Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गोंदिया लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गोंदिया लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, जुलै २२, २०२३

घाटबोरी शेत शिवारात शेतकऱ्याचा वीज पडून  मृत्यू

घाटबोरी शेत शिवारात शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू





संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२२ जुलै:-
सडक अर्जुनी तालुक्यात शुक्रवारी (ता.२२)सकाळ पासूनच पाऊस होता.पाऊस सकाळी,दुपारी व सायंकाळी पडला.
दुपारच्या वेळेला विजांच्या कडकडाटासह पडला.
तालुक्यातील घाटबोरी/तेली येथील ओमदास सखाराम वाघाडे  (वय ५५ वर्षे) यांचा दुपारी  अडीच वाजता च्या दरम्यान  शेतात रोवणी सुरू असताना विज पडून मृत्यू झाला. घाटबोरी/तेली वरून दोन किलोमिटर अंतरावरील घाटबोरी/कोहळी शेतशिवारात
रोवणी सुरू होती.येथे 
मृतक शेतात एका बांधीत  फन मारत होता.तर दुसऱ्या बांधीत महिला रोवणी करीत होत्या.अचानक दुपारला
विजेच्या गडगडासह  पाऊस पडला. विज  मृतकाच्या अंगावर पडली.जागीच त्यांचा मृत्यु झाला.परंतु,त्यात दोन बैल,पाच महिला,त्यांचा एक मुलगा व पुतण्या थोडक्यात बचावले.वेळीच शेतावर काम करणारे महिला पुरुष गोळा झाले.त्यांना पत्नी व दोन मुले आहेत.  मृतकाची  माहिती होताच घटनास्थळी तलाठी पोहचले व माहिती घेतली.तसेच डूग्गीपार
पोलिसांनी पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.

शनिवार, मे २०, २०२३

नवेगाव नागझिरा व्याघ्र अभयारण्यात सोडण्यात आल्या दोन वाघिणी

नवेगाव नागझिरा व्याघ्र अभयारण्यात सोडण्यात आल्या दोन वाघिणी

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती. नागझिऱ्यातील वाघांना मिळाल्या दोन नव्या मैत्रिणी.



संजीव बडोले प्रतिनिधी
नवेगावबांध दि.20 मे:-
वन विभागाने राज्यामध्ये पहिल्यांदाच एक अभिनव प्रयोग केला आहे. व्याघ्र प्रकल्पातील संतुलन राखण्यासाठी नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये चंद्रपूर वरून आणलेल्या दोन वाघिणींना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत आज दि.20 मे रोज शनिवारी सोडण्यात आले. यावेळी खासदार सुनील मेंढे, खासदार अशोक नेते आमदार मनोहर चंद्रिकापुरे,आमदार विजय रहांगडाले प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक रंगनाथ नाईकडे, वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक ताडोबा अंधारी प्रकल्प डॉ. जितेंद्र रामगावकर, विशेष पोलीस महासंचालक (नक्षल सेल) संदीप पाटील, उपवनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक नवेगाव-नागझिरा जयरामेगौडा आर., गोंदिया उपवनसंरक्षक कुलराज सिंह, भंडारा उपवनसंरक्षक राहूल गवई, गोंदिया निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपसंचालक नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखिव क्षेत्र साकोली पवन जेफ, विभागीय वन अधिकारी प्रदीप पाटील व सहाय्यक वनसंरक्षक राजेंद्र सदगीर यावेळी उपस्थित होते.वनविभागाची इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 


