Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
शनिवार, जुलै २२, २०२३
रविवार, जून ०४, २०२३
मदर डेअरी उभारणार नागपुरात डेअरी प्लांट , दररोज 30 लाख लिटर दूध खरेदी करणार - गडकरी
नागपुरात दिसले 'भावी मुख्यमंत्री' नाना पाटोलेंचे पोस्टर्स
शुक्रवार, मे १९, २०२३
धक्कादायक! सातवीच्या विद्यार्थ्याने केले आठवीच्या विद्यार्थिनीला गर्भवती
शनिवार, मार्च १८, २०२३
मनपा उद्यान अधिक्षकांविरोधात दाखल तक्रार तत्थ्यहिन:झाडांची शहानिशा न करता चुकीची तक्रार दाखल
शनिवार, जानेवारी १४, २०२३
कटलेली पतंग पकडतांना १३ वर्षीय मुलाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धंतोलीतील कुंभारटोळीतून जाणाऱ्या नागपूर-मुंबई रेल्वे लाईनवर काही मुले पतंग उडवित होते. शुक्रवारी दुपारी वंशसुद्धा तेथे पतंग उडवित होता. पतंग लुटण्याच्या नादात वंशचे वेगाने येणाऱ्या रेल्वेकडे लक्ष गेले नाही आणि वेगाने येणाऱ्या यशवंत एक्सप्रेसचे वंशला जबर धडक बसली. यात वंशचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
रविवार, डिसेंबर १८, २०२२
हवामान अंदाज समजून घ्या आणि करा नियोजन | Local Weather Forecast
Local Weather Forecast - RMC Nagpur
चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात आकाश अंशिक ढगाळ राहणार असून, कमाल तापमान 30 अंश ते किमान तापमान 17 अंश पर्यंत राहणार आहे. हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गोंदिया (Gondia) जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात आकाश अंशिक ढगाळ राहणार असून, कमाल तापमान 30 अंश ते किमान तापमान 17 अंश राहणार आहे या जिल्ह्यात देखील हवामान कोरडे राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
भंडारा (Bhandara) जिल्ह्यात अंशिक ढगाळ वातावरण राहणार असून 17 ते 21 डिसेंबर दरम्यान आद्रतेत व तापमानात घट होण्याची शक्यता आहे .
गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस आकाश निरभ्र राहणार असून आवश्यक ढगाळ व हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे कमाल तापमान 30 अंश तर किमान तापमान 14° पर्यंत खाली घसरण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आद्रता ६० ते ७० टक्के तर दुपारची सापेक्ष आद्रता 40 ते 53% राहण्याचा अंदाज आहे.
पुढील पाच दिवसाच्या हवामान अंदाजानुसार ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावरील घाटे अळीसाठी पोषक वातावरण असल्याने प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी घेतलेल्या तापमानाचा भात पिकाच्या रोपावर वाढीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता टाळण्यासाठी रात्रीच्या वेळी प्लास्टिक आच्छादन किंवा भाताच्या तणसाचे आच्छादन टाकावे व सकाळी काढून घ्यावे असा सल्ला देखील कृषी विभागाने दिला आहे.
लोक हेदेखील विचारतात
Does it will rain tomorrow in Nagpur?
Does it rain in Nagpur?
How many days rain in Nagpur?
What is the climate of Nagpur Today?
Health effects can be immediately felt by sensitive groups. Healthy individuals may experience difficulty breathing and throat irritation with prolonged exposure. Limit outdoor activity.
हवामान अंदाज समजून घ्या आणि करा नियोजन Local Weather Forecast
संबंधित शोध
Nagpur 14 day weather forecast
Nagpur weather next 15 days
Weather forecast nagpur next 30 days
BBC weather Nagpur
Nagpur weather satellite
Nagpur weather forecast 7 days
Nagpur weather today rain
weather nagpur, maharashtra
मंगळवार, नोव्हेंबर २९, २०२२
वेटलिफ्टिंग स्पर्धेत आहाना कपुरियाला सुवर्णपदक
नागपूर । वेटलिफ्टिंग महाराष्ट्रतर्फे नुकत्याच आयोजित महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत एकूण 160 किलो वजनी गटात १७ वर्ष वयोगटात आहाना प्रवीण कपुरिया हिने सुवर्ण पदक प्राप्त केले. तिच्या या कामगिरीवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. डिसेंबरअखेरीस आणि जानेवारी २०२३ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत नागरकोइल येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत तिची निवड झाली आहे.
