Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

chandrapur लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
chandrapur लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, सप्टेंबर ०६, २०२३

श्री साई औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपुर येथे शिक्षक दिन साजरा

श्री साई औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपुर येथे शिक्षक दिन साजरा

चंद्रपुर:
आज दि.०५/०९/२०२३ ला श्री साई औद्योगिक प्रशिक्षण संस्था,चंद्रपुर येथे भारतरत्न तसेच माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात आला.

ह्याप्रसंगीसंस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी सुध्दा संस्थेतील वरिष्ठ निदेशक श्री आशिष रायपूरकर सर (अभियांत्रिकीनिदेशक ) ह्यांना शाल,श्रीफळ आणि पुष्पपुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले तसेच इतर शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले ह्यावेळी संस्थेचे प्राचार्य श्री राजेश पेशट्टीवार ह्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात विद्यार्थ्यांना शिक्षक दिवसाचे महत्व सांगून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच सर्वांचे प्रेरणास्थान स्व.डॉ.व्ही.एम.येरगुडे साहेब ह्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल माहिती दिली. 

ह्याप्रसंगी सर्वनिदेशक-कर्मचाऱ्यांनी प्राचार्य श्री राजेश एम पेशट्टीवार ह्यांना शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ आणि भेटवस्तु देऊनसन्मानित केले. सर्वांनी प्रतिमेला पुष्पार्पण करून अभिवादन केले ह्याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा मा. श्रीमती विद्याव्ही. येरगुडे मॅम,सचिव मा.श्री.अमित व्ही येरगुडे सर तसेच उपाध्यक्ष मा.श्री.अभिषेक व्ही. येरगुडे सर ह्यांनीसर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि सरतेशेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून तसेचकर्मचाऱ्यांना चहा-बिस्कीट देऊन कार्यक्रमाची सांगता केली.

शुक्रवार, जुलै ०७, २०२३

आमदार म्हणाले शिक्षकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची गय नाही

आमदार म्हणाले शिक्षकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची गय नाही

प्रलंबित समस्‍यांविरोधात "विमाशि संघा"चे धरणे आंदोलन
चंद्रपूर : कार्यरत तथा सेवानिवृत्त शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या अनेक समस्या चंद्रपूर शिक्षण विभागात प्रलंबित आहेत. या माझ्या शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी सभागृहात व सभागृहाबाहेरही रस्त्यावर उतरून समस्या निकाली काढण्यासाठी कायम कटिबद्ध राहील. सोबतच शिक्षण विभागातील जे अधिकारी शिक्षकांच्या प्रलंबित समस्या निकाली काढत नसतील त्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा आमदार सुधाकर अडबाले यांनी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने आयोजित धरणे / निदर्शने आंदोलनात दिला.

प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या प्रलंबित समस्या निवारणार्थ २४ मेला सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत विषय सुचीतील सर्व प्रलंबित प्रकरणे १७ जूनपर्यंत निकाली काढण्यात येतील, असे मा. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी आश्वासीत केले होते. परंतू, त्यातील अनेक प्रकरणे अजूनही प्रलंबित आहेत. व त्या सभेचे इतिवृत्तही अप्राप्त आहे. या गंभीर प्रस्तावांच्या विरोधात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने संघटनेचे सरकार्यवाह आमदार सुधाकर अडबाले यांच्‍या नेतृत्वात शुक्रवारी जि.प. चंद्रपूर समोर धरणे / निदर्शने आंदोलन करण्यात आले.

ज्या शिक्षक - कर्मचाऱ्यांची प्रकरणे एक वर्ष होऊनही प्रलंबित आहेत. त्या कर्मचाऱ्यांनी सरळ लोकायुक्त यांच्याकडे तक्रार करावी. त्यांच्या पाठीशी मी उभा राहिल, असे आवाहन आमदार सुधाकर अडबाले यांनी केले. आंदोलनातील समस्यांचे निवेदन उपशिक्षणाधिकारी (माध्य.) निकिता ठाकरे यांनी आंदोलन स्थळी येऊन स्वीकारले.

या आंदोलनात म. रा. मा. शि. महामंडळाचे सहकार्यवाह जगदीश जुनगरी, कार्याध्यक्ष लक्ष्मणराव धोबे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ चंद्रपूरचे जिल्‍हाध्यक्ष केशवराव ठाकरे, जिल्‍हा कार्यवाह श्रीहरी शेंडे, विमाशिचे उपाध्यक्ष सुनील शेरकी, नामदेव ठेंगणे, गंगाधर कुनघाडकर, कोषाध्यक्ष दिगांबर कुरेकर, सहकार्यवाह अनिल कंटीवार, शालीक ढोरे, दीपक धोपटे, देवराव निब्रड, मनोज वासाडे, धनंजय राऊत, प्रा. ज्ञानेश्‍वर सोनकुसरे, सुरेंद्र अडबाले, सतीश मेश्राम, जुनी पेन्शन संघटनेचे भालचंद्र धांडे, अजय देठे, विनोद कौरासे, संजय ठावरी, प्रकाश कुंभारे, कालिदास बोबडे, मिलमिले, शकील सर, धनंजय राऊत, हेमंत किंदरणे, डॉ. विजय हेलवटे व मोठ्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व मोठ्या संख्येने शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

या धरणे आंदोलनात शिक्षक - शिक्षकेतर व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा तिसरा व चौथा थकबाकी हप्ता तात्‍काळ देण्यात यावा, सेवानिवृत्ती उपदानाची प्रलंबित प्रकरणे, ऑगस्‍ट २०२२ ला कॅम्पमध्ये सुमारे तिनशे निवडश्रेणी / वरिष्ट श्रेणी प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले. परंतू त्यापैकी शेकडो प्रस्ताव अजुनही प्रलंबित आहेत ते तात्काळ निकाली काढण्यात यावे, प्रलंबित वैद्यकीय देयके, ज्या निवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना नियमित पेंशन मंजूर झाले नाही अश्या निवृत्त शिक्षक-कर्मचाऱ्यांना प्रोव्हीजनल पेंशन दिले जाते. त्यांचे बिल काढण्यात नियमितपणा दिसून येत नाही. काही निवृत्ती वेतनधारक सहा महिणे वेतनापासून वंचित राहतात असे निदर्शनास येत आहे, 

अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या किंवा काही शिक्षक कर्मचाऱ्यांना चुकीने अधिसंख्य दाखविण्यात येवून त्यांची वेतनवाढ किंवा सेवानिवृत्ती प्रकरणे रोखलेली आहेत. त्यांना त्यांचे लाभ तात्काळ अदा करण्यात यावे, अनुकंपा तत्वावरील पदभरतीचे मान्यता प्रस्ताव तात्काळ निकाली काढण्यात यावे, विविध विषयावरील अनेक प्रस्ताव प्रलंबित असण्यामागे भ्रष्टाचार हे प्रमुख कारण आहे असे निदर्शनास येत आहे. त्याची सत्यता पडताळून दोषींवर कार्यवाही करण्यात यावी व इतर अनेक मागण्यांचा समावेश आहे.

शनिवार, मार्च १८, २०२३

मोबाईल टॉवर मनपाद्वारे सील

मोबाईल टॉवर मनपाद्वारे सील

चंद्रपूर:
 १,४१,०९५ रुपयांची थकबाकी असणाऱ्या सरकार नगर, राधिका सभागृहाजवळील व्हीजन कंपनीच्या टॉवरला मनपा कर वसुली पथकाने टाळे ठोकले आहे. मनपा कर विभागाद्वारे वारंवार सूचना देऊनही सदर मालमत्ता धारकाने कराचा भरणा न केल्याने सदर कारवाई करण्यात आली आहे.

महापालिका क्षेत्रात ८० हजाराहुन अधिक मालमत्ता असून, संपूर्ण मालमत्तांच्या माध्यमातून दरवर्षी मागणी नोंदवली जाते. करदात्यांना कराची नोटीस पाठविल्यानंतर जे मालमत्ता धारक कराचा भरणा करण्यास दिरंगाई करत आहे त्यांच्या मालमत्तांवर सील लावण्यात येत आहे. याकरीता झोननिहाय विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जास्तीत जास्त वसुली होऊन ती शहराच्या विकास कामांसाठी उपयोगी यावी या अनुषंगाने यंत्रणा जोमात कामाला लागली आहे.

काही मालमत्ता धारक हे धनादेशाद्वारे कराचा भरणा करतात, अधिकतम धनादेश हे वटले जातात, मात्र जे धनादेश वटले जाणार नाही त्यांच्यावर फौजदारी कारवाई मनपातर्फे करण्यात येणार आहे. www.cmcchandrapur.com या लिंकवर Pay Water Tax Online या टॅबवर पाणीपट्टी कराचा तर https://chandrapurmc.org या लिंकवर मालमत्ता कराचा ऑनलाईन भरणा करता येतो त्याचप्रमाणे फोन पे, गुगल पे,भीम या युपीआय ॲपवर सुद्धा मालमता व पाणी कराचा भरणा करता येत आहे. १६ ते २६ मार्च दरम्यान मालमत्ता कराच्या शास्तीत ५० टक्के सूट देण्यात येत असुन अधिकाधिक मालमत्ता धारकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

सदर कारवाई मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात व उपायुक्त अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सहायक आयुक्त विद्या पाटील,नरेंद्र बोभाटे,सचिन माकोडे, राहुल पंचबुद्धे, कर विभाग प्रमुख अनिल घुले,अग्निशमन विभाग प्रमुख चैतन्य चोरे,पथक प्रमुख नागेश नित,नरेंद्र पवार,अमित फुलझेले,चिन्मय देशपांडे,अमुल भुते,प्रगती भुरे,अतुल भसारकर,रवींद्र कळंबे,सोनू थुल,प्रतीक्षा जनबंधु,अतुल टिकले,सागर सिडाम,विकास दानव,चॅनल वाकडे, प्रविण हजारे यांनी केली.

रविवार, जानेवारी ०८, २०२३

 औरंगाबादच्या भारतीय सैनिकाने जिंकली मॅरेथॉन: धानोरकर दाम्पत्यांनी केला विजेत्यांच्या विशेष सन्मान

औरंगाबादच्या भारतीय सैनिकाने जिंकली मॅरेथॉन: धानोरकर दाम्पत्यांनी केला विजेत्यांच्या विशेष सन्मान

