Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

job लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
job लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ऑगस्ट ३०, २०२३

अनुदानित संस्थेत विविध पदांसाठी भरती; आजच संपर्क साधावा | Recruitment

अनुदानित संस्थेत विविध पदांसाठी भरती; आजच संपर्क साधावा | Recruitment


लोककल्याण बहुउद्देशिय शिक्षण संस्था, ब्रम्हपुरी जिल्हा चंद्रपूर द्वारा संचालीत स्वामी विवेकानंद मतिमंद मुलांची निवासी शाळा, नागभीड, जि. चंद्रपूर या संस्थेसाठी विविध पदांची भरती सुरू आहे.

Swami Vivekananda Residential School for Mentally Handicapped Children, Nagbhid, Distt. Chandrapur


इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीकरीता अर्ज व मुळ प्रमाणपत्रासहीत स्वखर्चाने स्वामी विवेकानंद मतिमंद मुलांची निवासी शाळा, जुने कॉन्व्हेन्ट, बजरंग वार्ड, नागभीड येथे उपस्थित राहावे.

अध्यक्ष /सचिव

स्वामी विवेकानंद मतिमंद मुलांची निवासी शाळा, नागभीड
9422181144/
9145434512/
8805767824

  • Cryptocurrency
  • NFT
  • Metaverse
  • Web3
  • Blockchain
  • Investing
  • Personal Finance
  • Business
  • Marketing
  • Entrepreneurship
  • Health and Wellness
  • Travel

शनिवार, जून २४, २०२३

26 जून रोजी पोलीस पाटीलपदासाठी लेखी परीक्षा  | police patil bharti 2023

26 जून रोजी पोलीस पाटीलपदासाठी लेखी परीक्षा | police patil bharti 2023


नागपूर, दि. 23 – पोलिस पाटील भरती 2023 च्या अनुषंगाने 26 जून रोजी उपविभागीय अधिकारी यांचे स्तरावर पोलिस पाटील लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा सकाळी11 ते 12.30 या कालावधीत एका सत्रात उपविभागीय अधिकारी स्तरावर घेण्यात येणार आहे. या लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र पात्र उमेदवारांनी उपलब्ध करून देण्यात आलेल्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घ्यावे. या परीक्षेकरिता एकूण 4389 उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत.

  उमरेड उपविभागांतर्गत 891 उमेदवार परीक्षेसाठी पात्र असून www.umredpp.in   हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. सावनेर उपविभागांतर्गत 298 पात्र अर्ज असून www.sdosaonerpp.in  हे संकेतस्थळ आहे. रामटेक उपविभागांतर्गत 582 अर्ज असून www.sdoramtekpp.in हे संकेतस्थळ उपलब्ध आहे. नागपूर ग्रामीण www.sdonagpurruralpp.in  796 उमेदवार आहेत. मौदा 1110  www.sdomaudapp.in, काटोल 712 उमेदवार असून www.sdokatolpp.in  हे संकेतस्थळ आहे. 



उमरेड उपविभागात 49 पोलीस पाटील पदासाठी ऑनलाईन भरती

नागपूर,दि. 31 : police patil bharti 2023 जिल्ह्यातील उमेरड उपविभागातील उमरेड, भिवापूर व कुही तालुक्यातील गावातील 49 पोलीस पाटील पदभरतीसाठी अर्हताधारक उमेदवारांकडून विहित नमून्यातील ऑनलाईन अर्ज 6 जूनपर्यंत  मागविण्यात आले आहे.  (police patil bharti 2023 nagpur gramin)

सरळ भर्ती प्रक्रियेत आरक्षणाचा प्रवर्ग अदलाबदलीनुसार खुल्या प्रवर्गासाठी 18, इतर मागास प्रवर्ग-17, भटक्या जमाती (ब)- 9, विमुक्त जाती (अ)-4 आणि, भटक्या जमाती क व ड-1 असे एकूण 49 पोलीस पाटील पदासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज  www.sdoumredpp.in या संकेतस्थळावर भरावयाचे आहे. या प्रक्रियेत एकूण  पदापैकी 18 जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहे. परीक्षा शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी 6 जून 2023 पर्यंत आहे.