सेंटर पॉइंट स्कूलची विद्यार्थिनी आहाना प्रवीण कपुरिया हिने काही दिवसांपूर्वी नागपुरातील मानकापूर स्टेडियममध्ये झालेल्या स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यात तिला सुवर्णपदक मिळाले होते. याशिवाय 12 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2022 दरम्यान होणाऱ्या राज्य शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत ती खेळणार आहे. तिने आपल्या आभ्यासात तरुणांसाठी राष्ट्रीय विक्रम स्थापित केले असून, यावर्षी राष्ट्रीय स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित करण्याचे तिचे स्वप्न आहे. तिच्या यशस्वी कामगिरीसाठी सेंटर पॉइंट स्कूल व्यवस्थापन आणि शिक्षकांनी सहकार्य केले. गेल्या वर्षभरापासून संतोष सर आणि विशाल सरांनी तिला मदत करीत प्रशिक्षण दिले. अधिकाधिक मुलांनी खेळात पुढे यावे, अशी इच्छा आहाना प्रवीण कपुरिया हिने व्यक्त केली आहे.
Miss Aahana Pravin kapuria 17 years old she has won the gold medal (160kg total) in the state competition in Maharashtra organised by weightlifting Maharashtra and she has been selected for nationals which would be held in Nagercoil in the end of December till the first week of January. She has won the DSO competition held in mankapur stadium few days back in which she had got the gold and she would be going to play school state for weightlifting which would be held in between 12th December till the 15th of December 2022.
She has broken the national record for the youth in her practice and is aiming to set a new record in the national this year. She is student of centre point school and the school has helped her in all the possible ways for her growth. Santosh sir and Vishal Sir have helped her and coached her since last one year. We Really wish that more kids come forward in sports
सोमवार, नोव्हेंबर २८, २०२२
*‘SHRI GURU TEG BAHADAR’S MARTYRDOM DAY OBSERVED AT JARIPATKA*
मंगळवार, नोव्हेंबर २२, २०२२
समाजकार्य महाविद्यालयात युवतींचे संरक्षण या विषयावर कार्यशाळा | Protection of Girls Protection Alliance
शनिवार, नोव्हेंबर १२, २०२२
सीताफळ तोडण्यासाठी झाडावर चढण्याचा प्रयत्नात असतांना ३ वर्षीय मुलाचा विहिरीत पडून मृत्यू
शनिवार, ऑक्टोबर २९, २०२२
नदीच्या पात्रात आढळला वाघाचा मृतदेह
बाजारगाव परिसरात वाघिणीचा मृत्यू
रविवार, ऑक्टोबर १६, २०२२
संस्कृत आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे जगभरात पोचवावे. - श्री नितीन जी गडकरी
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचा रजतोत्सव समारोह
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रजतोत्सवा निमित्त एक विशेष कार्यक्रम आज रविवार, दि. 16 ऑक्टोबर 2022 रोजी संपन्न झाला. विश्वविद्यालयाच्या रजतोत्सवानिमित्त आयोजित या विशेष कार्यक्रमाला प्रमुख अतिथी या नात्याने मा. श्री. नितीनजी गडकरी, केंद्रीय मंत्राी, जहाजबांधणी, रस्ते वाहतूक व महामार्ग उपस्थित होते . विशेष अतिथी या नात्याने कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे संस्थापक कुलगुरू मा. डॉ. पंकज चांदे आणि मा. पूर्व कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी, मा. कुलगुरू, केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय, दिल्ली उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वविद्यालयाचे मा. कुलगुरू प्रो. मधुसूदन पेन्ना होते. कुलसचिव डॉ. रामचंद्र जोशी, प्रो नंदा पुरी, अधिष्ठाता, संस्कृत तथा संस्कृतेतर भाषा संकाय, रजतोत्सव समन्वयक प्रो. कृष्णकुमार पाण्डेय हे प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते.
