Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
बुधवार, सप्टेंबर १३, २०२३
रविवार, सप्टेंबर १०, २०२३
या जिल्ह्यात येणार पाऊस | Nagpur, Chandrapur, Gondia, Bhandara, Gadchiroli
या जिल्ह्यात येणार पाऊस
rain weather forecast । पुढच्या काही तसाच नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात खामगाव शहरात काल रात्रीपासून सुरू आहे सततच्या पावसामुळे आज पहाटे साडेतीनशे सुमारास खामगाव शहरात जलंब नाका परिसरात एका घराचे नुकसान झालं. येत्या काही तासात नागपूर वर्धा यवतमाळ भंडारा चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात खामगाव शहरात काल रात्रीपासून पावसाची सतत धार सुरू असून अनेक दिवसांपासून गायब असलेला पाऊस सुरू झाल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येतोय सततच्या पावसामुळे आज पहाटे साडेतीनच्या सुमाराला खामगाव शहरात जलंब नाका परिसरात एका घराची भिंत कोसळून त्याच्यात असा उद्वस्त झालं मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
नागपूर, 10 सप्टेंबर 2023: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांत (10 आणि 11 सप्टेंबर) पूर्वविदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नागपुर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली (Nagpur, Chandrapur, Gondia, Bhandara, Gadchiroli) या पाच जिल्ह्यांत पुढील पाच दिवस (6 ते 10 सप्टेंबर) आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
11 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. 7 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. 10 आणि 11 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
गडचिरोली जिल्ह्यात पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ ते पूर्णता ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 11 ते 12 सप्टेंबर रोजी सर्वत्र ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. 9 आणि 10 सप्टेंबर रोजी बहुदा सर्वत्र ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान विभागाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदी, नाले, धरणांच्या काठावरून सुरक्षित अंतर ठेवावे. तसेच, घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज घेऊन बाहेर पडावे.
अतिवृष्टीमुळे होणारे संभाव्य नुकसान
- पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता
- रस्ते, पुल, इमारतींचे नुकसान
- शेतीचे नुकसान
- जीवितहानी
अतिवृष्टीपासून बचाव
- नदी, नाले, धरणांच्या काठावरून सुरक्षित अंतर ठेवा
- घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज घेऊन बाहेर पडा
- मुसळधार पावसाच्या वेळी घरातच रहा
- आवश्यक असल्यास, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या
- पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती त्वरित द्या
- Heavy rain
- Eastern Vidarbha
- Nagpur, Chandrapur, Gondia, Bhandara, Gadchiroli
- Cloudy sky
- Light to moderate rain
- Thunderstorm with lightning
- Possibility of flooding
- Safety measures to be taken during heavy rain
पंचमुखी हनुमान मंदिर येथे १०१ किलो बुंदी लाडू; ८०० पेक्षा अधिक दिव्यांची मनमोहक आरास
शनिवार, सप्टेंबर ०२, २०२३
डॉ.ऍड अंजली साळवे ओबीसी जनगणनेसाठी सर्वोच्च न्यायालयात न्यायाच्या प्रतीक्षेत
द सिक्रेट डिजिटल मार्केटिंग अँड फ्रीलांसर पुस्तक प्रकाशित | the Secrets Digital Marketing and Freelancer)
- Digital marketing
- Freelancing
- Young people
- Business
- Success
- Inspiration
गुरुवार, ऑगस्ट ३१, २०२३
अनधिकृत गाड्या पार्किंग ला त्वरित आळा घाला : मनसे
बुधवार, ऑगस्ट ३०, २०२३
"7-Year-Old Expresses Gratitude on Raksha Bandhan by Tying Rakhi to Police Officers"
दोन दिवसांत 906 ग्राहकांना महावितरणचा ‘प्रकाश’
नवीन वीज जोडण्यांचा आलेख
मंडल | 1 जानेवारी ते 28 ऑगस्ट दरम्यान नवीन वीज जोड | तात्काळ वीजजोड | |
24 तासात | 48 तासात | ||
नागपूर शहर | 30534 | 201 | 330 |
नागपूर ग्रामीण | 16807 | 121 | 115 |
वर्धा | 10934 | 52 | 87 |
नागपूर परिमंडल एकूण | 58275 | 374 | 532 |
