Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गोंदिया लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गोंदिया लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, जुलै २२, २०२३

घाटबोरी शेत शिवारात शेतकऱ्याचा वीज पडून  मृत्यू

घाटबोरी शेत शिवारात शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू





संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२२ जुलै:-
सडक अर्जुनी तालुक्यात शुक्रवारी (ता.२२)सकाळ पासूनच पाऊस होता.पाऊस सकाळी,दुपारी व सायंकाळी पडला.
दुपारच्या वेळेला विजांच्या कडकडाटासह पडला.
तालुक्यातील घाटबोरी/तेली येथील ओमदास सखाराम वाघाडे  (वय ५५ वर्षे) यांचा दुपारी  अडीच वाजता च्या दरम्यान  शेतात रोवणी सुरू असताना विज पडून मृत्यू झाला. घाटबोरी/तेली वरून दोन किलोमिटर अंतरावरील घाटबोरी/कोहळी शेतशिवारात
रोवणी सुरू होती.येथे 
मृतक शेतात एका बांधीत  फन मारत होता.तर दुसऱ्या बांधीत महिला रोवणी करीत होत्या.अचानक दुपारला
विजेच्या गडगडासह  पाऊस पडला. विज  मृतकाच्या अंगावर पडली.जागीच त्यांचा मृत्यु झाला.परंतु,त्यात दोन बैल,पाच महिला,त्यांचा एक मुलगा व पुतण्या थोडक्यात बचावले.वेळीच शेतावर काम करणारे महिला पुरुष गोळा झाले.त्यांना पत्नी व दोन मुले आहेत.  मृतकाची  माहिती होताच घटनास्थळी तलाठी पोहचले व माहिती घेतली.तसेच डूग्गीपार
पोलिसांनी पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.

शनिवार, मे २०, २०२३

नवेगाव नागझिरा व्याघ्र अभयारण्यात सोडण्यात आल्या दोन वाघिणी

नवेगाव नागझिरा व्याघ्र अभयारण्यात सोडण्यात आल्या दोन वाघिणी

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती. नागझिऱ्यातील वाघांना मिळाल्या दोन नव्या मैत्रिणी.



संजीव बडोले प्रतिनिधी
नवेगावबांध दि.20 मे:-
वन विभागाने राज्यामध्ये पहिल्यांदाच एक अभिनव प्रयोग केला आहे. व्याघ्र प्रकल्पातील संतुलन राखण्यासाठी नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये चंद्रपूर वरून आणलेल्या दोन वाघिणींना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत आज दि.20 मे रोज शनिवारी सोडण्यात आले. यावेळी खासदार सुनील मेंढे, खासदार अशोक नेते आमदार मनोहर चंद्रिकापुरे,आमदार विजय रहांगडाले प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक रंगनाथ नाईकडे, वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक ताडोबा अंधारी प्रकल्प डॉ. जितेंद्र रामगावकर, विशेष पोलीस महासंचालक (नक्षल सेल) संदीप पाटील, उपवनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक नवेगाव-नागझिरा जयरामेगौडा आर., गोंदिया उपवनसंरक्षक कुलराज सिंह, भंडारा उपवनसंरक्षक राहूल गवई, गोंदिया निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपसंचालक नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखिव क्षेत्र साकोली पवन जेफ, विभागीय वन अधिकारी प्रदीप पाटील व सहाय्यक वनसंरक्षक राजेंद्र सदगीर यावेळी उपस्थित होते.वनविभागाची इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 


संशोधन, पर्यटन, संवर्धन व ईन ब्रिडिंग या चार मुद्यांवर आधारित कार्य वनविभागाने हाती घेतले असून त्या अंतर्गत आज नवेगाव-नागझिरा अभयारण्यात वाघिणींचे स्थानांतरण करण्यात आले. नैसर्गिक अधिवासासाठी येथील जंगल उपयुक्त आहे. वाघिणींच्या आगमनामुळे नवेगाव-नागझिरा अभयारण्य वन्यजीव प्रेमी, अभ्यासक व पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनेल असा विश्वास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प नैसर्गिक अधिवासासाठी उत्तम ठिकाण असून आज सोडण्यात आलेल्या वाघिणींच्या प्रजननातून वाघांची पुढील पिढी दर्जेदार निर्माण होण्यास सहाय्यभूत ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वन्यप्रेमींची मागणी आणि त्या अनुषंगाने खासदार सुनील मेंढे यांनी केलेल्या पाठपुराव्याच्या प्रयत्नातून आज (दि.२० मे ) नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात दोन नवीन वाघिणींना सोडण्यात आले. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. 
व्याघ्र संवर्धन आणि स्थानांतरण या उपक्रमांतर्गत या दोन वाघिणींचे चंद्रपूर जिल्ह्यातून स्थानांतरण करून त्यांना आज नागझिरा अभयारण्य सोडण्यात आले. पर्यटन आणि वन्यजीवाच्या संदर्भात खासदार यांची सकारात्मकता म्हणूनच आज हे शक्य झाल्याचे वनमंत्र्यांनी सांगितले. भविष्यात आणखी तीन वाघ सोडले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आमच्याकडे जंगल आहे मात्र जंगलात वाघांची संख्या खूप नाही. मग आम्ही इतर जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये पर्यटनासाठी जातो. वाघ पाहून संतुष्ट मनाने घराकडे परततो. कधी व्याघ्र दर्शन न झाल्याने निराश होऊन परततो. पण आता दोन वाघिणीच गोंदिया- भंडारा जिल्ह्याच्या जंगलात आल्या आहेत. खासदार सुनील मेंढे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या व्याघ्र संवर्धनाच्या निर्धारातून आज (दि.२० मे) दोन वाघीण नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडल्या गेल्या आहेत. वन्यजीव प्रेमींसाठी अत्यंत सुखद असाच हा क्षण म्हणावा लागेल.
भंडारा गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्य त्याच्या विस्तीर्णतेसाठी आणि घनदाट जंगलांसाठी प्रसिद्ध आहे. जंगलात वाघ, बिबट, अस्वल यासह अनेक प्राणी आहेत. आजच्या घडीला ११ वाघ असून त्यात ९ नर आणि २ मादी वाघ आहेत. तरीही पर्यटकांची व्याघ्र दर्शनाची भूक भागत नसल्याने त्यांना इतर जिल्ह्यातील ताडोबा सारख्या प्रकल्पात वाघाच्या दर्शनासाठी फिरावे लागते. नैसर्गिक दृष्ट्या संतुलन राखण्याच्या दृष्टीने वाघिणींची संख्या जंगलात वाढणे गरजेचे आहे. वाघांच्या बाबतीत संतुलन राखले जावे.यासाठी निसर्गाचा विचार करता आणखी वाघिणी या जंगलात असणे अपेक्षित आहे.वन्यप्रेमींकडून या दृष्टीने सातत्याने मागणी केली जात होती. या मागणीच्या आधारे खासदार सुनिल मेंढे यांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे या अनुषंगाने सातत्याने पाठपुरावा केला. प्रत्यक्ष भेट घेऊनही हा विषय समजावून सांगितला. विषयाचे गांभीर्य ओळखून वनमंत्र्यांनी दोन वेगवेगळ्या वंशाच्या वाघिणी नवेगाव नागझिरा अभयारण्यास भेट म्हणून देण्याचा निर्णय जाहीर केला होता.आज २० मे रोज शनिवारला या दोन्ही वाघिणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार सुनील मेंढे, चंद्रपूर गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार अशोक नेते आमदार विजय रहांगडाले आमदार मनोहर चंद्रिकापुरे ,वन्यजीव व वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थित दोन्ही वाघिणींना जंगलात सोडण्यात आले. निलय विश्रामृहासमोरील जंगल परिसरात या वाघिणी सोडण्यात आल्या आहेत.भविष्यात आणखी तीन वाघ सोडले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी वनमंत्र्यांनी यावेळी सांगितले. पट्टेदार वाघांची संख्या  वाढून, पर्यटनाला चालना मिळणे.हा एक महत्त्वाचा दृष्टिकोन यामागे असल्याचे खासदार सुनील मेंढे यांनी यावेळी सांगितले. या दोन वाघिणींमुळे या  क्षेत्रातील वाघांची संख्या बारा वरून  आता 14 वर पोहोचली आहे. 
नवेगाव-नागझिरा या राखीव व्याघ्र अभयारण्यात बारा वाघांची संख्या होती. यामध्ये वाघिणींची संख्या कमी असल्याने वाघांमध्ये होत असलेला संघर्ष टाळण्यासाठी आणि या क्षेत्रात वाघांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने तसेच चंद्रपूर मध्ये वाढलेल्या वाघांचा पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने राज्यात पहिल्यांदाच हा अभिनव प्रयोग करण्यात आला. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातून अडीच ते तीन वर्षाची एक एक वाघीण पकडून तिला शनिवारी नागझिरा अभयारण्यात सोडण्यात आले.  हा राज्यातील पहिलाच प्रयोग असल्याने वनविभागाने जय्यत तयारी केली होती. जिथे या वाघिणीला सोडणार होते त्या ठिकाणी  जाळी आणि हिरव्या नेट ने कुंपण केले होते. तसेच देखरेखी साठी मच्यान लावण्यात आले होते. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे स्वतः या कार्यक्रमासाठी नागझिरा येथे उपस्थित होते. वाघिणीला सोडल्यानंतर मुनगंटीवार यांनी या वाघिणीचे सुरक्षा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गाडीला हिरवा झेंडा दाखविला. 
जगात १९३ देश आहेत या पैकी केवळ १४ देशात वाघ आहेत. या 14 देशांपैकी सर्वात जास्त वाघ हे भारतात  आहे. ६५ टक्के वाघ हे भारतात आहेत.  त्यापैकी सर्वात जास्त हे विदर्भात आहेत  हे विदर्भाचे वैशिष्ट आहे. नागझीराचा पर्यटन वाढावा या साठी दोन वाघिणी सोडण्याचा निर्णय घेतला. नागझिरा कोर क्षेत्र ६५३ स्क्वेअर  किलो मीटर आहे.  तर बफर १२४१ स्क्वेअर किलो मिटर एवढं असल्याने आणि २० वाघ अधिवास करतील एवढी क्षमता  असल्याने  आता २ वाघिणी सोडण्यात आल्या असून पुढे ३ वाघ पुन्हा सोडण्यात येणार असल्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले

शनिवार, मे ०६, २०२३

भूमिपूजनासाठी निघालेल्या खासदारांना दाखवले काळे झेंडे

भूमिपूजनासाठी निघालेल्या खासदारांना दाखवले काळे झेंडे




संजीव बडोले प्रतिनिधी/ नवेगावबांध दि.६ मे.
नवेगावबांध येथील पर्यटन संकुलातील रॉक गार्डनचे व कॉन्फरन्सचे हॉल या दोन कामांचे गेल्या १४ वर्षापासून लोकार्पण न झाल्याने, निवडून आल्यापासून गेल्या चार वर्षापासून याबाबत कुठली चर्चा व बैठक गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील मेंढे (sunil mendhe) यांनी लावली नाही. याच्या निषेधार्थ येथे एका भूमिपूजनासाठी खासदार मेंढे येथे आले असता, विश्रामगृहावरून कार्यक्रम स्थळी  जात असताना,येथील आझाद चौकात सकाळी ११.३५ वाजेच्या दरम्यान काळे झेंडे दाखवून खासदार मेंढे यांचा निषेध करण्यात आला.