---
----Addressing Rajat Mahotsav program organised by Kavikulguru Kalidas Sanskrit University, Nagpur https://t.co/pxw1xGNhCj
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) October 16, 2022
कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या शुभहस्ते वेदमंत्रांच्या उद्घोषात दीप प्रज्वलनाने झाला. विद्यापीठ गीतानंतर मा. श्री नितीन जी गडकरी , मा संस्थापक कुलगुरू डॉ पंकज चांदे , मा कुलगुरू प्रो श्रीनिवास वरखेडी यांचा शाल, श्रीफळ, सरस्वती प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला.
लघुचित्रपट “प्रसादचिह्नानि” प्रदर्शित
रजतमहोत्सवाचे औचित्य साधून विश्वविद्यालयाच्या 25 वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेणारा लघुचित्रपट “प्रसादचिह्नानि” या प्रसंगी प्रदर्शित करण्यात आला. विश्वद्यालय निर्मित या लघुचित्रपटाचे लेखन, निवेदन आणि दिग्दर्शन जनसंपर्क अधिकारी डॉ रेणुका बोकारे यांनी केले होते.
विश्वविद्यालयातर्फे संपूर्ण वर्षात रजत महोत्सवानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचा आलेख रजतोत्सव समिती समन्वयक प्रो कृष्णकुमार पांडेय यांनी प्रस्तुत केला.
*समर्थ पोर्टल चे लोकार्पण
1 भारत सरकार तर्फे तयार करण्यात आलेल्या समर्थ पोर्टल चे उद्घाटन मा श्री नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय हे महाराष्ट्रातील समर्थ पोर्टल स्वीकृत करणारे पहिले विद्यापीठ आहे. या पोर्टल द्वारे प्रवेश, परीक्षा, निकाल आणि अन्य सर्व प्रशासकीय कामकाज online पद्धतीने करण्यात येणार आहे. श्री राजीव रंजन मिश्रा, संचालक महर्षी पाणिनी संगणक केंद्र यांच्या परिश्रमातून है पोर्टल तयार करण्यात आले.
शोधसंहिता संशोधन जर्नल चे प्रकाशन
2 विश्वविद्यालयाच्या युजीसी केअर लिस्टेड ‘‘शोधसंहिता’’ या वार्षिकांकाचे प्रकाशन - शोधसंहिता प्रकाशन .. गेल्या 10 वर्षांपासून प्रकाशित होत असलेले ugc care listed मधे समाविष्ट संशोधन जर्नल चा आज 9 वा अंक प्रकाशित झाला . मा कुलगुरु प्रो पेन्ना यांच्या प्रमुख संपादकत्वाखाली डॉ रेणुका बोकारे उपसंचालक, संशोधन व प्रकाशन विभाग यांनी या अंकाचे संपादन केले आहे. श्री उमेश पाटील आणि श्री अभिलाष नील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
शोधसंहिता पोर्टल उद्घाटन
शोधसंहिता पोर्टल चे उद्घाटनही या प्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. शोधसंहिता हे विश्वविद्यालयाचे ugc care listed रिसर्च जर्नल आहे. संपूर्ण भारतात प्रख्यात असलेले हे जर्नल सर्वांना सहज उपलब्ध व्हावे यासाठी एक विशेष पोर्टल तयार करण्यात आले आहे. या पोर्टल द्वारे संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक यांना online registration द्वारे आपले लेख पाठवता येतील . शोधसंहिता जर्नल मधे लेख प्रकाशित होण्याची संपूर्ण प्रक्रिया ही संशोधकांना पारदर्शक पद्धतीने आणि सहज उपलब्ध व्हावी यासाठीच या पोर्टल ची निर्मिती करण्यात आली आहे. Registration to publication अशा सर्व टप्प्यांवरचा संशोधन लेखाचा प्रवास यामधे अंतर्भूत असून, जे गेट या रिसर्च पोर्टल मधे ते समाविष्ट होणार आहे. शोधसंहिता चा प्रवास आणि प्रक्रिया ही प्रिंट ते डिजिटल रुपात साकारण्याचे महत्त्वाचे कार्य हे या रजतोत्सवी वर्षातील विश्वविद्यालयाच्या संशोधन व प्रकाशन विभागाची मोठीच उपलब्धी आहे. डॉ रेणुका बोकारे, उपसंचालक, संशोधन व प्रकाशन विभाग यांनी हे कार्य यशस्वी रित्या पूर्ण केले असून आणि डॉ दीपक कापडे ग्रंथपाल यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. विशेष म्हणजे आज प्रकाशित झालेला शोधसंहिता चा अंक... देखील या पोर्टल द्वारे लोकार्पित करण्यात आला.
प्रमुख अतिथी मा श्री नितीन जी गडकरी आपल्या भाषणात म्हणाले ,’’
कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाने नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे संस्कृत जगाच्या व्यासपीठावर पोचवावे. संस्कृत ही कुठल्याही विशिष्ट गटाची भाषा नसून ती सर्वांची भाषा आहे. संस्कृत for all हे विद्यापीठाचे ध्येय असून त्यानुसार विद्यापीठ सर्वसमावेशक, समाजाच्या सर्व स्तरापर्यंत सर्वांपर्यंत पोचेल असे विविध कार्यक्रम आणि अभ्यासक्रम राबवित आहे. या विद्यापीठाला प्रतिष्ठित करण्यामध्ये डॉ चांदे, डॉ वैद्य, डॉ वरखेडी आणि डॉ पेन्ना यांनी मोठे योगदान दिले आहे. आधुनिक काळानुरूप नवीन तंत्रज्ञानाआधारे सर्वोत्तम सादरीकरण करून एक museum तयार करावे. त्यामुळे जगभरातील लोक येथे पर्यटनासाठी येतीलच आणि संस्कृत शिकण्यासाठी आकृष्ट होतील. डॉ.पेन्ना यांनी ज्ञानेश्वरी संस्कृत मधून आणली त्याचप्रमाणे विद्यापीठाने विनोबा भावे यांचे गीतासार आणि तुकडोजी महाराज यांचे साहित्य ही संस्कृत मध्ये आणावे अशी अपेक्षा व्यक्त केली. भारताचा प्राचीन ज्ञान वारसा, भारतीय संस्कृती जगभरात पोचविण्याचे कार्य विद्यापीठाने करावे असे बोलून रजतोत्सवा निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
संस्थापक कुलगुरू डॉ पंकज चांदे आपल्या भाषणात म्हणाले कालिदास विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थ्यांकरिता इंग्रजी माध्यमातून शिकवण्यास सुरुवात करावी. विद्यापीठाने उर्जस्वल परंपरा कायम ठेवावी असे सांगून आपले विद्यापीठ अधिकाधिक उन्नत व्हावे..... अशा शुभेच्छा दिल्या.
मा कुलगुरू प्रो श्रीनिवास वरखेडी आपल्या भावपूर्ण भाषणात म्हणाले, विकास यात्रेत जे स्नेह सहकार्य मिळाले तो काळ माझ्यासाठी अविस्मरणीय आहे . कुलगुरु डॉ चांदे यांनी या विद्यापीठाची पायभरणी केली. विद्यापीठाचे व्यवस्थापन अतिशय उत्तम असून, असे व्यवस्थापन मी कोणत्याच संस्थेत बघितले नाही. येथे सर्वांनी टीम म्हणून कार्य केले आणि संपूर्ण भारतभरात विद्यापीठाला प्रतिष्ठा, गौरव प्राप्त झाला आहे.
कालिदास विद्यापीठात कार्य करण्यामुळेच मला केंद्रीय संस्कृत विद्यापीठात कार्य करण्याची संधी मिळाली.
राष्ट्रीय शिक्षण नीती मधील अनेक गोष्टी डॉ चांदे यांनी यापूर्वीच केला आहे. संस्कृत मुख्य प्रवाहात यावे आणि संस्कृत विद्यापीठ बहुविषयक असावे हे राष्ट्रीय शिक्षण नीती मधील अपेक्षा डॉ चांदे यांनी इथे केला आहे त्यामुळे कालिदास विद्यापीठ हे त्याचे आदर्श प्रारूप आहे. कालिदास विद्यापीठ हे स्वावलंबी विद्यापीठ असून महत्त्वपूर्ण विद्यापीठ आहे. A प्लस प्लस मिळवण्यासाठी येणारा काळ आव्हानात्मक आहे. येणाऱ्या चार वर्ष तुम्हाला प्रत्येकाला कठोर निरंतर परिश्रम करावे लागतील.