नागपूर शहरात वीज कर्मचा-यांना मारहाण | Electricity workers beaten up in Nagpur city
वीज कर्मचा-यांना मारहाण करणा-याविरोधात
कठोर पोलीस कारवाईसाठी महावितरण आग्रही
नागपूर, दि. 29 ऑगस्ट 2023:- नागपूर शहरातील बिनाकी उपविभाग अंतर्गत वनदेवी नगर भागात फ्यूज कॉलच्या तक्रारीवर उपस्थित असताना, महावितरणच्या कर्मचा-यांवरआणि टॉवर शिडीच्या वहनावरर दगडफेक आणि विटा फेकण्यात होत्या, त्यात कर्मचारी थोडक्यात बचावला त्याच दिवशी सकाळी त्याच वनदेवी नगर परिसरात महावितरणच्या दोन कर्मचा-यांना धक्काबुक्की देखील करण्यात आली होती. याचसोबत काटोल ग्रामीण उपविभागातील भिष्णूर येथे थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यास गेलेल्या वरिष्ठ तंत्रज्ञ सुभाष घरत यांना देखील घक्काबुक्की झाल्याच्या घटना नुकत्याच झालेल्या आहेत. या दोन्ही प्रकरणात महावितरणतर्फ़े संबंधितांनाविरोधात गुन्ह दाखल करण्यात आला आहे. Electricity workers beaten up in Nagpur city
महावितरण कर्मचारी ऊन, वारा, पावसात ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे काम करीत असतात. मात्र अनेकदा त्यांना ग्राहकांच्या रोषाला विनाकारण बळी पडावे लागते. परंतु ज्या शासकीय कर्मचा-यांचा थेट जनतेशी प्रत्यक्ष संबंध येतो व ज्यांना जनतेच्या रोषाला बळी पडावे लागते व प्रसंगी मारहाण होते अशांसाठी भा.दं.वि. चे कलम 353 या कलमान्वये आरोपीला कठोर शिक्षेची तरतूद आहे. या कलमाचा आधार घेत मागील काही दिवसांत झालेल्या हल्ल्यातील घटनांमध्ये महावितरणने हल्लेखोरांविरोधात कठोर भुमिका घेतली असुन त्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी महावितरण प्रशासन पाठपुरावा करीत आहे. वीज कर्मचा-यांना मारहाण करणा-याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 332, 504 व 506 अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात येत असून, कलम 353 नुसार आरोपीला दोन वर्षापर्यंत कैद आणि दंडाची तरतुद आहे तर कलम 332 नुसार तीन वर्षापर्यंत कैद आणि दंडाची तरतुद असून कलम 504 व 506 नुसार प्राणांकीत हल्याच्या आरोपाखाली कठोर शिक्षेची तरतूद आहे. या सर्व कलमांचा कठोर वापर करून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी महावितरण सातत्याने प्रयत्नरत आहे.
वीजबिल थकबाकी वसुलीसाठी जाणा-या महावितरणच्या कर्मचा-यांना मारहाण करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याच्या घटना गांभिर्याने घेत मारहाण करणा-यांविरोधात कठोर पोलीस कारवाई करण्याबाबत आग्रही असल्याचे संकेत महावितरण प्रशासनाने दिले आहेत. महावितरण ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असल्याने नफा कमावणे हा महावितरणचा उद्देश नाही. मात्र महावितरणचे अस्तित्व हे विकलेल्या प्रत्येक युनिट वीजेचे पैसे वसूल होण्यावर अवलंबून आहे. वीजबिलांच्या थकबाकीचे प्रमाण वाढल्याने महावितरणला आर्थिक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे, ही परिस्थिती लक्षात घेता ग्राहकांनी वीज देयकांचा नियमित भरणा ऑनलाईन पद्धतीने करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
महावितरण कार्यालयांना घेराव घालणे, कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवणे, तोडफ़ोड-जाळपोळ करणे हे प्रकार होत असतील तर महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काम तरी कसे करायचे?' असा प्रश्न कर्मचारी संघटना वारंवार उपस्थित करीत आहेत. 'उद्दीष्टाप्रमाणे वीज थकबाकी वसूल न झाल्यास वीज पुरवठा करणे अशक्य होईल. तरी वीज ग्राहकांनी महावितरणची बाजूही समजून घेणे आवश्यक आहे. थकबाकीपोटी आपला वीज पुरवठा खंडित केल्यामुळे काही थकबाकीदारांनी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, कार्यालयाची तोडफोड करणे हे प्रकार अलीकडच्या काळात वाढले आहेत, संबंधितांविरुद्ध गुन्हेही दाखल झाले आहेत. वीज कर्मचा-यांना होणा-या मारहाणीच्या घटनांचे गांभिर्य लक्षात घेता महावितरण प्रशासनाने आरोपींना तात्काळ अटक व्हावी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी याकरिता प्रशासनाने संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा सुरू केला आहे.