संशोधन, पर्यटन, संवर्धन व ईन ब्रिडिंग या चार मुद्यांवर आधारित कार्य वनविभागाने हाती घेतले असून त्या अंतर्गत आज नवेगाव-नागझिरा अभयारण्यात वाघिणींचे स्थानांतरण करण्यात आले. नैसर्गिक अधिवासासाठी येथील जंगल उपयुक्त आहे. वाघिणींच्या आगमनामुळे नवेगाव-नागझिरा अभयारण्य वन्यजीव प्रेमी, अभ्यासक व पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनेल असा विश्वास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प नैसर्गिक अधिवासासाठी उत्तम ठिकाण असून आज सोडण्यात आलेल्या वाघिणींच्या प्रजननातून वाघांची पुढील पिढी दर्जेदार निर्माण होण्यास सहाय्यभूत ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वन्यप्रेमींची मागणी आणि त्या अनुषंगाने खासदार सुनील मेंढे यांनी केलेल्या पाठपुराव्याच्या प्रयत्नातून आज (दि.२० मे ) नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात दोन नवीन वाघिणींना सोडण्यात आले. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. 
व्याघ्र संवर्धन आणि स्थानांतरण या उपक्रमांतर्गत या दोन वाघिणींचे चंद्रपूर जिल्ह्यातून स्थानांतरण करून त्यांना आज नागझिरा अभयारण्य सोडण्यात आले. पर्यटन आणि वन्यजीवाच्या संदर्भात खासदार यांची सकारात्मकता म्हणूनच आज हे शक्य झाल्याचे वनमंत्र्यांनी सांगितले. भविष्यात आणखी तीन वाघ सोडले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आमच्याकडे जंगल आहे मात्र जंगलात वाघांची संख्या खूप नाही. मग आम्ही इतर जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये पर्यटनासाठी जातो. वाघ पाहून संतुष्ट मनाने घराकडे परततो. कधी व्याघ्र दर्शन न झाल्याने निराश होऊन परततो. पण आता दोन वाघिणीच गोंदिया- भंडारा जिल्ह्याच्या जंगलात आल्या आहेत. खासदार सुनील मेंढे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या व्याघ्र संवर्धनाच्या निर्धारातून आज (दि.२० मे) दोन वाघीण नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडल्या गेल्या आहेत. वन्यजीव प्रेमींसाठी अत्यंत सुखद असाच हा क्षण म्हणावा लागेल.
भंडारा गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्य त्याच्या विस्तीर्णतेसाठी आणि घनदाट जंगलांसाठी प्रसिद्ध आहे. जंगलात वाघ, बिबट, अस्वल यासह अनेक प्राणी आहेत. आजच्या घडीला ११ वाघ असून त्यात ९ नर आणि २ मादी वाघ आहेत. तरीही पर्यटकांची व्याघ्र दर्शनाची भूक भागत नसल्याने त्यांना इतर जिल्ह्यातील ताडोबा सारख्या प्रकल्पात वाघाच्या दर्शनासाठी फिरावे लागते. नैसर्गिक दृष्ट्या संतुलन राखण्याच्या दृष्टीने वाघिणींची संख्या जंगलात वाढणे गरजेचे आहे. वाघांच्या बाबतीत संतुलन राखले जावे.यासाठी निसर्गाचा विचार करता आणखी वाघिणी या जंगलात असणे अपेक्षित आहे.वन्यप्रेमींकडून या दृष्टीने सातत्याने मागणी केली जात होती. या मागणीच्या आधारे खासदार सुनिल मेंढे यांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे या अनुषंगाने सातत्याने पाठपुरावा केला. प्रत्यक्ष भेट घेऊनही हा विषय समजावून सांगितला. विषयाचे गांभीर्य ओळखून वनमंत्र्यांनी दोन वेगवेगळ्या वंशाच्या वाघिणी नवेगाव नागझिरा अभयारण्यास भेट म्हणून देण्याचा निर्णय जाहीर केला होता.आज २० मे रोज शनिवारला या दोन्ही वाघिणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार सुनील मेंढे, चंद्रपूर गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार अशोक नेते आमदार विजय रहांगडाले आमदार मनोहर चंद्रिकापुरे ,वन्यजीव व वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थित दोन्ही वाघिणींना जंगलात सोडण्यात आले. निलय विश्रामृहासमोरील जंगल परिसरात या वाघिणी सोडण्यात आल्या आहेत.भविष्यात आणखी तीन वाघ सोडले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी वनमंत्र्यांनी यावेळी सांगितले. पट्टेदार वाघांची संख्या  वाढून, पर्यटनाला चालना मिळणे.हा एक महत्त्वाचा दृष्टिकोन यामागे असल्याचे खासदार सुनील मेंढे यांनी यावेळी सांगितले. या दोन वाघिणींमुळे या  क्षेत्रातील वाघांची संख्या बारा वरून  आता 14 वर पोहोचली आहे. 
नवेगाव-नागझिरा या राखीव व्याघ्र अभयारण्यात बारा वाघांची संख्या होती. यामध्ये वाघिणींची संख्या कमी असल्याने वाघांमध्ये होत असलेला संघर्ष टाळण्यासाठी आणि या क्षेत्रात वाघांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने तसेच चंद्रपूर मध्ये वाढलेल्या वाघांचा पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने राज्यात पहिल्यांदाच हा अभिनव प्रयोग करण्यात आला. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातून अडीच ते तीन वर्षाची एक एक वाघीण पकडून तिला शनिवारी नागझिरा अभयारण्यात सोडण्यात आले.  हा राज्यातील पहिलाच प्रयोग असल्याने वनविभागाने जय्यत तयारी केली होती. जिथे या वाघिणीला सोडणार होते त्या ठिकाणी  जाळी आणि हिरव्या नेट ने कुंपण केले होते. तसेच देखरेखी साठी मच्यान लावण्यात आले होते. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे स्वतः या कार्यक्रमासाठी नागझिरा येथे उपस्थित होते. वाघिणीला सोडल्यानंतर मुनगंटीवार यांनी या वाघिणीचे सुरक्षा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गाडीला हिरवा झेंडा दाखविला. 
जगात १९३ देश आहेत या पैकी केवळ १४ देशात वाघ आहेत. या 14 देशांपैकी सर्वात जास्त वाघ हे भारतात  आहे. ६५ टक्के वाघ हे भारतात आहेत.  त्यापैकी सर्वात जास्त हे विदर्भात आहेत  हे विदर्भाचे वैशिष्ट आहे. नागझीराचा पर्यटन वाढावा या साठी दोन वाघिणी सोडण्याचा निर्णय घेतला. नागझिरा कोर क्षेत्र ६५३ स्क्वेअर  किलो मीटर आहे.  तर बफर १२४१ स्क्वेअर किलो मिटर एवढं असल्याने आणि २० वाघ अधिवास करतील एवढी क्षमता  असल्याने  आता २ वाघिणी सोडण्यात आल्या असून पुढे ३ वाघ पुन्हा सोडण्यात येणार असल्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले

शनिवार, मे ०६, २०२३

भूमिपूजनासाठी निघालेल्या खासदारांना दाखवले काळे झेंडे

भूमिपूजनासाठी निघालेल्या खासदारांना दाखवले काळे झेंडे




संजीव बडोले प्रतिनिधी/ नवेगावबांध दि.६ मे.
नवेगावबांध येथील पर्यटन संकुलातील रॉक गार्डनचे व कॉन्फरन्सचे हॉल या दोन कामांचे गेल्या १४ वर्षापासून लोकार्पण न झाल्याने, निवडून आल्यापासून गेल्या चार वर्षापासून याबाबत कुठली चर्चा व बैठक गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील मेंढे (sunil mendhe) यांनी लावली नाही. याच्या निषेधार्थ येथे एका भूमिपूजनासाठी खासदार मेंढे येथे आले असता, विश्रामगृहावरून कार्यक्रम स्थळी  जात असताना,येथील आझाद चौकात सकाळी ११.३५ वाजेच्या दरम्यान काळे झेंडे दाखवून खासदार मेंढे यांचा निषेध करण्यात आला.


खासदार मेंढे निवडून आल्यावर सत्कार स्वीकारण्याच्या समारंभा निमित्त पहिल्या वर्षी तालुक्यात आले होते.त्यावेळी येथील टी पॉइंट चौकात नवेगावबांध फाउंडेशनच्या वतीने खासदार मेंढे यांना निवेदन देऊन या कामाची आठवण करून देण्यात आली होती. यावर बैठक लावून चर्चा करू असे आश्वासने खासदारांनी त्यावेळी दिले होते. त्यावेळी खासदार सुनील मेंढे (sunil mendhe) यांच्या मालकीच्या मे.सन्नी कन्स्ट्रक्शन भंडारा यांनी रॉक गार्डन व येथील कान्फरन्स हाल चे बांधकाम कंत्राटदार म्हणून केले होते. हे येथे उल्लेखनीय आहे.



