४१ किलोमीटरच्या स्पर्धेत उरतले राज्यभरातील हजारो धावपटू
चंद्रपूर : वरोरा- भद्रावती मतदार संघाचा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचा ९ जानेवारीला वाढदिवस. या वाढदिवसाचे औचित्य साधून माता महाकाली बहुउद्देश्यीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने रविवारी ८ जानेवारीला सकाळी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. रत्नमाला चौक (वरोरा) ते पडोली चौक अशा या ४१ किलोमीटरच्या स्पर्धेत राज्यभरातील हजारो धावपटू सहभागी झाले होते. औरंगाबाद जवळील बेडेवाडी या गावी सुटीवर असलेल्या भारतीय जवानाने स्पर्धेत सहभाग नोंदवित एक लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकाविले.
धानोरकर दाम्पत्याची ओळख राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देणारे अशी आहे. त्यामुळे खासदार बाळूभाऊ धानोरकर असो वा आमदार प्रतिभाताई धानोरकर हे आपला वाढदिवस दरवर्षी साधेपणाने साजरा करतात. समाजातील गरजुंना मदतीचा हात देत त्यांच्या चेहऱ्यावरील हास्यात स्वतः आनंद शोधतात. यावर्षीसुद्धा ताईंचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचे ठरले. शारीरिक तंदुरुस्ती आणि सुदृढ आरोग्याचा मूलमंत्र देण्यासाठी वरोरा ते पडोली अशी ४१ किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्याचे ठरले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्पर्धेत राज्यभरातील स्पर्धक सहभागी व्हावे म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमाचा वापर केला. सोशल मीडियावरून मॅरेथॉन स्पर्धेची माहिती मिळताच राज्यभरातील धावपटूंना स्पर्धेत आपल्या नावांची नोंदच केली नाही, तर स्वयंस्फूर्तीने सहभागीसुद्धा झाले.
वरोरा येथील रत्नमाला चौक येथून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली. खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी स्पर्धेला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी काँग्रेसचे प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, इंटक नेते के. के. सिंग, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामू तिवारी, माता महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सचिन साधनकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनेश चोखारे, चंद्रपूर काँग्रेस तालुका अध्यक्ष श्याम थेरे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल शेख, माजी नगराध्यक्ष विलास टिपले, वरोरा तालुकाध्यक्ष मिलिंद भोयर, डॉ. सागर वझे, महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष रत्ना अहिरकर, वणी तालुका अध्यक्ष प्रमोद वासेकर, वरोरा विधानसभा प्रमुख मोनू चिमुरकर, घुगुस शहर काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी, बाजार समिती माजी अध्यक्ष राजू चिकटे, भद्रावती तालुका अध्यक्ष प्रशांत काळे, शहर अध्यक्ष सुरज गावंडे, पवन अगदारी, प्रमोद बोरीकर, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मगरे. सैय्यद अन्वर, रोशन दतलवार, इंटक जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती, यश दत्तात्रेय, कुणाल चहारे, शाफान शेख, पप्पू सिद्धीकी राहुल चौधरी यांची उपस्थिती होती.
प्रल्हाद रामसिंग धनावत या भारतीय जवानाने २ तास १३ मिनिट ५२ सेकंदात ४१ किलोमीटर अंतर पार करीत प्रथम क्रमांक पटकाविला. ५१ हजार रुपयाचे दुसरे पारितोषिक महेश वाढई रा. चंद्रपूर, तृतीय पारितोषिक दीपक सिरसाट रा. नाशिक, चतुर्थ पारितोषिक अजित झा.रा. ठाणे , पाचवे पारितोषिक निखील सिंह रा. मुंबई, यांनी पटकाविले. या विजेत्यांना खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
--
आरोग्याची श्रीमंती सर्वश्रेष्ठ
आरोग्यासारखी दुसरी कोणतीही श्रीमंती नाही. त्यामुळेच आरोग्य धनसंपदा म्हटले जाते. लाखो, कोट्यवधी रुपये असतील. परंतु, आरोग्यच चांगले नसेल, तर हे पैसा कोणत्या कामाचा. त्यामुळे प्रत्येकांनी आपले आरोग्य जपावे. दररोज सकाळी नियमित व्यायाम करावा. शारीरिक तंदूरुस्ती आणि सुदृढ आरोग्याचा मूलमंत्र देण्याच्या उद्देशातून मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत हजारोच्या संख्येने धावपटू सहभागी झाले. त्या सर्वांचे अभिनंदन.
-खासदार बाळूभाऊ धानोरकर