वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती. नागझिऱ्यातील वाघांना मिळाल्या दोन नव्या मैत्रिणी.
नवेगावबांध दि.20 मे:-
वन विभागाने राज्यामध्ये पहिल्यांदाच एक अभिनव प्रयोग केला आहे. व्याघ्र प्रकल्पातील संतुलन राखण्यासाठी नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये चंद्रपूर वरून आणलेल्या दोन वाघिणींना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत आज दि.20 मे रोज शनिवारी सोडण्यात आले. यावेळी खासदार सुनील मेंढे, खासदार अशोक नेते आमदार मनोहर चंद्रिकापुरे,आमदार विजय रहांगडाले प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक रंगनाथ नाईकडे, वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक ताडोबा अंधारी प्रकल्प डॉ. जितेंद्र रामगावकर, विशेष पोलीस महासंचालक (नक्षल सेल) संदीप पाटील, उपवनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक नवेगाव-नागझिरा जयरामेगौडा आर., गोंदिया उपवनसंरक्षक कुलराज सिंह, भंडारा उपवनसंरक्षक राहूल गवई, गोंदिया निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपसंचालक नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखिव क्षेत्र साकोली पवन जेफ, विभागीय वन अधिकारी प्रदीप पाटील व सहाय्यक वनसंरक्षक राजेंद्र सदगीर यावेळी उपस्थित होते.वनविभागाची इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
संशोधन, पर्यटन, संवर्धन व ईन ब्रिडिंग या चार मुद्यांवर आधारित कार्य वनविभागाने हाती घेतले असून त्या अंतर्गत आज नवेगाव-नागझिरा अभयारण्यात वाघिणींचे स्थानांतरण करण्यात आले. नैसर्गिक अधिवासासाठी येथील जंगल उपयुक्त आहे. वाघिणींच्या आगमनामुळे नवेगाव-नागझिरा अभयारण्य वन्यजीव प्रेमी, अभ्यासक व पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनेल असा विश्वास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प नैसर्गिक अधिवासासाठी उत्तम ठिकाण असून आज सोडण्यात आलेल्या वाघिणींच्या प्रजननातून वाघांची पुढील पिढी दर्जेदार निर्माण होण्यास सहाय्यभूत ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वन्यप्रेमींची मागणी आणि त्या अनुषंगाने खासदार सुनील मेंढे यांनी केलेल्या पाठपुराव्याच्या प्रयत्नातून आज (दि.२० मे ) नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात दोन नवीन वाघिणींना सोडण्यात आले. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
व्याघ्र संवर्धन आणि स्थानांतरण या उपक्रमांतर्गत या दोन वाघिणींचे चंद्रपूर जिल्ह्यातून स्थानांतरण करून त्यांना आज नागझिरा अभयारण्य सोडण्यात आले. पर्यटन आणि वन्यजीवाच्या संदर्भात खासदार यांची सकारात्मकता म्हणूनच आज हे शक्य झाल्याचे वनमंत्र्यांनी सांगितले. भविष्यात आणखी तीन वाघ सोडले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आमच्याकडे जंगल आहे मात्र जंगलात वाघांची संख्या खूप नाही. मग आम्ही इतर जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये पर्यटनासाठी जातो. वाघ पाहून संतुष्ट मनाने घराकडे परततो. कधी व्याघ्र दर्शन न झाल्याने निराश होऊन परततो. पण आता दोन वाघिणीच गोंदिया- भंडारा जिल्ह्याच्या जंगलात आल्या आहेत. खासदार सुनील मेंढे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या व्याघ्र संवर्धनाच्या निर्धारातून आज (दि.२० मे) दोन वाघीण नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडल्या गेल्या आहेत. वन्यजीव प्रेमींसाठी अत्यंत सुखद असाच हा क्षण म्हणावा लागेल.
