Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

mumbai लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
mumbai लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, डिसेंबर १०, २०२२

remain open for processing passport applications on next three Saturdays

remain open for processing passport applications on next three Saturdays

 

All offices under Regional Passport Office Mumbai to remain open for processing passport applications on next three Saturdays

Posted On: 09 DEC 2022 5:30PM by PIB Mumbai

Mumbai: 9 December 2022

 

As a part Ministry of External Affairs' initiative to make passport appointments available to citizens at an early date, all offices under Regional Passport Office Mumbai will remain open for processing passport applications on next three Saturdays i.e. December 10, 17, and 24, 2022 during 0900 hrs to 1730 hrs.

The appointments for December 10. 2022 are available online. Appointments for December 17, and December 22, 2022 shall be available on December 14, and December 21, 2022 respectively.

New appointments can be booked by filling the form online at https://www.passportindia.gov.in and making the payment online. The applicant should thereafter log in again to the https://www.passportindia.gov.in website to verify the payment and schedule the appointment. The appointment confirmation can be seen in the portal.

Applicants with passport appointments at a later date, or those have missed their earlier appointments can also reschedule their appointments for above mentioned Saturdays. Such applicants will be allowed to reschedule their appointment only once.

 



बुधवार, डिसेंबर ०७, २०२२

 चिथावणी देणे बंद करा, अन्यथा संयम सुटेल

चिथावणी देणे बंद करा, अन्यथा संयम सुटेल


भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

 

खा. संजय राऊत यांनी तुरुंगात शिकलेली षंढनामर्द अशी भाषा वापरून चिथावणी देणे आणि आव्हान देणे बंद केले पाहिजेअन्यथा संयम सुटेल आणि भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरेलअसा खणखणीत इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना दिला.

 ते म्हणाले कीसंजय राऊत यांनी आव्हान देऊ नयेराज्याचे राजकीय वातावरण खराब करू नये आणि सामाजिक वातावरण बिघडवू नयेअन्यथा लोकांचा संयम सुटेल. यातून उद्या उद्रेक झाला तर थांबविता येणार नाही. कोणत्याही नेत्याचा व्यक्तिगत अपमान होईलअसे संजय राऊत यांनी बोलू नये. मर्दानगी काढणेनालायक म्हणणे हे महाराष्ट्र सहन करणार नाही. राऊत यांनी चिथावणी देणे बंद करावे. नाही तर त्यांच्या बोलण्याचा उलटा परिणाम होईल.

 महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यावर न्यायालयातच तोडगा निघेल. न्यायालयाने लवकरात लवकर सुनावणी करून या प्रकरणी निर्णय द्यावा यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेतअसे आपले आवाहन आहेअसे मा. बावनकुळे यांनी सांगितले.


 ते म्हणाले कीया प्रश्नी सर्वोच्च न्यायालयातच तोडगा निघेल हे माहिती असूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण स्वतः सीमाभागात जाणार असल्याचे जाहीर करणे शोभत नाही. त्यांना सीमाभागात जायचे होते तर ते आधी का गेले नाहीतअसा प्रश्न निर्माण होतो.  #BJp #SanjayRaut


 जी २० संबंधी बैठकीस निमंत्रण असूनही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गैरहजर राहिले. त्यांनी महाराष्ट्राच्या हितापेक्षा अधिक महत्त्व स्वतःच्या राजकारणाला दिले व महाराष्ट्राचा अपमान केलाअसेही त्यांनी सांगितले.  #BJp #SanjayRaut

रविवार, ऑक्टोबर २३, २०२२

 KBC च्या सेटवर अपघात; अमिताभ बच्चन यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले

KBC च्या सेटवर अपघात; अमिताभ बच्चन यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले

#AmitabhBachchan Hospitalised Again! Bollywood Superstar Reveals He Was Rushed to Hospital After He Cut A Vein on His Left Calf

रविवारी KBC च्या पुढच्या एपिसोडचे शूटिंग करत असताना त्यांचा अपघात झाला. अमिताभ यांचा पाय कापला गेला. अभिनेत्याच्या पायाच्या मागची नस कापली गेली. त्यामुळे खूप रक्तस्त्राव झाला होता. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी डॉक्टरांना त्यांच्या पायाला टाके घालावे लागले. डॉक्टरांनी त्यांना सध्या विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

#KBC #AmitabhBachchan #Accident #KBC14

अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले की, "धातुच्या धारदार तुकड्याने डावा पाय कापला आणि नस कापली गेली. नस कापली की रक्त अनियंत्रित होते. मात्र कर्मचारी आणि डॉक्टरांच्या टीमने वेळीच केलेल्या मदतीमुळे तो आटोक्यात आला असून पायाला टाके पडले आहेत. 

