिक पत्रकारिता यावर भाष्य केले. देवनाथ गंडाटे यांनी डिजिटल मीडियाचे आजचे स्वरूप व त्यासाठी उपयोगात येणारे विविध टुल्स याची माहिती शिबिरार्थ्यांना दिली.




पत्रकार प्रशिक्षण शिबिरासाठी आलेल्या पाहुण्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शिबिरात सहभागी सर्व शिबिरार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सागर जाधव यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितेंद्र कोठारी यांनी केले. उपस्थितांचे आभार तन्मय कापसे यांनी मानले. (Digital Media Publisher Newsportal Editor Training workshop)



कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अतुल डफ, अभिलाष राजूरकर यांच्यासह स्माईल फाउंडेशनचे पीयूष आत्राम, आदर्श दाढे, विश्वास सुंदरानी, उत्कर्ष धांडे, खुशाल मांढरे, अनिकेत वासरिकर, रोहित ओझा, कुणाल आत्राम, प्रेम बावणे, रुद्राक्ष, कनाके, राज भरटकर, मनीष मिलमिले, आकाश राजूरकर, घनश्याम हेपट यांनी परिश्रम घेतले.

शनिवार, फेब्रुवारी १८, २०२३

प्रतापगड यात्रेत नवेगावबांध येथील एका महिला भाविकेचा मृत्यू.

प्रतापगड यात्रेत नवेगावबांध येथील एका महिला भाविकेचा मृत्यू.

कुंभरे कुटूंबियांवर शोककळा. प्रभाबाईच्या दुर्दैवी निधनाने हळहळले नवेगावबांधवाशी.




संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.१८ फेब्रुवारी:-
प्रतापगड यात्रेत महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भगवान श्री शंकराच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या नवेगावबांध येथील एका भाविक महिलेचे दुर्देवी निधन झाले.मृतक महिलेचे नाव प्रभाबाई नीलकंठ कुंभरे (वय ५२वर्षे)असे आहे.यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुखद घटना महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर प्रतापगड यात्रेत घडली.
नवेगावबांध येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नीलकंठ कुंभरे यांच्या पत्नी प्रभाबाई वय ५५ वर्षे यांचे आज प्रतापगड यात्रेत दुःखद निधन झाले. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर त्यांचे दुःखद निधनाने कुंभरे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.त्या ग्रामपंचायत सदस्य विजय कुंभरे यांच्या मातोश्री आहेत.ही दुर्दैवी घटना दुपारी ३.०० वाजेच्या दरम्यान घडली. प्रभाबाई यांच्या दुर्देवी निधनाने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.यात्रेदरम्यान एखाद्या भाविकांचा मृत्यू व्हावा .ही प्रतापगड यात्रेतील पहिलीच घटना आहे,असे सांगितले जाते. मृतक प्रभा ह्या  प्रतापगड यात्रेत सहभागी झाल्या.त्या वर गडावर चढत होत्या. वाटेत त्यांच्या लहान मुलाच्या दुकानात विश्रांती घेतली. पुढे प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या प्राचीन शिव मंदिरात श्री भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी जायला निघाल्या त्या उभ्या राहिल्या बरोबर समोर अचानक भोवळ येऊन खाली जमिनीवर कोसळल्या. पडल्या त्यांचा त्याच क्षणी मृत्यूझाला असा अंदाज आहे.प्रतापगड यात्रेत त्या कोसळल्या त्या वेळेस त्याचे जवळ त्याचा लहान मुलगा वैभव सोबत होता.
त्या भोले शंकराचे दर्शन घेण्यासाठी प्राचीन मंदिरात वर टेकडीवर जात असताना, सीतेच्या न्हानीजवळ पोहोचल्या असता,अचानक भोवळ येऊन  खाली पडल्या. त्यांच्यासोबत असणाऱ्यांनी तसेच यात्रेकरूंनी त्यांना नजीकच असलेल्या आरोग्य विभागाच्या आरोग्य शिबिरात उपचारासाठी नेले. तिथे उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतक प्रभा यांना मृत घोषित केले. त्यांचे प्रेत ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले. नवेगावबांध पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.त्यांच्यावर उद्या दि.१९ फेब्रुवारी रोज रविवारला सकाळी १०.०० वाजता स्थानिक स्मशान घाटावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

शुक्रवार, फेब्रुवारी १७, २०२३

सौंदड गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा.

सौंदड गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा.




संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.१६ फेब्रुवारी:-
श्री साईबाबा गजानन धाम सौंदड रेल्वे येथे गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त पालखीचे दर्शन,भजन,गोपालकाला व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाला माजी सामाजिक न्यायमंत्री व पालकमंत्री राजकुमार बडोले, पोलिस निरीक्षक आर.के.सिंगनजुडे, सरपंच हर्ष विनोदकुमार मोदी,जि.प.सदस्या निशा तोडासे,पं.स.सदस्या वर्षा चरण शहारे,जि.प.सदस्या कविता रंगारी, माजी जि.प.सदस्या रुपाली टेंभुर्णे,माजी पं.स.सदस्या मंजूर डोंगरवार,सदूभाऊ विठ्ठले,शुभम जनबंधू, खुशाल ब्राम्हणकर,रंजना भोईर,प्रमिला निर्वाण,शोभा चोपकर व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.यावेळी नवनिर्वाचित सरपंच हर्ष विनोदकुमार मोदी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे संचालन वाय.जी.बेंदवार व आभार प्रकाश ऊरकुडे यांनी केले.

गुरुवार, फेब्रुवारी १६, २०२३

सावरटोला येथे 19 फेब्रुवारीला शिवजन्मोत्सवाचे भव्य आयोजन.

सावरटोला येथे 19 फेब्रुवारीला शिवजन्मोत्सवाचे भव्य आयोजन.



संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.१६ फेब्रुवारी:-
नवयुवक सार्वजनिक छत्रपती शिवाजी राजे मंडळ सावरटोला बोरटोला, उमरी यांच्या वतीने 19 फेब्रुवारी रोज रविवारला सकाळी दहा वाजता श्री छत्रपती शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०.०० वाजता ध्वजारोहण व मानवंदना दुपारी ३.०० वाजता गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.सायंकाळी ७.०० वाजता मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच युवराज तरोणे हे राहणार असून,सोहळ्याचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांच्या शुभहस्ते होणार आहे.तर पाहुणे म्हणून, गोंदिया जिल्हा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुनील तरोणे, प्राध्यापक शिवरकर,मुख्याध्यापक एस.एस.टेंभुर्णे, मुख्याध्यापक आर. के.कापगते, मुख्याध्यापक लांजेवार, रंगारी,एस. व्ही. बडोले, उपसरपंच सुवर्णा तरोणे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष सरिता मेश्राम,उपाध्यक्ष सेवदास मेश्राम,पोलीस पाटील शंकर तरोणे, आदी प्रभुती उपस्थित राहणार आहेत. सदर शिवजन्मोत्सव सोहळ्याला नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष प्रवीण शिवणकर, उपाध्यक्ष प्रवीण वलथरे,महेश तरोणे, सचिव गजेंद्र तरोणे, महेंद्र शिवणकर, विवेक नारनवरे,यशपाल डोये, मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांनी एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे केले आहे.
सौंदड येथे सेवालाल महाराज जयंती साजरी.

सौंदड येथे सेवालाल महाराज जयंती साजरी.




संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.१६ फेब्रुवारी:-
सडकअर्जुनी येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय सौन्दड येथे थोर समाजसुधारक,जगद्गुरू श्रीसंत सेवालाल महाराज यांची २८४वी जयंती साजरी करण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एन. भीमटे यांनी श्रीसंत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले व त्यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. ज्येष्ठ शिक्षक ए.एस.बोरकर यांनी मार्गदर्शन करतांना बंजारा समाजाचे धर्मगुरू संत शिरोमणी सेवालाल महाराज यांनी सर्व मानव जातीला प्रेमाने राहायला शिकवले तसेच त्यांचे विचार संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे होते असे मत व्यक्त केले.यावेळी विद्यालयातील शिक्षक जे.एस.मोटघरे,ए.आर.कापगते, एस.आर.रामटेके,एल.बी.रहांगडाले,एम.जी.कोहळे शिक्षिका डी. एम.तुरकर,हिना बोरकर,
एन.एम.मांडारकर,अश्विनी डोंगरवार,प्रतिभा बाकडे उपस्थित होते.

बुधवार, फेब्रुवारी १५, २०२३

सौंदड येथे  महिला मेळावा व मार्गदर्शन  शिबिर संपन्न.

सौंदड येथे महिला मेळावा व मार्गदर्शन शिबिर संपन्न.




संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.15 फेब्रुवारी:-
आज दिनांक 15/02/2023 ला रोज बुधवार ला सकाळी 11:00  वाजता सौंदड ग्रामपंचायत आणि महिला व बालविकास यांच्या संयुक्त सौजन्याने भव्य महिला मेळावा व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उदघाटक   सौ.सविताताई पुराम सभापती जि. प. गोंदिया, 
सहउदघाटक  सौ.निशाताई तोडासे सदस्य जि.प. गोंदिया, कार्यक्रमाचे अध्यक्ष हर्ष विनोदकुमार मोदी सरपंच ग्रामपंचायत सौंदड, 
दिपप्रज्वलक  सौ. वर्षाताई शहारे सदस्य पं. स.सदस्य सडक अर्जुनी,  डॉ.रूखीराम वाडई सदस्य पं. स.सदस्य सडक अर्जुनी, सौ. रुपालीताई टेंभुर्णे माजी जि. प. सदस्य,, सौ भावणाताई यावलकर 
निखिल मेश्राम सरपंच ग्रां.पं. बोपाबोडी ,
सौ. भूमिका बाळबुद्धे   सरपंच ग्रां.पं.घाटबोरी,
 नितीश गुरणुले सरपंच ग्रां.पं. तिडका ,
 माधोराव तरोणे सरपंच ग्रां.पं. बाम्हणी ,
सौ.लता गहाने  सरपंच ग्रां.पं. फुटाळा 
 सौ. रंजना भोई ग्रामपंचायत सदस्य सौंदड,
 सौ. शुभम जनबंधू ग्रामपंचायत सदस्य सौंदड,
सौ. प्रमीला निर्वाण ग्रा.प. सौंदड, सौ. सुषमा राऊत ग्रा.प. सौंदड,.  सौ.रीता राऊत काणूनी कलाकार
सौ.निशा कोरे कृषी सखी ,सौ.अर्चना नंदेश्वर बँक सखी, सौ.किरण भुमके बचत गट सखी,  सौ. ॲड. रिता राऊत,सौ.रेखा राउत, सौ.योगेश्वरी निर्वाण,  सौ. एन.बी.बक्त पर्यवेक्षिका ,
सौ.अर्चना डोंगरवार , आरोग्य सेविका व अंगणवाडी सेविका महिला व बालक व पालक व गावातील मंडळी मोठ्या संख्येने ह्या कार्यक्रमात उपस्थित झाले.

मंगळवार, फेब्रुवारी १४, २०२३

कालीमाती येथे १७ फेब्रुवारी ला भव्य खंजेरी भजन स्पर्धा | १८ ला महाप्रसाद

कालीमाती येथे १७ फेब्रुवारी ला भव्य खंजेरी भजन स्पर्धा | १८ ला महाप्रसाद




संजीव बडोले प्रतिनिधी/नवेगावबांध दि.१४ फेब्रुवारी:-

श्री गणेश सत्संग भजन मंडळ कवठा, जय कोकणाई माता महिला भजन मंडळ कवठा,कालीमाती हनुमान मंदिर देवस्थान समिती सुकळी खैरी, ग्रामपंचायत गोठणगाव, प्रतापगड, बाराभाटी, कुंभीटोला, देवलगाव,कवठा,येरंडी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या दिनांक १७ फेब्रुवारी रोज शुक्रवारला सायंकाळी ७.०० वाजता हनुमान मंदिर कालीमाती परिसर येथे भव्य खंजिरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.


स्पर्धेचे उद्घाटन अर्जुन मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे, गोंदिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष यशवंत गणवीर यांच्या शुभहस्ते होणार असून,माजी जिल्हा परिषद सदस्य व खोडशिवनी ग्रामपंचायतचे सरपंच गंगाधर परशुरामकर हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. अर्जुनी मोरगाव पंचायत समितीचे उपसभापती होमराज पुस्तोडे, गोंदिया जिल्हा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुनील तरोणे हे पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेत प्रथम क्रमांक दहा हजार रुपये, द्वितीय क्रमांक सात हजार रुपये, तृतीय क्रमांक पाच हजार रुपये रोख विजेत्या मंडळांसाठी राखून ठेवण्यात आले आहेत. 