सालई (ब्राम्हण), चाडा, दिपाळा, पौनी, पिराया, निरव्हा, भिवापूर (उटी), भिवी, लोहारा, धानला, डोंगरगाव, डोडमा, माळणी, जुनोनी, मानोरी, पेंढरी, कळमना (बेला), हिवरा, सावरगाव-नेरी पुनर्वसन, खलासना, धानोली, सावळी, खैरलांजी, चिचघाट, पंचखेडी, अंबाडी, चिपडी, टाकळी, अकोला, पिपळा, किन्हाळा, वडेगाव काळे, लांजाळा, धामनी, अजनी, तेलकवडसी, बोटेझरी, मांगरुड(लभान), मांडवा, झिलबोडी, मेंढेगाव, रुयाड, अडेगाव, खापरी (कुरडकर), दुधा, पेंढरी, खातखेडा व धामना अशा 49 गावांचा समावेश आहे.  

            अधिक माहितीसाठी उपविभागीय दंडाधिकारी, उमरेड यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. police patil bharti 2023

शनिवार, मे २७, २०२३

Pashusavardhan Vibhag Recruitment 2023 | पशुसंवर्धन विभागात विविध ४४६ पदांसाठी भरती;  २७ मेपासून अर्ज प्रक्रिया

Pashusavardhan Vibhag Recruitment 2023 | पशुसंवर्धन विभागात विविध ४४६ पदांसाठी भरती; २७ मेपासून अर्ज प्रक्रिया

Pashusavardhan Vibhag Recruitment 2023 |


पशुसंवर्धन विभागात विविध ४४६ पदांसाठी भरतीची (Pashusavardhan Vibhag Recruitment 2023) प्रक्रिया राबविली जात असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. पशुसंवर्धन विभागात सर्वात मोठी भरती राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केली आहे.

लम्पी संसर्गाच्या वेळी पशुसंवर्धन विभागात पदांची कमतरता लक्षात घेता, त्यावेळी पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लवकरच आवश्यक त्या पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे आश्वासन जनतेला दिले होते. त्यानुसार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत धोरणात्मक निर्णय घेत ही पशुसंवर्धन विभागाची पदभरती जाहीर केली आहे. (Pashusavardhan Vibhag Recruitment 2023)



यामध्ये पशुधन पर्यवेक्षकची ३७६ पदे, वरिष्ठ लिपीकची ४४ पदे, लघुलेखक (उच्चश्रेणी)ची ०२ पदे, लघुलेखक (निम्नश्रेणी) ची १३ पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञची ०४ पदे, तारतंत्रीची ०३ पदे, यांत्रिकीची ०२, पदे, बाष्पक परिचरची ०२ पदे अशी एकूण ४४६ पदे भरली जाणार आहेत.

Recruitment of Various Posts
Important Events Dates
  • Commencement of on-line registration of application 27/05/2023 10:00 AM
  • Closure of registration of application 11/06/2023
  • Closure for editing application details 11/06/2023
  • Last date for printing your application 26/06/2023
  • Online Fee Payment 27/05/2023 10:00 AM to 11/06/2023

यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे. २७ मे २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता पासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे, तर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक ११ जून २०२३ रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे. या भरतीसाठी परिक्षा जुलै महिन्यात होणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

ऑनलाईन भरतीची लिंक | https://ibpsonline.ibps.in/cahmay23/


ऑनलाईन भरतीची लिंक | https://ibpsonline.ibps.in/cahmay23/












सोमवार, मे २२, २०२३

ग्रामीण डाक सेवक पदाच्या जागा निघाल्या | GDS Bharti 2023

ग्रामीण डाक सेवक पदाच्या जागा निघाल्या | GDS Bharti 2023

डाक विभागात नवीन 620 जागांसाठी “ग्रामीण डाक सेवक (GDS)” भरती जाहीर २०२३.




महाराष्ट्र टपाल विभाग GDS Bharti 2023: महाराष्ट्र डाक विभाग (महाराष्ट्र डाक विभाग) ने 2023 साली तयार केलेल्या शाखा पोस्ट ऑफिसमध्ये शाखा पोस्टमास्टर/सहाय्यक शाखा पोस्टमास्टर म्हणून ग्रामीण डाक सेवक (GDS) या पदांसाठी रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली. अर्जदारांचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे. https://indiapostgdsonline.gov.in/ येथे अर्ज ऑनलाइन सबमिट करायचे आहेत. 

महाराष्ट्र डाक विभाग (महाराष्ट्र डाक विभाग) भरती मंडळ, महाराष्ट्र यांनी मे 2023 च्या जाहिरातीत एकूण 620 रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 11 जून 2023 आहे.