#KBC #AmitabhBachchan #Accident #KBC14

अमिताभ यांच्या पायाची नस कापण्यात आली, त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. अमिताभ यांनी ब्लॉगवर अपघाताची माहिती शेअर केली आणि सांगितले की रक्त थांबवण्यासाठी काही टाके देखील लावले आहेत. ही बातमी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बातमी समोर आल्यापासून अमिताभ यांचे चाहतेही चिंतेत आहेत. अमिताभ लवकर ठीक व्हावेत अशी प्रार्थना करत आहेत.

#KBC #AmitabhBachchan #Accident #KBC14  @SrBachchan

गुरुवार, ऑक्टोबर १३, २०२२

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

मतदार यादीत नाव नसल्यास कोल्हापुरात जाउनच हरकत घ्या -निवडणूक अधिकाऱ्याचा अजब फतवा
                                       
कोल्हापूर, मुंबई व पुण्यात मतदान केंद्रे; मतदार याद्यांवर हरकती  दुरुस्ती व निर्णय  मात्र कोल्हापुरातच ...                                                                                       
                        

     पुणे- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक ५ फेब्रुवारी २०२३ ला व मतमोजणी ८ फेब्रुवारीला होणार आहे.धर्मादाय उपायुक्त कार्यालयाचे निरीक्षक तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी आसिफ शेख यांनी मंगळवारी हा निवडणूक कार्यक्रम निश्चित केला आहे. ही निवडणूक जुन्या मतदार यादीनुसार होणार असून फक्त कोल्हापूर, मुंबई व पुणे या तीन ठिकाणीच मतदान केंद्रे आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया १० जानेवारीपासून सुरू होत आहे.मतदार यादीत नाव नसल्यास अगर चुकीचे नाव असल्यास संबधित मतदार नागपूरचा असो , मुबई पुण्याचा असो वा महाराष्ट्रातील कुठल्याही गावातील असो त्यास कोल्हापूर येथे दुपारी ११ ते ३ या वेळेत जाउनच याबात हरकत घेऊन दुरुस्तीची सूचना करावी लागणार असल्याचे या कार्यक्रमात नमूद केले असल्याने याबाबत पुण्यातील सलाम पुणे चे अध्यक्ष शरद लोणकर यांनी संताप व्यक्त केला आहे . मुंबई , पुणे वा नागपूर अशा ठिकाणांहून लोकांनी आपापले नाव मतदार यादीत नसल्यास कोल्हापूरला जाऊन हरकत घ्यायची हा सभासदांना नाहक त्रास दिला जाणार आहे , निवडणूक अधिकारी यांना याबाबत विनंती करण्यात येईल असे ते म्हणालेत . मतदार यादी तपासणे आणि त्यावर हरकती घे दुरुस्ती सुचविणे आणि निर्णय घेणे या तिन्ही गोष्टी कोल्हापूर सह मुंबई ,पुणे कार्यालयात देखील व्हायला हव्यात असे ते म्हणाले. सध्या जाहीर केलेल्या कार्यक्रमात हरकती दुरुस्ती आणि त्याबाबतच्या निर्णयाच्या  ठिकाणांचा पुनर्विचार करावा व त्यात बदल करावा असे त्यांनी म्हटले आहे. चित्रपट महामंडळातील अंतर्गत राजकारणामुळे अध्यक्ष मेघराज भोसले व अन्य कार्यकारिणी असे तीन गट पडले आहेत. मागील महिन्यात भोसले यांनी आपल्या अधिकारात निवडणूक जाहीर केल्यानंतर दोन दिवसांनी उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनीही निवडणूक जाहीर केली. एकाच संस्थेची दोनवेळा निवडणूक हा प्रकारच धर्मादायच्या कायद्यात बसत नसल्याने धर्मादाय उपायुक्त कार्यालयाने दोन्ही निवडणुका बेकायदेशीर ठरवल्या.
निवडणूक जाहीर करण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती केली.मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून आसिफ शेख काम पाहत आहेत. त्यांना निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यास मुदत दिली होती परंतु ती मुदत न पाळता ,पुन्हा १५ दिवसांची वाढीव मुदत त्यांनी घेतली त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस कामकाजाच्या विषयासह त्या सभेच्या ठरलेल्या दिवसापूर्वी किमान १५ दिवस आधी प्रसिद्ध झाली पाहिजे या नियमानुसार प्रसिद्ध केली. इतर कोणतीही सूचना किंवा नोटीस सभासदांना देता येणार नाही, अशी सक्त सूचना केली आहे. महामंडळाची नवी घटना अजून मंजूर नसल्याने ही निवडणूक जुन्या मतदार यादीनुसार होणार असून त्यात सभासद संख्या १८ हजार आहे.                           निवडणूक कार्यक्रम असा                                                          सभासदांची वैध यादी करणे -१५ नोव्हेबर ते १५ डिसेम्बर (कोल्हापूर कार्यालयात च )सभासदांची वैध कच्ची यादी प्रसिद्ध करणे -१९ डिसेम्बर ते २० डिसेम्बर (तिन्ही कार्यालयात मुंबई -पुणे आणि कोल्हापूर )या मतदार यादीवर हरकती- दुरुस्ती स्वीकारणे २१ डिसेम्बर ते ४ जानेवारी रोज ११ ते ३ या वेळेत फक्त कोल्हापूर कार्यालयातच .हरकती व दुरुस्तीवर निर्णय घेणे ५ जाणे वारी ते ६ जानेवारी फक्त कोल्हापूर कार्यालयातच .अंतिम मतदार यादी प्रसिद्धी : ९ जानेवारी २०२३ (तिन्ही कार्यालयात मुंबई -पुणे आणि कोल्हापूर )उमेदवारी अर्ज देणेव स्वीकारणे : १० ते १६ जानेवारी(तिन्ही कार्यालयात मुंबई -पुणे आणि कोल्हापूर )छाननी -१७ जानेवारी (कोल्हापूर कार्यालयातच )माघार : १८ ते २० जानेवारी(कोल्हापूर कार्यालयातच )मतदान : ५ फेब्रुवारी(तिन्ही ठिकाणी मुंबई -पुणे आणि कोल्हापूर )मतमोजणी : ८ फेब्रुवारी (कोल्हापुरात )निकाल -कोल्हापुरात

