गोंदिया | बाई गंगाबाई महिला व बाल रुग्णालयात (Bai Ganga Bai Women Hospital, Gondia ) 2 फेब्रुवारी 2023 रोजी जन्म जात दृष्टीदोष (आरओपी) तिराळेपण यावर नागपूर येथील प्रख्यात सुरज नेत्रपेढीच्या अनुभवी नेत्र चिकित्सक मार्फत मोफत रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन डी इ आई सी या जिल्हा शीघ्र हस्तक्षेप उपचार केंद्रात होते.
या कॅम्प चे उदघाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अंबरीश मोहबे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या वेळी प्रमुख मार्गदर्शिका म्हणून बाई गंगाबाई महिला व बाळ रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर तसेच डी इ आय सी चे बालरोग तज्ञा डॉ प्रदीप गुज्जर डॉ त्रिपाठी मॅनेजर श्री पारस लोणारे तसेच समुपदेशक श्री अजित सिंग प्रामुख्याने उपस्थित होते.
या कॅम्प मध्ये आर बी इस के च्या माध्यमातून संदर्भ सेवा दिलेल्या दृष्टी व्यंग असलेल्या बालकांना नेत्र तज्ज्ञांनी उपचार केले तसेच विशेष करून ज्या नवजात शिशुना एस एन सी यु मध्ये अनेक दिवस उपचार घ्यावा लागला होता अशा बाळांना नेत्र तज्ञा मार्फत आर ओ पी करिता स्क्रिनिंग करून घेण्यात आली.
तसेच ज्या लहान बालकांना डोळ्याची नजर तिरपी आहे. तिराळेपणा आहे त्यांना शस्त्रक्रिया करून पूर्ववत नजर प्राप्त करण्यासाठी मोफत वैद्यकीय सल्ला व समुपदेशन देण्यात आले गोंदिया जिल्ह्यातून विविध तालुक्यातून माता पालक आपल्या बाळाला घेऊन गंगाबाई कॅम्पस मधील डी इ आय सी मध्ये घेऊन आले होते. या मोफत शिबिरांत सुमारे 45 बालकांचा विशेष तपासणी व मोफत उपचार करण्यात आले. कॅम्प चे संयोजन डी इ आई सी केंद्राचे मॅनेजर श्री पारस लोणारे व समुपदेशक अजित सिंग यांनी केले .
कॅम्प यशस्वी करण्यासाठी या केंद्राचे श्री अमित शेंडे, रोशन कुर्वे, प्रकुर्ती मनोहर, पूजा बैस, तसेच रिता नेवरे व शालिनी यादव यांनी परिश्रम घेतले .
Government hospital in Gondia, Maharashtra