४१ किलोमीटरच्या स्पर्धेत उरतले राज्यभरातील हजारो धावपटू

 चंद्रपूर : वरोरा- भद्रावती मतदार संघाचा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचा ९ जानेवारीला वाढदिवस. या वाढदिवसाचे औचित्य साधून माता महाकाली बहुउद्देश्यीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने रविवारी ८ जानेवारीला सकाळी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. रत्नमाला चौक (वरोरा) ते पडोली चौक अशा या ४१ किलोमीटरच्या स्पर्धेत राज्यभरातील हजारो धावपटू सहभागी झाले होते. औरंगाबाद जवळील बेडेवाडी या गावी सुटीवर असलेल्या भारतीय जवानाने स्पर्धेत सहभाग नोंदवित एक लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकाविले.
धानोरकर दाम्पत्याची ओळख राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देणारे अशी आहे. त्यामुळे खासदार बाळूभाऊ धानोरकर असो वा आमदार प्रतिभाताई धानोरकर हे आपला वाढदिवस दरवर्षी साधेपणाने साजरा करतात. समाजातील गरजुंना मदतीचा हात देत त्यांच्या चेहऱ्यावरील हास्यात स्वतः आनंद शोधतात. यावर्षीसुद्धा ताईंचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचे ठरले. शारीरिक तंदुरुस्ती आणि सुदृढ आरोग्याचा मूलमंत्र देण्यासाठी वरोरा ते पडोली अशी ४१ किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्याचे ठरले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्पर्धेत राज्यभरातील स्पर्धक सहभागी व्हावे म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमाचा वापर केला. सोशल मीडियावरून मॅरेथॉन स्पर्धेची माहिती मिळताच राज्यभरातील धावपटूंना स्पर्धेत आपल्या नावांची नोंदच केली नाही, तर स्वयंस्फूर्तीने सहभागीसुद्धा झाले. 
वरोरा येथील रत्नमाला चौक येथून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली. खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी स्पर्धेला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी काँग्रेसचे प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, इंटक नेते के. के. सिंग, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामू तिवारी, माता महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सचिन साधनकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनेश चोखारे, चंद्रपूर काँग्रेस तालुका अध्यक्ष श्याम थेरे,  अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल शेख, माजी नगराध्यक्ष विलास टिपले, वरोरा तालुकाध्यक्ष मिलिंद भोयर, डॉ. सागर वझे, महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष रत्ना अहिरकर, वणी तालुका अध्यक्ष प्रमोद वासेकर, वरोरा विधानसभा प्रमुख मोनू चिमुरकर, घुगुस शहर काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी,  बाजार समिती माजी अध्यक्ष राजू चिकटे, भद्रावती तालुका अध्यक्ष प्रशांत काळे, शहर अध्यक्ष सुरज गावंडे, पवन अगदारी, प्रमोद बोरीकर, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मगरे. सैय्यद अन्वर, रोशन दतलवार, इंटक जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती, यश दत्तात्रेय, कुणाल चहारे, शाफान शेख, पप्पू सिद्धीकी राहुल चौधरी यांची उपस्थिती होती.
प्रल्हाद रामसिंग धनावत या भारतीय जवानाने २ तास १३ मिनिट ५२ सेकंदात ४१ किलोमीटर अंतर पार करीत प्रथम क्रमांक पटकाविला. ५१ हजार रुपयाचे दुसरे पारितोषिक महेश वाढई रा. चंद्रपूर, तृतीय पारितोषिक दीपक सिरसाट रा. नाशिक, चतुर्थ पारितोषिक अजित झा.रा. ठाणे , पाचवे पारितोषिक निखील सिंह रा. मुंबई, यांनी पटकाविले. या विजेत्यांना खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते  सन्मानित करण्यात आले. 
--

आरोग्याची श्रीमंती सर्वश्रेष्ठ
आरोग्यासारखी दुसरी कोणतीही श्रीमंती नाही. त्यामुळेच आरोग्य धनसंपदा म्हटले जाते. लाखो, कोट्यवधी रुपये असतील. परंतु, आरोग्यच चांगले नसेल, तर हे पैसा कोणत्या कामाचा. त्यामुळे प्रत्येकांनी आपले आरोग्य जपावे. दररोज सकाळी नियमित व्यायाम करावा. शारीरिक तंदूरुस्ती आणि सुदृढ आरोग्याचा मूलमंत्र देण्याच्या उद्देशातून मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत हजारोच्या संख्येने धावपटू सहभागी झाले. त्या सर्वांचे अभिनंदन.
-खासदार बाळूभाऊ धानोरकर
  एक करोड 2 लाख रुपये खर्च करून बांधलेली बाबूपेठ येथील विद्युत शवदाहीनी धुळखात:राजु कुडे

एक करोड 2 लाख रुपये खर्च करून बांधलेली बाबूपेठ येथील विद्युत शवदाहीनी धुळखात:राजु कुडे

उद्घाटनाच्या अगोदरच विद्युत चिमनी ला लागले जंग
स्मशानभुमी बनली कच-याच माहेरघर
चंद्रपूर - बाबूपेठ परीसरात असलेली एकमेव स्मशानभूमी जिथे बंगाली कॅम्प, अष्टभुजा, महाकाली कॉलरी, लालपेठ, आणि संपूर्ण बाबुपेठ परिसरातील जनता शवदहन करण्याकरिता या स्मशानभुमी मध्ये आणतात. अनेक वर्षापासून असलेल्या या स्मशानभूमी कडे मनपा प्रशासनाचे लक्ष न गेल्यामुळे येथे अनेक समस्या उद्भवत आहेत. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथे रोज अनेक शव दहन केले जाते. परंतु एकच शव दाहिनी असल्यामुळे जनतेला याचा त्रास सहन करावा लागतो आहे. त्याकरिता चार शव दाहीनी ची तिथे व्यवस्था करावी. सोबतच येथील जागेवर स्थानिक लोकांकडून अतिक्रमण होत आहे. तिथे संपूर्ण परिसराला वॉल कंपाऊंड करण्यात यावे. जंगलातून आलेला पाण्याचा झरा हा स्मशानभूमी मधून जात असून तो 12 महिने वाहत असतो तिथे आंघोळीकरीता ओटा, करून देण्यात यावा. आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे अशी मागणी आम आदमी पार्टी चे शहर सचिव तथा मनपा सह प्रभारी राजु कुडे यांनी आयुक्तांकडे केली आहे.


गरज नसताना मनपा कडून खनीज निधीतून 1कोटी खर्च करून LPG शव दांहीनी स्मशान भूमी मध्ये बसवली गेली. ज्या मध्ये मागील दीड वर्षात एक ही शव दहन झाले नाही. ही तर जनतेचा पैशाची उधळपट्टी असून यात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी आम आदमी पार्टी चंद्रपूर तर्फे करण्यात आली आहे. स्मशानभूमी संदर्भातील मागण्या पूर्ण करण्याकरीता 7 दिवसांत महत्त्वाचे पाऊले उचलली गेली नाही तर जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरू असे आवाहन आम आदमी पार्टीचे शहर सचिव राजू भाऊ कुडे यांनी दिले. या वेळेला जिल्हाध्यक्ष सुनिल देवराव मुसळे शहर युवा अध्यक्ष संतोष बोपचे, झोन अध्यक्ष रहमान खान पठाण, प्रभाग अध्यक्ष अनुप तेलतुंबडे, कृष्णा सहारे, महेश ननावरे, भीमराज बगेसर, मुकुंद गटलेवार तसेच इतर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
सदैव तेली समाजा सोबत राहील - आ. किशोर जोरगेवार