खासदार मेंढे निवडून आल्यावर सत्कार स्वीकारण्याच्या समारंभा निमित्त पहिल्या वर्षी तालुक्यात आले होते.त्यावेळी येथील टी पॉइंट चौकात नवेगावबांध फाउंडेशनच्या वतीने खासदार मेंढे यांना निवेदन देऊन या कामाची आठवण करून देण्यात आली होती. यावर बैठक लावून चर्चा करू असे आश्वासने खासदारांनी त्यावेळी दिले होते. त्यावेळी खासदार सुनील मेंढे (sunil mendhe) यांच्या मालकीच्या मे.सन्नी कन्स्ट्रक्शन भंडारा यांनी रॉक गार्डन व येथील कान्फरन्स हाल चे बांधकाम कंत्राटदार म्हणून केले होते. हे येथे उल्लेखनीय आहे.



नवेगावबांध (navegao bandh) येथील पर्यटन संकुल स्थळी सन २००३-०४ या आर्थिक वर्षात रॉक गार्डन व कॉन्फरन्स हाल करिता कोट्यावधीचा निधी प्राप्त झाला होता. सदर कामाचे कंत्राट भंडारा येथील सनी कन्स्ट्रक्शन ज्याचे मालक विद्यमान खासदार सुनील मेंढे हे आहेत.असोसिएट अश्फाक अहमद यांच्या मदतीने सदर काम करायचे होते.२००७-०८, २००८-०९  या कालीवधी मध्ये हे बांधकाम  करण्यात आले होते. सदर काम करतेवेळी त्या कामात बऱ्याच तफावती होत्या. नवेगावबांध संघर्ष समितीच्या वतीने झालेल्या कामाचं लोकार्पण करा, अन्यथा दोषींवर कारवाई करा.एवढेच मागणी करण्यात आली होती. या मागणीला धरून नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष या नात्याने रामदास बोरकर यांनी लोकायुक्ताकडे दाद मागितली होती. यामध्ये लोकायुक्ताने गोदिया जिल्ह्याचे तत्कालीन दोन जिल्हाधिकारी व राज्याचे प्रिन्सिपल सेक्रेटरी यांना या प्रकरणात दोषी ठरविले होते. त्यावेळी आपण सदर कामाचे लोकार्पण करा किंवा दोषींवर कारवाई करा.एवढी मागणी लावून धरली होती. नवनियुक्त खासदार सुनील मेंढे यांची तीन वर्षांपूर्वी भंडारा येथील शासकीय विश्रामगृहात फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली होती. त्यांना सर्व काही विसरून त्या गार्डनची डागडूजी करून, त्याचे लोकार्पण करण्याची विनंती करण्यात आली होती.परंतु वर्षा मागून वर्ष लोटून ही नवेगावबांध येथील पर्यटन संकुलातील त्या गार्डनचे व कॉन्फरन्सचे लोकार्पण न झाल्याने,या गोष्टीचा निषेध म्हणून नवेगावबांध येथे आज दिनांक ६ मे रोज शनिवारला येथील  आझाद चौक येथे  खासदार सुनील मेंढे हे येथील ग्रामपंचायत समोरील जलजीवन मिशनच्या कामाच्या भूमिपूजनासाठी विश्रामगृहावरून कार्यक्रम स्थळी जात  असतांना आझाद चौक येथे 
रामदास बोरकर,नवेगावबांध फांऊडेशन,मुकेश चाफेकर शाखाप्रमुख ठाकरे सेना,घनश्याम कापगते शाखा उपप्रमुख ठाकरे सेना यांनी काळे  झेंडे दाखवून निषेध केला.अचानक काळे झेंडे दाखवण्यात आल्यामुळे काही काळ त्या ठिकाणी गोंधळ उडाला. झालेल्या प्रकाराबद्दल क्षणभर थांबून खासदारांचा ताफा कार्यक्रम स्थळी पोहोचला.

कोट
गोंदिया जिल्ह्याच्या नवेगावबांध पर्यटन संकुलाचे पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यात यावा याकरिता संघर्ष समितीचा पंचवीस वर्षांपूर्वीपासून विकासाकरिता संघर्ष सुरू आहे.शासन व जनप्रतिनिधी याना निवेदनातून विकासाची मागणी करण्यात येत आहे ,याचाच एक भाग म्हणून 2003 च्या कालावधीमध्ये कोट्यावधीचा रुपयांचा निधी संकुल परिसराच्या विकासासाठी प्राप्त झाला. त्यामध्ये राग गार्डन व कॉन्फरन्सलचे काम हाती घेण्यात आले होते.परंतु कामांमध्ये फार तफावत होती आणि दिवसा मागून दिवस निघून जात असताना सदर कामाचे लोकार्पण होत नव्हते.या कामाचे लोकार्पण करण्यात यावे व कामाचे लोकार्पण होत नसेल, तर दोषींवर कारवाई करण्यात यावी एवढी मागणी आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतरही या कामाकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याने माननीय खासदार यांना आपण प्रत्यक्ष भेटून विनंती केली की, आपल्या हातून हे काम झालेले आहे. आपण त्याची डागडूजी करून ते लोकार्पण करावे,ही अपेक्षा होती. तरीसुद्धा त्यांनी ते केलं नाही.त्याचे स्मरण करून द्यावे आणि याकडे दुर्लक्ष केले म्हणून, आम्ही खासदारांना काळे झेंडे दाखवून आज नवेगावबांध येथे निषेध केला.
- रामदास बोरकर,
अध्यक्ष,नवेगावबांध फाउंडेशन.


Sunil Baburao Mendhe is an Indian Politician and a Member of Parliament to the 17th Lok Sabha from Bhandara–Gondiya Lok Sabha constituency, Maharashtra. 

नवेगावबांध येथे ९ कोटीच्या पाणीपुरवठा योजनेचे खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते भूमिपूजन

नवेगावबांध येथे ९ कोटीच्या पाणीपुरवठा योजनेचे खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते भूमिपूजन



संजीव बडोले प्रतिनिधी/ 
नवेगावबांध दि.६ मे:-
जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मंजूर झालेल्या नवेगावबांध नळ पाणीपुरवठा योजना अंदाजपत्रकीय किंमत ४९७.४४ लाख व सिरेगावबांध प्रादेशिक पाणीपुरवठा योजना विशेष दुरुस्ती अंदाजपत्रकीय किंमत ३५६.२८ लाख रुपये कामाचे भूमिपूजन येथील ग्रामपंचायत आवारात भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील मेंढे यांच्या शुभहस्ते आज दि.६ मे रोज शनिवारला दुपारी १२.०० वाजता संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चांद्रिकापुरे हे होते.

प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य रचानाताई गहाने, लायकराम भेंडारकर, पंचायत समिती सदस्य संदीप कापगते, ग्रामपंचायत सरपंच हिराताई पंधरे, उपसरपंच रमेश डोंगरवार, ग्रामपंचायत सदस्य देवाजी कापगते प्रामुख्याने यावेळी उपस्थित होते.
अर्जुनी मोरगाव पंचायत समितीचे उपसभापती होमराज पुस्तोडे, ग्रामविकास अधिकारी व्ही.ई.रामटेके यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य पितांबर काशीवार,विजय कुंभरे, दिलीप शिपानी, लेनिन राऊत, रेशीम काशिवार, प्रेमचंद चांदेवार, सोनाली नाकाडे ,सरीता नाईक, पारामीता भूमके प्रियंका सांगोळकर, सीमा बडोले,दुर्गा शहारे,पूजा कापगते, मिना पहाडे,सुरेखा येळाम, पाणिपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.

शनिवार, एप्रिल २२, २०२३

गोसावी कोकणा येथे अवकाळी पाऊस व गारपीटीने पिकाचे अतोनात नुकसान.शेतकऱ्यांची आर्थिक मदतीची मागणी.

गोसावी कोकणा येथे अवकाळी पाऊस व गारपीटीने पिकाचे अतोनात नुकसान.शेतकऱ्यांची आर्थिक मदतीची मागणी.



संजीव बडोले, प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२२एप्रिल:-
गोंदिया जिल्ह्यातील ‌सडक अर्जुनी तालुक्यात आज २२एप्रिल रोज शनिवारला ला तालुक्यात सायंकाळी ४.३० ते ५ वाजेदरम्यान वादळ वा-यासह आलेल्या अवकाळी पावसाने, धान व मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील गोसाई कोकणा येथे वादळ वा-यासह आलेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने धान ,मका व अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गेला दोन तीन दिवसापासून मौसम खराब आहे. वादळ वारा येत होता मात्र पाऊस आलेला नव्हता. आज मात्र वादळ वा-यासह आलेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने शेतकऱ्यांचे शेतातील पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे.यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

बुधवार, एप्रिल ०५, २०२३

बेहळीटोला येथील नवसाला पावणारी गिरजामाता.

बेहळीटोला येथील नवसाला पावणारी गिरजामाता.