भंडारा गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्य त्याच्या विस्तीर्णतेसाठी आणि घनदाट जंगलांसाठी प्रसिद्ध आहे. जंगलात वाघ, बिबट, अस्वल यासह अनेक प्राणी आहेत. आजच्या घडीला ११ वाघ असून त्यात ९ नर आणि २ मादी वाघ आहेत. तरीही पर्यटकांची व्याघ्र दर्शनाची भूक भागत नसल्याने त्यांना इतर जिल्ह्यातील ताडोबा सारख्या प्रकल्पात वाघाच्या दर्शनासाठी फिरावे लागते. नैसर्गिक दृष्ट्या संतुलन राखण्याच्या दृष्टीने वाघिणींची संख्या जंगलात वाढणे गरजेचे आहे. वाघांच्या बाबतीत संतुलन राखले जावे.यासाठी निसर्गाचा विचार करता आणखी वाघिणी या जंगलात असणे अपेक्षित आहे.वन्यप्रेमींकडून या दृष्टीने सातत्याने मागणी केली जात होती. या मागणीच्या आधारे खासदार सुनिल मेंढे यांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे या अनुषंगाने सातत्याने पाठपुरावा केला. प्रत्यक्ष भेट घेऊनही हा विषय समजावून सांगितला. विषयाचे गांभीर्य ओळखून वनमंत्र्यांनी दोन वेगवेगळ्या वंशाच्या वाघिणी नवेगाव नागझिरा अभयारण्यास भेट म्हणून देण्याचा निर्णय जाहीर केला होता.आज २० मे रोज शनिवारला या दोन्ही वाघिणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार सुनील मेंढे, चंद्रपूर गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार अशोक नेते आमदार विजय रहांगडाले आमदार मनोहर चंद्रिकापुरे ,वन्यजीव व वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थित दोन्ही वाघिणींना जंगलात सोडण्यात आले. निलय विश्रामृहासमोरील जंगल परिसरात या वाघिणी सोडण्यात आल्या आहेत.भविष्यात आणखी तीन वाघ सोडले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी वनमंत्र्यांनी यावेळी सांगितले. पट्टेदार वाघांची संख्या वाढून, पर्यटनाला चालना मिळणे.हा एक महत्त्वाचा दृष्टिकोन यामागे असल्याचे खासदार सुनील मेंढे यांनी यावेळी सांगितले. या दोन वाघिणींमुळे या क्षेत्रातील वाघांची संख्या बारा वरून आता 14 वर पोहोचली आहे.
नवेगाव-नागझिरा या राखीव व्याघ्र अभयारण्यात बारा वाघांची संख्या होती. यामध्ये वाघिणींची संख्या कमी असल्याने वाघांमध्ये होत असलेला संघर्ष टाळण्यासाठी आणि या क्षेत्रात वाघांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने तसेच चंद्रपूर मध्ये वाढलेल्या वाघांचा पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने राज्यात पहिल्यांदाच हा अभिनव प्रयोग करण्यात आला. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातून अडीच ते तीन वर्षाची एक एक वाघीण पकडून तिला शनिवारी नागझिरा अभयारण्यात सोडण्यात आले. हा राज्यातील पहिलाच प्रयोग असल्याने वनविभागाने जय्यत तयारी केली होती. जिथे या वाघिणीला सोडणार होते त्या ठिकाणी जाळी आणि हिरव्या नेट ने कुंपण केले होते. तसेच देखरेखी साठी मच्यान लावण्यात आले होते. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे स्वतः या कार्यक्रमासाठी नागझिरा येथे उपस्थित होते. वाघिणीला सोडल्यानंतर मुनगंटीवार यांनी या वाघिणीचे सुरक्षा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गाडीला हिरवा झेंडा दाखविला.
जगात १९३ देश आहेत या पैकी केवळ १४ देशात वाघ आहेत. या 14 देशांपैकी सर्वात जास्त वाघ हे भारतात आहे. ६५ टक्के वाघ हे भारतात आहेत. त्यापैकी सर्वात जास्त हे विदर्भात आहेत हे विदर्भाचे वैशिष्ट आहे. नागझीराचा पर्यटन वाढावा या साठी दोन वाघिणी सोडण्याचा निर्णय घेतला. नागझिरा कोर क्षेत्र ६५३ स्क्वेअर किलो मीटर आहे. तर बफर १२४१ स्क्वेअर किलो मिटर एवढं असल्याने आणि २० वाघ अधिवास करतील एवढी क्षमता असल्याने आता २ वाघिणी सोडण्यात आल्या असून पुढे ३ वाघ पुन्हा सोडण्यात येणार असल्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले