आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांच्या तक्रारीनंतर मोठी कारवाई
साठ रुपये किमतीचे कटल ब्लेड तब्बल सहाशे रुपयांना विकणाऱ्या मेडिकल स्टोरच्या विरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर मोका चौकशी करून या मेडिकलला सील ठोकण्यात आले आहे..
चंद्रपूर शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये डोळ्याचे ऑपरेशनसाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असतात. शस्त्रक्रियेसाठी कटल ब्लेड गरज भासते. डॉक्टरांच्या सांगण्यावरून ते खासगी मेडिकल मधून विकत घेतले जाते. जिल्हा सामान्य रुग्णालयात पुरेसा औषध साठा असताना देखील बाहेर असलेल्या श्रीजी मेडिकल मधूनच हे ब्लेड विकत घेण्यासंदर्भात डॉक्टरांचा हट्ट असतो. डॉक्टर आणि मेडिकल स्टोअर संचालकांनी साठेलोटे करून साठ रुपये किमतीचे हे ब्लेड तब्बल सहाशे रुपयांना विकण्याचा सपाटा लावला होता. आतापर्यंत जवळपास 20 रुग्णांनी सदर ब्लेड विकत घेतले. रुग्णांकडून दहा पटीने अवैध पद्धतीने आर्थिक लूट करण्यात येत असल्याची बाब आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांच्या लक्षात आली. त्यांनी या संदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार आज लगेच अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी श्री डांगे यांनी सर्वात समक्ष मोका चौकशी केली. आम आदमी पार्टीने या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सकांना देखील कळविले होते. आज झालेल्या चौकशी दरम्यान किमतीचे ब्लेड सहाशे रुपयांना विकत असल्याचा प्रकार अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत घडला आणि तो उघड झाला. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने श्रीजी मेडिकलला सील ठेवण्याची कारवाई केली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांच्या माध्यमातून गरीब रुग्णांची मोठ्या प्रमाणात लूट करण्याचा हा प्रकार आम आदमी पार्टीच्या माध्यमातून उघड झाला आहे.
आर्थिक फसवणूक करणाऱ्या मेडीकल संचालक तसेच मीलीभगत असणाऱ्या सरकारी दवाखान्याच्या डाक्टरवर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांनी केली आहे.
A blade worth sixty rupees was sold for as much as six hundred rupees