              








संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.५ एप्रिल:-
  ‌
सडकअर्जुनी तालुक्यातील गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या बेहळीटोला या गावात ३०कुटुंब संख्या असून जवळपास २५० लोकसंख्येची लहान वस्ती आहे.या गावात मागिल चार पिढ्यांपासून प्रत्यक्ष स्वरूप देवीची मूर्ती असून एक सिध्दी स्थळ आहे.या स्थळाची ओळख गिरजामाता म्हणून आहे.येथे येणा-या प्रत्येक भाविकांची मनोकामना पूर्ण होत असल्याचे बोलले जाते. ‌सडक अर्जुनी तालुका मुख्यालयापासून २४ किमी.अंतरावर बेहळीटोला गाव आहे. गिरजामाता मंदिर सुमारे दिडशे वर्ष जुने आहे.गावालगत जंगल असून या गावातील लोक हलबी गोंड समाजाचे आहेत.या गावातील चौधरी यांनी आपले कुलदैवत म्हणून गिरजामाता मंदिराची स्थापना केली होती.मागिल चार पिढ्यांपासून सुरवातीला रघु चौधरी यांच्या स्वप्नात गिरजामाता निंबाच्या झाडाखाली असल्याचे सांगून त्याठिकाणी रघु चौधरी यांनी मुर्ती स्थापन करून मंदिर बांधले.तिच परंपरा आजही कायम आहे.परंपरेची जोपासना दुसरी पिढी पांडुरंग चौधरी,तिसरी पिढी मंगरू चौधरी,सकटू चौधरी,चांगो,देवाजी चौधरी आणि आता चौथी पिढी कचरू सकटू चौधरी चालवत आहेत.या मंदिरात नवरात्रीमध्ये नऊ दिवस घटस्थापना करून पुजाअर्चना केली जाते.यात तालुक्यातील अनेक भाविक भक्त या उत्सवात सहभागी होतात.तसेच संक्रांतीला दोन दिवस दुर्गाबाई डोहावर जाऊन पुजा करीत असतात.चैत्रामध्ये हनुमान जयंतीला पालखी घेऊन मंदिरातील ढोल नगारे वाजवून पालखी मिरवणूक जवळपासच्या गावांमध्ये फेरी काढून जोगवा मागून रात्री तेल जाळून हा उत्सव साजरा केला जातो ‌.या देवस्थानात वर्षभर अनेक भाविक भक्त येत असतात.चैत्रामध्ये नवस फेडणारे भाविक भक्त त्रिशूळ व घोडयाची मुर्ती देवस्थानात अर्पण करतात.चार पिढ्यांपासून स्थापन केलेली मुर्ती त्याचठिकाणी असून मंदिरासारखे छत तयार करण्यात आले आहे.सन १९३०मध्ये २५ किलोचा पंच धातुचा घाट भाविकांनी या  गिरजामाता मंदिराला अर्पण केला आहे.तसेच सन १९३४शुक्ल चैत्रात चिचटोला गावातील पंच लोकांनी ५किलोची घाट अर्पण केली होती,ती आजही या मंदिरात आहे.या घाटा वाजविल्यास २-२ किमी. पर्यंत रात्रीच्या वेळी आवाज जातो.हे विशेष.                        ‌                                          ‌========≠========‌ ‌.  *प्रसिध्दी नसल्याने विकासापासून कोसो दूर**:---या मंदिरात गिरजामाता अदृश्य स्वरुपात वास्तव्य करीत असते.या मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकांची मनोकामना पूर्ण होते.या गिरजामाता मंदिरावर अनेक भाविकांची अतुट श्रद्धा आहे. या देवीचे भक्त स्थानिक कचरू सकटू चौधरी मंदिराची नित्यनेम पुजाअर्चना करून देखरेख करतात.तसेच बेहळीटोला व चिचटोला वासी सुद्धा मंदिराची देखरेख करतात.येथील गिरजामाता मंदिर सिद्ध असून प्रसिद्धी नसल्याने विकासापासून कोसो दूर आहे.अशी खंत या देवीचे भक्त कचरू सकटू चौधरी यांनी सदर प्रतिनिधी जवळ बोलून दाखवले.            ‌=================

मंगळवार, फेब्रुवारी १४, २०२३

कालीमाती येथे १७ फेब्रुवारी ला भव्य खंजेरी भजन स्पर्धा | १८ ला महाप्रसाद

कालीमाती येथे १७ फेब्रुवारी ला भव्य खंजेरी भजन स्पर्धा | १८ ला महाप्रसाद




संजीव बडोले प्रतिनिधी/नवेगावबांध दि.१४ फेब्रुवारी:-

श्री गणेश सत्संग भजन मंडळ कवठा, जय कोकणाई माता महिला भजन मंडळ कवठा,कालीमाती हनुमान मंदिर देवस्थान समिती सुकळी खैरी, ग्रामपंचायत गोठणगाव, प्रतापगड, बाराभाटी, कुंभीटोला, देवलगाव,कवठा,येरंडी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या दिनांक १७ फेब्रुवारी रोज शुक्रवारला सायंकाळी ७.०० वाजता हनुमान मंदिर कालीमाती परिसर येथे भव्य खंजिरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.


स्पर्धेचे उद्घाटन अर्जुन मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे, गोंदिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष यशवंत गणवीर यांच्या शुभहस्ते होणार असून,माजी जिल्हा परिषद सदस्य व खोडशिवनी ग्रामपंचायतचे सरपंच गंगाधर परशुरामकर हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. अर्जुनी मोरगाव पंचायत समितीचे उपसभापती होमराज पुस्तोडे, गोंदिया जिल्हा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुनील तरोणे हे पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेत प्रथम क्रमांक दहा हजार रुपये, द्वितीय क्रमांक सात हजार रुपये, तृतीय क्रमांक पाच हजार रुपये रोख विजेत्या मंडळांसाठी राखून ठेवण्यात आले आहेत. 

तसेच पुरुष महिला गायक तबलावादक हार्मोनियम वादक यांच्यासाठी प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार आहे. पुजारी केवळराम कांबळे व कवठा पोलीस हरिचंद मेश्राम यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. दिनांक 18 फेब्रुवारी रोजी शनिवारला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या भव्य खंजिरी भजन स्पर्धेला भजन मंडळांनी व भक्तांनी उपस्थित राहावे.असे आवाहन आयोजका च्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

गुरुवार, फेब्रुवारी ०२, २०२३

दृष्टीव्यंग शिबीरात 45 बालकांचा मोफत उपचार | Eye Health News Government hospital in Gondia, Maharashtra

दृष्टीव्यंग शिबीरात 45 बालकांचा मोफत उपचार | Eye Health News Government hospital in Gondia, Maharashtra


गोंदिया | बाई गंगाबाई महिला व बाल रुग्णालयात (Bai Ganga Bai Women Hospital, Gondia ) 2 फेब्रुवारी 2023 रोजी जन्म जात दृष्टीदोष (आरओपी) तिराळेपण यावर  नागपूर येथील प्रख्यात  सुरज नेत्रपेढीच्या  अनुभवी नेत्र चिकित्सक मार्फत मोफत रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन डी इ आई सी या जिल्हा शीघ्र हस्तक्षेप उपचार केंद्रात होते. 

 या कॅम्प चे उदघाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अंबरीश मोहबे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या वेळी प्रमुख मार्गदर्शिका म्हणून बाई गंगाबाई महिला व बाळ रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर तसेच डी इ आय सी चे बालरोग तज्ञा डॉ प्रदीप गुज्जर डॉ त्रिपाठी मॅनेजर श्री पारस लोणारे तसेच समुपदेशक श्री अजित सिंग प्रामुख्याने उपस्थित होते. 

या कॅम्प मध्ये आर बी इस के च्या माध्यमातून संदर्भ सेवा दिलेल्या दृष्टी व्यंग असलेल्या बालकांना नेत्र तज्ज्ञांनी उपचार केले तसेच  विशेष करून ज्या नवजात शिशुना एस एन सी यु मध्ये अनेक दिवस उपचार घ्यावा लागला होता अशा बाळांना नेत्र तज्ञा मार्फत आर ओ पी करिता स्क्रिनिंग करून घेण्यात आली.

तसेच ज्या लहान बालकांना डोळ्याची  नजर तिरपी आहे. तिराळेपणा आहे त्यांना शस्त्रक्रिया करून पूर्ववत नजर प्राप्त करण्यासाठी मोफत वैद्यकीय सल्ला व समुपदेशन  देण्यात आले  गोंदिया जिल्ह्यातून विविध तालुक्यातून  माता पालक आपल्या बाळाला घेऊन गंगाबाई कॅम्पस मधील  डी इ आय सी मध्ये घेऊन आले होते. या मोफत शिबिरांत सुमारे 45 बालकांचा विशेष तपासणी व मोफत उपचार करण्यात आले. कॅम्प चे संयोजन डी इ आई सी केंद्राचे मॅनेजर श्री पारस लोणारे व समुपदेशक अजित सिंग यांनी केले . 
कॅम्प यशस्वी करण्यासाठी या केंद्राचे  श्री अमित शेंडे, रोशन कुर्वे, प्रकुर्ती मनोहर, पूजा बैस, तसेच रिता नेवरे व शालिनी यादव यांनी परिश्रम घेतले .

Government hospital in Gondia, Maharashtra

शुक्रवार, जानेवारी २७, २०२३

भाजपचे ज्येष्ठ नेते रघुनाथ लांजेवार यांचे निधन

भाजपचे ज्येष्ठ नेते रघुनाथ लांजेवार यांचे निधन








संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२७ जानेवारी:-
येथील भारतिय जनता पक्षाचे जेष्ठ नेते, जिल्हा संपर्क प्रमुख, भाजपाचे जेष्ठ मार्गदर्शक अर्जुनी मोर. तालुका भाजपा चे माजी अध्यक्ष, नवेगांवबांध ग्रामपंचायत चे माजी सरपंच, उपसरपंच, खरेदी विक्री समिती अर्जुनी मोर. चे संचालक, एक मनमिळाऊ व निस्वार्थ जनतेची अहोरात्र सेवा करनारे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, नवेगांवबांध निवासी रघुनाथ हगरुजी लांजेवार यांचे आज दि.27 जानेवारी रोज शुक्रवार ला दुपारी  2:30 वाजता भंडारा येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. मृत्युसमयी ते 72 वर्षाचे होते. उद्या दि.28 जानेवारी रोज शनिवार ला सकाळी 10.00 वाजता नवेगांवबांध येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांचे मृत्युपश्च्यात पत्नी, दोन मुले, दोन मुली व बराच मोठा परिवार आहे. 
भाजपाचे जेष्ठ नेते रघुनाथ लांजेवार यांचे निधनाने अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रांतील भारतिय जनता पक्षाची प्रचंड हाणी झाली असुन,पक्षाने एक तळमळीचा व निष्ठावावान नेता गमावल्याची प्रतिक्रिया माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केली आहे.

रविवार, जानेवारी २२, २०२३

नवेगावबांध-कोहमारा मार्गावर मोटर सायकलची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक.एक ठार,तर एक गंभीर.अपघातात नेमीचंद वलथरे यांचे दुःखद निधन.

नवेगावबांध-कोहमारा मार्गावर मोटर सायकलची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक.एक ठार,तर एक गंभीर.अपघातात नेमीचंद वलथरे यांचे दुःखद निधन.









संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२१ जानेवारी:-
नातेवाईकाच्या अंतिम संस्काराला उपस्थित राहून स्वगावी परतणाऱ्या एका मोटर सायकल चालकाचे अपघाती दुःखद निधन झाले.रोडवर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिल्याने मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला. मृतकाचे नाव नेमीचंद बादशहा वलथरे राहणार सावरटोलाअसे असून, मागे स्वार असलेला चुलत भाऊ गंभीर जखमी झाला आहे.
अपघाती निधनाचे वृत्त कळताच दोन मुली,पत्नी व वृद्ध आईवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. त्यांच्या मृत्यूने साऱ्या गावावर शोककळा पसरली आहे.
सदर दुर्घटना दिनांक 20 जानेवारी च्या सायंकाळी 6:15 ते 6:30 वाजेच्या दरम्यान नवेगावबांध- कोहमारा मार्गावरील येथील भारत गॅस गोदामाच्या जवळ घडली.
प्राप्त माहितीनुसार,काल दिनांक 20 जानेवारीला अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सावरटोला येथील रहिवासी नेमीचंद बादशाह वलथरे वय 52 वर्षे हे आपल्या चुलत भाऊ भोजराम रामजी वलथरे वय 48 वर्षे दोघेही राहणार सावरटोला हे,भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील मोहघाटा येथून स्वतःच्या मोटरसायकल एमएच 35,एक्स 5779 ने फुटाळासौंदड येथे आपल्या मुली,जावई व नातवांना भेटून कोहमारा मार्गे स्वगावी सावरटोला येथे परत येत असताना, नवेगावबांध-कोहमारा या मार्गावर सायंकाळी 6.15 ते 6.30 वाजता नवेगावबांध येथील भारत गॅस गोडाऊन जवळ रस्त्यावर उभे असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली क्रमांक एमएच 35,जी 7393 ला जबर धडक दिली.या अपघातात मोटरसायकल चालक नेहमीचं वलथरे व त्यांचे भाऊ भोजराम वलथरे हे दोघेही गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच, ये जा करणाऱ्या लोकांनी त्यांना ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
नेमीचंद वलथरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.तर दुसरे गंभीर जखमी भोजराम वलथरे यांच्यावर प्राथमिक उपचारानंतर ते गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती आहे.देवलगाव येथील सुदाम शेंडे यांच्या मालकीचा ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल.अशा स्थितीत धोकादायक व निष्काळजीपणाने उभे करून ट्रॉलीला कोणत्याही प्रकारचे रिपटेकलेस पार्किंग लाईट न लावता उभे ठेवल्याने मोटरसायकल चालक नेमीचंद वलथरे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरले.तसेच फिर्यादीचे भाऊ भोजराम वलथरे  गंभीर जखमी करण्यास कारणीभूत ठरले.ट्रॅक्टर चालकावर फिर्यादी केशव रामजी वलथरे राहणार सावरटोला यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे नवेगावबांध येथे अपराध क्रमांक 09/2023 कलम 283,337,338,304(अ), भादवि सहकलम222/177 मोटार वाहन कायदा अव्यये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मपोना घनमारे हे करीत आहेत.मृतक नेमीचंद वलथरे यांच्यावर शवविच्छेदनानंतर सावरटोला येथील स्थानिक स्मशान घाटावर शोकाकुल गावकरी आप्तेष्ट व कुटुंबीय यांच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करण्यात आले. मृतक नेमीचंद यांच्या मागे आई,पत्नी,तीन मुली आहेत.मृतक नेमीचंद यांच्या अपघाती निधनाने वलथरे कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. वडीलाच्या अपघाती निधनाचे वृत्त कळताच दोन मुली,पत्नीने व वृद्ध मातेने टाहो फोडला. वलथरे कुटुंबीयांचा एकमेव आधारवड या अपघाताने हिरावून घेतला.
मृतक नेमीचंद हे त्यांच्या कुटुंबीयांचे एकमेव आधार होते. त्यांच्या अशा अकाली जाण्याने त्यांचे कुटुंब दुःखाच्या महासागरात बुडून गेले आहे. त्यांची मोठी मुलगी वैष्णवी 12 कला शाखेतून संग्रामे विद्यालयातून इयत्ता बारावीला द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. उद्या दिनांक 22 जानेवारीला विद्यालयाच्या वार्षिक उत्सवात गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभात तिचा सत्कार करण्यात येणार आहे.परंतु तिचा हा गौरव बघायला वडील ह्यात नाहीत.याचे दुःख तिला आहे, तर दुसरी मुलगी तेजस्विनी ही सम्राट अशोक विद्यालय उमरी येथे इयत्ता दहावीत शिकत आहे. वडिलांच्या अकाली, अपघाती निधन झाल्याने या दोन्ही मुलीवर दुःखाचा आघात झाला आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण सावरटोला गावावर शोककळा पसरली आहे.

सोमवार, जानेवारी १६, २०२३

उद्या आरुषी पब्लिक स्कूल येथे दोन दिवसीय वार्षिकोत्सवाचे आयोजन.

उद्या आरुषी पब्लिक स्कूल येथे दोन दिवसीय वार्षिकोत्सवाचे आयोजन.


संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.१६ जानेवारी:-
कमल गोविंद युनायटेड सोसायटी द्वारा संचालित आरुषी पब्लिक स्कूल,अमित ज्यूनियर कॉलेज,रुखमा महिला महाविद्यालय, लिटिल स्टार कॉन्व्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१७ व १८ जानेवारीला वार्षिकोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.वार्षिकोत्सवाचे उद्घाटन दि. १७ जानेवारी रोज मंगळवार ला दुपारी ३:३० वाजता येथील सुप्रसिद्ध वैदक डॉ.अ.का.कापगते यांच्या शुभहस्ते,गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोझरीचे केंद्रीय प्रचारक कुलदीप लांजेवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. अतिथी म्हणून डॉ. सुवर्णा रावल उपप्राचार्य बीएनएन कॉलेज भिवंडी मुंबई,भटके आयुक्त विकास परिषद नागपूरचे प्रांत संयोजक दिलीप चित्रीवेकर,नवेगावबांध ग्रामपंचायत चे सरपंच हिराताई पंधरे, नवेगावबांध पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पांढरे,पंचायत समितीचे उपसभापती हमराज पुस्तोडे ,उद्योजक अनिल जैन,मुख्याध्यापक किशोर शंभरकर,प्रतिष्ठित व्यापारी कमल जायस्वाल,मराठा महासंघाचे सुनील तरोणे, माझी बांधकाम समिती सभापती प्रकाश गाहणे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. सायंकाळी ४.३० वाजेपासून स्वरसंध्या,आम्हा नकळे ज्ञान सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण,तर बुधवार दिनांक १८ जानेवारीला सायंकाळी ५.३० वाजता सांज संध्या नृत्याविष्कार विद्यार्थ्यांच्या वतीने सादर केले जाणार आहे. तरीपण सर्व पालकांनी व विद्यार्थ्यांनी सदर वार्षिकोत्सवात बहुसंख्येने सहभागी व्हावे.असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष वैशाली बोरकर,सचिव एकनाथ बोरकर, संस्थेचे सर्व प्राचार्य यांनी केले आहे.
अमित ज्युनिअर कॉलेज येथे  एक दिवसीय विज्ञान प्रदर्शन संपन्न.  प्रदर्शनीत ग्रामीण भागात शाश्वत विकास हाच केंद्रबिंदू.

अमित ज्युनिअर कॉलेज येथे एक दिवसीय विज्ञान प्रदर्शन संपन्न. प्रदर्शनीत ग्रामीण भागात शाश्वत विकास हाच केंद्रबिंदू.










संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.१६ जानेवारी:-
आपले गाव आपला परिसर हा ग्रामीण क्षेत्रात मोडतो. या भागातील शाश्वत विकासाचे प्रयत्न करून, विज्ञान व तंत्रज्ञान च्या ज्ञानावर आधारित काय उपक्रम ग्रामीण संसाधनावर उभारता येतील?हे केंद्रबिंदू मानून,येथील कमल गोविंद युनायटेड वेल्फेअर सोसायटी द्वारा संचालित आरुषी पब्लिक स्कूल येथे,आरुषी पब्लिक स्कूल व अमित ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने वैज्ञानिक संशोधनाचे बीज विद्यार्थ्यांच्या अंतकरणात शालेय जीवनापासूनच रुजावे या उद्देशाने एक दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.


विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन येथिल प्रतिष्ठित व्यापारी कमल जायस्वाल यांच्या शुभहस्ते,संस्थेचे सचिव एकनाथ बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. 



प्रमुख पाहुणे म्हणून,पंचायत समितीचे उपसभापती होमराज पुस्तोडे, ग्रामपंचायत सदस्य बबलू जैन,नीता जायस्वाल,डॉ.भोयर, कविता शिपानी,भोयर मॅडम, मुख्याध्यापक रमेश नाकाडे,संजीव बडोले,रामदास बोरकर,डॉ.युगा कापगते, खुशाल काशिवार,महादेव बोरकर,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे, मराठा सेवा संघाचे सुनील तरोणे, गोविंदा बोरकर,प्रशांत कापगते, संजय पुस्तोडे, प्राचार्य तिरुपती मेश्राम,राणे प्रामुख्याने उपस्थित होते.

 प्रारंभी अतिथींच्या हस्ते, भारताचे पूर्व राष्ट्रपती व मिसाईल मॅन, वैज्ञानिक डॉ.एपीजे अब्दुल कलाम व शारदा माता यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून त्यांना अभिवादन करण्यात आले.


विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण, लोप झालेल्या व लोप  होऊ पहात आहेत असे पारंपारिक बी-बियाणे,स्वस्त ऊर्जा,पवन ऊर्जा, अंतराळ,भौगोलिक ज्ञान, शेतीला सिंचन, शेतकऱ्यांना उद्योजक बनवता येइल असे कृषी विषयावर आधारित विविध  असे १४ प्रकल्पाचे सादरीकरण या विज्ञान प्रदर्शनात सादर करण्यात आले. प्रदर्शनात आलेल्या दर्शकांना विद्यार्थ्यांनी माहिती देऊन,त्यांच्या शंका समाधान केले. शाश्वत विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमाचे विद्यार्थ्यांनी सदैव स्वागत करून, स्वतःमध्ये वैज्ञानिक संशोधनाची बीजे शालेय दशे पासूनच अंकुरावी.अशी अपेक्षा व्यक्त करून, उद्याचा भारत आपल्याच खांद्यावर आहे.त्यामुळे जबाबदारीची जाणीव ठेवून भारताच्या सर्वांगीण विकास कसा होईल,याकडे लक्ष द्यावे. अशी अपेक्षा व्यक्त करून, प्रदर्शनात सादर केलेल्या शाश्वत विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमाची अतिथींनी प्रशंशा केली. विद्यार्थ्यांनी तेवढ्यात जोमात अतिथींच्या या अपेक्षेला स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे संचालन अमित बोरकर यांनी केले,तर उपस्थितांचे आभार पोरस ठाकूर यांनी मानले. विज्ञान प्रदर्शनी यशस्वी करण्यासाठी प्रवीण तिरपुडे,महेश लांजेवार,गौतम शेंडे,विक्की बावनकुळे, नारायण डुंबरे ,अश्वघोष रामटेके,द्वारकाजीत मंडले, यादव चांदेवार, सुनिता पटले, अर्चना पवार, मीना राऊत,हर्षा डोये, नगमा साखरे, निशिगंधा सोनवाने,अग्रवाल,रश्मी पवार,मोनिका हटवार,कोमल शेंडे, लीलाधर वळके,अनिल गायकवाड, गजेंद्र देशमुख, कैलास कोवे,तुषार  कांबळे,विठ्ठल जुगनाके,सतीश बहेकार,उषाताई कोल्हे यांनी सहकार्य केले.