सदैव तेली समाजा सोबत राहील - आ. किशोर जोरगेवार

तेली युवक मंडळाच्या वतीने भव्य उपवर
उपवधु मेळावा व स्नेहमीलन कार्यक्रमाचे आयोज
चंद्रपूर:
तेली हा धार्मीक आणि सामाजिक बांधीलकी जपणारा समाज आहे. समाजातील युवक हे प्रतिभावंत आहे. त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. आजच्या या उपवर - उपवधु मेळाव्याच्या माध्यमातुन समाज एकत्रीत आला आहे. यात समाजाच्या समस्या व प्रश्नांबाबत चिंतन व्हावे. हे प्रश्न आमच्या पर्यत्न पोहचावेत. ते सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मी कटिबध्द असुन तेली समाजा सोबत होते आणि पुढे ही राहिल असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

माश्रोती सभागृह येथे तेली युवक मंडळाच्या वतीने भव्य उपवर - उपवधू मेळाव व स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी मंत्री तथा ब्रम्हपुरी विधान सभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार, वेकोलीचे सिजीएम संजय वैरागडे, सिंदेवाही चे नगराध्यक्ष सुधिर कांबळे, तेली समाजाचे विदर्भ अध्यक्ष बाबुलाल शेंडे, महिला अध्यक्ष दुधलकर, सेवादल चे सुर्यकांत खनके, माजी नगरसेविका चंदा ईटनकर, छबु वैरागडे, प्राचार्य जर्नाधन दुधलकर, विनोद बुटले, आकाश साखरकर, यांच्यासह इतर मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी पूढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, तेली युवक मंडळाच्या वतीने दरवर्षी उपवर - उपवधु मेळाव्याचे आयोजन केल्या जात आहे. प्रत्येक समाजाने असे आयोजन नियमित केले पाहिजे. अशा आयोजनातून समाज एकत्रीत येतो. आजच्या धावपडीच्या युगात समाजातील योग्य वर वधु शोधण्यासाठीही असे आयोजन गरजेचे असल्याचे ते यावेळी म्हणाले. तेली समाज आपल्या पारंपरीक व्यवसायकडुन दुर जात असल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली. नौकरीच्या शोधात राहा पंरतु त्या सोबतच स्वयंरोजगारातुन समाजाची आर्थिक प्रगती साधा असे आवाहणनही यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी समाजातील युवक युवतींना केले.
आपण सेवेकरी समाज आहोत. तेली समाजाने चंद्रपूर जिल्ह्याला अनेक मोठे नेतृत्व दिले आहे. या समाजातील युवक - युवती मागे राहता कामा नये, या समाजाच्या अडचणी सोडविण्याचे लोकप्रतिनीधी म्हणून आमचे प्रयत्न सुरु आहे. आपण संताजी शिक्षण प्रसारक मंडळ यांना सभागृहासाठी 25 लक्ष रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतुन तयार होणार असलेले हे सभागृह समाजाच्या सामाजिक, धार्मीक कार्यक्रमासांठी उपलब्ध असणार आहे. तर बाबुपेठ येथे ही श्री संताजी यांच्या खुल्या मंचासाठी आपण निधी उपलब्ध करुन दिला आहे. हा काही शेवट नाही. समाजाने पुन्हा कुठे गरज असल्यास तशी मागणी करावी निधी आम्ही देऊ असेही यावेळी बोलतांना आमदार जोरगेवार म्हणाले.

सामाजिक आणि धार्मीक क्षेत्रात तेली समाज बांधवाचे मोठे योगदान राहिले आहे. सामाजिक कार्यात पूढे असणारा हा समाज आहे. समाजातील युवकांमध्ये समाजकार्याची आवड आहे. वधू.- वर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जपण्याचे काम समाजाच्या वतीने केल्या जात आहे असल्याचे ते यावेळी म्हणाले . या कार्यक्रमाला समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

गुरुवार, डिसेंबर २९, २०२२

शहरात थर्टीफर्स्टच्या पर्वावर चंद्रपूर पोलिसांकडून ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम सुरु

शहरात थर्टीफर्स्टच्या पर्वावर चंद्रपूर पोलिसांकडून ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम सुरु

थर्टीफर्स्ट साजरे करा,मात्र जरा जपून!
चंद्रपूर:
३१ डिसेंबर शांततेत व अपघातमुक्‍त ठेवण्यासाठी जिल्हयात मादक द्रव्याचे सेवन करुन वाहन चालविणाऱ्याविरुध्द ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिम राबविले जात आहे.

जिल्हयात दरवर्षीप्रमाणे यंदाही थर्टीफर्स्ट सेलिब्रेशथनचा जोर चांगला रंगणार आहे. यावर्षी पोलीस विभागातर्फे ३१ डिसेंबरच्या पार्श्वभुमीवर अपघाताचे प्रमाण कमी व्हावे काही उपाय योजना राबविण्यात येत असुन त्यांपैकी ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिम मादक द्रव्याचे सेवन करुन वाहन चालविणाऱ्याविरुध्दची कारवाई ची मोहिमे सुरुवात करण्यात आली आहे.

थर्टीफर्स्ट सेलिब्रेशन उत्साहाच्या भरात गैरकृत्य करणाऱ्या मद्यप्रेमी, दारुच्या नशेत गाडी  चालवणे, विना परवाना मद्य सेवन करणे, दंगा मस्ती, गोंधळ घालणे अशा बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या मद्यपींविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यासाठी तसेच या पार्श्वभुमीवरुन जिल्हयात कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी दिनांक २८ डिसेंबर २०२२ पासुनच जिल्हयात ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिम राबविली जात आहे. सदर मोहिमे अंतर्गत जिल्हयात विविध ठिकाणी नाकाबंदी, ब्रिथ अनालायझर मशिनच्या मदतीने मद्यप्राशन करणाऱ्या मद्यपीची तपासणी करण्यात येत असुन दिनांक २८ डिसेंबर २०२२ रोजी राबविलेल्या मोहिमेत अनेक केसेस करण्यात आल्या आहेत.

