Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑगस्ट २९, २०२३

संताजी कॉलेजच्या विद्यार्थ्याची मित्रांनी केली हत्या | murder case

हिंगणा पोलीस स्टेशन अंतर्गत डोंगरगाव परिसरात 17 वर्षीय तरुण युवकाची हत्या


नागपूर, 29 ऑगस्ट 2023: नागपूर शहरात आणि परिसरामध्ये गुन्हेगारी मध्ये वाढ झाली आहे. हिंगणा पोलीस स्टेशन अंतर्गत डोंगरगाव परिसरात सक्षम कैलास तीनकर या 17 वर्षीय तरुण युवकाची हत्या करण्यात आली आहे. आरोपी सौरभ उर्फ बादशाह पंधराम व त्याचे सात विधिसंघर्षग्रस्त बालकाने मिळून ही हत्या केली आहे. (Nagpur city murder case)

विश्वसनीय सूत्रानुसार, जुन्या भांडणाचे सेटलमेंट करण्याच्या उद्देशाने आरोपीनी मृतकाला डोंगरगाव परिसरात बोलविले व तेथे सक्षम तिनकरची हत्या केली. आरोपी व मृतक हे वर्धा रोड छत्रपती चौक येथील संताजी कॉलेज येथे शिक्षण घेत होते.

पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्यात येत आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलीस तपास
Nagpur police
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक सक्षम तिनकर व आरोपी सौरभ पंधराम यांच्यात पूर्वीपासून भांडणाचा इतिहास होता. मृतक तिनकर याने सौरभ पंधराम ला मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आरोपींनी मृतकाला धमकी दिली होती.

28 ऑगस्ट रोजी आरोपींनी मृतकाला डोंगरगाव परिसरात बोलविले. तेथे आरोपींनी मृतकावर हल्ला केला व त्याला ठार केले.

नागपूर शहरात वाढती गुन्हेगारी
Nagpur police crime
नागपूर शहरात आणि परिसरामध्ये गुन्हेगारी मध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक गंभीर गुन्हे घडले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.