शनिवार, ऑक्टोबर ०८, २०२२

Election symbol of ShivSena Dhanushyaban |  शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं

Election symbol of ShivSena Dhanushyaban | शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं


शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही

शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही



नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय द्यायचे आहे



शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबात अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. मात्र, निवडणुक आयोग धनुष्यबाण चिन्ह गोठविले आहे. धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्यास उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना केंद्रीय निवडणूक आयोगाची मनाई करण्यात आली आहे. फक्त शिवसेना इतकंच नाव वापरण्यासही आयोगाची मनाई आहे. .शिवसेना-ठाकरे गट, शिवसेना-शिंदे गट अशी नावे स्वतंत्र निवडणूक चिन्हांसह वापरता येणार आहेत. 

शिवसेना-शिंदे गटानं कागदपत्र सादर केल्यानंतर दिल्लीत निवडणुक आयोगाची बैठक झाली. निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वात ही बैठक झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाची ही बैठक तब्बल 4 तासानंतर संपली. शिवसेना आणि शिंदे गटाकडून प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने ही महत्वाची बैठक घेतली.

शिवसेनेला पुरावा सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार शिवसेनेने कागदपत्रांचा 700 पानांच गठ्ठा निवडणूक आयोगाकडे सादर केला होता. निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्हावर त्वरित सुनावणी घेऊ नये अशी शिवसेनेची मागणी होती. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीसाठी 3 नोव्हेंबरला मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.


A very important update has come out regarding Shiv Sena's symbol. Uddhav Thackeray and Chief Minister Eknath Shinde's faction is fighting to get the bow and arrow symbol of Shiv Sena. However, the Election Commission has frozen the bow symbol. Uddhav Thackeray and Eknath Shinde have been banned by the Central Election Commission from using the bow symbol. The Commission is also prohibited from using the same name as Shiv Sena. .


Names like Shiv Sena-Thackeray group, Shiv Sena-Shinde group can be used with separate election symbols.


Election Commission meeting was held in Delhi after Shiv Sena-Shinde group submitted the document. The meeting was held under the leadership of Election Commissioner Rajeev Kumar. The meeting of the Central Election Commission ended after almost 4 hours. The Central Election Commission held this important meeting after submission of affidavit by Shiv Sena and Shinde group.