बुधवार, डिसेंबर २१, २०२२

नवेगावबांध ग्रामपंचायतमध्ये भाजपाचा किल्ला ढासळला

नवेगावबांध ग्रामपंचायतमध्ये भाजपाचा किल्ला ढासळला



सरपंचपदी काँग्रेसच्या हिराबाई पंधरे.काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडे सत्तांतर.

संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२१ डिसेंबर:-
परिसरातील सर्वात मोठी ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या नवेगावबांध ग्रामपंचायतच्या सरपंच पदासह १७ सदस्यांच्या निवडणुकीचा निकाल हाती आला असून, गेल्या पंधरा वर्षापासून चा भारतीय जनता पक्षाचा किल्ला यंदा ढासळला असून,या निवडणुकीत प्रस्थापितांविरुद्ध भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  या आघाडीला घवघवीत यश यंदा मिळाले आहे. ग्रामपंचायतला स्वतःची मक्तेदारी समजणार्‍या  विद्यमान सदस्यांना मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. सरपंच पदासह आघाडीला ११ जागा, १ अपक्ष व भारतीय जनता पक्ष समर्थित विकास पॅनलला ५ जागा मिळाल्या आहेत. सरपंच पदावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या हिराबाई नीलमचंद पंधरे या विजयी झाल्या आहेत. तर प्रभाग क्रमांक २ मधून भारतीय जनता पक्षाचे दिग्गज व किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे, माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच रघुनाथ लांजेवार,प्रभाग ६ मधून संजय उजवणे यांचा या निवडणुकीत यंदा दारूण पराभव झाला आहे. त्यांच्या पराभवाने भाजपा प्रणित विकास पॅनलला फार मोठा धक्का बसला आहे.रघुनाथ लांजेवार यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे देवाजी कापगते यांचा विजय झाला आहे.
 प्रभाग २ व ६ ची निवडणूक लक्षवेधी होती.संपूर्ण गावाचे लक्ष या निवडणुकीत या प्रभागाकडे लागले होते. 
सरपंच पदाच्या निवडणूक साठी एकूण  ५ उमेदवार रिंगणात होते. सरपंच पदासाठी ६ प्रभागामध्ये ही निवडणूक चुरशीची  झाली होती.१८ डिसेंबरला झालेल्या निवडणुकीत उमेदवारांची भवितव्य ईव्हीएम पेटीत बंद झाले होते.
सरपंच पदासाठी एकूण ५ उमेदवार रिंगणात होते. सहाही प्रभागात सरपंच पदा साठी चुरशीची लढत झाली होती. 
काँग्रेसच्या हिराबाई नीलमचंद पंधरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या इंदू डीडेश्वर पंधरे  व माजी सरपंच खंबायती मडावी यांचा पराभव करून, विजयी झाल्या. यात माजी सरपंच खांबाबाई राजेंद्र मडावी, अपक्ष उमेदवार डिंपल दिलीप पंधरे ह्या पराभूत झाल्या. 


प्रभाग क्रमांक १ मधून 
सर्वसाधारण पुरुष गटातून अपक्ष उमेदवार प्रेमचंद चांदेवार यांनी काँग्रेसचे दिग्गज जगदीश पवार, भाजपाचे हितेंद्र राऊत यांच्यात झालेल्या तिरंगी लढतीत पराभूत केले आहे. दोन्ही पक्षाच्या मातब्बर उमेदवारांना हरवून प्रेमचंद चांदेवार यांनी बाजी मारली.सर्वसाधारण महिला राखीव गटातून भारतीय जनता पक्षाच्या सीमा योगेश बडोले यांनी काँग्रेसच्या सुप्रिया हितेंद्र डोंगरे यांचा पराभव करून विजय मिळविला.
अनुसूचित जमाती गटातून  काँग्रेसचे विजय नीलकंठ कुंभरे यांनी भारतीय जनता पक्षाचे बाबुराव तुळशीराम कोरेटी, अर्चना संतोष मलगाम यांचा पराभव करून विजय मिळविला आहे.
प्रभाग २ मध्ये अनुसूचित जमाती महिला राखीव गटातून भाजपाच्या सुरेखा येळाम यांनी विजय मिळवला. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वर्षा पुराम, वृंदा सयाम यांना पराभूत केला.तर सर्वसाधारण महिला गटातून  भाजपाच्या मीना पहाडे यांनी काँग्रेसच्या जयश्री लोकेश पसीने व शालू झोळे
यांचा पराभव केला. 
प्रभाग क्रमांक ३ मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग या गटातून भारतीय जनता पक्षाचे अशोक हांडेकर यांचा पराभव करून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पितांबर काशीवार विजयी झाले आहे.अनुसूचित जमाती महिला गटातून भाजपाच्या शितल पुसाम यांचा पराभव करून,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सरिता नाईक विजयी झाल्या आहेत. 
प्रभाग क्रमांक ४ मधून सर्वसाधारण गटातून भारतीय जनता पक्ष प्रणित विकास पॅनलचे रेशीम काशीवार निवडून आले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे  ऋषी पुस्तोडे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शैलेश शर्मा. यांचा पराभव केला. अनुसूचित जाती महिला गटातून प्रियंका निलेश सांगोळकर ह्या विजयी झाल्या,त्यांनी भाजपाच्या उमेदवार उषा राजेंद्र साखरे  यांचा पराभव केला. सर्वसाधारण महिला गटातून काँग्रेसच्या दुर्गा दीपक शहारे ह्या विजय झाल्या असून,त्यांनी भाजपाच्या दीपलता विलास राऊत यांच्या पराभव केला
प्रभाग क्रमांक ५ मध्ये झालेल्या तिरंगी लढतीत  सर्वसाधारण गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे व माजी सरपंच लीना डोंगरवार यांचे पती रमेश डोंगरवार यांनी भाजपाचे नितेश्वर मस्के व आघाडी पॅनल चे
धनंजय डोंगरवार यांचा पराभव करून विजय संपादन केला आहे. अनुसूचित जाती महिला गटातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या हेमलता बडोले यांनी भाजपाच्या पल्लवी भूमके यांना पराभूत करून विजय संपादन केले. तर सर्वसाधारण राखीव महिला गटातून कांग्रेसचे जयश्री पशीने यांचा पराभव झाला असून भाजपाच्या पूजा कापगते यांचा विजय झाला आहे.प्रभाग क्रमांक दोन प्रमाणे प्रभाग क्रमांक सहा ची निवडणूक रंगतदार, चुरशीची व लक्षवेधी आहे.
प्रभाग क्रमांक ६ मधून सर्वसाधारण पुरुष गटातून भारतीय जनता पक्षाचे राकेशकुमार  कोल्हे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे  उमेदवार दिलीप शिपानी व काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देऊन महाविकास आघाडीचे उमेदवार, संजय उजवणे यांच्यात झालेल्या तिरंगी काट्याच्या  लढतीत काँग्रेस पक्षाचे दिलीप शिपानी यांनी ही जागा स्वतः कडे खेचून आणली.प्रभाग क्रमांक २ प्रमाणेच प्रभाग क्रमांक ६ मध्ये कोण बाजी मारतो याकडे  साऱ्या गावकऱ्यांचे लक्ष लागले होते.विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संजय उजवणे हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभे होते.हम करे शो कायदा त्यांच्या चांगलेच अंगलट आल्याचे दिसून आले.ग्रामपंचायतचे किंग मेकर म्हणून,त्यांना गावात ओळखले जाते.मात्र या निवडणुकीत मतदारांनी त्यांना चांगलाच दणका दिला.  मतदारांची  नाराजी त्यांनी ईव्हीएम मधून दाखवून दिली. दिलीप शिपानी यांच्यामुळे एक प्रबळ उमेदवार म्हणून मतदारांना एक नवीन पर्याय मिळाला आहे. गावात एक मनमिळाऊ,गरजेच्या वेळी धावून जाणारे सामाजिक कार्यकर्ते,असे दिलीप उर्फ बबलू शिपानी यांची ओळख असून,ऐनवेळी मतदारांच्या कल शिपानी यांच्याकडे झुकल्यास नवल वाटू नये.
अनुसूचित जाती गटातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चेतन साखरे,भाजपाचे नवीनकुमार उके, ईश्वर शहारे यांचा पराभव करून काँग्रेस पक्षाचे  लेनीन राऊत यांनी या प्रभागात विजय मिळवला आहे. 
ग्रामपंचायत करिता झालेल्या निवडणुकीत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सर्वात मोठ्या नवेगाव बांध ग्रामपंचायत मध्ये भारतीय जनता पार्टीला धूळ चाखवून मतदारांनी ग्रामपंचायत मधून भाजपाकडून काँग्रेस राष्ट्रवादीकडे सत्तांतर केले आहे.काँग्रेस पक्षाच्या हिराबाई नीलमचंद पंधरे या थेट जनतेतून सरपंच पदाकरिता निवडणूक जिंकल्या तर उपसरपंच पदासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराची वर्णी लागणार?अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे नवेगावबांध या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी प्रस्थापितांना धक्के देत पराभवाचा दणका देत सत्तांतर घडवून आणला आहे.मतदारांनी  नवख्या उमेदवारांना संधी दिली आहे.आमच्या शिवाय ग्रामपंचायत चालूच शकत नाही, आमचीच गरज आहे?या अहंकारी वृत्ती बाळगणाऱ्या उमेदवारांना जनतेने मतदान नाकारून विद्यमान सत्तापिपासुना सत्तेच्या बाहेर फेकले आहे.विशेष म्हणजे या निवडणुकीने गावामध्ये गावकऱ्यांना नवचैतन्य आले असून, परिवर्तन झाल्याने जनतेमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. ग्रामपंचायत मधील गैर कारभार  निर्वाचित सरपंच व सदस्या कडून दूर होण्याची व स्वच्छ प्रशासन ची आशाबाळगून  नवेगावबांधवांसीयांनी सर्व नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचे स्वागत करीत समाधान व्यक्त केले आहे. सरपंचासह सर्व सदस्य येत्या पाच वर्षाच्या काळात नागरिकांच्या अपेक्षांची पूर्ती करतात की कसे याबाबत गावकरी अपेक्षा ठेवून आहेत.

सोमवार, नोव्हेंबर २८, २०२२

हत्तींचा कळप घुसला गावात; या गावातील नागरिक त्रस्त

हत्तींचा कळप घुसला गावात; या गावातील नागरिक त्रस्त




सोमलपूर,गुढरी,सिरेगावबांध येथील उसवाड्या व धानाच्या पूजण्याची नासाडी.