आपला संपूर्ण performance तुम्हाला कायम ठेवावा लागेल.
अध्यक्षीय भाषणात मा कुलगुरू प्रो मधुसूदन पेन्ना यांनी कालिदास संस्कृत विद्यापीठ आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करेल असे आश्वस्त केले. शास्त्ररक्षण शास्त्रसंवर्धन आणि शास्त्र परंपरा पुढे नेण्यासाठी आम्ही कायमच प्रयत्नरत राहू असे सांगून रजतोत्सवासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांना धन्यवाद दिले. कार्यक्रमाचे संचालन डॉ रेणुका करंदीकर यांनी केले शांतीपाठाने कार्यक्रमाची समाप्ती झाली.
प्रस्तुत कार्यक्रमाला विश्वविद्यालयाच्या विकासात योगदान देणारा नागपूरचा संस्कृत परिवार, हितचिंतक रामटेक व नागपूर येथील पत्रकार , विश्वविद्यालयाच्या विविध संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक विद्यार्थी तसेच सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, अधिकारी व सहकारी तसेच निवृत्त अधिकारी आणि प्राध्यापक , आजी व माजी विद्यार्थी उपस्थित होते
शुक्रवार, ऑक्टोबर १४, २०२२
माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपातील साईबाबाच्या सुटकेचे आदेश | Bombay High Court - professor GN Saibaba
माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपातील साईबाबाच्या सुटकेचे आदेश
देशद्रोह आणि माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेले दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबा यांची मुंबई उच्च न्यायालयाने मुक्तता केली आहे. न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने साईबाबांच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. हा आदेश देताना खंडपीठाने साईबाबांची तात्काळ सुटका करावी, असे म्हटले आहे.
कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात साईबाबांनी उच्च न्यायालयात अपील केले. 2017 मध्ये साईबाबाला एका खासगी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा रद्द करून न्यायमूर्ती राहुल देव आणि न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या खंडपीठाने प्राध्यापकाला सोडण्याचे आदेश दिले आहेत. साईबाबा सध्या नागपूर कारागृहात आहेत. त्याला चालता येत नाही आणि तो व्हीलचेअरच्या साहाय्याने हालचाल करतो. खंडपीठाने केवळ साईबाबाच नाही तर त्याच्यासह 5 आरोपींची सुटका केली आहे. त्यापैकी एकाचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे.
काय प्रकरण आहे?
महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सत्र न्यायालयाने मार्च २०१७ मध्ये साईबाबा आणि पत्रकार आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) विद्यार्थ्यासह इतरांना माओवादी संबंध आणि देशाविरुद्ध युद्ध पुकारण्याच्या कारवायांमध्ये सहभागी झाल्याबद्दल दोषी ठरवले होते. साईबाबा आणि इतरांना न्यायालयाने कठोर बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) आणि भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध तरतुदींखाली दोषी ठरवले.
नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या गतीत आरोपावरून 2017 पासून जेलमध्ये असलेल्या #साईबाबा व त्यांचे इतर 5 सहयोगी यांना आज #मुंबई_उच्च_न्यायालयाच्या_नागपूर_खंडपीठाने दोष मुक्त करत त्यांना सोडण्याचे आदेश दिले. #Nagpur #Maharashtra pic.twitter.com/WG1Pmztm4c
— आकाशवाणी बातम्या नागपूर (@airnews_nagpur) October 14, 2022
Delhi University professor GN Saibaba, who has been in jail for the past eight years for having links with a banned Maoist party, has been acquitted of all charges by the Bombay High Court. The court has ordered the government to immediately release Saibaba from jail. Apart from Professor Saibaba, the release of five more accused has been ordered. He was sentenced in 2017 by a lower court in Maharashtra.