Government of India Ministry of Communications Department of Posts

NOTIFICATION NO:No.17-31/2023-GDS

Dated: 20.05.2023

'Gramin Dak Sevak (GDS) Online Engagement-Special Cycle, May, 2023 Online applications are invited from the eligible applicants for engagement as Gramin Dak Sevaks (GDS) [Branch Postmaster(BPM)/Assistant Branch Postmaster (ABPM)] in Branch Post Offices (BOs) created in the year 2023. 

 Applications are to besubmitted online at https://indiapostgdsonline.gov.in/
Details of the vacant postsaregivenin Annexure-I. 2. ENGAGEMENT SCHEDULE IS AS UNDER: Sl No. ActivitiesSchedule (i)Registration and submission of online applications by candidates 22.05.2023 to 11.06.2023 (ii) Edit/Correction Window for Applicants: 12.06.2023 to 14.06.2023



महाराष्ट्र डाक विभाग भरती २०२३.
⇒ जाहिरात क्र.: 17-31/2023-GDS.
⇒ पदाचे नाव: ग्रामीण डाक सेवक (ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर).
⇒ रिक्त पदे: 620 पदे.
⇒ शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण, संगणकाचे ज्ञान.
⇒ वयोमर्यादा: 18 ते 40 वर्षे.
⇒ नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
⇒ अर्ज शुल्क: ₹ 100 / – (SC/ST/PWD/महिला: फी नाही).
⇒ अर्ज पद्धती: ऑनलाईन.
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: ११ जून २०२३.

Recruitment Name | Gramin Dav Sevak (GDS) Bharti 2023
Name Posts (पदाचे नाव) | Gramin Dak Sevak (GDS)
Number of Posts (एकूण पदे | Total 620 Vacancies
Salary (वेतनमान) |  BPM – Rs.12,000/-, ABPM/DakSevak – Rs.10,000/-

Official Website (अधिकृत वेबसाईट) 
https://maharashtrapost.gov.in/

Application Mode (अर्जाची पद्धत)  Online

Job Location (नोकरी ठिकाण) | All Maharashtra

Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख) | 11th June 2023

Maharashtra Postal Circle GDS Bharti Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

i) 10th pass in Mathematics and English (having been studied as compulsory or elective subjects)
ii) Knowledge of Computer
iii) Knowledge of Cycling
iv) Adequate of Livelihood


Candidate Application Form

https://indiapostgdsonline.in/ref_validation.aspx


चंद्रपूर |  
https://indiapostgdsonline.cept.gov.in/HomePages/P14.aspx


नागपूर - 
https://indiapostgdsonline.cept.gov.in/HomePages/P14.aspx


Maharashtra Postal Department GDS Bharti 2023: Maharashtra Postal Department (Maharashtra Dak Vibhag) announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Gramin Dav Sevak (GDS) as Branch Postmaster /Assistant Branch Postmaster in Branch Post Offices created in the year 2023. The age of the Applicants should be between 18 years to 40 years. Applications are to be submitted online at https://indiapostgdsonline.gov.in/. Total 620 Vacant Posts have been announced by Maharashtra Postal Department (Maharashtra Dak Vibhag) Recruitment Board, Maharashtra in the advertisement May 2023. Last date to submit application is 11th June 2023.
Chandrapur cmc Bharti 2023 | चंद्रपूर महानगरपालिकेत कर्मचारी भरती; तब्बल इतका मिळेल पगार

Chandrapur cmc Bharti 2023 | चंद्रपूर महानगरपालिकेत कर्मचारी भरती; तब्बल इतका मिळेल पगार



चंद्रपूर महानगरपालिकेत विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे. उमेदवाराने पदानुसार अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर 25 मे 2023 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर नमूद करायचे आहेत. (Chandrapur mahanagarpalika Recruitment 2023)


यामध्ये काही पदांच्या थेट मुलाखती देखील होणार आहे, त्यासाठी उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे ते जास्तीत जास्त 60 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे, भरती प्रक्रिया दरम्यान ज्या ज्या उमेदवारांना बोलविण्यात येईल त्या त्या वेळी त्यांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.सदर उपस्थिती करिता कोणतेही मानधन अथवा प्रवास खर्च दिला जाणार नाही. (Chandrapur mahanagar palika Vacancy 2023)


Chandrapur Municipal Corporation उमेदवार चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असल्यास प्राधान्य देण्यात येईल,उमेदवारांना शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे महाराष्ट्र नागरी सेवेचे नियम लागू राहणार नाहीत, तसेच त्यांना भविष्यात कायम नोकरीचा दावा देखील करता येणार नाही. उमेदवाराने कामावर रुजू होण्यापूर्वी शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपरवर विहित नमुन्यात करारनामा करून द्यावा लागेल.


