देशात महागाई वाढीला मोदी सरकार जबाबदार
खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची टीकाचंद्रपूर : पेट्रोलने शंभरी गाठली आहे. डिझेल शंभरीच्या जवळ आहे. गॅस नऊशे झाला आहे. देशाचा जीडीपी बांग्लादेशापेक्षाही घसरला आहे. देशात महागाई वाढीला मोदी सरकार जबाबदार आहे. सरकार चालविता येत नसल्यास मोदी सरकारने चालते व्हावे. महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे मोदी सरकारला भविष्यात याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा खासदार बाळू धानोरकर यांनी दिला.
चंद्रपूर शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे सोमवारी (ता. ७) येथील आदर्श पेट्रोल पंप येथे पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन करीत केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी खासदार बाळूभाऊ धानोरकर बोलत होते. यावेळी चंद्रपूर शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे उपस्थित होते.
खासदार धानोरकर पुढे म्हणाले, आधीच कोरोनाने जनता त्रस्त आहे. त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहे. काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भरमसाठ वाढल्या असतानाही पेट्रोल, डिझेलच्या किमतीवर परिणाम झाला नाही. सामान्य माणसांना दिलासा देण्याचीच भूमिका घेतली होती. मात्र, आताचे मोदी सरकार सामान्य जनतेवर उठले आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी काहीही परिणाम होताना दिसत नाही.
यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. चंद्रपूर शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्वातील आंदोलनात कामगार नेते के. के. सिंग, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनेश चोखारे, अनुसूचित जाती प्रदेश उपाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, महिला कॉंग्रेस शहर अध्यक्ष सुनीता अग्रवाल, अनुसूचित जाती आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुताई दहेगावकर, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सोहेल शेख, नगरसेवक प्रशांत दानव, नगरसेविका सुनीता लोढ़िया, नगरसेवक प्रदीप डे, माजी नगरसेवक संतोष लहामगे, नगरसेविका ललीता रेवल्लीवार, महिला शहर उपाध्यक्ष सुनंदा धोबे, अनुसूचित जाती शहर अध्यक्ष शालिनी भगत, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर, माजी नगरसेवक प्रसन्ना शिरवार, नरेंद्र बोबड़े, गोपाल अमृतकर, युवक कॉंग्रेसप्रदेश सचिव सचिन कत्याल, एनएसयुआय प्रदेश महासचिवकुणाल चहारे, माजी नगरसेवक राजेश अडूर, इंटक युथ जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती, उमाकांत धांडे, सुलेमान अली, मोहन डोंगरे, रुचित दवे, चंद्रमा यादव, नौशाद शेख, विजय धोबे, प्रवीण दाहूले, मनीष तिवारी, योगानंद चंदनवार, प्रीतिसा शाह, रामकृष्णा, मनोज खांडेकर, संदीप सिडाम, सुरेश खापने, पप्पूभैय्या सिद्दीकी, मुन्ना बुरड़कर, इरफान शेख, सलीम भाई, कासिफ अली, केतन दुर्सेलवार, मोनू रामटेके, वैभव येरगुडे, कृणाल रामटेके, राजू त्रिवेदी, राजू वासेकर, वायफडे गुरुजी, प्रकाश देशभ्रतार, रुषभ दुपारे, राजेश रेवल्लीवार, अंकुर तिवारी, सूर्य अडबाले, अॅड. वाणी दारला, शीतल काटकर, संध्या पिंपळकर, कल्पना गिरड़कर, स्वाती त्रिवेदी, चोपकर ताई, मंदाताई सोयाम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.