Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, डिसेंबर २९, २०२२

धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोनस जाहीर केल्याबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे अभिनंदन ! Congratulations to Chief Minister and Deputy Chief Minister




बोनससाठी स्पष्ट नकार देणा-या अजित पवारांचा खरा चेहरा उघड : सुधीर मुनगंटीवार

धान उत्पादक शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी प्रति हेक्टरी १५ हजार रु या प्रमाणे दोन हेक्टर मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम बोनस म्हणून देण्याची घोषणा केल्याबद्दल वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Shri Eknath Shinde and Deputy Chief Minister Shri Devendra Fadnavis) यांचे अभिनंदन केले आहे. गेल्या सरकारचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी विधानसभागृहात धानाला बोनस देण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला होता आणि या सरकारने धानाला बोनस जाहीर करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे . विद्यमान सरकार हे खरे शेतकऱ्यांचे हित जोपासणारे सरकार असल्याचे सिद्ध झाले असल्याचे सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे धान उत्पादक जिल्ह्यातील ५ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. ही बोनसची रक्कम ऑनलाइन पद्धतीने धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.केंद्र शासनाने राज्याला १५ लाख मेट्रिक टन धान खरेदीसाठी मंजुरी दिली आहे. हा निर्णय शिंदे फडणवीस सरकारचा मोठा निर्णय आहे. सातत्याने आर्थिक हालअपेष्टा सहन करणाऱ्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला महाविनाश आघाडीने सतत पाने पुसली पण आमच्या सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आधार दिला असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

Congratulations to Chief Minister and Deputy Chief Minister for announcing bonus for paddy farmers!

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.