पात्र-अपात्र उमेदवारांची यादी व मुलाखतीचा दिनांक चंद्रपूर मनपाच्या संकेतस्थळावर तसेच आरोग्य विभाग, तिसरा माळा, चंद्रपूर महानगरपालिका येथे 06 जून 2023 रोजी उपलब्ध होईल.


चंद्रपूर महानगरपालिकेत विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे. उमेदवाराने पदानुसार अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर 25 मे 2023 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर नमूद करायचे आहेत.




Chandrapur mahanagarpalika Recruitment 2023
Chandrapur mahanagar palika Vacancy 2023
Mahanagar palika chandrapur recruitment 2023 notification
Mahanagar palika Chandrapur Recruitment 2023
Chandrapur municipal corporation recruitment 2023
Maha food chandrapur bharti 2023
Mahabharti chandrapur
Nmk chandrapur

जाहिरात क्र. 003/2022 सहायक संचालक, नगर रचना, गट अ या संवर्गाच्या मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी तसेच अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7134 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7135

जाहिरात क्र. 005/2022 सहायक नगर रचनाकार, श्रेणी-I, गट-ब या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7127

शुक्रवार, मे ०५, २०२३

 Police Patil Bharti 2023 । पोलीस पाटीलपदासाठी भरती; १७ मेपर्यंत करा ऑनलाईन अर्ज

Police Patil Bharti 2023 । पोलीस पाटीलपदासाठी भरती; १७ मेपर्यंत करा ऑनलाईन अर्ज


नागपूर,दि. 4 : जिल्ह्यातील मौदा उपविभागातील मौदा व कामठी तालुक्यातील गावातील 145 पोलीस पाटील पदभरतीसाठी अर्हताधारक उमेदवारांकडून विहित नमून्यातील ऑनलाईन अर्ज 17 मे पर्यंत  मागविण्यात आले आहे. (Police Patil Bharti 2023)


सरळ भर्ती प्रक्रियेत अनुसूचित जाती-25, अनुसूचित जमाती-13, विशेष मागास प्रवर्ग-4 विमुक्त जाती व भटक्या जमाती-21, इतर मागास प्रवर्ग-33 आणि खुल्या प्रवर्गासाठी 34, आर्थिक दुर्बल घटक-15 असे एकूण 145 पोलीस पाटील पदासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज www.sdomoudaapp.in या संकेतस्थळावर भरावयाचे आहे. या प्रक्रियेत 30 टक्के पदे महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे. परीक्षा शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी 17 मे 2023 पर्यंत आहे.


Police Patil Bharti 2023 -Police Patil is a very important element in the rural system. Police Patil Bharti For various districts of Maharashtra is already started. The candidates can go through the given links & Apply for respective Police Patil Bharti 2023. 


पोलीस पाटील पदासाठी आवश्यक अर्हता व अटीशर्ती या प्रमाणे आहे. अर्जदार दहावी परीक्षा पास असावा. पोलीस पाटील पदासाठी वयोमर्यादा शिथिलक्षम नाही. रहिवासी दाखला मुलाखतीच्या वेळी सादर करावा. नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र कार्यालयास सादर करणे बंधनकारक राहील. या परीक्षेसाठी आरक्षित व आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी शुल्क 200 रुपये असून खुल्या प्रवर्गासाठी 300 रुपये आहे. पोलीस पदासाठी लेखी परीक्षेसाठी 80 गुण असून तोंडी परीक्षेसाठी 20 गुण असे 100 गुण राहील.


अर्जदार संबंधित एकाच गावाचा स्थानिक व कायमचा रहिवासी असावा. अर्जदाराने एका गावासाठी अर्ज करावा. एकापेक्षा जस्त गावातून केलेले सर्व अर्ज बाद ठरविण्यात येतील. पोलीस पाटलांना क्षेत्रिय स्तरावर काम करावे लागत असल्याने पद धारण करणारी व्यक्ती ही शारीरीकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. संपूर्ण भरती प्रक्रीयेदरम्यान पाठविल्या जाणाऱ्या सूचना, संदेश व माहिती उमेदवारांना ऑनलाईन पाठविण्यात येणार असल्याने मोबाईल सुस्थितीत ठेवावा. पात्र उमेदवाराला वेब-बेस्ड ऑनलाईन अर्ज www.sdomoudaapp.in या संकेस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांकानंतर संकेतस्थावरील अर्ज भरण्याची लिंक बंद केली जाईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.