नवेगावबांध (navegao bandh) येथील पर्यटन संकुल स्थळी सन २००३-०४ या आर्थिक वर्षात रॉक गार्डन व कॉन्फरन्स हाल करिता कोट्यावधीचा निधी प्राप्त झाला होता. सदर कामाचे कंत्राट भंडारा येथील सनी कन्स्ट्रक्शन ज्याचे मालक विद्यमान खासदार सुनील मेंढे हे आहेत.असोसिएट अश्फाक अहमद यांच्या मदतीने सदर काम करायचे होते.२००७-०८, २००८-०९  या कालीवधी मध्ये हे बांधकाम  करण्यात आले होते. सदर काम करतेवेळी त्या कामात बऱ्याच तफावती होत्या. नवेगावबांध संघर्ष समितीच्या वतीने झालेल्या कामाचं लोकार्पण करा, अन्यथा दोषींवर कारवाई करा.एवढेच मागणी करण्यात आली होती. या मागणीला धरून नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष या नात्याने रामदास बोरकर यांनी लोकायुक्ताकडे दाद मागितली होती. यामध्ये लोकायुक्ताने गोदिया जिल्ह्याचे तत्कालीन दोन जिल्हाधिकारी व राज्याचे प्रिन्सिपल सेक्रेटरी यांना या प्रकरणात दोषी ठरविले होते. त्यावेळी आपण सदर कामाचे लोकार्पण करा किंवा दोषींवर कारवाई करा.एवढी मागणी लावून धरली होती. नवनियुक्त खासदार सुनील मेंढे यांची तीन वर्षांपूर्वी भंडारा येथील शासकीय विश्रामगृहात फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली होती. त्यांना सर्व काही विसरून त्या गार्डनची डागडूजी करून, त्याचे लोकार्पण करण्याची विनंती करण्यात आली होती.परंतु वर्षा मागून वर्ष लोटून ही नवेगावबांध येथील पर्यटन संकुलातील त्या गार्डनचे व कॉन्फरन्सचे लोकार्पण न झाल्याने,या गोष्टीचा निषेध म्हणून नवेगावबांध येथे आज दिनांक ६ मे रोज शनिवारला येथील  आझाद चौक येथे  खासदार सुनील मेंढे हे येथील ग्रामपंचायत समोरील जलजीवन मिशनच्या कामाच्या भूमिपूजनासाठी विश्रामगृहावरून कार्यक्रम स्थळी जात  असतांना आझाद चौक येथे 
रामदास बोरकर,नवेगावबांध फांऊडेशन,मुकेश चाफेकर शाखाप्रमुख ठाकरे सेना,घनश्याम कापगते शाखा उपप्रमुख ठाकरे सेना यांनी काळे  झेंडे दाखवून निषेध केला.अचानक काळे झेंडे दाखवण्यात आल्यामुळे काही काळ त्या ठिकाणी गोंधळ उडाला. झालेल्या प्रकाराबद्दल क्षणभर थांबून खासदारांचा ताफा कार्यक्रम स्थळी पोहोचला.

कोट
गोंदिया जिल्ह्याच्या नवेगावबांध पर्यटन संकुलाचे पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यात यावा याकरिता संघर्ष समितीचा पंचवीस वर्षांपूर्वीपासून विकासाकरिता संघर्ष सुरू आहे.शासन व जनप्रतिनिधी याना निवेदनातून विकासाची मागणी करण्यात येत आहे ,याचाच एक भाग म्हणून 2003 च्या कालावधीमध्ये कोट्यावधीचा रुपयांचा निधी संकुल परिसराच्या विकासासाठी प्राप्त झाला. त्यामध्ये राग गार्डन व कॉन्फरन्सलचे काम हाती घेण्यात आले होते.परंतु कामांमध्ये फार तफावत होती आणि दिवसा मागून दिवस निघून जात असताना सदर कामाचे लोकार्पण होत नव्हते.या कामाचे लोकार्पण करण्यात यावे व कामाचे लोकार्पण होत नसेल, तर दोषींवर कारवाई करण्यात यावी एवढी मागणी आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतरही या कामाकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याने माननीय खासदार यांना आपण प्रत्यक्ष भेटून विनंती केली की, आपल्या हातून हे काम झालेले आहे. आपण त्याची डागडूजी करून ते लोकार्पण करावे,ही अपेक्षा होती. तरीसुद्धा त्यांनी ते केलं नाही.त्याचे स्मरण करून द्यावे आणि याकडे दुर्लक्ष केले म्हणून, आम्ही खासदारांना काळे झेंडे दाखवून आज नवेगावबांध येथे निषेध केला.
- रामदास बोरकर,
अध्यक्ष,नवेगावबांध फाउंडेशन.


