जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मंजूर झालेल्या नवेगावबांध नळ पाणीपुरवठा योजना अंदाजपत्रकीय किंमत ४९७.४४ लाख व सिरेगावबांध प्रादेशिक पाणीपुरवठा योजना विशेष दुरुस्ती अंदाजपत्रकीय किंमत ३५६.२८ लाख रुपये कामाचे भूमिपूजन येथील ग्रामपंचायत आवारात भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील मेंढे यांच्या शुभहस्ते आज दि.६ मे रोज शनिवारला दुपारी १२.०० वाजता संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चांद्रिकापुरे हे होते.
प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य रचानाताई गहाने, लायकराम भेंडारकर, पंचायत समिती सदस्य संदीप कापगते, ग्रामपंचायत सरपंच हिराताई पंधरे, उपसरपंच रमेश डोंगरवार, ग्रामपंचायत सदस्य देवाजी कापगते प्रामुख्याने यावेळी उपस्थित होते.
अर्जुनी मोरगाव पंचायत समितीचे उपसभापती होमराज पुस्तोडे, ग्रामविकास अधिकारी व्ही.ई.रामटेके यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य पितांबर काशीवार,विजय कुंभरे, दिलीप शिपानी, लेनिन राऊत, रेशीम काशिवार, प्रेमचंद चांदेवार, सोनाली नाकाडे ,सरीता नाईक, पारामीता भूमके प्रियंका सांगोळकर, सीमा बडोले,दुर्गा शहारे,पूजा कापगते, मिना पहाडे,सुरेखा येळाम, पाणिपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.