            अधिक माहितीसाठी उपविभागीय दंडाधिकारी, मौदा यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा.



शनिवार, मार्च २५, २०२३

एन.एस.डी.सी दिल्लीमार्फत पहिल्या आंतरराष्ट्रीय रोजगार मेळाव्याचे आयोजन

एन.एस.डी.सी दिल्लीमार्फत पहिल्या आंतरराष्ट्रीय रोजगार मेळाव्याचे आयोजन

जिल्ह्यातील उमेदवारांनी सहभागी 
होऊन संधीचा लाभ घेण्याचे आवाहन
चंद्रपूर:
 भारतातील उमेदवारांना परदेशातील नोकरी उपलब्ध होण्यासाठी पहिला आंतरराष्ट्रीय रोजगार मेळावा दि. 21 फेब्रुवारी ते 26 मे 2023 या दरम्यान नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कार्पोरेशन दिल्ली (एनएसडीसी) यांच्यामार्फत आयोजीत करण्यात आला आहे. सदर रोजगार मेळाव्यामध्ये उमेदवार, उद्योजकांना सहभागी होण्याकरीता लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या जॉब फेअरमध्ये उमेदवारांनी सहभागी होण्यासाठी https://www.kaushalmahotsav.nsdcdigital.org/International/Candidate/ या लिंकवर नोंदणी करावयाची आहे. तसेच विविध कंपन्या व उद्योजकांना सहभागी होण्यासाठी www.kaushalmahotsav.nsdcdigital.org/International/Company/ ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली असून या लिंकवर नोंदणी करावयाची आहे.

रोजगार मेळावा ऑनलाइन व ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने घेण्यात येणार आहे. मेळाव्यामध्ये सहभागी होण्या करीता उमेदवारांना एन.एस.डी.सी.च्या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. मेळाव्यामध्ये उमेदवारांची प्राथमिक फेरी व अंतिम फेरीचे आयोजन करण्यात येणार असून समारोपीय कार्यक्रमसुद्धा आयोजीत करण्यात आला आहे. मेळाव्यामध्ये सहभागी होणा-या उद्योजकातर्फे प्राथमिक व अंतिम फेरी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून समारोपीय कार्यक्रमाकरीता संबंधित उद्योजक प्रत्यक्ष हजर राहणार आहे. वेगवेगळया झोनमध्ये वेगवेगळया दिवशी प्राथमिक आणि अंतिम फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यामध्ये अमेरिका, कॅनडा, इंग्लड, युरोप, पश्चिम आणि दक्षिण आशिया, जपान, आस्ट्रेलिया, न्युझिलंड, पूर्व आणि दक्षिण पूर्व आशिया व भारतातील नामांकित उद्योजक ऑनलाइन उपस्थित राहणार आहे. यामध्ये ऑटोमोटीव्ह, कृषी, कारपेंटर, बांधकाम, ड्रायव्हर, इलेक्ट्रिशिअन, फॅसिलीटी मॅनेजमेंट, फूड आणि बेव्हरेज, हेल्थ केअर, हॉस्पीटॅलीटी, आयटी, लॉजीस्टीक, ऑइल ॲड गॅस, प्लंबर, रेफ्रिरेजेशन, रिटेल सर्व्हिस, शिपयार्ड, वेल्डर आदी क्षेत्रामध्ये उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. उमेदवारांकरीता महाराष्ट्रात मुंबई येथे प्राथमिक आणि अंतीम फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

जॉब फेअरची प्रक्रिया व कालावधी
स्क्रीनिंग व भाषा चाचणीचा ऑनलाइन दिनांक 20 ते 27 मार्च 2023, उमेदवाराची ऑनलाइन मॅपिंग दि. 28 मार्च ते 10 एप्रिल 2023, तर भारतातील विविध शहरामध्ये प्राथमिक फे-या दि. 11 ते 30 एप्रिल 2023, संपूर्ण भारतातील विविध शहरामध्ये अंतिम फे-या दि. 8 ते 15 मे 2023 कालावधीत पार पडणार आहे. समारोपीय समारंभ दि.26 मे 2023 रोजी होणार आहे. या आंतरराष्ट्रीय रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून किमान 2 हजार उमेदवारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नोकरीची संधी प्राप्त करून देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे.

निवड झालेल्या उमेदवारांचे परदेशात प्रस्थानापूर्वी आवश्यक प्रशिक्षण एन.एस.डी.सी.मार्फत आयोजीत करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहितीकरीता एनएसडीसीच्या व्यवस्थापक पंघोरी बोरगोएन यांच्या 9599495296 भ्रमणध्वनी क्रमांकावर किंवा pangkhuri.borgohain@nsdcindia.org या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा. पहिल्या आंतरराष्ट्रीय रोजगार मेळाव्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी होऊन संधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.
28 ते 31 मार्च रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

28 ते 31 मार्च रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन


चंद्रपूर: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर कार्यालयाच्या वतीने दि. 28 ते 31 मार्च 2023 या कालावधीत पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर स्वतःची नाव नोंदणी करून किंवा ज्यांनी यापूर्वी नाव नोंदणी केलेली असेल त्या उमेदवारांनी अप्लाय करावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

ऑनलाईन नोंदणी करण्याची कार्यपद्धती 
www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा प्ले-स्टोअर मधुन महास्वयंम अप्लीकेशन मोफत डाऊनलोड करुन इन्स्टॉल करा व एम्प्लॉयमेंटवर क्लिक करा. एम्प्लॉयमेंट पृष्ठावरील जॉब सिकर हा पर्याय निवडून नोंदणी, आधार कार्ड क्रमांक व पासवर्डने साइन इन करा. नंतर होम पेजवरील पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन जॉब फेअर हा पर्याय निवडा. चंद्रपूर जिल्ह्याची निवड करुन फिल्टर बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर-चंद्रपूर या ओळीतील अॅक्शन मेनुतील दुसऱ्या बटणावर (व्हॅकन्सी लिस्टिंग) क्लिक करा. आयअॅग्री हा पर्याय निवडा. पर्याय निवडल्यानंतर शैक्षणिक पात्रतेनुसार जुळणारे विविध आस्थापना, कंपन्यांच्या रिक्त पदांच्या अप्लाय बटनावर क्लिक करा.

सर्व बेरोजगार उमेदवारांनी आपल्या युजर आयडी व पासवर्डने लॉगईन करुन दि. 28 ते 31 मार्च 2023 रोजी वेबपोर्टलवर नोंद केलेल्या उद्योजकांच्या रिक्त पदांकरीता उद्योजकांनी नमुद केलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अप्लाय करावे आणि उद्योजकांसोबत व्हॉट्सॲप, गुगल मिट, व्हिडीओ कॉलींग आदींच्या माध्यमातुन संपर्क साधुन ऑनलाईन मुलाखत द्यावी व ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

बुधवार, मार्च १५, २०२३

चंद्रपूर शहरातील १०६ कर्मचाऱ्याची नोकरी जाणार; कारण जाणून घ्या Chandrapur cmc Jobs

चंद्रपूर शहरातील १०६ कर्मचाऱ्याची नोकरी जाणार; कारण जाणून घ्या Chandrapur cmc Jobs

चंद्रपूर शहरातील १०६ कर्मचाऱ्याची नोकरी जाणार

चंद्रपूर शहरातील १०६ कर्मचाऱ्याची नोकरी जाणार; कारण जाणून घ्या Chandrapur cmc Jobs

चंद्रपूर | महानगर पालिकेअंतर्गत नाले सफाईचे कंत्राट मिळालेल्या कंत्राटदार मार्फत 50 टक्के कामगारांची कपात केल्या जणार आहे. त्यामुळे जवळपास 106 अस्थायी कामगार बेरोजगार (Chandrapur Jobs) होणार आहे. ही बाब गंभीर असुन नाले सफाई करत शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करत असलेल्या एकाही कामगाराला कामावरुन कमी करण्यात येऊ नये अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात बोलतांना केली आहे.