- Cryptocurrency
- NFT
- Metaverse
- Web3
- Blockchain
- Investing
- Personal Finance
- Business
- Marketing
- Entrepreneurship
- Health and Wellness
- Travel
मंगळवार, ऑगस्ट २९, २०२३
संताजी कॉलेजच्या विद्यार्थ्याची मित्रांनी केली हत्या | murder case
सोमवार, ऑगस्ट २८, २०२३
स्थानिक स्वराज्य संस्था पदविका अभ्यासक्रम Local Self-Government Diploma Course
- Cryptocurrency
- NFT
- Metaverse
- Web3
- Blockchain
- Investing
- Personal Finance
- Business
- Marketing
- Entrepreneurship
- Health and Wellness
- Travel
शनिवार, ऑगस्ट २६, २०२३
राष्ट्रवादी काँग्रेसने मागितल्या चंद्रपूर जिल्ह्यातील या दोन जागा NCP Chandrapur
LATEST POSTS
- 27/08/2023 - Khabarbat
- 27/08/2023 - Khabarbat
- 26/08/2023 - Khabarbat
- 26/08/2023 - Khabarbat
- 25/08/2023 - Khabarbat
- 25/08/2023 - Khabarbat
- 25/08/2023 - Khabarbat
- 25/08/2023 - Khabarbat
शुक्रवार, ऑगस्ट २५, २०२३
विजेचे बिल चेकद्वारे भरता का? मग ही काळजी नक्की घ्या! Electricity Bill
How to Save on Electricity Bill
)‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध असली तरी अद्यापही अनेक वीजग्राहक दरमहा वीजबिलांचा भरणा धनादेशाद्वारे करीत आहेत. धनादेश अनादरीत झालेल्या सर्व ग्राहकांना प्रत्येक वीजबिलासाठी 750/- रुपये बँक अॅडमिनिस्ट्रेशन चार्जेस व त्यावरील 18 टक्के जीएसटी कराचे 135/- रुपये असे एकूण 885/- रुपये आणि विलंब आकार पुढील महिन्याच्या वीजबिलात इतर आकार म्हणून समाविष्ट करण्यात येत आहे. (
How to Save on Electricity Bill
)अनादरित झालेल्या एकाच धनादेशाद्वारे ( Maharashtra Bijli Bill Check) अनेक वीजबिलांचा भरणा केलेला असल्यास प्रत्येक वीजबिलासाठी दंडात्मक रक्कम लावण्यात येत आहे. यासोबतच धनादेशाद्वारे वीजबिल भरण्याची सोय सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात येत आहे. धनादेशावर चुकीची तारीख, खाडाखोड, चुकीची स्वाक्षरी, चुकीचे नाव, खात्यात संबंधीत रक्कम नसणे आदी कारणांवरून धनादेश अनादरित होत असल्याचे आढळून येत आहे. धनादेश दिल्यानंतर तो क्लिअर होण्यासाठी साधारणतः तीन ते पाच दिवसांचा कालावधी लागतो. धनादेश दिल्यानंतर वीजबिल भरल्याची पावती त्याच दिवशी मिळत असली तरी धनादेशाची रक्कम जमा झाल्याच्या तारखेला वीजबिल भरणा ग्राह्य धरला जातो. त्यामुळे मुदतीच्या एक-दोन दिवस आधी दिलेल्या धनादेशाची रक्कम मुदतीनंतर जमा झाल्याने पुढील वीज बिलामध्ये थकबाकी दिसून येते. त्यामुळे ग्राहकाने देय तारखेपूर्वी कार्यालयीन कामकाजाच्या तीन दिवस अगोदर धनादेश देणे आवश्यक आहे.
Maharashtra Bijli Bill Check धनादेशाव्दारे वीज बिलाचा भरणा करतेवेळी धनादेश अकाउंट पेयी आणि 'MSEDCL' च्या नावे असावा, धनादेश स्थानिक बँकेचा असावा, धनादेशासोबत पावती स्थळप्रत जोडावी, स्टॅपल करू नये. याशिवाय धनादेश पुढील तारखेचा नसावा. धनादेश/ डीडी ने देयकाचा भरणा केल्यास, महावितरणच्या खात्यात रक्कम जमा होण्याची दिनांक, भरणा दिनांक म्हणून गृहीत धरल्या जाते. देयक चेक कलेक्शन पेटीत टाकतांना धनादेशाच्या मागे ग्राहक क्रमांक (पी.सी., बि. यु. साहित) लिहावा व स्थळ प्रतीच्या मागे चेकचा तपशील लिहावा. परक्राम्य संलेख अधिनियम (Negotiable Instrument Act) 1881 कलम 138 प्रमाणे धनादेश अनादरीत होणे हा दंडनीय अपराध असून कायदेशीर कारवाईस पात्र आहे. धनादेश ही ग्राहकाने वापरलेली सुविधा आहे त्यामुळे कुठल्याही कारणास्तव त्याचा अनदार झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही ग्राहकाची असल्याचेही महावितरणतर्फ़े स्पष्ट करण्यात आले आहे.
महावितरणचे www.mahadiscom.in हे संकेतस्थळ तसेच महावितरण मोबाईल अॅपद्वारे चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा 'ऑनलाईन' भरणा करणे लघुदाब वीजग्राहकांसाठी घरबसल्या शक्य झाले आहे. एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीजजोडण्यांबाबत सेवा उपलब्ध आहे. तसेच डेबिट कार्ड, युपीआय, भीम, इंटरनेट बँकिंग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बॅकिंगद्वारे भरणा केल्यास वीजबिलामध्ये 0.25 टक्के (500 रुपयांच्या मर्यादेत) सूट देण्यात येत आहे. तर क्रेडीट कार्ड वगळता सर्व 'ऑनलाईन'द्वारे होणारा भरणा निशुल्क आहे. यासोबतच लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती किंवा सोसायट्यांच्या वीजग्राहकांचे बिल 10 हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध आहे. त्यासाठी या ग्राहकांच्या वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देखील देण्यात येत आहे. वीजग्राहकांनी धनादेशाऐवजी 'ऑनलाईन'द्वारे वीजबिलांचा भरणा करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.