तसेच पुरुष महिला गायक तबलावादक हार्मोनियम वादक यांच्यासाठी प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार आहे. पुजारी केवळराम कांबळे व कवठा पोलीस हरिचंद मेश्राम यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. दिनांक 18 फेब्रुवारी रोजी शनिवारला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या भव्य खंजिरी भजन स्पर्धेला भजन मंडळांनी व भक्तांनी उपस्थित राहावे.असे आवाहन आयोजका च्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

सोमवार, फेब्रुवारी १३, २०२३

अल्ट्राटेक सिमेंट कंपनीतील भरतीसंदर्भातील मोठी बातमी  | Ultratech Cement Company Recruitment

अल्ट्राटेक सिमेंट कंपनीतील भरतीसंदर्भातील मोठी बातमी | Ultratech Cement Company Recruitment

गदारोळ होण्याची शक्यता..
भरती प्रक्रिया संशयाचा भोवऱ्यात..

अल्ट्राटेक सिमेंट कंपनीतील भरतीसंदर्भातील मोठी बातमी  | Ultratech Cement Company Recruitment

चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील सिमेंट उद्योगा पैकी नामांकित कंपनी म्हणून ओळख असलेली अल्ट्राटेक सिमेंट कंपनी (UltraTech Cement The Engineer's Choice: India's No 1 Cement) लोडर भरती प्रक्रिय सदर्भात झालेल्या घोळामुळे कंपनीचा लोडर कमागरा मध्ये असंतोष पसरला असून गदारोळ होण्याची शक्यता कामगारा कडून वर्तविली जात आहे.


अल्ट्राटेक सिमेंट कंपनी मध्ये कार्यरत असलेल्या लोडर यांचा मुलांना लोडर मध्ये सामावून घेण्याचे आदेश कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी अधिकारी यांनी दिले होते. जुलै महिन्यात एकूण ६७ लोडर हे कामावरून निवृत्त झाले. लोडर भरती होवून आपला मुलगा ही लोडर कामावर जाणार या आशेवर निवृत्त लोडर कर्मचारी होते. परंतू कंपनीने पुन्हा वेगळा आदेश काढला की आता फक्त कामावर असलेल्या कामगाराचे मुले घेण्यात येईल. मात्र कामगाराचा कानालाही खबर न होवू देता अधिकारी यांनी ठेकेदारी पद्धतीने काम करीत असलेल्या व लोडर मध्ये काम करीत असलेल्या 30 मुलांची मेडिकल करून सरळ भरती करण्यात आली. हे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा परिसातील युवकांना माहीत न होता पुन्हा 30 मुलांची भरती घेतल्याने कामगार व युवकांमध्ये असंतोष पसरल्याचे दिसून येत आहे.

अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचा वरीष्ठ अधिकारी यांनी लोडर चा मुलांना कामावर घ्यायचे असे आदेश काढले होते. परंतू एक, दोन, नाही तर तब्बल तीन वेळ आदेश वेगवेगळे काढल्याने आणि कोणाचाही कानाला खबर न होता भरती प्रक्रिया राबवून सावरा सावर केल्याने कुठे तरी पाणी मुरतंय असा संशय कामगार मध्ये होता पुन्हा परत 30 मुलांना थांगपत्ता न लागत लोडर मध्ये घेतल्याने कुठे तरी पाणी मुरतंय असा संक्षय होवू लागला आहे.

लोडर कामा करिता जवळ पास अंदाजे 2500 हजार युवकांनी कागदो पत्राची जुळवा जुळव करून फॉर्म भरले. या पैकी ज्यांचे वडील लोडर मध्ये कार्यरत आहे तसेच निवृत्त व मयत झालेल्या मुलांची टेस्ट घेण्यात आली. परंतू काही मोजक्याच लोकांना मेडिकल टेस्ट ला बोलावून त्याची भरती करण्यात आली. लोडर कामा करिता मनुष्य शारीरिक दृष्ट्या सक्षम व धष्टपुष्ट असणे आवश्यक असले तरी भरती करतांना हे देखील बघितले नसून काही लोकांची अशीच भरती करण्यात आल्याचे दिसून येत आहे.  Ultratech Cement Company Recruitment

लोडर भरती प्रक्रियेत 30 युवकांना सामावून घेतल्याने लोडर कामगारा अमशे कल्लोळ माजला आहे. कोणत्या अटी व शर्तीवर भरती प्रक्रिया राबविण्यात आली याची कुणालाही कुणकुण नाही. तसेच वर्षानुवर्षे काम करणारे अनुभवी लोकांना सुध्दा डावलन्यात आल्याने कामगरा मध्ये असंतोष माजला असून भरती प्रक्रिया संशयाचा भोवऱ्यात असल्याची दिसून येत आहे.