मनपा क्षेत्रातील नाले सफाई नियमीत करण्यासाठी 206 अस्थायी कामगार काम करत आहे. मात्र आता जुन्या कंत्राटदाराचा कंत्राट संपल्याने नवा कंत्राट मिळालेल्या कंत्राटदाराने कामगारांच्या संख्येत 50 टक्याने कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. असे झाल्यास 106 कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे.
हा मुद्दा आज आमदार किशोर जोरगेवार Kishor Jorgewar यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित करत कामगारांच्या व्यस्थेकडे सभागृहाचे लक्ष वेधले आहे. यावेळी अधिवेशनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, गेले अनेक वर्ष 206 कामगार नाले सफाईचे काम करत आहे. मात्र चंद्रपूर महानगरपालिकेचे नाले सफाईचे कंत्राट आता नविन ठेकेदाराला मिळाले असुन केवळ 100 कामगारांना कामावर घेऊन काम करण्याचा या नव्या ठेकेदाराचा मानस आहे. चंद्रपूर महानगर पालिका मोठी आहे. येथे योग्य सफाई होत नाही. अशी नागरिकांची नेहमी ओरड असतांना 206 कामगारांच्या येवजी 100 कामगारांच्या माध्यमातुन सफाईचे काम करणे शक्य नाही. नव्या कंत्राटदाराच्या म्हणण्या नुसार कामगारांएैवजी मशनरीच्या माध्यमातुन नाले सफाई केल्या जाणार आहे. मात्र सदर कंत्राटदाराकडे अशी कोणतीही मशीन उपलब्ध नाही.


अशातही मशनरीने केवळ मोठे नाले साफ करणे शक्य आहे. गल्लीबोळातील नाल्या साफ करण्यासाठी मन्युष्यबळाची गरज लागणार आहे. याचा कोणताही अभ्यास न करता कामगारांच्या संख्येत 50 टक्याने कपात करण्याचा घेण्यात आलेला निर्णय स्वच्छतेच्या दृष्टीने योग्य नाहीच सोबतच अनेक वर्षापासून चंद्रपूर स्वच्छ ठेवण्याचे काम करत असलेल्या कामगारांच्या हिताचा हि नाही. त्यामुळे कामगारांच्या संख्येत कपात न करता 206 कामगारांना कामावर घेण्यात यावे अशी मागणी त्यांनी यावेळी बोलतांना सभागृहात केली आहे

मंगळवार, डिसेंबर २७, २०२२

TAX ASSISTANT पस्तपालन व लेखाकर्म आणि आर्थिक सुधारणा कायदे, पंचवार्षिक योजना

TAX ASSISTANT पस्तपालन व लेखाकर्म आणि आर्थिक सुधारणा कायदे, पंचवार्षिक योजना




🌺 TAX ASSISTANT 🌺

🌼पस्तपालन व लेखाकर्म आणि आर्थिक सुधारणा कायदे, पंचवार्षिक योजना


📡ऑनलाईन बॅच


🍀TAX ASSISTANT 45+ प्रश्नांची परिपूर्ण तयारी

🍀 सर्व संकल्पना पूर्ण केल्या जाणार

🍀 परिपूर्ण नोट्स सह

🍀 MCQ+PYQ विश्लेषणासह 400+ प्रश्नांचा सराव.

🍀 Minimum Reference Maximum Outcome.

🍀 पर्णपणे नवीन व Updated Batch


🔴बच जॉईन करण्यासाठी Play Store ला भेट द्या and Download Our App

🔗https://play.google.com/store/apps/details?id=com.dhananjay.mates.swarajya.academy


👨‍💻मार्गदर्शक - धनंजय मते पाटील सर


📞सपर्क - 9970453207 / 8180804706


https://wa.me/+918180804706/?text

मंगळवार, डिसेंबर १३, २०२२

 ऑनलाईन रोजगार साधने कोणती? । What job can I do online? ।

ऑनलाईन रोजगार साधने कोणती? । What job can I do online? ।

ऑनलाईन उत्पन्नाचे स्रोत



- युट्युब, ब्लॉगर, न्यूजपोर्टल, इन्स्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून उत्पन्न करता  येते.  

- युट्युबवरून कमाई करण्यासाठी  1,000 subscribers आणि 4,000 valid public watch hours असणे आवश्यक आहे.

- युट्युबवर शॉर्ट व्हिडीओ तयार करून उत्पन्न करता येईल. 

- न्यूजपोर्टलच्या माध्यमातून बातमी किंवा लेख लिहून गूगल अड्ससेन्सकडून कमाई करता येते.  

- फेसबुकपेजवर देखील कमाई करता येऊ शकते. त्यासाठी 10,000 followers आणि  600,000 minutes of views in the last 60 days आवश्यक आहे.