Sunil Baburao Mendhe is an Indian Politician and a Member of Parliament to the 17th Lok Sabha from Bhandara–Gondiya Lok Sabha constituency, Maharashtra. 

नवेगावबांध येथे ९ कोटीच्या पाणीपुरवठा योजनेचे खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते भूमिपूजन

नवेगावबांध येथे ९ कोटीच्या पाणीपुरवठा योजनेचे खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते भूमिपूजन



संजीव बडोले प्रतिनिधी/ 
नवेगावबांध दि.६ मे:-
जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मंजूर झालेल्या नवेगावबांध नळ पाणीपुरवठा योजना अंदाजपत्रकीय किंमत ४९७.४४ लाख व सिरेगावबांध प्रादेशिक पाणीपुरवठा योजना विशेष दुरुस्ती अंदाजपत्रकीय किंमत ३५६.२८ लाख रुपये कामाचे भूमिपूजन येथील ग्रामपंचायत आवारात भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील मेंढे यांच्या शुभहस्ते आज दि.६ मे रोज शनिवारला दुपारी १२.०० वाजता संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चांद्रिकापुरे हे होते.

प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य रचानाताई गहाने, लायकराम भेंडारकर, पंचायत समिती सदस्य संदीप कापगते, ग्रामपंचायत सरपंच हिराताई पंधरे, उपसरपंच रमेश डोंगरवार, ग्रामपंचायत सदस्य देवाजी कापगते प्रामुख्याने यावेळी उपस्थित होते.
अर्जुनी मोरगाव पंचायत समितीचे उपसभापती होमराज पुस्तोडे, ग्रामविकास अधिकारी व्ही.ई.रामटेके यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य पितांबर काशीवार,विजय कुंभरे, दिलीप शिपानी, लेनिन राऊत, रेशीम काशिवार, प्रेमचंद चांदेवार, सोनाली नाकाडे ,सरीता नाईक, पारामीता भूमके प्रियंका सांगोळकर, सीमा बडोले,दुर्गा शहारे,पूजा कापगते, मिना पहाडे,सुरेखा येळाम, पाणिपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.

शनिवार, एप्रिल २२, २०२३

गोसावी कोकणा येथे अवकाळी पाऊस व गारपीटीने पिकाचे अतोनात नुकसान.शेतकऱ्यांची आर्थिक मदतीची मागणी.

गोसावी कोकणा येथे अवकाळी पाऊस व गारपीटीने पिकाचे अतोनात नुकसान.शेतकऱ्यांची आर्थिक मदतीची मागणी.



संजीव बडोले, प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२२एप्रिल:-
गोंदिया जिल्ह्यातील ‌सडक अर्जुनी तालुक्यात आज २२एप्रिल रोज शनिवारला ला तालुक्यात सायंकाळी ४.३० ते ५ वाजेदरम्यान वादळ वा-यासह आलेल्या अवकाळी पावसाने, धान व मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील गोसाई कोकणा येथे वादळ वा-यासह आलेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने धान ,मका व अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गेला दोन तीन दिवसापासून मौसम खराब आहे. वादळ वारा येत होता मात्र पाऊस आलेला नव्हता. आज मात्र वादळ वा-यासह आलेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने शेतकऱ्यांचे शेतातील पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे.यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.