आवाळपूर येथील काही कामावर असलेल्या परंतू त्यांचा अपघाती मृत्यु झालेल्या अशा कामगारांचा काही मुलांना अल्ट्राटेक कंपनी अधिकारी व पदाधिकारी यांचा समक्ष आश्वासन दिल्याचे कळते परंतू आता झालेल्या भरतीत देखील त्यांचा तोंडाला पाणी पुसले असल्याने त्या युवकामध्ये नाराजी सुरु उमटू लागला आहे. आश्वासन दिलेल्या मुलांना लोडर मध्ये न घेतल्यास आवाळपूर येथील युवक व रिपब्लिक पार्टी चा वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

(कंपनी चा एका वरिष्ठ अधिकारी व काही युनियन पदाधिकारी यांनी काही युवकांना हाताशी धरून सेटिंग करून त्यांचा कडून पैसे घेऊन भरती केल्याची खमंग चर्चा पंचक्रोशीत व कामगारा मध्ये सुरू आहे. यामुळे लोडर भरती प्रक्रिया ही संशयाचा भोवऱ्यात सापडली असल्याचे चित्र दिसून येत आहे.)  Ultratech Cement Company Recruitment

भरतीच्या निकषांविषयी युवकांमध्ये संभ्रम आहे. एका युनियन पदाधिकाऱ्याच्या व कंपनी अधिकाऱ्याच्या आर्थिक व्यवहार व वशिलेबाजीतून भरती करण्यात आली असून यासंदर्भात युवकांमध्ये प्रचंड रोष आहे. दहा वर्षापासून ठेकेदारीत काम करणाऱ्या कामगारांना डावलून दोन-तीन वर्षे काम करणाऱ्या ठेकेदारीतील आर्थिकदृष्ट्या सक्षम कामगारांची निवड करण्यात आली आहे. जे नियमाविरुद्ध आहे. भरती प्रक्रिया रद्द करुन नव्याने पारदर्शकपणे भरती करावी.
- आशिष देरकर
उपसरपंच ग्राम पंचायत बिबी



Which company makes UltraTech Cement?
UltraTech Cement Limited is the cement flagship company of the Aditya Birla Group. A USD 7.1 billion building solutions powerhouse, UltraTech is the largest manufacturer of grey cement, ready mix concrete (RMC) and white cement in India.

रविवार, फेब्रुवारी १२, २०२३

मुंबईत आदिवासी विकास केंद्र तत्काळ स्थापन करणार – खा. शरद पवार यांची घोषणा Adivasi Development Center Mumbai Sharad Pawar

मुंबईत आदिवासी विकास केंद्र तत्काळ स्थापन करणार – खा. शरद पवार यांची घोषणा Adivasi Development Center Mumbai Sharad Pawar



सामूहिक वनहक्क धारक वनवासी व इतर पारंपरिक निवासी गावांची राज्यस्तरीय परिषद

सेवाग्राम (वर्धा) / नागपूर : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे आदिवासी विकास केंद्र तत्काळ सुरु करू, अशी घोषणा जेष्ठ नेते मा. खा. शरद पवार (Sharad pawar) यांनी गांधी आश्रम, सेवाग्राम येथे केली.


ते रविवार, १२ फेब्रुवारी रोजी सामुहिक वनहक्क धारक आदिवासी व इतर पारंपारीक वननिवासी गावांच्या राज्यस्तरीय परिषदेला संबोधित करत होते. यावेळी मंचावर सामुहिक वनहक्क व उपजीविका या विषयासंदर्भात राज्य व देश पातळीवर कार्यरत असलेले जेष्ठ व अनुभवी श्री दिलीप गोडे, श्रीमती प्रतिभा शिंदे, ॲड. पूर्णिमा उपाध्याय, डॉ. किशोर मोघे, श्री. मोतीराम सयाम, श्री. अमित कळस्कर तसेच आ. अनिल देशमुख, माजी आमदार सुरेश देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