 सदर मोहिम ही कारवाई करण्यासाठी नाही तर फक्‍त अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी राबविली जात आहे. मा. पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंह परदेशी यांनी याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन केले आहे की, ३१ डिसेंबर उत्साहात साजरा करावा परंतु सेलिब्रेशनच्या नावांखाली मद्य प्राशन करुन मोटार सायकल व कार भरधाव वेगाने चालवुन/स्टंट मारुन अपघात घडवु नये किंवा अपघात होवू नये याची सर्वांनी स्वत:हून काळजी घेणे आवश्यक आहे, म्हणुनच पोलीस विभागातर्फ ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिम मादक द्रव्याचे सेवन करुन वाहन चालविणाऱ्याविरुध्दची कारवाई ची मोहिम सुरुवात करण्यात आली आहे.
 आता शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी,विद्यार्थीनी करीता “'पोलीस काका-पोलीस दीदी” उपकम

आता शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी,विद्यार्थीनी करीता “'पोलीस काका-पोलीस दीदी” उपकम


चंद्रपूर:
सद्याच्या बदल्या आधुनिक जिवनशैली मुळे सद्यस्थितीत शालेय व महाविद्यालयीन विधार्थी आणि विद्यार्थीनीना अनेक प्रकारच्या लैंगिक छळ, गुड टच-बॅड टच, चुकीचा स्पर्श, छेळछाडीचे घटना, टॉटींग-रॅंगिंग, डूग्स ईत्यादिचे व्यसनाधिनता, सायबर पाठलाग, सायबर गुन्हे आणि सर्व प्रकारच्या लैगिंक व शारिरीक हिंसाचार इत्यादी विविध धोक्यांचा सामना करावा लागत असल्याच्या अनेक उदाहरणे समोर येवु लागली आहेत. 

अशा समस्यांचे वेळी वेळीच योज्य प्रकारची मदत न केल्यास विद्यार्थ्याच्या भविष्यासाठी कायमचे नुकसान होवु शकते. अशा नुकसानी टाळण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या “पोलीस काका-पोलीस दीदी'* अशा परिस्थीतीत त्यांना वेळीच आवश्यक ती मदत देत आहात. ज्यामुळे पोलीस-विद्यार्थी परस्पर विश्वास आणि विश्‍वासावर आधारित संबंध निर्माण होत आहेत. पोलीसांच्या वेळेवेर मदतीची उदाहरणे इतर विद्यार्थ्यांना मदतीसाठी पुढे येण्यास प्रोत्साहित करीत असुन “"पोलीस काका-पोलीस दीदी" हे विद्यार्थ्यचे संरक्षक, मित्र आणि मार्गदर्शक म्हणुन काम करीत आहे. 

मा. पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंह परदेशी यांनी नागरीकांना पुनश्च: जागरुकतपर माहिती  देत आहे की, चंद्रपूर जिल्हयातील प्रत्येक शाळा/कॉलेज/मुलींचे वस्तीगृह ई ठिकाणी प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावरील पोलीस अंमलदार ““पोलीस काका-पोलीस दीदी” हे भेटी देवुन शालेय मुलींना गुड टच-बॅड टच, चुकीचा स्पर्श, सायबर गुन्हे, महिला व बाल सुरक्षा विषयक माहिती व मार्गदर्शन करुन त्यांना त्यांचे संपर्क कमांक तसेच चंद्रपूर जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाचे ११२ कमांकाबाबत माहिती देवुन संकटाचे वेळी पोलीस मदती करीता त्यांचेशी संपर्क करण्याबाबत कळविण्यात येत आहे. पोलीस काका-पोलीस दीदी?' या योजनाचे समन्वयक अधिकारी म्हणुन पोलीस निरीक्षक श्रीमती लता वाढीवे हे काम पाहत आहे.

दिनांक २८/१२/२०२२ रोजी पासुन पुनश्च: जिल्हयातील विविध पो.स्टे.हद्दीतील शाळांना नव्याने नेमणुक करण्यात आलेले “पोलीस काका-पोलीस दीदी” यांनी अनेक शाळांमध्ये भेट देवुन मुलांच्या गाठीभेटी घेवुन त्यांचेशी संवाद साधत आपले मोबाईल कमांक दिले असुन यापुढे सदर उपकम नियमित राबविण्यात येणार आहे.

बुधवार, डिसेंबर २८, २०२२

 जिल्हा क्रीडा संकुल फी आकारणीबाबत आक्षेप व सूचना 10 जानेवारी पर्यंत आमंत्रित

जिल्हा क्रीडा संकुल फी आकारणीबाबत आक्षेप व सूचना 10 जानेवारी पर्यंत आमंत्रित

 जिल्हा क्रीडा संकुल फी आकारणीबाबत आक्षेप व सूचना

चंद्रपूर:

सिंथेटिक ट्रॅक फुटबॉल ग्राउंड वापराची नियमावली प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये आकारण्यात आलेल्या फी बाबत किंवा नियमावलीतील नियमाबाबत काही हरकती आक्षेप व सूचना असल्यास खेळाडू, नागरिक, क्रीडाप्रेमी यांनी लेखी स्वरूपात दिनांक 10 जानेवारी 2023 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे द्याव्यात. आलेल्या सूचना जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत ठेवून निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत कोणतीही फी तूर्त आकारण्यात येणार नाही, असे जिल्हा क्रीडा अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा क्रीडा संकुल समिती यांनी कळविले आहे. jilha krida sankul


दोन दिवसाअगोदरच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुलातील 400 मीटर सिंथेटिक ट्रॅक, फुटबॉल ग्राउंड, चेंजिग रुम व इतर क्रीडा सुविधांच्या 12 कोटी कामांचे लोकार्पण तसेच ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी वॉकिंग ट्रॅकच्या 51 लक्ष रुपये कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. 

मंगळवार, डिसेंबर २७, २०२२

चंद्रपूर मंडळाच्या अधीक्षक अभियंता यांचा मा.जिल्हाधिकारी यांचे हस्ते सत्कार

चंद्रपूर मंडळाच्या अधीक्षक अभियंता यांचा मा.जिल्हाधिकारी यांचे हस्ते सत्कार


चंद्रपूर: chandrapur,MSEB,
दि.७ डिसेंबर रोजी, सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण केल्यामुळे मा. जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा यांनी महावितरण चंद्रपूर कार्यालयाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती संध्या चिवंडे यांना प्रशस्तीपत्र व स्मरणचिन्ह प्रदान करून गौरवान्वित केले.याप्रसंगी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. रवींद्रसिंह परदेशी,चंद्रपूर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विवेक जॉन्सन व महानगरपालिका आयुक्त श्री. विपीन पालिवाल हे उपस्थित होते.
चंद्रपूर परिमंडळ, चंद्रपूर मंडळ व त्यांतर्गत तिन्ही विभागाच्या वतीने अधीक्षक अभियंता यांनी हा सन्मान स्वीकारला व कृतज्ञता व्यक्त केली.परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. सुनिल देशपांडे यांनी सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

सोमवार, डिसेंबर २६, २०२२

चंद्रपुरातील या भिंतीवरील चित्र नक्की बघा! | Chandrapur Wall!

