जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर तालुक्यातील जि.प.प्राथ.शाळा ठाकरवाडी(तेजूर) येथे इ.1ली ते इ.7वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना दप्तर,फुलस्केफवह्या,थ्री इन वन वह्या,कंपास पेटी,चित्रकला वही, रंग पेटी, पाटीपेन्सील असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
उर्मी संस्था,दुर्ग संवर्धन संस्था या संस्थेच्या सहयोगाने ॲफिनिटी एक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सीएसआर फंडातून शाळेतील गरीब गरजू विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले.सलग 4 वर्षापासून या गरीब विद्यार्थांना या संस्थेकडून शैक्षणिक साहित्य मिळत असल्याने शिक्षणाच्या प्रवाहात टिकून असल्याचे मत विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले .कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ॲफिनिटी एक्स प्रायव्हेट लिमिटेड चे सुनील लेंगरे साहेब,अभी तळवारे तसेच खंडेराव ढोबळे (सरचिटणीस, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ)उपस्थित होते.
त्यांनी यानिमित्ताने "मुलांनी या साहित्याचा सुयोग्य वापर करून गुणवत्तापूर्ण शिक्षण घ्यावे खूप शिकून मोठे व्हावे"असे विचार व्यक्त केले.
याप्रसंगी तेजूर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ.अनिताताई जाधव,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जालिंदर दुधवडे,उपाध्यक्षा सौ.मनिषा दुधवडे, माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य .संजयभाऊ गावडे,विकास दुधवडे,.महेंद्र दुधवडे ,.रामचंद्र केदार ग्रामस्थमंडळी व शाळेतील शिक्षक वृंद उपस्थित होता कार्यक्रमाचे प्रास्ताविक आ.का.मांडवे (मुख्याध्यापक) यांनी केले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन व नियोजन लक्ष्मण कुडेकर सर व सौ. कविता वारे मॅडम यांनी केले सूत्रसंचालन .तानाजी तळपे सर यांनी तर सचिन नांगरे सर यांनी आभार मानले*.