चंद्रपूर:
३१ डिसेंबर शांततेत व अपघातमुक्त ठेवण्यासाठी जिल्हयात मादक द्रव्याचे सेवन करुन वाहन चालविणाऱ्याविरुध्द ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिम राबविले जात आहे.
जिल्हयात दरवर्षीप्रमाणे यंदाही थर्टीफर्स्ट सेलिब्रेशथनचा जोर चांगला रंगणार आहे. यावर्षी पोलीस विभागातर्फे ३१ डिसेंबरच्या पार्श्वभुमीवर अपघाताचे प्रमाण कमी व्हावे काही उपाय योजना राबविण्यात येत असुन त्यांपैकी ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिम मादक द्रव्याचे सेवन करुन वाहन चालविणाऱ्याविरुध्दची कारवाई ची मोहिमे सुरुवात करण्यात आली आहे.
थर्टीफर्स्ट सेलिब्रेशन उत्साहाच्या भरात गैरकृत्य करणाऱ्या मद्यप्रेमी, दारुच्या नशेत गाडी चालवणे, विना परवाना मद्य सेवन करणे, दंगा मस्ती, गोंधळ घालणे अशा बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या मद्यपींविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यासाठी तसेच या पार्श्वभुमीवरुन जिल्हयात कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दिनांक २८ डिसेंबर २०२२ पासुनच जिल्हयात ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिम राबविली जात आहे. सदर मोहिमे अंतर्गत जिल्हयात विविध ठिकाणी नाकाबंदी, ब्रिथ अनालायझर मशिनच्या मदतीने मद्यप्राशन करणाऱ्या मद्यपीची तपासणी करण्यात येत असुन दिनांक २८ डिसेंबर २०२२ रोजी राबविलेल्या मोहिमेत अनेक केसेस करण्यात आल्या आहेत.
सदर मोहिम ही कारवाई करण्यासाठी नाही तर फक्त अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी राबविली जात आहे. मा. पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंह परदेशी यांनी याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन केले आहे की, ३१ डिसेंबर उत्साहात साजरा करावा परंतु सेलिब्रेशनच्या नावांखाली मद्य प्राशन करुन मोटार सायकल व कार भरधाव वेगाने चालवुन/स्टंट मारुन अपघात घडवु नये किंवा अपघात होवू नये याची सर्वांनी स्वत:हून काळजी घेणे आवश्यक आहे, म्हणुनच पोलीस विभागातर्फ ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिम मादक द्रव्याचे सेवन करुन वाहन चालविणाऱ्याविरुध्दची कारवाई ची मोहिम सुरुवात करण्यात आली आहे.