चंद्रपुरातील या भिंतीवरील चित्र नक्की बघा! | Chandrapur Wall!


चंद्रपूर २६ डिसेंबर - सतत नवीन उमेद, नवीन प्रयोग, नवीन स्पर्धा, काही नवीन करायची इच्छा असणाऱ्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या अथक प्रयत्नांनी  " भव्य राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सव " (Bhavya Rajyastariy bhintichitra mahotsav) केवळ यशस्वीच झाला नाही तर आयोजन करणारे आयोजक असेच असावे अशी इच्छा स्पर्धकांनी व्यक्त केली.




   चंद्रपूर महानगरपालिका आयोजित राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सव २३ ते २६ डिसेंबर या काळात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद,नाशिक,अहमदनगर,अमरावती,वर्धा इत्यादी विविध शहरातील स्पर्धक यात सहभागी झाले होते. दिव्यांग स्पर्धकांचा उत्साह यात प्रकर्षानं पाहावयास मिळाला.चंद्रपूर शहर सुशोभीकरण व सौंदर्यीकरण या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित भिंतीचित्र पेंटींग,वृक्ष पेंटींग, क्रीएटीव्ह पेंटींग या ३ स्पर्धा घेण्यात आल्या. 
      

      शहरातील मुख्य दर्शनी भागातील भिंतींवर स्वातंत्र्य संग्रामातील शिलेदार, पर्यावरण संरक्षण, स्वच्छतापर संदेश, प्लास्टीक बंदी चंद्रपूरचे ऐतिहासिक वैभव, रेन वॉटर हार्वेस्टींग अशा विविध १४ विषयाचे चित्रण  जे चित्रकारांनी केले त्याचे कौतुक नागरिकांद्वारे केले जाते आहे.संताजी सभागृहात सर्व कलाकरांची निवासाची व्यवस्था करण्यात आली होती.

    कलाकार कलेसाठी समर्पित असतात, त्यामुळे ते सकाळी ६ वाजेपासुनच कामाला सुरवात करतात तेव्हा त्यांना लवकर चहा,पाणी, नाश्ता,जेवण यांची सोय करण्यास आयुक्तांनी जबाबदारी वाटून दिली होती. स्पर्धा मोठ्या प्रमाणात असल्याने मनपाचे सर्वच अधिकारी किंवा कर्मचारी व्यवस्थेत होते. सर्व कलाकारांच्या कलेची ड्रोन द्वारे चित्रीकरण करण्यात आले. स्पर्धेत भाग घेणारे सर्वच कलाकार हे पारंगत होते. केवळ भिंतीच नाहीत तर वृक्षांवर सुद्धा कलात्मक व सामाजीक संदेश देण्यात आले आहेत.

      भिंतीचित्र पेंटींग स्पर्धेत चित्रकारांसाठी वैयक्तीक गट व समुह गट असल्याने  समुह गटात प्रथम बक्षीस १ लक्ष ५१ हजार रुपये असुन द्वितीय १ लक्ष तर तृतीय बक्षीस ५१ हजार रुपये दिले जाणार आहे. तर वैयक्तीक गटातील स्पर्धकास प्रथम बक्षीस ७१ हजार रुपये असुन द्वितीय ५१ हजार तृतीय बक्षीस ३१ हजार रुपये तसेच प्रत्येकी १० प्रोत्साहनपर बक्षिसे सुद्धा दिली जाणार आहेत.


      त्याचप्रमाणे वृक्ष पेंटींग स्पर्धेत नेमून दिलेल्या झाडांचे सौंदर्यीकरण करणे अपेक्षित आहे. यात अनुक्रमे २१ हजार,१५ हजार, ११ हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. क्रीएटीव्ह पेंटींग स्पर्धेत अनुक्रमे २१ हजार,१५ हजार, ११ हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. लवकरच मनपाद्वारे बक्षीस वाटपाचा कार्यक्रम घोषीत करून स्पर्धकांना कळविले जाणार आहे.  
     स्पर्धेचे आयोजन आयुक्त विपीन पालीवाल यांच्या नियंत्रणात उपायुक्त अशोक गराटे, सहायक आयुक्त विद्या पाटील,नरेंद्र बोभाटे, सचिन माकोडे,राहुल पंचबुद्धे,विधी अधिकारी अनिल घुले,डॉ.अमोल शेळके,नागेश नित, विकास दानव,गिरीराज प्रसाद,साक्षी कार्लेकर तसेच इतर सर्व विभागांनी केले.         

Check out this picture on the wall in Chandrapur!

शुक्रवार, डिसेंबर २३, २०२२

गडचांदुर पोलीसांची अवैध गोवंश तस्करांवर कारवाई  Gadchandur police

गडचांदुर पोलीसांची अवैध गोवंश तस्करांवर कारवाई Gadchandur police



दिनांक २२/१२/२०२२ रोजी रात्रौ अवैधपणे गोवंश जनावरांची वाहतुक करणारी दोन वाहने गडचांदुर कडे येत असल्याची गोपनीय माहीती गडचांदुर पोलीसांना प्राप्त झाली त्यानुसार गडचांदुर पोलीसांनी बैलमपुर रोडवर नाकाबंदी करून एक आयशर टेम्पो क एम. एच. २७ बी. एक्स. ५८३८ या मध्ये ०७ गोवंश बैल व बोलेरो पिकअप क एम. एच. ३४ बी. जी. ९७२६ मध्ये ४ गोवंश बैल पकडुन एकुण १६,१०,०००/- रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला व गुन्हा नोंद करून ०३ आरोपी १) प्रकाश रामकृष्ण हिवरे, वय ४८ वर्ष, रा. चारगाव बुद्रुक ता. वरोरा, जि. चंद्रपूर २) रमेश महादेव गजभिये, वय ५४ वर्ष, रा.चारगाव बुद्रुक ता. वरोरा जि. चंद्रपूर ३) इरफान गुफरान खान, वय ३२ वर्षे, रा. वार्ड क्र ०४,गडचांदुर ता. कोरपना जि. चंद्रपुर यांना अटक करण्यात आली आहे.




