Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

chandrapur लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
chandrapur लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, सप्टेंबर ०६, २०२३

श्री साई औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपुर येथे शिक्षक दिन साजरा

श्री साई औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपुर येथे शिक्षक दिन साजरा

चंद्रपुर:
आज दि.०५/०९/२०२३ ला श्री साई औद्योगिक प्रशिक्षण संस्था,चंद्रपुर येथे भारतरत्न तसेच माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात आला.

ह्याप्रसंगीसंस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी सुध्दा संस्थेतील वरिष्ठ निदेशक श्री आशिष रायपूरकर सर (अभियांत्रिकीनिदेशक ) ह्यांना शाल,श्रीफळ आणि पुष्पपुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले तसेच इतर शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले ह्यावेळी संस्थेचे प्राचार्य श्री राजेश पेशट्टीवार ह्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात विद्यार्थ्यांना शिक्षक दिवसाचे महत्व सांगून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच सर्वांचे प्रेरणास्थान स्व.डॉ.व्ही.एम.येरगुडे साहेब ह्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल माहिती दिली. 

ह्याप्रसंगी सर्वनिदेशक-कर्मचाऱ्यांनी प्राचार्य श्री राजेश एम पेशट्टीवार ह्यांना शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ आणि भेटवस्तु देऊनसन्मानित केले. सर्वांनी प्रतिमेला पुष्पार्पण करून अभिवादन केले ह्याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा मा. श्रीमती विद्याव्ही. येरगुडे मॅम,सचिव मा.श्री.अमित व्ही येरगुडे सर तसेच उपाध्यक्ष मा.श्री.अभिषेक व्ही. येरगुडे सर ह्यांनीसर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि सरतेशेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून तसेचकर्मचाऱ्यांना चहा-बिस्कीट देऊन कार्यक्रमाची सांगता केली.

शुक्रवार, जुलै ०७, २०२३

आमदार म्हणाले शिक्षकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची गय नाही

आमदार म्हणाले शिक्षकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची गय नाही

प्रलंबित समस्‍यांविरोधात "विमाशि संघा"चे धरणे आंदोलन
चंद्रपूर : कार्यरत तथा सेवानिवृत्त शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या अनेक समस्या चंद्रपूर शिक्षण विभागात प्रलंबित आहेत. या माझ्या शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी सभागृहात व सभागृहाबाहेरही रस्त्यावर उतरून समस्या निकाली काढण्यासाठी कायम कटिबद्ध राहील. सोबतच शिक्षण विभागातील जे अधिकारी शिक्षकांच्या प्रलंबित समस्या निकाली काढत नसतील त्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा आमदार सुधाकर अडबाले यांनी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने आयोजित धरणे / निदर्शने आंदोलनात दिला.

प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या प्रलंबित समस्या निवारणार्थ २४ मेला सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत विषय सुचीतील सर्व प्रलंबित प्रकरणे १७ जूनपर्यंत निकाली काढण्यात येतील, असे मा. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी आश्वासीत केले होते. परंतू, त्यातील अनेक प्रकरणे अजूनही प्रलंबित आहेत. व त्या सभेचे इतिवृत्तही अप्राप्त आहे. या गंभीर प्रस्तावांच्या विरोधात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने संघटनेचे सरकार्यवाह आमदार सुधाकर अडबाले यांच्‍या नेतृत्वात शुक्रवारी जि.प. चंद्रपूर समोर धरणे / निदर्शने आंदोलन करण्यात आले.

ज्या शिक्षक - कर्मचाऱ्यांची प्रकरणे एक वर्ष होऊनही प्रलंबित आहेत. त्या कर्मचाऱ्यांनी सरळ लोकायुक्त यांच्याकडे तक्रार करावी. त्यांच्या पाठीशी मी उभा राहिल, असे आवाहन आमदार सुधाकर अडबाले यांनी केले. आंदोलनातील समस्यांचे निवेदन उपशिक्षणाधिकारी (माध्य.) निकिता ठाकरे यांनी आंदोलन स्थळी येऊन स्वीकारले.