संजीव बडोले, प्रतिनिधी.
नवेगावबांध:- दि.२८ नोव्हेंबर.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धानाच्या पुंजन्याची प्रचंड नुकसान करीत दाभना, अरततोंडी, इंजोरी पिंपळगाव,खांबी,बाकटी या गावातील शेतकऱ्यांच्या धानाच्या पुंजन्याची प्रचंड नुकसान करीत बाकटी जवळील बोरटोला गावालगतच्या भागी रिठी पहाडी जवळठाण मांडून बसलेल्या, हत्तीच्या कळपा गुढरी,सोमलपुर, सिरेरेगाव बांध या मार्गाने भंडारा वन विभागामध्ये प्रवेश केला आहे. आज दुपारच्या सुमारास शिवनीबांध जलाशयाच्या कडेने झाडगाव,नैनपुर,पापडा मार्गे महालगाव सुकळी परिसरात हत्तीच्या कळपाने आपले बस्तान मांडले आहे. गुढरी, सोमलपुर, सिरेगावबांध येथील शेतातील धानाच्या पुंजण्याची तसेेच ऊस वाड्यानची मोठी नुकसान केली आहे.


अर्जुनी मोरगाव तालुक्यातून हत्तींच्या कळपाने भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पीडित शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वावस टाकला आहे. परवा रात्रीच्या सुमारास अर्जुनीमोरगाव तालुक्यातील दाभणा, अरततोंडी,पिंपळगाव, खांबी, इंजोरी, बाकटी,चांना येथील शेतातील धनाच्या पूजण्याची नासधूस करीत हत्तीच्या कळपाने हैदोस मांडला होता. हत्तीचा कळप गोंदिया वन विभागातील नळेगाव बांध अर्जुनी मोरगाव वनक्षेत्रातून निघून गेल्यामुळे वनविभागाच्या अधिकारी कर्मचार्ऱ्यांनी देखील सुटकेचा निस्वास टाकला आहे.पुन्हा हत्तीचा कळप अर्जुनी मोरगाव तालुक्यात परत तर येणार नाही ना अशा प्रकारची धास्ती वनविभागात व शेतकऱ्यात आजही वाटत आहे. महालगाव स्थित असलेल्या हत्तींच्या कळप आता नागझिरा अभयारण्याकडे वळतो की, पुन्हा गोंदिया जिल्ह्यात दाखल होतो, याकडे वनविभागाचे व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

रविवार, नोव्हेंबर २७, २०२२

हत्तींच्या कळपाने वळविला मोर्चा; पिकांचे प्रचंड नुकसान

हत्तींच्या कळपाने वळविला मोर्चा; पिकांचे प्रचंड नुकसान

रात्रभर हत्यांनी केली धान पुंजण्याची नुकसान. 
परिसरात प्रचंड दहशत

दाभना,पिंपळगाव,खांबी,बाकटी,परिसरात  भागी बोरटोला,येथे सध्या बसले ठाण मांडून

संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध:- दि.२७ नोव्हेंबर.

नवेगावबांध,अर्जुनी मोर या दोन वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या कवठा,खैरी,सुकळी, कुंभीटोला,येरंडीदरे, रामघाट या परिसरात गेल्या पंधरा दिवसापासून वावर असलेल्या हत्तीच्या कळपाने आपला मोर्चा बाराभाटी रेल्वे क्रॉसिंग ओलांडून अरततोंडी,दाभना, पिंपळगाव,खांबी,इंजोरी परिसरात काल( दिनांक 26 नोव्हेंबर) रोज शनिवारला रात्रीच्या सुमारास वळविला या गावातील धानाच्या पुंजण्याची मोठ्या प्रमाणात नासधूस केली आहे. त्यामुळे पिंपळगाव,खांबी परिसरातील तोंडाशी आलेला व व व रोगराईतून सावरलेल्या शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान झाली असून शेतकऱ्यांचा तोंडचाचा घास हत्तींनी हिरावून घेतला आहे.
गेल्या 28 सप्टेंबर पासून गडचिरोली जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात हत्याच्या कळपाने प्रवेश केला होता. तेव्हाही
तेव्हाही सुकळी,कवठा येथील शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान हत्तींनी केली होती. 4 ऑक्टोंबर ला मौजा तिडका येथील एका शेतकऱ्याला एका हत्तीने चिरडल्यामुळे स्वतःचा जीव गमवावा लागला होता.तर एक शेतकरी जखमी झाला होता. त्यानंतर पुन्हा या हत्यांचा मोर्चा कवठा,बोळदे, खैरी सुकळी कवठा कुंभी टोला कवठा,बोळदे या गावांकडे गेल्या पंधरा दिवसापासून पुन्हा वळविला आहे. कळपाने शेतकऱ्यांच्या धानपिकांचे शेतात रात्रभर धुळघुस घालून प्रचंड प्रमाणावर नासधूस केली होती. पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते.
आता पुन्हा काल रात्री पासून गुढरी,सोमलपूर ,बाकटी,चांना परिसरातून सकाळच्या सुमारास आपला मोर्चा बोरटोला,सावरटोला लगत च्या भागी पहाडी परिसरात हत्ती ठाण मांडून बसले आहेत. वन विभागाचे नवेगावबांध,अर्जुनी मोरगाव, गोठणगाव वनक्षेत्रातील जवळपास 100 अधिकारी , कर्मचारी व पश्चिम बंगाल वरून पाचारण करण्यात आलेले होला टीमचे 50 सदस्य हत्तींच्या कळपावर नियंत्रण ठेवून आहेत. वनविभागाच्या वतीने कुठलीही मनुष्य जीवित हानी होऊ नये,हत्तींच्या कळप गावात प्रवेश करू नये, गावातील मनुष्यहानी व मालमत्तेचे नुकसान होऊ नये याकडे वन विभाग विशेषत्वाने लक्ष ठेवून आहे. गेल्या महिना, दीड महिन्यापूर्वी कवठा,बोळदे ,खैरी,सुकळी,एरंडी दर्रे या परिसरात थैमान घालून शेतशिवारात रानटी हत्यांच्या कळपाणे मोठ्या प्रमाणात धान पिकाचे नुकसान केले होते. मागील महिन्यात नागणडोह येथे हत्तींनी हैदोस घालून गावातील मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. गावकऱ्यांना रात्रीच गावातून जीवमुठीत घेऊन, भयाण अंधारात पळून जाऊन गाव सोडावे लागले होते. तर येरंडी दर्रे येथील येथील एका शेतकऱ्याला जीव गमवा लागला होता, तर एक शेतकरी जखमी झाला होता. हे येथे उल्लेखनीय आहे. कवठा, बोळदे खैरी,सुकळी, कुंभिटोला परिसरात हत्ती वास्तव्याला असताना,गोंदिया वनविभागाचे उपवनसंरक्षक कुलराज सिंह यांनी या परिसराला दि.२२नोव्हेंबर ला भेट दिली होती. हे येथे उल्लेखनीय आहे.
आधीच इतर वन्यप्राणी केलेल्या व आता हत्तींचा कळपाने शेत पिकाचे नुकसान केले होते. परंतु नुकसानीच्या मानाने वन विभागाकडून मिळणारी मदत ही फारच अल्प असून त्यामध्ये तिप्पट वाढ करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेले आहे.त्याचप्रमाणे ज्यांचे सतत तीन-चार वर्षांपासून नुकसान होत आहे व आतापर्यंत ज्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही.अशा शेतकऱ्यांना प्राधान्य क्रमाने मदत देऊन तात्काळ उपाययोजना करावी. अशी मागणी पिंपळगाव,खांबी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. दरम्यान हत्तीच्या कळपाणे मोठ्या प्रमाणात धान पिकाचे नुकसान केलेले आहे. हत्तीचा वावर असलेल्या परिसरात या हत्तीच्या कळपांची धास्ती व भीती शेतकऱ्यांनी घेतलेली आहे.रात्रीच्या वेळी सदर हत्तीचा कळप गावांमध्ये येऊन जीवितहानी व वित्तहानी करणार नाही ना?या दहशतीत परिसरातील संपूर्ण गावातील लोक आहेत.तर वन विभागाकडून रात्रीची गस्त लावून त्यांच्यावर पाळत ठेवत आहेत. हत्तीना गावापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न रात्रंदिवस हत्तींच्या कळपावर नजर ठेवून, वन विभाग करीत आहे. हत्तीचा कळप परत कवठा बोळदे खैरी सुकळी कुंभिटोला या परिसरात सध्या वास्तव्यात असलेले हत्तींचा कळप परत येणार? की भंडारा जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्याकडे आपला मोर्चा वळवणार? याकडे परिसरातील जनतेचे वनविभागाचे लक्ष लागले आहे.


हत्तींनी गावात प्रवेश करू नये, गावातील जीवित हानी,वित्तहानी होऊ नये.याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. हत्तींना नियंत्रित करण्यासाठी होला पथक कलकत्ता येथून पाचारण करण्यात आले आहे. त्यांच्या हालचालीवर वन विभाग बारीक लक्ष ठेवून आहे.
-रोशन दोनोडे, वनपरिक्षेत्राधिकारी, वनक्षेत्र नवेगावबांध.

सोमवार, ऑक्टोबर १७, २०२२

नागणडोह गावात हत्तींचा हैदोस

नागणडोह गावात हत्तींचा हैदोस



संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.१३ ऑक्टोबर:-

काल रात्री नागणडोह गावामध्ये हत्तीचा कळप घुसून घरांची तोडफोड केलेली आहे. गावामध्ये अंदाजे 40 ते 45 लोकांची लोकवस्ती असून 8 ते 9 घरे आहेत. कोणतीही जीवित हानी झालेली नाही, जीवनावश्यक वस्तू व घराचे नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तसेच हत्ती गावामध्ये आल्यानंतर सर्व लोक सुखरूपरीत्या जवळच्या तिरखुरी गावांमध्ये मार्गस्थ झाल्याची माहिती मिळते. गोठणगाव वनपरिक्षेत्राचा स्टाफ, RRT यांनी मौकास्थळी जाऊन पाहणी केली. नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे.
elephants | Nagandoh village | Tirkhuri villages|  Gothangaon Forest Range | RRT 


 सध्या हत्तीचा कळप नागणडोह चे परिसरात असल्याची खात्री केली आहे. 