आरोपी ताब्यात घेतलेली जनावरे तेलंगाना राज्यात घेवुन जात होते. सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक साो. रविद्रसिंह परदेशी, मा.अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यजित आमले, सहा. पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे, सहा पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ नागलोत., पो. हवा. प्रशांत येंडे, पो.शि. महेश चव्हाण, मुंडकर, पो.शि. व्यंकटेश भटलाडे यांनी केली.




Gadchandur police action against illegal cattle traffickers

On 22/12/2022, the Gadchandur police received confidential information that two vehicles illegally transporting cattle were coming to Gadchandur at night. H. 27 b. X. 5838 out of which 07 cow bullocks and Bolero pick-up Km. H. 34 b. G. In 9726, 4 cattle bulls were caught and the goods worth Rs.16,10,000/- were seized and a case was registered against 03 accused 1) Prakash Ramakrishna Hivre, aged 48 years, Res. Chargaon Budruk T. Varora, Dist. Chandrapur 2) Ramesh Mahadev Gajbhiye, aged 54 years, Res.Chargaon Budruk Varora Dist. Chandrapur 3) Irfan Gufran Khan, Age 32 Years, Res. Ward No. 04, Gadchandur T. Korpana Dist. Chandrapur has been arrested. The animals seized by the accused were being taken to the state of Telangana. The said action Hon. Superintendent of Police Ravidrasinh Pardeshi, Hon. Additional Superintendent of Police Rina Janbandhu, Hon. Under the guidance of Deputy Divisional Police Officer Sushil Kumar Nayak, Police Inspector Satyajit Amle, six. Police Inspector Pramod Shinde, Six Police Inspector Gorakshanath Naglot., P.O. the air Prashant Yende, P.S. Mahesh Chavan, Mundkar, P.S. By Venkatesh Bhatlade.

शनिवार, डिसेंबर १०, २०२२

फोटो स्टुडिओ व अन्य दोन दुकानात चोरी Theft at a photo studio and two other shops

फोटो स्टुडिओ व अन्य दोन दुकानात चोरी Theft at a photo studio and two other shops

फोटो स्टुडिओ व अन्य दोन दुकानात चोरी
चोरट्याने केली 43 हजार ची रोकड लंपास




वरोरा/प्रतिनिधी
वरोरा : कल्पना कॉम्प्लेक्स सरदार पटेल वॉर्ड येथील शिरीष उगे यांचे महाराष्ट्र फोटो स्टुडिओ, विनोद चंदनखेडे यांचे स्कुल युनिफ्रॉम व नंदिनी ब्युटी पोर्लर आहे. हे तीन दुकाने काल दि 10 ला रात्रौला 1 वाजता दरम्यान अज्ञात व्यक्तीने या एकाच कॉम्प्लेक्स मधील तीन दुकाने फोडले या घटनेची माहिती शिरीष उगे यांनी सकाळी पोलीस ठाण्यात दिली.


तात्काळ घटनेच्या ठिकाणी पोलीस हजर राहून चोरी झाल्याचा पंचनामा करून चोरी करताना चोराचे सी सी टीव्ही मध्ये जप्त केले आहे.  यामध्ये शिरीष उगे यांच्या फोटो स्टुडिओ मधून चार आर. डी. बुकातून ठेवलेले 15100 रु, लग्नाच्या ऍडव्हान्स मिळालेले पॉकेट मधले 16000रु, पत्नीच्या पर्स मधलेले ठेवलेले 2400रु, व काउंटर मध्ये ठेवलेले 7300 रु, जयदुर्गा युनिफ्रॉम च्या दुकाना च्या काउंटर मधून 1500 रु तर नंदिनी ब्युटी पार्लर मधून 1100 रु, असा एकूण 43400 रु चे रोकड अनोळखी चोरट्याने चोरून नेले. या दोन दिवस पाहिले लगान बार मध्ये चोरी केली होती तोच चोर सी सी फुटेज मध्ये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेचा तपास पोलीस निरिक्षक खोब्रागळे यांच्या मार्गदर्शनात ए पी आय किटे करित आहे.

शुक्रवार, डिसेंबर ०९, २०२२

नायलॉन मांजा विक्री केल्यास इतका मोठा होईल दंड | Ban Nylon Manja

नायलॉन मांजा विक्री केल्यास इतका मोठा होईल दंड | Ban Nylon Manja



चंद्रपूर शहरात नायलॉन मांजाविरुद्ध मनपा करणार कडक कारवाई

विक्री केल्यास १० हजारांचा दंड, तर साठा आढळल्यास १ लाखांच्या दंडासह फौजदारी कारवाई

चंद्रपूर Chandrapur 9 डिसेंबर : Ban Nylon Manja 
नायलॉन मांजामुळे अपघाताच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचे उत्पादन, उपयोग व विक्री आणि आयातीवर पूर्णपणे बंदी आणली आहे. त्यानुसार चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कडक कारवाई केली जाणार आहे. विक्री केल्यास १० हजारांचा दंड, तर साठा आढळल्यास १ लाखांच्या दंडासह फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले आहे.
दरवर्षी तीळ संक्रांतीच्या उत्सवाला पतंग उडविण्याची परंपरा आहे. त्यासाठी महिनाभराआधीपासूनच पतंग आणि दोरा यांची विक्री सुरु होते. राष्ट्रीय हरित लवादाने पतंगबाजी करत असताना नायलॉन धागा वापरण्यास बंदी घातली आहे. तरीही शहरात हा धागा वापरला जात असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेचे उपद्रव शोधपथक यावर कारवाई करत असुन नायलॉन मांजा बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी मनपाच्या माध्यमातून विशेष पथक स्थापन करण्यात येणार आहेत. बंदीचे उल्लंघन करणार्‍यांवर विक्री केल्यास १० हजारांचा दंड आणि साठा आढळल्यास १ लाखांच्या दंडासह फौजदारी कारवाई आणि साहित्य जप्त केले जाणार आहेत. Ban Nylon Manja

गुरुवार, डिसेंबर ०८, २०२२

 ‘आयुष्मान भारत’ कार्ड असेल तरच मिळणार पाच लाखांपर्यंत मोफत उपचार Ayushman Card Online Apply

‘आयुष्मान भारत’ कार्ड असेल तरच मिळणार पाच लाखांपर्यंत मोफत उपचार Ayushman Card Online Apply

Ø चंद्रपूर जिल्ह्यात नऊ लाख 23 हजार लाभार्थी




Ayushman Card Online Apply

चंद्रपूर, दि. 8 : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेचा अंतर्भाव करून आयुष्मान भारत योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत रुग्णांना पाच लाखांपर्यंत आरोग्य विमाच्या माध्यमातून एकूण 1209 उपचार/शस्त्रक्रिया मोफत दिले जाणार आहेतचंद्रपूर जिल्ह्यात या कार्डचा लाभ मिळू शकणा-या लाभार्थ्यांची संख्या तब्बल नऊ लाख 23 हजार आहे.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे लाभार्थी हे  2011 साली झालेल्या ‘सामाजिकआर्थिक व जातनिहाय जनगणना’ च्या आधारावर असून या यादीत नाव असणारे व्यक्ती या योजनेचे पात्र लाभार्थी आहेतआयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ घेण्याकरीता आयुष्मान कार्डची आवश्यकता आहे. हे कार्ड सी.एस.सीकेंद्र आपले सरकार केंद्र किंवा योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयामध्ये मोफत वितरीत करण्यात येत आहेत्याचप्रमाणे ही यादी गावनिहाय किंवा वार्डनिहाय https//aapkedwarayushman.pmjay.gov.in/AapkeDwar/ या लिंक वर सुध्दा नागरिकांना करीता उपलब्ध आहे.

त्याचप्रमाणेमहाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत केशरीपिवळेअंत्योदय आणि अन्नपूर्णा राशन कार्डधारक कुटुंबे पात्र लाभार्थी असून यात एकूण 996 उपचार/शस्त्रक्रियेकरिता प्रती वर्ष/प्रती कुटुंब दीड लाखांचा आरोग्य विमा पुरविण्यात येत आहेमहात्मा जनआरोग्य योजनेंतर्गत दीड लाख आणि आयुष्मान भारत योजनेंतर्गत साडेतीन लाख असे एकूण पाच लाखापर्यंतचे उपचार आरोग्य विमाच्या माध्यमातून मोफत होतातत्यामुळे उपचारापूर्वी आपले नाव आयुष्मान भारत योजनेत समाविष्ठ आहे का ? याची खात्री करणे आवश्यक आहे.

2 लक्ष 23 हजार पात्र नागरिकांना आयुष्मान कार्ड : आयुष्मान भारत योजनेत 2 लक्ष 15 हजार 920 कुटुंबांचा समावेश असून एकूण 9 लक्ष 93 हजार 232 व्यक्तींना आयुष्मान कार्ड वितरीत करायचे उद्दिष्ठ  आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात 2 लक्ष 23 हजार पात्र नागरिकांना आयुष्मान कार्ड वितरीत करण्यात आलेले आहे. त्यांना पाच लाखापर्यंतचा आरोग्य विमा मोफत मिळणार आहे.

नोंदणी कोठे करणार : जिल्हात 691 आपले सरकार केंद्र व 402 सीएससी केंद्र उपलब्ध आहेत. या केंद्रावर लाभार्थाना सामाजिक आर्थिक जातनिहाय जनगणना 2011 च्या यादीत नाव असेल तर आधारकार्ड आणि राशन कार्डच्या माध्यमातून मोफत कार्ड प्राप्त करता येते. तसेच यादीत नाव नसेल तर महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. 2011 च्या जणगणनेनुसार समाजिक, आर्थिक, जातनिहाय जिल्हातील पात्र लाभार्थी यादी आरोग्य विभागाला प्राप्त झाली आहे व ही यादी ग्रामपंचायत व शहरी विभागात वार्ड कार्यालय येथे उपलब्ध आहे.

आवश्यक कागदपत्र : आयुष्मान कार्ड काढण्याकरीता लाभार्थांजवळ आधारकार्ड  व राशनकार्ड असणे आवश्यक आहे.

कोणत्या रुग्णालयात मिळणार उपचार : या योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्हात एकूण 10 रुग्णालय अंगीकृत असून त्यापैकी पाच शासकीय व पाच खाजगी रुग्णालय आहेतयात चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, मूल, चिमूर आणि वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालय, बल्लारपूर येथील ग्रामीण रुग्णालय, मुसळे रुग्णालयमानवतकर रुग्णालयक्रिस्त रुग्णालयगाडेगोणे रुग्णालयडॉ.अजय वासाडे रुग्णालय येथे आयुष्मान कार्ड मोफत काढून देण्यात येत आहे.

चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत उपलब्ध सीएससी केंद्र : आशा कॉम्पुटर इंदिरा नगर, उमेश नक्षीने केंद्र इंदिरा नगर, उमरे सीएससी केंद्र रामनगर, श्री इंटरनेट केंद्र रामनगर, आदित्य सर्विस केंद्र बालाजी वार्ड, सचिन निंबाळकर बालाजी वार्ड, युवराज पवार केंद्र बाबूपेठ वार्ड, स्वप्नील वर्भे केंद्र बाबूपेठ वार्ड, एम.केसायबर कॅफे केंद्र बागड खिडकी, ओम प्रकाश कुमरे केंद्र तुकूम येथे सुध्दा आयुष्मान कार्डची सेवा उपलब्ध आहे.   

त्याचप्रमाणे ग्रामीण भागात ग्रामपंचायतनिहाय आपले सरकार केंद्रांत नागरिकांना सदर कार्ड काढण्यात येत आहे. यादीत नाव असलेल्या पात्र लाभार्थ्यांनी त्वरीत आयुष्मान भारत कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी केले आहे.


संबंधित शोध