नवेगावबांध दि.५ एप्रिल:-
सडकअर्जुनी तालुक्यातील गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या बेहळीटोला या गावात ३०कुटुंब संख्या असून जवळपास २५० लोकसंख्येची लहान वस्ती आहे.या गावात मागिल चार पिढ्यांपासून प्रत्यक्ष स्वरूप देवीची मूर्ती असून एक सिध्दी स्थळ आहे.या स्थळाची ओळख गिरजामाता म्हणून आहे.येथे येणा-या प्रत्येक भाविकांची मनोकामना पूर्ण होत असल्याचे बोलले जाते. सडक अर्जुनी तालुका मुख्यालयापासून २४ किमी.अंतरावर बेहळीटोला गाव आहे. गिरजामाता मंदिर सुमारे दिडशे वर्ष जुने आहे.गावालगत जंगल असून या गावातील लोक हलबी गोंड समाजाचे आहेत.या गावातील चौधरी यांनी आपले कुलदैवत म्हणून गिरजामाता मंदिराची स्थापना केली होती.मागिल चार पिढ्यांपासून सुरवातीला रघु चौधरी यांच्या स्वप्नात गिरजामाता निंबाच्या झाडाखाली असल्याचे सांगून त्याठिकाणी रघु चौधरी यांनी मुर्ती स्थापन करून मंदिर बांधले.तिच परंपरा आजही कायम आहे.परंपरेची जोपासना दुसरी पिढी पांडुरंग चौधरी,तिसरी पिढी मंगरू चौधरी,सकटू चौधरी,चांगो,देवाजी चौधरी आणि आता चौथी पिढी कचरू सकटू चौधरी चालवत आहेत.या मंदिरात नवरात्रीमध्ये नऊ दिवस घटस्थापना करून पुजाअर्चना केली जाते.यात तालुक्यातील अनेक भाविक भक्त या उत्सवात सहभागी होतात.तसेच संक्रांतीला दोन दिवस दुर्गाबाई डोहावर जाऊन पुजा करीत असतात.चैत्रामध्ये हनुमान जयंतीला पालखी घेऊन मंदिरातील ढोल नगारे वाजवून पालखी मिरवणूक जवळपासच्या गावांमध्ये फेरी काढून जोगवा मागून रात्री तेल जाळून हा उत्सव साजरा केला जातो .या देवस्थानात वर्षभर अनेक भाविक भक्त येत असतात.चैत्रामध्ये नवस फेडणारे भाविक भक्त त्रिशूळ व घोडयाची मुर्ती देवस्थानात अर्पण करतात.चार पिढ्यांपासून स्थापन केलेली मुर्ती त्याचठिकाणी असून मंदिरासारखे छत तयार करण्यात आले आहे.सन १९३०मध्ये २५ किलोचा पंच धातुचा घाट भाविकांनी या गिरजामाता मंदिराला अर्पण केला आहे.तसेच सन १९३४शुक्ल चैत्रात चिचटोला गावातील पंच लोकांनी ५किलोची घाट अर्पण केली होती,ती आजही या मंदिरात आहे.या घाटा वाजविल्यास २-२ किमी. पर्यंत रात्रीच्या वेळी आवाज जातो.हे विशेष. ========≠======== . *प्रसिध्दी नसल्याने विकासापासून कोसो दूर**:---या मंदिरात गिरजामाता अदृश्य स्वरुपात वास्तव्य करीत असते.या मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकांची मनोकामना पूर्ण होते.या गिरजामाता मंदिरावर अनेक भाविकांची अतुट श्रद्धा आहे. या देवीचे भक्त स्थानिक कचरू सकटू चौधरी मंदिराची नित्यनेम पुजाअर्चना करून देखरेख करतात.तसेच बेहळीटोला व चिचटोला वासी सुद्धा मंदिराची देखरेख करतात.येथील गिरजामाता मंदिर सिद्ध असून प्रसिद्धी नसल्याने विकासापासून कोसो दूर आहे.अशी खंत या देवीचे भक्त कचरू सकटू चौधरी यांनी सदर प्रतिनिधी जवळ बोलून दाखवले. =================