यापूर्वी सुकळी कवठा बोळदे,जब्बारखेड,तिडीका या परिसरात हत्याने हैदोस मांडला होता 3 ऑक्टोबरला तिडका येथील सुरेंद्र जेटु कळहबाग या शेतकऱ्याने जीव गमावला होता तर एक शेतकरी जखमी झाला होता गेल्या पंधरा दिवसापासून याच परिसरात हत्तींचा वावर असून शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे वन विभागामार्फत नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे केले जात असून नुकसान भरपाई देण्याची तजवीज केली जाईल असे वन अधीकाऱ्यांकडून सांगण्यात येते आहे 7 ऑक्टोबरला हे हत्ती पुन्हा कवठा परिसरात आले होते.त्यानंतर नवेगावबांध, कोहलगाव या परिसरात काल परवा दोन दिवस वास्तव्य होते. नागनडोह गावात अचानक हत्तींचा कळप आल्याने ग्रामस्थ भयभीत झाले. सैरावैरा पळू लागले. जीवाच्या आकांताने गावकरी महिला-पुरुष आपले मुलेबाळे घेऊन तीरखुरी गावाकडे पळून गेले. हत्तींच्या पाळतीवर असलेल्या वनविभागाच्या वनरक्षक,वनमजूर यांनी आज सकाळी सर्व नागनडोहवासीयांना बोरटोल्याला हत्तीचे वास्तव्य असेपर्यंत राहण्याची व्यवस्था केली आहे. सुदैवाने मात्र कुठलीही जीवित व प्राणहानी झाली नाही.


नागणडोह मधील सर्व लोकांना वनविभागाचे मदतीने बोरटोला येथे हत्तीचे अस्तित्व असेपर्यंत हलविण्यात आले असून, राहण्याची व जेवणाची व्यवस्था केलेली आहे. नागणडोह येथे केलेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करून नुकसानभरपाई देण्याची तजवीज ठेवण्यात येत आहे.
श्री. दादा राऊत,
सहाय्यक वनसंरक्षक, नवेगावबांध.


elephants | Nagandoh village | Tirkhuri villages|  Gothangaon Forest Range | RRT visited the spot and inspected.

रविवार, ऑगस्ट २८, २०२२

सावरटोला येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा.  वृक्षारोपण करून गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सत्कार.

सावरटोला येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा. वृक्षारोपण करून गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सत्कार.







संजीव बडोले प्रतिनिधी
नवेगावबांध दि.२८ ऑगस्ट:-
सावरटोला ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने तान्हा पोळा सावरटोला ग्रामपंचायत च्या परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.तान्हा पोळ्यात 300 बालगोपालांनी प्रचंड उत्साहात सहभाग घेतला होता. ग्रामपंचायत परिसरात अतिथींच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला. ग्रामपंचायतचे सरपंच युवराज तरोणे,उपसरपंच सुवर्णा तरोणे, बोरटोला ग्रामपंचायतचे सरपंच कुरुंदा वैद्य, सहकारी संस्थेचे अध्यक्ष योगेश लाडे, पोलीस पाटील शंकर तरोणे, सामाजिक कार्यकर्ते मराठा सेवा संघाचे सुनील तरोणे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सरिता मेश्राम,उपाध्यक्ष सेवकराम मेश्राम, संजीव बडोले,मनोहर तरोणे, गुरुदेव संघाचे राधेश्याम तरोणे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलित करून व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
गावातील मार्च-एप्रिल २०२२ मध्ये इयत्ता बारावी मध्ये विज्ञान विषयात सर्वप्रथम आलेल्या आदित्य राऊत, कला शाखेतून प्रथम आलेल्या वैष्णवी वलथरे, इयत्ता दहावी मध्ये गावातून सर्वप्रथम आलेल्या प्रांजली शिवणकर व वैभव तरोणे यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तान्हा पोळ्यात गावातील तीनशे बालगोपाल स्वयंस्फूर्तीने सजावट केलेले नंदीबैल घेऊन मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.सर्व सहभागी बालगोपालांना खाऊ वाटप करण्यात आले. राजेंद्र तरोने यांनी प्रास्ताविक मांडले. कार्यक्रमाचे संचालन भागवत मुनेश्वर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अश्विनी तरोणे यांनी मानले.
सामूहिक आरती नंतर कार्यक्रमाची सांगता झाली. स्नेहल तरोणे, ग्रामपंचायत सदस्य डॅनी डोये, उर्मिला शिवणकर,दिलीप मेश्राम, कविता चचाने,धर्मेंद्र गजबे, सीमाताई शेंडे,प्रकाश शिवणकर,गोवर्धन मुनेश्वर, दुधराम तरोणे, राकेश डोये, पुरुषोत्तम मेश्राम,केशव बांबोळे, महादेव डोये, देवराम शिवणकर,यादवराव तरोणे यांच्यासह कार्यक्रमाला सावरटोला येथील ग्रामस्थ महिला,पुरुष व बालगोपाल बहुसंख्येने उपस्थित होते.

बुधवार, ऑगस्ट १७, २०२२

 Maharashtra | एक्स्प्रेस व मालवाहक ट्रेन धडकली; 50 पेक्षा जास्त प्रवासी जखमी |

Maharashtra | एक्स्प्रेस व मालवाहक ट्रेन धडकली; 50 पेक्षा जास्त प्रवासी जखमी |

आज Aug 17, 20222022 पहाटे ४ वाजेच्या सुमारास शहराजवळील गुदमा स्टेशन जवळ  रायपूरकडून गोंदिया  (Gondia) कडे येणाऱ्या भगत की कोठी एक्स्प्रेस Bhagat ki Kothi व मालवाहक ट्रेन धडकली. धडक दिल्यानंतर रेल्वेचा एक डब्बा रुळावरून खाली उतरला. यात 50 पेक्षा जास्त प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमी प्रवाश्यांना शहरातील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय, खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. भगत की कोठी एक्स्प्रेस नागपूरच्या दिशेनं जात होती.  

 Maharashtra | More than 50 persons were injured after 3 bogies of a train derailed in Gondia around 2.30 am at night. A collision b/w a goods train & passenger train- Bhagat ki Kothi, due to non-receipt of signal, led to this accident. No deaths were reported.

RAI 
 
धडक दिल्यानंतर मोठा आवाज झाला आणि रेल्वेचा एक डब्बा रुळावरून खाली उतरला. पहाटे झोपेत असलेल्या प्रवाशांना एकच धक्का बसला . डब्ब्यातील प्रवाशांना मोठा झटका बसला त्यामुळे 50 पेक्षा जास्त प्रवासी यात जखमी झाले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या जवानही घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने शासकीय आणि खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. काही प्रवाशांना प्राथमिक उपचारानंतर सुटी देण्यात आली. रेल्वेचे कर्मचारी घटनेचा तपास करत आहे.



Maharashtra | Re-railment completed at 4.30 am, affected train left site at 5.24 am & arrived Gondia at 5.44 am. Up & Down traffic was resumed at 5.45am. 2 persons with minor injuries were treated and left in the same train: Indian Railways on Gondia train derailment incident.

Maharashtra | Only one coach was derailed injuring two passengers: Indian Railways on Gondia train derailment incident

शनिवार, जुलै ३०, २०२२

आझादी का अमृत महोत्सव |  विदर्भातील जिल्हानिहाय क्षमता | Azadi Ka Amrit Mahotsav | Potential Investors in VIDARBHA

आझादी का अमृत महोत्सव | विदर्भातील जिल्हानिहाय क्षमता | Azadi Ka Amrit Mahotsav | Potential Investors in VIDARBHA

Azadi Ka Amrit Mahotsav | Potential Investors in VIDARBHA


1)Large Integrated SteelPlant 4-5MMTPA JSW Group,JSPL,Arcelor Mittal TATA Steel,

2)Complete Acquisition of MIHAN Land for Containers Making,DataCenters,MROs,5STAR hotel,Defense  TATA Group 

3)Country's largest FerroAlloys Cluster at Bhandara by TATA GROUP, JSWGROUP and MOIL 

4)Largest Private Freight Terminal to handle Road,Rail and Air Logistics. Private and Railways as PPP model

5)Country's Largest Commondo Training Institute by Ministry of Home affairs and Defense 

All these proposals having strong viability and logic for investors to explain

*Most of Mumbai Based Group if UP CM can attract them Our DCM can attract for sure only honest efforts must*
------------------------------


 1) GADCHIROLILarge Integrated Steel Plant 4-5MMTPA capacity
 
LOGIC- Best quality IronOre,LimeStone,Coal

Country's Largest Commondo Training Institute. 

LOGIC - Best location with Mountains,Rivers,Insurgency ,3StateBorders. 

१) गडचिरोली - मोठा एकात्मिक स्टील प्रकल्प ४-५ एमएमटीपीए क्षमता
​कारण - उत्तम दर्जाचे लोहखनिज, चुनखडी, कोळसा
  देशातील सगळ्यात मोठी कमांडो प्रशिक्षण संस्था
​कारण - पर्वत, नद्या, बंडखोरी आणि ३ राज्यांच्या सीमांसह सर्वोत्तम स्थान
------------------------------


2) BHANDARA |  Country's Largest Auto Component Park 

LOGIC- A)Best quality Long,Flat,alloy steel,Manpower,nearby

B)All 3 leading Automobile Manufacturing hubs Delhi,Pune,Chennai on equal distance. 50%OEM,20%Replacement 20%Exports through Best export infrastructure created

Country's Largest FerroAlloys Manufacturing Cluster 

LOGIC- Country's largest Manganese Ore producer Navratna PSU MOIL having mines in Bhandara,All other major inputs with electricity nearby 

12MMTPA SteelPlants in Maharashtra as FerroAlloys consumers ensure 3-4Times more revenues to state.Huge savings with Exports demands also. 
 
२) भंडारा - देशातील सगळ्यात मोठा ऑटो कॉम्पोनंट पार्क
​कारण - अ) उत्तम दर्जाचे लांब, सपाट मिश्रधातू स्टील, जवळच उपलब्ध मनुष्यबळ
​​ ब) दिल्ली, पुणे चेन्नई ही तिन्ही अग्रगण्य ऑटोमोबाईल उत्पादन केंद्रे समान अंतरावर. ​​ निर्माण केलेल्या सर्वोत्तम पायाभूत निर्यात सुविधांद्वारे ५०% ओईएम, २०% बदली, २०% निर्यात | देशातील सगळ्यात मोठे फेरो-अलॉय उत्पादन क्लस्टर
      कारण - देशातील सगळ्यात मोठे मँगनीज खनिज उत्पादक नवरत्न पीएसयू मॉइलच्या भंडार्‍यात खाणी. वीजेसह  
              सगळे महत्त्वाचे इनपुट्स (आवश्यक सामग्री) जवळ उपलब्ध
              महाराष्ट्रात १२ एमएमटीपीए स्टील प्रकल्प कारण फेरो-अलॉय ग्राहक राज्याला ३-४पट महसूलाची ​​​ सुनिश्चिती देतात.
 
 --------------------------
 

3) *GONDIA* World's first of its own kind International Tiger Tourism Center where Gondia Airport must be developed as Tiger Gateway of India. 
 
LOGIC-  Three Side four best Tiger Sanctuaries with maximum Tiger population KanhaKisli,Pench,Nagzira and Tadoba. These attractions must be marketed aggressively in high income cities like Pune Banglore,Hyderabad,Delhi,Mumbai.3-4days packages will attract many tourists. Huge income for locals 

10000-15000 Tourists good number may help all local small and big tourists points revival.Local food,Tribal Arts,Bomboo items may help vibrant economy. Hotels,Tours&Travel industry will flourish again huge employments.

2)Most Modern Rice Research Center near Gondia 

LOGIC - Will help improving Rice Varities to earn more Forex.Like Punjab over the years quality and realizations improved manifold. Gondia with huge forex earnings by RiceExports deserve this institution. Infact 3 states CG MP and Maharashtra will be benefitted. 

LOGIC- A)Best quality Long,Flat,alloy steel,Manpower,nearby

3)LARGE SOLAR POWR PARK NEAR GONDIA 

LOGIC- Lots of land available in Gondia at much cheaper rates where no agriculture activities.Such large land parcels must be made productive by inviting investments in Solar Power Generation.Cities where thermal power generated must be given priority for Solar Power. 

3) गोंदिया
A)जगातील अशाप्रकारचे पहिले आंतरराष्ट्रीय व्याघ्र पर्यटन केंद्र; गोंदिया विमानतळ टायगर गेटवे ऑफ इंडिया म्हणून विकसित करणे आवश्यक आहे.
​कारण - तीन बाजूंना कान्हाकिसली, पेंच, नागझिरा आणि ताडोबा ही कमाल वाघ-संख्या असलेली चार उत्तम व्याघ्र अभायण्ये. 
 पुणे, बंगळुरु, हैदराबाद, दिल्ली, मुंबई अशा उच्च उत्पन्न असलेल्या शहरांमध्ये या आकर्षणांचे ​अतिशय जोमाने मार्केटिंग करायला हवे. ३-४ दिवसांचे पॅकेज अनेक पर्यटकांना आकर्षित करेल. स्थानिकांसाठी ​उत्पन्न वाढवण्याची मोठी संधी होईल.
 
​१००००-१५००० अशा चांगल्या संख्येने पर्यटक आल्यास स्थानिक लहान-मोठ्या पर्यटन स्थळाम्चे पुनरुज्जीवन होण्यास मदत होईल. स्थानिक खाद्यपदार्थ, आदिवासी कला, बांबूच्या वस्तू अर्थव्यवस्थेला चालना देतील. मोठा रोजगारासह हॉटेल्स, टुर्स अँड ट्रॅव्हल्स उद्योग पुन्हा बहरेल
 
२) गोंदियाजवळ सगळ्यात आधुनिक तांदूळ संशोधन केंद्र
​कारण - तांदळाचे प्रकार सुधारण्यासाठी आणि अधिक फॉरेक्स मिळवण्यास मदत होईल. पंजाबसारखे दर्जा आणि ​पैशात रुपांतर अनेकपटींनी सुधारेल. तांदूळ निर्यातीने मोठे परकीय चलन कमावण्यास पात्र असलेले गोंदिया या ​संस्थेसाठी पात्र आहे. किंबहुना, छत्तीसगढ़ , मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या ३ राज्यांना फायदा होईल.
 
३) गोंदियाजवळ मोठा सौर ऊर्जा पार्क
​कारण - कृषी उपक्रम नसलेली जमीन मोठ्या प्रमाणावर गोंदियात उपलब्ध आहे. सौर ऊर्जा निर्मितीसाठी गुंतवणूक ​आमंत्रित करून असे असे मोठे भूखंड उत्पादक करायला हवे. ज्या शहरांमध्ये औष्णिक उर्जा निर्मिती होते त्यांना ​सौर ऊर्जेसाठी प्राधान्य द्यायला हवे.
 --------------------
4) CHANDRAPUR 
Must be converted&declared as *WorldClassIndustrialCity*
 
LOGIC -- Chandrapur the highest Revenue Contributing District ignored by local leaders.With Cement,Steel,FerroAlloys,CoalMining,Electricity Generation all polluting industries.Chandrapur must be given equally clean green industries to ensure Citizens get better opportunities.

 2)Chandrapur must be considered for Cross Subsidy Waiver for cheaper electricity. 

LOGIC- Power plants near CoalMines generating electricity at much lower rates but given to consumers at much higher price by loading highT&D losses and Cross Subsidy fr farmers. But Citizens health,Air quality,Poor Roads due to excessive Transport activities needs to be compensated by lower electricity costs, Better amenities for citizens and world class facilities. Highest Revenue paying by Minerals Royalty,Highest rate GST by Cement&Steel,Cess,Tiger and wildlife tourism like many levies Chandrapur deserve special package to become world class industrial city.

3)Chandrapur must have large *Indian School of Mines*equilent to IIT like Dhanbad 

LOGIC--Chandrapur and Surrounding areas full of Ferrous,Nonferrous and Coal Mines need high class mining professionals as world wide new technologies coming.As most of the non forest Minerals now almost finished.Forest and underground mining need different technology and such prestigious institutions opens up lots of opportunities for local talented youth. Such graduates having huge demand in foreign countries also.


१) चंद्रपूर - "जागतिक दर्जाचे औद्योगिक शहर" म्हणून रुपांतरित व घोषित करायला हवे.
​कारण - चंद्रपूर हा महसूलात सगळ्यात जास्त योगदान देणारा जिल्हा आहे, मात्र स्थानिक नेत्यांकडून दुर्लख्सःईट. ​सिमेंट, स्टील, फेरोअलॉय, कोळसा खाणी, वीज निर्मिती असे सगळे प्रदूषण करणारे उद्योग. नागरिकांना अधिक ​चांगल्या संधी मिळाव्या म्हणून चंदपूरला तेवढेच स्वच्छ, हरित उद्योग द्यायला हवेत.
 
२) स्वस्त विजेसाठी क्रॉस सबसिडी माफीसाठी चंद्रपूरचा विचार करणे आवश्यक आहे.
​कारण - कोळसा खाणीजवळील वीज प्रकल्पात अतिशय कमी दरात वीज निर्मिती होते पण ग्राहकांना ती पारेषण व ​वितरण नुकसानीचे ओझे लादून आणि शेतकर्‍यांसाठी क्रॉस सबसिडी लावून बर्‍याच जास्त दराने दिली जाते.पण ​नागरिकांचे आरोग्य, हवेची गुणवत्ता, मोठय प्रमाणावरील वाहतुकीमुळे खराब रस्ते याची भरपाई वीज दर कमी ​करुन, सुखसोयी व जागतिक दर्जाच्या सुविधा देऊन करायला हवी. खनिज रॉयल्टीमुळे सगळ्यात जास्त महसूल ​देणारे, सिमेंट व स्टीलवर सगळ्यात जास्त जीएसटी दर, सेस, व्याघ्र व वन्यजीव पर्यटन असे अनेक अकारण ​लादलेले कर यामुळे जागतिक दर्हाचे औद्योगिक शहर होण्यास चंदपूर विशेष पॅकेज मिळण्यासाठी पात्र आहे.
 
३) धनबादसारखे आयआयटीला समकक्ष "इंडियन स्कुल ऑफ माइन्स" चंद्रपूरला असायला हवे.
​कारण - चंद्रपूर व आसपासच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर लोह व गैर-लोह आणि कोळशाच्या खाणी आहेत, आता ​जगभरात नवीन तंत्रज्ञान येत असल्याने तिथे उच्च श्रेणीच्या खाणकाम व्यावसायिकांची गरज आहे. आता बहुतांश ​गैर-वन्य खनिजे संपली आहेत. जंगलांमध्ये आणि भूमिगत खाणकामासाथी वेगळ्या तंत्रज्ञानाची गरज आहे आणि ​अशा प्रतिष्ठित संस्था स्थानिक प्रतिभावंत युवकांसाठी अनेक संधी निर्माण करतात. अशा पदवीधारकांना परदेशातही मोठी मागणी आहे.
   -----------------------


5)YEOTMAL
 Large Minerals Processing Zone at Wani.
 
LOGIC -- Wani Taluka in YEOTMAL district having best quality of Minerals like Dolomite,Limestone in bulk quantities. Specifications and Whiteness after calcination making it more precious.Large Steel Companies already buying from Wani but huge potential there to expand manifold. 

Minerals&Coal nearby Wani only area in country.Lime&Dolomite both precious and after processing it is used in bulk quantities for Steel,Chemicals,Construction and Wall care products.All these sectors growing with huge capacities additions. 

Wani having such many small Minerals processing units but with old polluting process plants needs replacement.These plants must be converted into latest technology plants with cluster formation nearby. Manifold value additions ensure huge earnings for state. 

2)Large Coal Gasification Plants 

LOGIC-- NitiAayog and Ministry of Coal started promoting Coal Gasification in bigway. Wani area in YEOTMAL having best quality Coal Deposits can be converted into Synthetic Natural Gases. Through this process new generation fuels like Ethanol Methanol DME can be produced.DME is the replacement of LPG presently imported. 

Coal Gasification route can be used for Large quantities of Fertilisers making like Urea,Ammonium Nitrate presently coming from long distance plants or Imported.

3)Cotton and Cotton Seed Processing

LOGIC--YEOTMAL district having best quality Cotton as main crop.This long Fibre cotton having good Domestic and Exports demands.Under MITRA Scheme one Large Textile Cluster proposed in Amravati. Best prices can help farmers to double their income. 

After processing Cotton seed can be used for Oil extraction used as edible oil.DeOiledCake can be used for cattle feed ensure very high percentage of Fat in milk. This way Cotton Ginning,Pressing,OilExtraction,Milk Processing like many opportunities there for youth in YEOTMAL district. 

4)Large Scale Solar Power Generation 

Logic-Whole YEOTMAL dist with maximum radius having ample land available at much lower cost.Jhhudpi forest where small Shrubs can be used for Solar Power Generation.Infact in Coal Mining Districts Solar plants must be given on priority.Climatic Conditions always suitable for proposed industries. 

5)Large Textile Park Under MITRA Scheme 

Yeotmal equally suitable district for large investments in Textiles.All Conditions laid by Central Govt for MITRA Scheme can be easily fulfilled. Shri Devendra Fadnavis Sir trying hard for this.Amravati and Yeotmal both locations suitable with best cotton crop.Socially large employments generating opportunities must in YEOTMAL. 

All these investments in YEOTMAL must as district witnessed maximum farmer suicide in last two decades. CoalMining,Gasification, Minerals Processing Industry having huge potential can ensure one assured job with fixed income in small farmers family. 


- प्रदीप महेश्वरी
तज्ज्ञ, नैसर्गिक संसाधने
(Pradeep Maheshwari | Strategist Natural Resources Nagpur)