Adivasi Development Center Mumbai Sharad Pawar 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्याच्या विविध भागांतून आलेल्या ग्रामसभा सदस्यांनी विविध ग्रामगीते, स्फुर्तिगीते, भजने म्हंटली. त्यानंतर नियोजित वेळी महिला ग्रामसभा सदस्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी सामूहिक वनहक्क व उपजीविका या विषयासंदर्भातील ज्येष्ठ कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून जेष्ठ व आदरणीय नेते मा. खा. श्री शरद पवार यांनी आपल्या भाषणात सामुहिक वन हक्क आणि उपजीविका ग्रामसभा परिषदेसाठी गांधी आश्रम, सेवाग्रमची निवड केल्याबद्दल विदर्भ निसर्ग संरक्षण संस्था, विदर्भ व खान्देश उपजीविका मंच आदी संघटनांची प्रशंसा केली. शरद पवार म्हणाले की, जल, जंगल जमीन यांचे संवर्धन करणारा एकमेव घटक म्हणजे आदिवासी होय. राज्यातील विविध ग्रामसभांची शक्ती वाढली पाहिजे. तसेच आदिवासींचे जीवन समृद्ध करण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. यासाठी विदर्भ व राज्यातील संस्था व संघटना यांनी ग्रामसभेच्या प्रतिनिधी, भगिनी व कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला व खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण गावांची संकल्पना व नैसर्गिक साधनसंपत्तीवरती स्थानिकांचा अधिकार ही संकल्पना या संस्थांनी राबविली या शब्दांत विदर्भ आणि राज्यातील ग्रामस्थ या शब्दांत त्यांनी परिषदेच्या आयोजकांची स्तुती केली. पवार साहेब यांनी आपल्या भाषणात महात्मा फुलेंचे उदाहरण शेती व जंगल यासंदर्भातील उदाहरण देत त्यांनी सांगितलेली निती व शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्याचे स्वप्न आजही कसे संयुक्तिक आहे असे उदाहरणांसह सांगितले. ग्रामसभा ४० कोटींचा तेंदू, १५ कोटींचा महू, हिरडा, बेहडा यांसारखे काम विदर्भ ग्रामसभा महासंघ, विदर्भ निसर्ग संरक्षण संस्था यांसारख्या स्वयंसेवी संघटनांप्रमाणे सामुहिक वनहक्क आणि ग्रामस्थांच्या उपजीविकेसंदर्भातील कार्य राज्यस्तरावर उभे राहिले पाहिजे. तसेच या संघटनांचा एक संघ राज्यस्तरावर निर्माण झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.

या परिषदेत विदर्भ, खानदेश या विभागातील ग्रामसभा प्रतिनिधी व त्यांचेसोबत कार्यरत खोज, व्हीएनसीएस, जीएसएमटी, लोकसमन्वय प्रतिष्ठान, साकव, ग्राम आरोग्य, रिवॉर्ड, वननिकेतन, इश्यु, संदेश या संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. तसेच गडचिरोली, गोंदिया, चंद्रपुर, नागपूर, यवतमाळ, अमरावती, नंदुरबर, धुळे या जिल्ह्यातील सामुहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभांचे ७०० पेक्षा अधिक प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मंचावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी डॉ. दिलीप गोडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर सामुहिक वनहक्क,राज्यातील स्थिती, वन,जल व कृषी आधारित आदिवासी उपजिविका व आव्हाने यावर अॅड. पुर्णिमा उपाध्याय यांनी पॉवर पॉईंट सादरीकरण केले. त्यात त्यांनी सामुहिक वनहक्क व उपजीविका विषयासंदर्भात महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात झालेले काम आणि वर्तमान आव्हाने यांबद्दल माहिती दिली.

त्यानंतर मोतीलाल सयाम ( देवरी, गोंदिया), रामलाल काळे (अमरावती), पूजा भंगाळे (जळगाव-खान्देश-नंदुरबार) या ग्रामसभा सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्रतिभाताई शिंदे यांनी देखील ग्रामस्थांच्या सामुहिक वनहक्क व उपजीविका यासंदर्भात संबोधन केले. परिषदेच्या समारोपाला डॉ. किशोर मोघे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

Adivasi Development Center Mumbai : Sharad Pawar 

त्यानंतर ग्रामसभा सदस्यांच्या खुल्या चर्चासत्रात ग्रामसभा सदस्यांनी ग्रामसभांचे वन व जलसंधारण, उपजिविका, वनउपज व शेती यात झालेली विकास कामे, शासकीय योजनांचे अभिसरण, सामुहिक वनहक्क व उपजिविका, ग्रामसभांचे महासंघ व शासनासोबत सुसंवाद, यावर कार्य करतांना आलेल्या अडचणी व त्याकरीता करावयाची उपाययोजना यावर चर्चा करून निर्णय घेतले.

सोमवार, फेब्रुवारी ०६, २०२३

पाहुणे घेऊन जाणारे वाहन उलटले; 31 जण रुग्णालयात |  Accident brahmapuri Chandrapur

पाहुणे घेऊन जाणारे वाहन उलटले; 31 जण रुग्णालयात | Accident brahmapuri Chandrapur

वऱ्हाड घेऊन जाणारे वाहन उलटले; 31 जण रुग्णालयात | Lagnache warad, brahmapuri

ब्रम्हपुरी (Bramhapuri) : पाहुणे घेऊन जाणाऱ्या टेम्पो  चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो वाहन पलटून वाहनात बसलेले 31 जण जखमी झाले. यात आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी दोनच्या सुमारास ब्रम्हपुरी येथील टिळक नगर जवळ  घडली.  Accident brahmapuri Chandrapur 


प्राप्त माहितीनुसार, लाखांदूर तालुक्यातील भागडी येथे नातेवाईकांकडे नामकरण विधीचा कार्यक्रम असल्याने रणमोचन येथील दोनाडकर व आप्त परिवार हे
मालवाहक टेम्पो वाहनाने कार्यक्रमाला जात असताना ब्रम्हपुरी येथे बारई तलावाजवळ चालकाने गाडी थांबवली तिथे महेश दिघोरे नामक दुसरा चालकाने गाडी हाती घेतली. ब्रम्हपुरी येथिल टिळक नगर दत्त मंदिराजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सूटल्यामुळे गाडी उलटली.

वेळीच घटनास्थळा जवळील रहिवाशांनी पलटी वाहनाला उभे करून जखमींना वाहना बाहेर काढून उपचारारार्थ दवाखान्यात दाखल करण्यासाठी मदत केली.त्यात 31 जण जखमी झाले असून महिला व बालकांचा यात समावेश आहे.

सदर घटनेनंतर जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.जखमींवर ताबडतोब येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.खंडाळे डॉ. पटले डॉ नागमोती डॉ कामडी व त्यांच्या चमुनी प्रथमोपचार करून यातील गंभीर जखमींना रुग्णवाहिकेने गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारार्थ पाठविले.  Accident brahmapuri Chandrapur 

यावेळी ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अतुल देशकर, संभाजी ब्रिगेड चे जिल्हा उपाध्यक्ष जगदीश (मोंटू) पिलारे, ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके आणि पत्रकारांनी भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली.

गंभीर जखमींमध्ये प्रियंका दोनाडकर, प्रमिला भर्रे, रागिना बुराडे, जागृती दोनाडकर, योगिता दोनाडकर, अनुसया राऊत, ज्योत्सना बुराडे, आदेश बुराडे, आदीं असून गडचिरोली येथे जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. तसेच बाकी उर्वरीत जखमींवर ब्रम्हपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Lagnache warad, brahmapuri Maharashtra Vidarbha India chandrapur


नागपुरात स्वस्त फ्लॅट हवाय? Low Budget & Affordable Flats for Sale in Nagpur

नागपुरात स्वस्त फ्लॅट हवाय? Low Budget & Affordable Flats for Sale in Nagpur

 

Affordable Flats for Sale in Nagpur

Looking For #Flats in affordable price In #Nagpur?


Flats in Nagpur for Sale under 21 Lakhs 

 2 BHK Flat @ 21 Lac Onwards...

 Location :- Amravati Road

 Only 11000/- Booking Amount

* Sample flat ready

 

Highlights

 Amravati Highway only 200 meters

 Near Agrawal farmhouse

Near Amusement park

     Whatsapp/ Call Now : 91 7264982465

घरकुल बांधायचे आहे? Gharkhul Yojana | Awas Yojana

Amenities:- 

 Gated Community With CCTV Survillence 

 Water Supply 24 x 7 

 lift with Power Backup 

 High Speed Lift

 Garden &Children's Play Area

 24 x 7 Security

 Parking & Visitor’s Parking

 RERA Registered

 Loan From All Nationalised Bank

250 flats township 

G+4 building

 

On each floor 8 flat 

 

800sqft flat area each flat


  

Ready Apartments from

·    4 th floor 21 L

·    3 rd floor 22 L

·    2 nd floor 23L

·    1st floor 24 L

Whatsapp/ Call Now : 

 7264982465

Flats in Nagpur under 24 lakhs

Each available Properties for sale within this price range is known for its spaciousness, excellent location, access to natural light and for their proximity to Amrawati road.