प्रतिबंधित माओवादी पार्टी से संपर्क रखने के आरोप में पिछले आठ बरस से जेल में बंद दिल्ली यूनिवर्सिटी के प्रोफेसर जीएन साईंबाबा को बॉम्बे हाईकोर्ट ने सभी आरोपों से बरी कर दिया है. अदालत ने सरकार को आदेश दिया है कि साईबाबा को तुरंत जेल से रिहा किया जाए. प्रोफेसर साईबाबा के अलावा पांच और अभियुक्तों की रिहाई का आदेश दिया गया है. उन्हें महाराष्ट्र की एक निचली अदालत ने 2017 में सज़ा सुनाई थी.
सोमवार, सप्टेंबर १२, २०२२
सौसर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपचे शक्ती प्रदर्शन | madhya pradesh election nagar nigam
भव्य मिरवणूक काढत जल्लोषात दाखल केले नामांकन अर्ज
सौसर नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने 15 वॉर्डातून सर्व जागांसाठी आज, सोमवार तारीख १२ सप्टेंबर २०२२ रोजी मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढून शक्ती प्रदर्शन करीत उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात नामांकन अर्ज दाखल करण्यात आले.
ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद आणि मतदारांच्या शुभेच्छा पाठीशी घेऊन प्रत्येक वॉर्डातून भव्य रॅली काढण्यात आली. ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचल्यावर एकच जल्लोष करीत विजयाचा संकलप करण्यात आला. मुख्य मार्गावरून रॅली जात असताना उमेवादारानी मतदारांच्या भेटी घेत आशीर्वाद घेतले. यावेळी सौंसर शहराच्या सर्वांगीण विकास व चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प सर्व उमेदवार, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी केला.
सौसर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून वार्ड क्र. 1 मधून रामकृष्णा वामन राउत, वार्ड क्र. 2 मधून श्रीमती आशा युवराज बेन्डे, वार्ड क्र. 3 श्रीमती शीतल दीलिप हेडाउ, वार्ड क्र. 4 श्रीमती अर्चना दिगाम्बर वरूडकर, वार्ड क्र. 5 सुनील शेषराव खंडाईत, वार्ड क्र. 6 श्रीमति योगिता सतीष बोडखे, वार्ड क्र. 7 श्रीमति मृनाली दर्शन झाडे, वार्ड क्र. 8 भारत सुरेश तरारे, वार्ड क्र. 9 श्रीमति गीताबाई वामन मारबते, वार्ड क्र. 10 विनोद भाऊराव जुनघरे, वार्ड क्र. 11 विनोद रूखमानंद दुफारे, वार्ड क्र. 12 श्रीमति सुरेखा इंदरचंद डांगा, वार्ड क्र. 13 रविशंकर बलवंत धुर्वे, वार्ड क्र. 14 प्रशांत दामोदर ठाकरे एवं वार्ड क्र. 15 से श्रीमति संगीता खुशाल उफाट यांचा समावेश आहे.
madhya pradesh election nagar nigam
सौसर नगर निकाय चुनाव में भाजपा ने दिखाया दमदार प्रदर्शन
भव्य रॅली में नामांकन आवेदन दाखिल किए गए
सौसर नगर पालिका के आगामी चुनाव के लिए भारतीय जनता पार्टी की ओर से 15 वार्डों की सभी सीटों के लिए आज, सोमवार, 12 सितंबर 2022 को उपमंडल अधिकारी के कार्यालय में नामांकन पत्र दाखिल किया गया।
वरिष्ठ नागरिकों के आशीर्वाद और मतदाताओं की शुभकामनाओं के साथ हर वार्ड से भव्य रैली निकाली गई. यह रैली जब छत्रपति शिवाजी महाराज चौक पर पहुंची तो जीत का संकल्प एक ही जयकारे के साथ हुआ। मुख्य मार्ग से गुजरते हुए प्रत्याशी मतदाताओं से मिले और उनका आशीर्वाद लिया। इस अवसर पर भाजपा के सभी उम्मीदवारों, पदाधिकारियों एवं कार्यकर्ताओं ने सौंसार शहर का चेहरा बदलने और समग्र विकास करने का संकल्प लिया.