- इंस्टाग्राम : सोशल मीडिया इंफ्लूएन्सर म्हणून इंस्टाग्रामवरून सर्वाधिक कमाई करू शकता. यासाठी तुमचे कमी कमी ५ हजार फॉलोअर्स असणे गरजेचे आहे. तसेच, एंगेजमेंट रेट देखील चांगला असला पाहिजे. तुमचे जेवढे अधिक फॉलोअर्स असतील, तेवढी अधिक कमाई करू शकता. फॉलोअर्स जास्त असल्यास कंपन्या देखील ब्रँडिंगसाठी संपर्क करतील.

- सोशल मीडियातून विदर्भ आणि महाराष्ट्रातील अनेक नाव कमविले. शिवाय ऑनलाईन उत्पन्नाचे स्रोत निर्माण केले आहे. 

'चिमूर का छोकरा' फेम आशिष बोबडे, श्री वल्ली फेम अमरावतीचा विजय खंडारे, लातूरची Typical Indian Girl । वर्ध्याचे कराळे मास्तर यासह भरपूर लोक पैसे कमवीत आहेत. 


फ्रीलांसर Freelancer 

कोणत्याही कंपनीत नोकरी न करता फ्रीलांसरच्या माध्यमातून ऑनलाईन वर्क करता येते. कंटेंट रायटिंग, ग्राफिक्स डिझाईन, वेब डिझाईन, भाषांतर, कंटेंट टायपिंग,.


Which online job is best?

Does Amazon pay you to work from home?

How to find a job online?

Online jobs work from home

Online jobs for students

Online jobs for freshers

Trusted online jobs for students

Online job apply 12th Pass

Available job online

Amazon online jobs

Online jobs in India

Online Jobs for Students that You Can Turn into a Career or a Business from Home


Online Tutor. ...

Search Engine Evaluator. ...

Social Media Manager. ...

Freelance Writer. ...

Resume Writer. ...

Transcriptionist. ...

Freelance Web Designer. ...

Micro-Freelancing At Fiverr.

बुधवार, नोव्हेंबर ३०, २०२२

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरती वरील स्थगिती कायम

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरती वरील स्थगिती कायम




चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरती वरील स्थगिती कायम

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सहकार खात्याची मागील 10 वर्षात घडलेल्या अनेक गंभीर तक्रारी लपवून मिळवलेल्या 360 पदाची नोकर भरतीबाबत सत्यता शासनाकडे खासदार व आमदार यांनी पाठपुरावा करून सत्यता निदर्शनास आणून दिल्याने 12 मे 2022 ला सहकार विभागाने स्थगीती दिली होती. त्यावर 23 नोव्हेंबर रोजी स्थगिती उठविण्यात आली होती. मात्र, 29 नोव्हेंबर रोजी सुधारित आदेश निघाले असून, स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे. 


 2017 ला विहित कार्यकाळ संपल्यानंतर कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्याचे न टाळता नोकर भरती, अमाप व अवास्तव खरेदीवर खर्च, मानधनावर लपून छपून भरती, निवृत्त अधिकारी यांना मानधनावर नेमणूक विम्यावर खर्च, अव्यवहार्य पोटनियम दुरुस्ती, शेतकरी कल्याण निधीचा गैरवापर, मुख्य कार्यकारी अधिकारी याची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नाबार्ड, सहकार खाते चे फिट अॅड प्रॉपर क्राईटरिया नियमात न बसणाऱ्या व्यक्तीची नियुक्ती करून गंभीर गुन्हे लपवून केंद्र व राज्य सरकारची दिशाभुल इत्यादी गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करण्याची खासदार श्री बाळूभाऊ धानोरकर व आमदार सौ. प्रतिभाताई धानोरकर यानी शासन दरबारी लावून धरली. काही निवडक मंडळींनी सहकार खात्याची वर नमुद बाबी दडपून बँकेच्या रक्कमेची उधळपट्टी करीत होते. खासदार व आमदार यांचे जागरूप भूमिकेने स्वप्नभंग झालेला आहे.

 खासदार बाळुभाऊ धानोरकर व आमदार सौ. प्रतिभा धानोरकर यांनी बँकेतील काळजीवाहू संचालक मंडळ करीत असलेल्या गैरकृत्य पुराव्यासह आळा घालण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करीत आहेत.
 अनेक गंभीर गैरप्रकार रोखण्यासाठी काही संचालकांनी खासदार यांचेशी संपर्क साधुन पुरावे दिल्याने अध्यक्ष, उपाध्यक्ष काही संचालक व अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Finally, the dream of Chandrapur District Central Co-operative Bank recruitment failed