Flats in Nagpur | शहरात घरकुल हवाय! मग, असा करा मोबाईलवरून अर्ज | Apply for a Gharkul Yojana From Mobile

Luxury apartments in Nagpur

Flats under 25 lakhs in Nagpur

Urgent flat for sale in Nagpur

शनिवार, फेब्रुवारी ०४, २०२३

सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ५८ वरून ६० वर्षे करा | खासदार बाळू धानोरकर यांची मागणी

सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ५८ वरून ६० वर्षे करा | खासदार बाळू धानोरकर यांची मागणी

MP Balu Dhanorkar
MP Balu Dhanorkar

चंद्रपूर :- केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ५८ वरून ६० वर्षे करण्यात यावी, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली.

नागपूर विभाग शिक्षक मतदार संघात आमदार सुधाकर अडबाले यांच्या विजयानिमित्त गांधी चौक चंद्रपूर येथे आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी मंचावर आमदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले, माजी आमदार व्हि.यू.डायगव्हाणे, डॉ.बबनराव तायवाडे, सीमाताई अडबाले, जुनी पेन्शन हक्क संघटन अध्यक्ष वितेश खांडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस नेते राजेंद्र वैद्य, शिवसेना जिल्हाध्यक्ष संदिप गिर्हे, चंद्रपूर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, परशुराम धोटे, प्रा.अनिल शिंदे, प्राचार्य सूर्यकांत खनके, प्राचार्य शाम धोपटे, विज्युक्टा अध्यक्ष राजेंद्र खाडे, गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य निलेश बेलखंडे राजेश नायडू, संभाजी ब्रिगेड नेते दिलीप चौधरी, केशवराव ठाकरे, जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, चंद्रपूर कार्याध्यक्ष लक्ष्मणराव धोबे यांची उपस्थिती होती.

यावेळी ते म्हणाले, जुनी पेंशन योजना हा विषय महत्वाचा आहेच , पण केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची निवृत्तीची वयोमर्यादा ६० वर्ष आहे. त्या प्रमाणे राज्यात देखील शिक्षक आणि सर्व इतर कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ५८ वरून ६० वर्षे करण्यात यावी. सेवानिवृत्तीचा हा प्रश्न राज्यात महत्वाचा आहे. तो नवनियुक्त आमदारांनी सभागृहात मांडवा, अशी अपेक्षा व्यक्त केली. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रा. बबनराव तायवाडे यांनी आपल्या पदाचा त्याग केला. त्यांचे भविष्यात पुनर्वसन केले जाईल, असा शब्दही खासदार धानोरकर यांनी दिला.


काँग्रेसला पूर्ववत वैभवाचे दिवस आणायचे आहे. सुधारकरराव अडबाले यांना आमदारकीची माळ घालून शिक्षक मतदार संघाच्या विधान परिषद सदस्य पदासाठी अगदी योग्य उमेदवार आपण निवडून दिला आहे. ते आपल्या सर्वांच्या विश्वासास पात्र ठरतील याबद्दल संशय नाही. शिक्षकांवर देशाचे सुजाण व चारित्र्यसंपन्न नागरीक घडविण्याची मुख्य जबाबदारी असतांना निवडणूका, आरोग्य विभाग इत्यांदी मध्ये गुंतविले जाते. शिक्षकांना फक्त विध्यार्थ्यांना घडविण्यासाठी शिकविण्याचेच काम फार मोठे व जबाबदारीचे आहे. यासाठी मी सरकार कडे पाठपूरावा करणार आहे. एकच ध्यास वैयक्तीक विकास या उद्दीष्टाने चालणारी भाजपा प्रणीत सरकारे पदच्यूत करायची तर आपण सर्वांनी देशाच्या व संविधानाच्या रक्षणासाठी एकत्रीतपणेे लढा देण्याची गरज आहे. असे देखील खासदार बाळू धानोरकर यांनी म्हंटले.


यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर बोलताना म्हणाल्या कि, शिक्षक मतदार संघाच्या माध्यमातून एक चांगला, अभ्यासू, कर्मठ आणि शिक्षकांना न्याय मिळवून देणारा आमदार सुधाकर अडबाले रूपाने यांचे मिळाला. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्राच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मोठ्या मताधिक्क्याने ते विजयी झाले, हा ऐतिहासिक विजय असून, जुनी पेन्शन योजना नक्कीच लागू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


Increase the retirement age from 58 to 60 years MP Balu Dhanorkar's