Shiv Sena was ordered by Election Commission to submit evidence. Accordingly, Shiv Sena had submitted only 700 pages of documents to the Election Commission. The Shiv Sena demanded that the Election Commission should not hold an immediate hearing on the bow and arrow symbol. Voting for the Andheri East Assembly by-election will be held on November 3 and counting of votes will be held on November 6.


बुधवार, ऑक्टोबर ०५, २०२२

Maharashtra Governor greets people on Vijayadashmi |  विजयादशमी निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

Maharashtra Governor greets people on Vijayadashmi | विजयादशमी निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

 विजयादशमी निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

 

            मुंबई, दि. 4 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विजयादशमीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

            विजयादशमीचा सण दुष्प्रवृत्ती वरील सतप्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक आहे. सत्याचा नेहमीच विजय होतोहा संदेश या सणाच्या माध्यमातून अधोरेखित होतो.

            यंदाची विजयादशमी सर्वांच्या जीवनात आनंदसुखआरोग्य व भरभराट घेऊन येवो या अपेक्षेसह सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा  देतोअसे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

 

००००

 

 

      The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari has greeted the people on the auspicious occasion of Vijayadashmi. In his message, the Governor has said:

 

      “The festival of Vijaya Dashmi or Dussehra symbolizes the victory of the good over the forces of evil. The festival underlines the message that Truth will always prevail.  May the festival bring peace, prosperity, good health and happiness to all.  I extend my heartiest greetings to the people on the joyous occasion of Vijaya Dashmi.”

००००

गुरुवार, जून १७, २०२१

गीर गाय जातीचे वळू ब्राझील मधून आयात करणार - पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार

गीर गाय जातीचे वळू ब्राझील मधून आयात करणार - पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार

 गीर गाय जातीचे वळू ब्राझील मधून आयात करणार - पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार



            मुंबई, दि. 17 : राज्यामध्ये महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ नागपूर यांच्यामार्फत राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ यांच्या सहकार्याने ब्राझील मधून शुद्ध गीर वंशाचे 10 वळू  जागतिक निविदा काढून खरेदी करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.


            पशुसंवर्धन मंत्री श्री.केदार म्हणाले, प्रसिद्ध करावयाच्या निविदाचे सर्व अत्यावश्यक प्रारुप राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ नागपूर यांना उपलब्ध करून दिलेले आहे. यामध्ये ब्राझील मधून या वळूंची आयात करण्यापूर्वी केंद्र शासनाच्या सर्व आवश्यक निकषाप्रमाणे सर्व रोगमुक्त असल्याबाबतच्या, तपासण्या वंशावळीची खातरजमा (डीएनए तपासणीद्वारे) करुन खरेदी करण्यात येणार आहे. वेळूच्या मातेचे दूध 10 हजार किलो प्रति वेत पेक्षा जास्त आहे असे गीर वळू आयात करण्यात येणार आहेत.


            गीर वळू पासून वीर्य रेतमात्रा तयार करून त्याद्वारे राज्यात शुद्ध गीर प्रजातीचे पैदासीव्दारे शेतक-यांचे व पर्यायाने राज्याचे दूध उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे.


            डिसेंबर 2021 पुर्वी  सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून कृतीबंध आराखडा तयार करुन वळूंची आयात करून प्रक्षेत्रवर करण्यात यावेत अशा सूचना श्री केदार यांनी यावेळी दिल्या.


            या बैठकीत विदर्भातील नाविन्यपूर्ण व विशेष घटक शेळी गट वाटपाबाबत चर्चा करण्यात आली. सानेन शेळी आयात करणेसंदर्भात एजन्सीकडून माहिती घेण्यात आली.नागपूर येथील मदर डेअरीमार्फत कार्यरत दूध प्रक्रिया व  दूध भुकटी प्रकल्पाबाबत चर्चा करण्यात आली. विदर्भ आणि मराठवाड्यात दूध भुकटी प्रकल्प सुरू करण्याबाबत प्रक्रिया सुरु करण्याच्या सूचना श्री.केदार यांनी दिल्या.


            या बैठकीस पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचे प्रतिनिधी श्री गुप्ता, श्री हातेकर, पशुसंवर्धन विभागाचे सह सचिव मानिक गुट्टे, उपायुक्त धनंजय परकाळे, दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त तुंबाड, उपसचिव श्री.गोविल, अवर सचिव श्री.केंडे उपस्थित होते.