Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑक्टोबर ३०, २०२०

मुख्य अभियंता पदभरती प्रक्रियेतील पात्र उमेदवार न्यायाच्या प्रतीक्षेत





दोषींवर कार्यवाही कधी करणार?

मुख्य अभियंता पदभरती घोटाळा प्रकरण


खापरखेडा-प्रतिनिधी
महानिर्मिती कंपनी अंतर्गत मुख्य अभियंता पद भरती घोटाळा दोन महिन्यांपूर्वी उघडकीस आला सदर घोटाळ्यात पात्र उमेदवारांना डावलून नियमबाह्य मुख्य अभियंता पदावर निवड करण्यात आली त्यामूळे पात्र उमेदवार न्यायाच्या प्रतीक्षेत असून दोषींवर कार्यवाही कधी करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.*
महानिर्मिती कंपनी अंतर्गत मुख्य अभियंता सरळसेवा भर्ती "२०१७" प्रक्रिया २२ में २०१७ रोजी राबविण्यात आली मात्र निवड समितीने पात्र उमेदवारांना डावलून खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात कार्यरत मुख्य अभियंत्याची नियमबाह्य मुख्य अभियंता पदावर निवड केली या घोटाळ्याला उघड होऊन दोन महिन्याचा कालावधी झाला मात्र अजूनही नियमबाह्य निवड झालेल्या मुख्य अभियंता व मेहरबानी करणाऱ्या निवड समितीवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात नाही त्यामूळे ऊर्जा खात्याच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाली असून ऊर्जा खात्यात हिटलरशाही सुरू आहे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यात वर्षभरापूर्वी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले भाजपच्या कार्यकाळात झालेला मुख्य अभियंता पदभरती घोटाळा महाविकास आघाडीच्या कार्यकाळात उघड झाला शिवाय माहितीच्या अधिकारातून समोर आला चौकाशी समिती स्थापन करण्यात आली "चोर नही तो डर काहे का" असे असतांना महानिर्मिती कंपनीने मुख्य अभियंता पदभरती घोटाळ्याचा चौकाशी अहवाल सार्वजनिक केला नाही तो का केला नाही हे समजण्या पलीकडे आहे.
महानिर्मिती कंपनी अंतर्गत मुख्य अभियंता सरळसेवा भर्ती "२०१७" प्रक्रिया राबविण्यात आली निवड समितीने नियमबाह्य पद्धतीने १० गुण वाढवून खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात कार्यरत मुख्य अभियंता यांची मुख्य अभियंता पदावर नियुक्ती केली नियमबाह्य नियुक्ती केल्यामुळे त्यांना पायउतार करने अपेक्षित आहे शिवाय त्यांची पूर्वीच्याच पदावर नियुक्ती करने न्यायसंगत आहे मात्र राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांचा विशेष आशिर्वाद प्राप्त असल्यामुळे महानिर्मिती कंपनीच्या चिंतेत भर पडल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली असून कार्यवाही "जैसे थे" च्या अवस्थेत असून महानिर्मिती कंपनीची अब्रू वेशीवर टांगली आहे.
त्यामूळे महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात न्यायव्यवस्था बिघडली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे जवळपास तीन वर्षांपूर्वी खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात कार्यरत मुख्य अभियंता यांची मुख्य अभियंता पदावर नियमबाह्य निवड करण्यात आली त्यांना मुख्य अभियंता पदाचे लाभ देण्यात आलेत नियमबाह्य निवड झाल्यामुळे त्यांना दिलेले लाभ परत घेणे अपेक्षित आहे मात्र अजूनही महानिर्मिती कंपनी त्यांना पायउतार करू शकली नाही हि शोकांकिता आहे मागील अनेक महिन्यापासून खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात हिटलरशाही कारभार सुरू आहे त्यामुळे मर्जीतील कंत्राटदार व सप्लायर यांची चांदी झाली आहे त्यामूळे मागील सहा महिन्यांत मर्जीतील कंत्राटदार व सप्लायर यांना दिलेले कंत्राट रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.



मुख्यमंत्री साहेब चाललंय तरी काय
भाजपच्या कार्यकाळात झालेला महानिर्मिती कंपनी अंतर्गत मुख्य अभियंता पदभरती घोटाळा दोन महिन्यांपूर्वी उघडकीस आला सदर घोटाळ्यात नियमबाह्य निवड झाल्यामुळे निवड समिती व संबंधित मुख्य अभियंत्यावर कार्यवाही करने अपेक्षित आहे मात्र कार्यवाही करण्यात आली नाही मुख्य अभियंता पदभरती घोटाळा प्रसार माध्यमाच्या माध्यमातून सतत गाजत आहे रोज वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे मात्र विरोधी बाकावर बसणारी नेतेमंडळी मुख्य अभियंता पदभरती घोटाळ्या संदर्भात काहीही बोलायला तयार नाहीत उलट सदर घोटाळा संदर्भात कार्यवाही होत नसल्याने सत्ताधारी नेते मंडळी मुख्य अभियंता पदभरती घोटाळ्याचं समर्थन करीत आहे काय? असा प्रश्न निर्माण झाला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब राज्यात चाललंय तरी काय?दोषींवर कठोर कार्यवाही करणार किंवा नाही असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.