Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑक्टोबर १३, २०२२

15 व 16 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल


चंद्रपूर(खबरबात):
  धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी येथील सोहळा पाहण्याकरीता शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिक 15 व 16 ऑक्टोबर रोजी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यादरम्यान, वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून चंद्रपूर शहराच्या बाहेरून येणाऱ्या वाहनाकरीता तात्पुरत्या स्वरूपात पार्किंग स्थळे उपलब्ध करून देण्याचे प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सादर करण्यात आले आहे.

त्याअनुषंगाने मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33(1)(ब) व कलम 36 अन्वये दि. 15 ऑक्टोंबरचे 7 वाजेपासून ते 17 ऑक्टोबर 2022 च्या 7 वाजेपर्यंत चंद्रपूर हद्दीतील स्थळे सर्व वाहनाकरीता पार्किंग स्थळे म्हणून जाहीर करण्यात येत आहे.

ही आहेत वाहनाकरीता पार्किंग स्थळे:

नागपूर रोडने दिक्षाभूमीकडे येणाऱ्या अनुयायांनी त्यांची दुचाकी व चारचाकी वाहनांकरीता शकुंतला लॉन, जनता कॉलेज समोरील पटांगण व जनता कॉलेज समोरील ईदगाह मैदान येथे पार्क करावीत. तसेच शहरातून दिक्षाभूमीकडे येणाऱ्या वाहनांकरीता सेंट मायकल स्कूल मैदान व सिंधी पंचायत भवन (संत केवलराम चौक), वडगांव, आकाशवाणी व लगतच्या परिसरातून दिक्षाभूमीकडे येणाऱ्या वाहनांकरीता लोकमान्य टिळक हायस्कूल (जिल्हा स्टेडियमच्या मागे) ‌व जीवन साफल्य गृहनिर्माण सहकारी संस्था(मनोमय दवाखान्याच्या पाठीमागे), मुल रोड, बंगाली कॅम्प व तुकूम या परिसरातून येणाऱ्या वाहनांकरिता कृषी भवन जवळील मैदानात व टॅक्सी स्टँड ही स्थळे पार्किंग स्थळे म्हणून जाहीर करण्यात आली असून या ठिकाणी नागरिकांनी व अनुयायांनी आपली दुचाकी व चारचाकी वाहने पार्क करावीत. असे जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.