Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जून २४, २०२३

26 जून रोजी पोलीस पाटीलपदासाठी लेखी परीक्षा | police patil bharti 2023


नागपूर, दि. 23 – पोलिस पाटील भरती 2023 च्या अनुषंगाने 26 जून रोजी उपविभागीय अधिकारी यांचे स्तरावर पोलिस पाटील लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा सकाळी11 ते 12.30 या कालावधीत एका सत्रात उपविभागीय अधिकारी स्तरावर घेण्यात येणार आहे. या लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र पात्र उमेदवारांनी उपलब्ध करून देण्यात आलेल्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घ्यावे. या परीक्षेकरिता एकूण 4389 उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत.

  उमरेड उपविभागांतर्गत 891 उमेदवार परीक्षेसाठी पात्र असून www.umredpp.in   हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. सावनेर उपविभागांतर्गत 298 पात्र अर्ज असून www.sdosaonerpp.in  हे संकेतस्थळ आहे. रामटेक उपविभागांतर्गत 582 अर्ज असून www.sdoramtekpp.in हे संकेतस्थळ उपलब्ध आहे. नागपूर ग्रामीण www.sdonagpurruralpp.in  796 उमेदवार आहेत. मौदा 1110  www.sdomaudapp.in, काटोल 712 उमेदवार असून www.sdokatolpp.in  हे संकेतस्थळ आहे. 



उमरेड उपविभागात 49 पोलीस पाटील पदासाठी ऑनलाईन भरती

नागपूर,दि. 31 : police patil bharti 2023 जिल्ह्यातील उमेरड उपविभागातील उमरेड, भिवापूर व कुही तालुक्यातील गावातील 49 पोलीस पाटील पदभरतीसाठी अर्हताधारक उमेदवारांकडून विहित नमून्यातील ऑनलाईन अर्ज 6 जूनपर्यंत  मागविण्यात आले आहे.  (police patil bharti 2023 nagpur gramin)

सरळ भर्ती प्रक्रियेत आरक्षणाचा प्रवर्ग अदलाबदलीनुसार खुल्या प्रवर्गासाठी 18, इतर मागास प्रवर्ग-17, भटक्या जमाती (ब)- 9, विमुक्त जाती (अ)-4 आणि, भटक्या जमाती क व ड-1 असे एकूण 49 पोलीस पाटील पदासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज  www.sdoumredpp.in या संकेतस्थळावर भरावयाचे आहे. या प्रक्रियेत एकूण  पदापैकी 18 जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहे. परीक्षा शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी 6 जून 2023 पर्यंत आहे.

सालई (ब्राम्हण), चाडा, दिपाळा, पौनी, पिराया, निरव्हा, भिवापूर (उटी), भिवी, लोहारा, धानला, डोंगरगाव, डोडमा, माळणी, जुनोनी, मानोरी, पेंढरी, कळमना (बेला), हिवरा, सावरगाव-नेरी पुनर्वसन, खलासना, धानोली, सावळी, खैरलांजी, चिचघाट, पंचखेडी, अंबाडी, चिपडी, टाकळी, अकोला, पिपळा, किन्हाळा, वडेगाव काळे, लांजाळा, धामनी, अजनी, तेलकवडसी, बोटेझरी, मांगरुड(लभान), मांडवा, झिलबोडी, मेंढेगाव, रुयाड, अडेगाव, खापरी (कुरडकर), दुधा, पेंढरी, खातखेडा व धामना अशा 49 गावांचा समावेश आहे.  

            अधिक माहितीसाठी उपविभागीय दंडाधिकारी, उमरेड यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. police patil bharti 2023


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.