Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑक्टोबर १३, २०२२

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

मतदार यादीत नाव नसल्यास कोल्हापुरात जाउनच हरकत घ्या -निवडणूक अधिकाऱ्याचा अजब फतवा
                                       
कोल्हापूर, मुंबई व पुण्यात मतदान केंद्रे; मतदार याद्यांवर हरकती  दुरुस्ती व निर्णय  मात्र कोल्हापुरातच ...                                                                                       
                        

     पुणे- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक ५ फेब्रुवारी २०२३ ला व मतमोजणी ८ फेब्रुवारीला होणार आहे.धर्मादाय उपायुक्त कार्यालयाचे निरीक्षक तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी आसिफ शेख यांनी मंगळवारी हा निवडणूक कार्यक्रम निश्चित केला आहे. ही निवडणूक जुन्या मतदार यादीनुसार होणार असून फक्त कोल्हापूर, मुंबई व पुणे या तीन ठिकाणीच मतदान केंद्रे आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया १० जानेवारीपासून सुरू होत आहे.मतदार यादीत नाव नसल्यास अगर चुकीचे नाव असल्यास संबधित मतदार नागपूरचा असो , मुबई पुण्याचा असो वा महाराष्ट्रातील कुठल्याही गावातील असो त्यास कोल्हापूर येथे दुपारी ११ ते ३ या वेळेत जाउनच याबात हरकत घेऊन दुरुस्तीची सूचना करावी लागणार असल्याचे या कार्यक्रमात नमूद केले असल्याने याबाबत पुण्यातील सलाम पुणे चे अध्यक्ष शरद लोणकर यांनी संताप व्यक्त केला आहे . मुंबई , पुणे वा नागपूर अशा ठिकाणांहून लोकांनी आपापले नाव मतदार यादीत नसल्यास कोल्हापूरला जाऊन हरकत घ्यायची हा सभासदांना नाहक त्रास दिला जाणार आहे , निवडणूक अधिकारी यांना याबाबत विनंती करण्यात येईल असे ते म्हणालेत . मतदार यादी तपासणे आणि त्यावर हरकती घे दुरुस्ती सुचविणे आणि निर्णय घेणे या तिन्ही गोष्टी कोल्हापूर सह मुंबई ,पुणे कार्यालयात देखील व्हायला हव्यात असे ते म्हणाले. सध्या जाहीर केलेल्या कार्यक्रमात हरकती दुरुस्ती आणि त्याबाबतच्या निर्णयाच्या  ठिकाणांचा पुनर्विचार करावा व त्यात बदल करावा असे त्यांनी म्हटले आहे. चित्रपट महामंडळातील अंतर्गत राजकारणामुळे अध्यक्ष मेघराज भोसले व अन्य कार्यकारिणी असे तीन गट पडले आहेत. मागील महिन्यात भोसले यांनी आपल्या अधिकारात निवडणूक जाहीर केल्यानंतर दोन दिवसांनी उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनीही निवडणूक जाहीर केली. एकाच संस्थेची दोनवेळा निवडणूक हा प्रकारच धर्मादायच्या कायद्यात बसत नसल्याने धर्मादाय उपायुक्त कार्यालयाने दोन्ही निवडणुका बेकायदेशीर ठरवल्या.
निवडणूक जाहीर करण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती केली.मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून आसिफ शेख काम पाहत आहेत. त्यांना निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यास मुदत दिली होती परंतु ती मुदत न पाळता ,पुन्हा १५ दिवसांची वाढीव मुदत त्यांनी घेतली त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस कामकाजाच्या विषयासह त्या सभेच्या ठरलेल्या दिवसापूर्वी किमान १५ दिवस आधी प्रसिद्ध झाली पाहिजे या नियमानुसार प्रसिद्ध केली. इतर कोणतीही सूचना किंवा नोटीस सभासदांना देता येणार नाही, अशी सक्त सूचना केली आहे. महामंडळाची नवी घटना अजून मंजूर नसल्याने ही निवडणूक जुन्या मतदार यादीनुसार होणार असून त्यात सभासद संख्या १८ हजार आहे.                           निवडणूक कार्यक्रम असा                                                          सभासदांची वैध यादी करणे -१५ नोव्हेबर ते १५ डिसेम्बर (कोल्हापूर कार्यालयात च )सभासदांची वैध कच्ची यादी प्रसिद्ध करणे -१९ डिसेम्बर ते २० डिसेम्बर (तिन्ही कार्यालयात मुंबई -पुणे आणि कोल्हापूर )या मतदार यादीवर हरकती- दुरुस्ती स्वीकारणे २१ डिसेम्बर ते ४ जानेवारी रोज ११ ते ३ या वेळेत फक्त कोल्हापूर कार्यालयातच .हरकती व दुरुस्तीवर निर्णय घेणे ५ जाणे वारी ते ६ जानेवारी फक्त कोल्हापूर कार्यालयातच .अंतिम मतदार यादी प्रसिद्धी : ९ जानेवारी २०२३ (तिन्ही कार्यालयात मुंबई -पुणे आणि कोल्हापूर )उमेदवारी अर्ज देणेव स्वीकारणे : १० ते १६ जानेवारी(तिन्ही कार्यालयात मुंबई -पुणे आणि कोल्हापूर )छाननी -१७ जानेवारी (कोल्हापूर कार्यालयातच )माघार : १८ ते २० जानेवारी(कोल्हापूर कार्यालयातच )मतदान : ५ फेब्रुवारी(तिन्ही ठिकाणी मुंबई -पुणे आणि कोल्हापूर )मतमोजणी : ८ फेब्रुवारी (कोल्हापुरात )निकाल -कोल्हापुरात

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.