सौसर नगरपालिक भाजपा अधिकृत पार्षद प्रत्याशी जिसमें वार्ड क्र. 1 से रामकृष्णा वामन राउत, वार्ड क्र. 2 श्रीमती आशा युवराज बेन्डे, वार्ड क्र. 3 श्रीमती शीतल दीलिप हेडाउ, वार्ड क्र. 4 श्रीमती अर्चना दिगाम्बर वरूडकर, वार्ड क्र. 5 सुनील शेषराव खंडाईत, वार्ड क्र. 6 श्रीमति योगिता सतीष बोडखे, वार्ड क्र. 7 श्रीमति मृनाली दर्शन झाडे, वार्ड क्र. 8 भारत सुरेश तरारे, वार्ड क्र. 9 श्रीमति गीताबाई वामन मारबते, वार्ड क्र. 10 विनोद भाऊराव जुनघरे, वार्ड क्र. 11 विनोद रूखमानंद दुफारे, वार्ड क्र. 12 श्रीमति सुरेखा इंदरचंद डांगा, वार्ड क्र. 13 रविशंकर बलवंत धुर्वे, वार्ड क्र. 14 प्रशांत दामोदर ठाकरे एवं वार्ड क्र. 15 से श्रीमति संगीता खुशाल उफाट आदीने नामांकन जमा किये ।
संबंधित शोध
शनिवार, सप्टेंबर १०, २०२२
८० फूट उड्डाणपुलावरुन खाली फेकले; चौघांचा जागीच मृत्यू Nagpur | Sakkardara | Accident |
शुक्रवार, सप्टेंबर ०९, २०२२
वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर ने जागतिक फिजिओथेरपी दिन साजरा केला |
वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर ने जागतिक फिजिओथेरपी दिन साजरा केला
नागपूर : जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त फिजिओथेरपी विभागातर्फे वृद्धाश्रम आणि जवळच्या पोलीस ठाण्यामधील लोकांच्या वेदना व दुःख दूर करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यंदाच्या जागतिक फिजिओथेरपी दिनाची थीम ‘ऑस्टियोआर्थराइटिसचे उपचार’ अशी आहे. विभागप्रमुख डॉ. अलका नाकाडे यांच्या नेतृत्वाखालील फिजिओथेरपी टीमने पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना नियमित व्यायाम करून आपले सांधे निरोगी ठेवण्याबाबत मार्गदर्शन केले आणि त्यांच्यापैकी कोणाला ऑस्टियोआर्थराइटिसची लक्षणे आढळल्यास त्यांना व्यायामाची पथ्ये व व्यायामाच्या पद्धती यासंदर्भात माहिती देण्यात आली.
डॉ. अलका यांनी सांगितले, "आम्ही वृद्धाश्रमला देखील भेट दिली होती, तिथे आम्ही जवळपास 20 ते 25 वृद्ध लोकांना भेटलो होतो, त्यांच्याशी बोललो आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या तक्रारींनुसार व्यायाम समजावून सांगितला. आम्ही 8 सप्टेंबर रोजी सर्व रुग्णांसाठी आणि नातेवाईकांसाठी त्यांच्या वजन सहन करण्याची स्थिती तपासण्यासाठी हॉस्पिटलमध्ये विनामूल्य फुट अनालिसिस मशीन ची व्यवस्था केली होती आणि ते समजा अयोग्य आढळून आले तर गुडघ्यांच्या ऑस्टियोआर्थराइटिसला कारणीभूत ठरते".
8 सप्टेंबर 2022 रोजी रुग्णालय आपल्या आवारात फुट अनालिसिस मशीन देखील स्थापित करेल ज्यामध्ये रूग्ण आणि नातेवाईक कुठलीही फी न देता त्याचा फायदा घेऊ शकतात.
श्री अभिनंदन दस्तेनवार, केंद्र प्रमुख, वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर म्हणाले, “आम्ही आमच्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असताना रोग टाळण्यासाठी समाजात योगदान देण्यास सक्षम असणे हे आमचे उद्दिष्ट आहे. हा उपक्रम या दिशेने फक्त एक लहान पाऊल आहे.”
Wockhardt Hospitals, Nagpur World Physiotherapy Day
Wockhardt Hospitals, Nagpur ... World Physiotherapy Day.jpeg