या आंदोलनात म. रा. मा. शि. महामंडळाचे सहकार्यवाह जगदीश जुनगरी, कार्याध्यक्ष लक्ष्मणराव धोबे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ चंद्रपूरचे जिल्‍हाध्यक्ष केशवराव ठाकरे, जिल्‍हा कार्यवाह श्रीहरी शेंडे, विमाशिचे उपाध्यक्ष सुनील शेरकी, नामदेव ठेंगणे, गंगाधर कुनघाडकर, कोषाध्यक्ष दिगांबर कुरेकर, सहकार्यवाह अनिल कंटीवार, शालीक ढोरे, दीपक धोपटे, देवराव निब्रड, मनोज वासाडे, धनंजय राऊत, प्रा. ज्ञानेश्‍वर सोनकुसरे, सुरेंद्र अडबाले, सतीश मेश्राम, जुनी पेन्शन संघटनेचे भालचंद्र धांडे, अजय देठे, विनोद कौरासे, संजय ठावरी, प्रकाश कुंभारे, कालिदास बोबडे, मिलमिले, शकील सर, धनंजय राऊत, हेमंत किंदरणे, डॉ. विजय हेलवटे व मोठ्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व मोठ्या संख्येने शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

या धरणे आंदोलनात शिक्षक - शिक्षकेतर व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा तिसरा व चौथा थकबाकी हप्ता तात्‍काळ देण्यात यावा, सेवानिवृत्ती उपदानाची प्रलंबित प्रकरणे, ऑगस्‍ट २०२२ ला कॅम्पमध्ये सुमारे तिनशे निवडश्रेणी / वरिष्ट श्रेणी प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले. परंतू त्यापैकी शेकडो प्रस्ताव अजुनही प्रलंबित आहेत ते तात्काळ निकाली काढण्यात यावे, प्रलंबित वैद्यकीय देयके, ज्या निवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना नियमित पेंशन मंजूर झाले नाही अश्या निवृत्त शिक्षक-कर्मचाऱ्यांना प्रोव्हीजनल पेंशन दिले जाते. त्यांचे बिल काढण्यात नियमितपणा दिसून येत नाही. काही निवृत्ती वेतनधारक सहा महिणे वेतनापासून वंचित राहतात असे निदर्शनास येत आहे, 

अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या किंवा काही शिक्षक कर्मचाऱ्यांना चुकीने अधिसंख्य दाखविण्यात येवून त्यांची वेतनवाढ किंवा सेवानिवृत्ती प्रकरणे रोखलेली आहेत. त्यांना त्यांचे लाभ तात्काळ अदा करण्यात यावे, अनुकंपा तत्वावरील पदभरतीचे मान्यता प्रस्ताव तात्काळ निकाली काढण्यात यावे, विविध विषयावरील अनेक प्रस्ताव प्रलंबित असण्यामागे भ्रष्टाचार हे प्रमुख कारण आहे असे निदर्शनास येत आहे. त्याची सत्यता पडताळून दोषींवर कार्यवाही करण्यात यावी व इतर अनेक मागण्यांचा समावेश आहे.

शनिवार, मार्च १८, २०२३

मोबाईल टॉवर मनपाद्वारे सील

मोबाईल टॉवर मनपाद्वारे सील

चंद्रपूर:
 १,४१,०९५ रुपयांची थकबाकी असणाऱ्या सरकार नगर, राधिका सभागृहाजवळील व्हीजन कंपनीच्या टॉवरला मनपा कर वसुली पथकाने टाळे ठोकले आहे. मनपा कर विभागाद्वारे वारंवार सूचना देऊनही सदर मालमत्ता धारकाने कराचा भरणा न केल्याने सदर कारवाई करण्यात आली आहे.

महापालिका क्षेत्रात ८० हजाराहुन अधिक मालमत्ता असून, संपूर्ण मालमत्तांच्या माध्यमातून दरवर्षी मागणी नोंदवली जाते. करदात्यांना कराची नोटीस पाठविल्यानंतर जे मालमत्ता धारक कराचा भरणा करण्यास दिरंगाई करत आहे त्यांच्या मालमत्तांवर सील लावण्यात येत आहे. याकरीता झोननिहाय विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जास्तीत जास्त वसुली होऊन ती शहराच्या विकास कामांसाठी उपयोगी यावी या अनुषंगाने यंत्रणा जोमात कामाला लागली आहे.

काही मालमत्ता धारक हे धनादेशाद्वारे कराचा भरणा करतात, अधिकतम धनादेश हे वटले जातात, मात्र जे धनादेश वटले जाणार नाही त्यांच्यावर फौजदारी कारवाई मनपातर्फे करण्यात येणार आहे. www.cmcchandrapur.com या लिंकवर Pay Water Tax Online या टॅबवर पाणीपट्टी कराचा तर https://chandrapurmc.org या लिंकवर मालमत्ता कराचा ऑनलाईन भरणा करता येतो त्याचप्रमाणे फोन पे, गुगल पे,भीम या युपीआय ॲपवर सुद्धा मालमता व पाणी कराचा भरणा करता येत आहे. १६ ते २६ मार्च दरम्यान मालमत्ता कराच्या शास्तीत ५० टक्के सूट देण्यात येत असुन अधिकाधिक मालमत्ता धारकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

सदर कारवाई मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात व उपायुक्त अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सहायक आयुक्त विद्या पाटील,नरेंद्र बोभाटे,सचिन माकोडे, राहुल पंचबुद्धे, कर विभाग प्रमुख अनिल घुले,अग्निशमन विभाग प्रमुख चैतन्य चोरे,पथक प्रमुख नागेश नित,नरेंद्र पवार,अमित फुलझेले,चिन्मय देशपांडे,अमुल भुते,प्रगती भुरे,अतुल भसारकर,रवींद्र कळंबे,सोनू थुल,प्रतीक्षा जनबंधु,अतुल टिकले,सागर सिडाम,विकास दानव,चॅनल वाकडे, प्रविण हजारे यांनी केली.

रविवार, जानेवारी ०८, २०२३

 औरंगाबादच्या भारतीय सैनिकाने जिंकली मॅरेथॉन: धानोरकर दाम्पत्यांनी केला विजेत्यांच्या विशेष सन्मान

औरंगाबादच्या भारतीय सैनिकाने जिंकली मॅरेथॉन: धानोरकर दाम्पत्यांनी केला विजेत्यांच्या विशेष सन्मान

४१ किलोमीटरच्या स्पर्धेत उरतले राज्यभरातील हजारो धावपटू

 चंद्रपूर : वरोरा- भद्रावती मतदार संघाचा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचा ९ जानेवारीला वाढदिवस. या वाढदिवसाचे औचित्य साधून माता महाकाली बहुउद्देश्यीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने रविवारी ८ जानेवारीला सकाळी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. रत्नमाला चौक (वरोरा) ते पडोली चौक अशा या ४१ किलोमीटरच्या स्पर्धेत राज्यभरातील हजारो धावपटू सहभागी झाले होते. औरंगाबाद जवळील बेडेवाडी या गावी सुटीवर असलेल्या भारतीय जवानाने स्पर्धेत सहभाग नोंदवित एक लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकाविले.
धानोरकर दाम्पत्याची ओळख राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देणारे अशी आहे. त्यामुळे खासदार बाळूभाऊ धानोरकर असो वा आमदार प्रतिभाताई धानोरकर हे आपला वाढदिवस दरवर्षी साधेपणाने साजरा करतात. समाजातील गरजुंना मदतीचा हात देत त्यांच्या चेहऱ्यावरील हास्यात स्वतः आनंद शोधतात. यावर्षीसुद्धा ताईंचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचे ठरले. शारीरिक तंदुरुस्ती आणि सुदृढ आरोग्याचा मूलमंत्र देण्यासाठी वरोरा ते पडोली अशी ४१ किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्याचे ठरले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्पर्धेत राज्यभरातील स्पर्धक सहभागी व्हावे म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमाचा वापर केला. सोशल मीडियावरून मॅरेथॉन स्पर्धेची माहिती मिळताच राज्यभरातील धावपटूंना स्पर्धेत आपल्या नावांची नोंदच केली नाही, तर स्वयंस्फूर्तीने सहभागीसुद्धा झाले. 
वरोरा येथील रत्नमाला चौक येथून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली. खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी स्पर्धेला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी काँग्रेसचे प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, इंटक नेते के. के. सिंग, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामू तिवारी, माता महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सचिन साधनकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनेश चोखारे, चंद्रपूर काँग्रेस तालुका अध्यक्ष श्याम थेरे,  अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल शेख, माजी नगराध्यक्ष विलास टिपले, वरोरा तालुकाध्यक्ष मिलिंद भोयर, डॉ. सागर वझे, महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष रत्ना अहिरकर, वणी तालुका अध्यक्ष प्रमोद वासेकर, वरोरा विधानसभा प्रमुख मोनू चिमुरकर, घुगुस शहर काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी,  बाजार समिती माजी अध्यक्ष राजू चिकटे, भद्रावती तालुका अध्यक्ष प्रशांत काळे, शहर अध्यक्ष सुरज गावंडे, पवन अगदारी, प्रमोद बोरीकर, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मगरे. सैय्यद अन्वर, रोशन दतलवार, इंटक जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती, यश दत्तात्रेय, कुणाल चहारे, शाफान शेख, पप्पू सिद्धीकी राहुल चौधरी यांची उपस्थिती होती.
प्रल्हाद रामसिंग धनावत या भारतीय जवानाने २ तास १३ मिनिट ५२ सेकंदात ४१ किलोमीटर अंतर पार करीत प्रथम क्रमांक पटकाविला. ५१ हजार रुपयाचे दुसरे पारितोषिक महेश वाढई रा. चंद्रपूर, तृतीय पारितोषिक दीपक सिरसाट रा. नाशिक, चतुर्थ पारितोषिक अजित झा.रा. ठाणे , पाचवे पारितोषिक निखील सिंह रा. मुंबई, यांनी पटकाविले. या विजेत्यांना खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते  सन्मानित करण्यात आले. 
--

आरोग्याची श्रीमंती सर्वश्रेष्ठ
आरोग्यासारखी दुसरी कोणतीही श्रीमंती नाही. त्यामुळेच आरोग्य धनसंपदा म्हटले जाते. लाखो, कोट्यवधी रुपये असतील. परंतु, आरोग्यच चांगले नसेल, तर हे पैसा कोणत्या कामाचा. त्यामुळे प्रत्येकांनी आपले आरोग्य जपावे. दररोज सकाळी नियमित व्यायाम करावा. शारीरिक तंदूरुस्ती आणि सुदृढ आरोग्याचा मूलमंत्र देण्याच्या उद्देशातून मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत हजारोच्या संख्येने धावपटू सहभागी झाले. त्या सर्वांचे अभिनंदन.
-खासदार बाळूभाऊ धानोरकर
  एक करोड 2 लाख रुपये खर्च करून बांधलेली बाबूपेठ येथील विद्युत शवदाहीनी धुळखात:राजु कुडे

एक करोड 2 लाख रुपये खर्च करून बांधलेली बाबूपेठ येथील विद्युत शवदाहीनी धुळखात:राजु कुडे

उद्घाटनाच्या अगोदरच विद्युत चिमनी ला लागले जंग
स्मशानभुमी बनली कच-याच माहेरघर
चंद्रपूर - बाबूपेठ परीसरात असलेली एकमेव स्मशानभूमी जिथे बंगाली कॅम्प, अष्टभुजा, महाकाली कॉलरी, लालपेठ, आणि संपूर्ण बाबुपेठ परिसरातील जनता शवदहन करण्याकरिता या स्मशानभुमी मध्ये आणतात. अनेक वर्षापासून असलेल्या या स्मशानभूमी कडे मनपा प्रशासनाचे लक्ष न गेल्यामुळे येथे अनेक समस्या उद्भवत आहेत. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथे रोज अनेक शव दहन केले जाते. परंतु एकच शव दाहिनी असल्यामुळे जनतेला याचा त्रास सहन करावा लागतो आहे. त्याकरिता चार शव दाहीनी ची तिथे व्यवस्था करावी. सोबतच येथील जागेवर स्थानिक लोकांकडून अतिक्रमण होत आहे. तिथे संपूर्ण परिसराला वॉल कंपाऊंड करण्यात यावे. जंगलातून आलेला पाण्याचा झरा हा स्मशानभूमी मधून जात असून तो 12 महिने वाहत असतो तिथे आंघोळीकरीता ओटा, करून देण्यात यावा. आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे अशी मागणी आम आदमी पार्टी चे शहर सचिव तथा मनपा सह प्रभारी राजु कुडे यांनी आयुक्तांकडे केली आहे.


गरज नसताना मनपा कडून खनीज निधीतून 1कोटी खर्च करून LPG शव दांहीनी स्मशान भूमी मध्ये बसवली गेली. ज्या मध्ये मागील दीड वर्षात एक ही शव दहन झाले नाही. ही तर जनतेचा पैशाची उधळपट्टी असून यात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी आम आदमी पार्टी चंद्रपूर तर्फे करण्यात आली आहे. स्मशानभूमी संदर्भातील मागण्या पूर्ण करण्याकरीता 7 दिवसांत महत्त्वाचे पाऊले उचलली गेली नाही तर जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरू असे आवाहन आम आदमी पार्टीचे शहर सचिव राजू भाऊ कुडे यांनी दिले. या वेळेला जिल्हाध्यक्ष सुनिल देवराव मुसळे शहर युवा अध्यक्ष संतोष बोपचे, झोन अध्यक्ष रहमान खान पठाण, प्रभाग अध्यक्ष अनुप तेलतुंबडे, कृष्णा सहारे, महेश ननावरे, भीमराज बगेसर, मुकुंद गटलेवार तसेच इतर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.