Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जानेवारी १४, २०२३

कटलेली पतंग पकडतांना १३ वर्षीय मुलाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू



नागपूर: कटलेल्या पतंग (Kite) पकडण्यासाठी रेल्वेट्रॅकवर धावत सुटलेल्या १३ वर्षीय मुलाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला असल्याची घटना शुक्रवारी नागपूर येथे घडली. पतंगीच्या मागे बेभान सुटल्याने त्याला धावत्या रेल्वेची (Train) जोरदार धडक बसली. यात मुलाचा जागीच जीव गेला. ध्रूव ऊर्फ वंश प्रवीण धुर्वे (रा. कुंभार टोळी वस्ती, धंतोली) असे मृत मुलाचे नाव आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धंतोलीतील कुंभारटोळीतून जाणाऱ्या नागपूर-मुंबई रेल्वे लाईनवर काही मुले पतंग उडवित होते. शुक्रवारी दुपारी वंशसुद्धा तेथे पतंग उडवित होता. पतंग लुटण्याच्या नादात वंशचे वेगाने येणाऱ्या रेल्वेकडे लक्ष गेले नाही आणि वेगाने येणाऱ्या यशवंत एक्सप्रेसचे वंशला जबर धडक बसली. यात वंशचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.


नागपूर येथे 7 जानेवारी २०२१ रोजी पतंग (Kite) पकडण्यासाठी जगाचं भान विसरुन धावणाऱ्या एका बारा वर्षाच्या मुलाचा रेल्वेच्या (Train) खाली चिरडून मृत्यू झाला होता. एंटा सोळंकी असं या मृत मुलाचं नाव होत. एंटा पंतग पकडण्याच्या नादात रेल्वे ट्रॅक ओलांडत होता. त्यावेळी त्या ट्रॅकवरुन रेल्वे येत असल्याचं त्याच्या लक्षात आलं नाही, आणि ही चूक त्याला महागात पडली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.