Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

New Delhi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
New Delhi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, सप्टेंबर १०, २०२३

G20 summit 2023 | पुढल्या जी 20 अध्यक्ष पदाची धुरा या देशाकडे!

G20 summit 2023 | पुढल्या जी 20 अध्यक्ष पदाची धुरा या देशाकडे!



पुढल्या जी 20 अध्यक्ष पदाची धुरा या देशाकडे!

G20 summit 2023 | जी २० शिखर परिषदेची आज नवी दिल्लीत यशस्वी सांगता झाली जी 20 अध्यक्ष पद भारताने ब्राझील कडे सुपूर्द केलं. सांगता समारंभात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष पदाचा प्रतीक असलेला हातोडा ब्राझीलचे राष्ट्रपती लुईस इन लुलाड डिझेल यांच्याकडे औपचारिकपणे सोपवला ब्राझीलचा अध्यक्ष पदाच्या काळात जी 20 ची सामायिक उद्दिष्ट साध्य होतील असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. भारताकडे नोव्हेंबर पर्यंत जी 20 अध्यक्ष तेची जबाबदारी आहे त्यामुळे अजून अडीच महिने शिल्लक आहेत दरम्यान दिल्लीत दोन दिवसांमध्ये सर्वांनी आपली मतं मांडली सूचना केल्या बरेच प्रस्ताव मांडले आहेत ज्या सूचना आल्या आहेत त्या पुन्हा एकदा तपासून त्यांच्या प्रगती बाबत गती कशी आणता येईल यासाठी प्रयत्न करणे ही आता आमची जबाबदारी आहे असं सांगत या शिखर परिषदेत निर्णय झालेल्या मुद्द्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी येत्या नोव्हेंबर अखेरीला आभासी 17 आयोजित करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला सध्याच्या जगात संपत्तीचे केंद्रीकरण झाले तर लाखो माणसं अजूनही भुकेच्या समस्येने त्रस्त आहेत असा ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी हातोडा स्वीकारल्यानंतर बोलताना सांगितलं दरम्यान आज दुपारी पंतप्रधान मोदी यांची फ्रान्सचे राष्ट्रपती इ-मेन्युअल मॅक्रोन यांच्यासोबत द्वीपक्षीय बैठक झाली यावेळी उभे नेत्यांनी भारत फ्रान्स यांच्यातील मजबूत नागरिक सहकार्याची कबुली देत आण्विक संबंध जयतापुर आणि प्रकल्पाची चांगली प्रगती यावर चर्चा केली सी आय आय चे अध्यक्ष आर दिनेश यांनी जी 20 शिखर परिषदेच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अभिनंदन केलं भारताच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात जागतिक अर्थव्यवस्थेची दिशा ग्लोबल साउथ ची गरज असलेल्या सर्व समावेशक आणि शाश्वत विकासाकडे वळवण्याचं महत्त्वपूर्ण काम झालंय असं त्यांनी सांगितलं


पर्यावरण स्नेही गणेशोत्सव असा होणार 

Environment friendly Ganeshotsav । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला पर्यावरण स्नेही गणेशोत्सव साजरा करायच्या केलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पर्यावरण विघ्नहर्ता 2023 या राज्यस्तरीय पर्यावरण स्नेही श्री गणेश मूर्ती आणि सजावट स्पर्धेच्या प्रकाशन मंत्रालयात झालं या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन पर्यावरण रक्षणाच्या कार्यात करात्मक सहभाग नोंदवावा असा आवाहन फडणवीस यांनी यावेळी गणेश भक्तांना केला. 


यांनी केले दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्याचा अनावरण 

the statue । जळगाव शहरातील पिंपराळा परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला असून, महापालिकेच्या आवारात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा साकारण्यात आला आहे या दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्याचा अनावरण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आलं. 


शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते पदाचा दिला राजीनामा 

Resignation। माजी समाज कल्याण मंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप यांनी आपल्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे घोलप हे नाशिक रोड देवळाली मतदारसंघाचे 25 वर्ष आमदार होते. 


या जिल्ह्यात उद्योग वाढीसाठी उद्योगस्नेही धोरण 

Industry friendly policy । भंडारा जिल्ह्यामध्ये स्थानिक उद्योग वाढीसाठी शासनाचे उद्योगस्नेही धोरण असून या उद्योगांमधूनच रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर झाली पाहिजे हे लक्षात घेता सध्या जिल्ह्यात असलेल्या औद्योगिक विकास क्षेत्राचे अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र निर्मितीसाठी शासन लवकरात सकारात्मक निर्णय घेईल त्यासाठी एमआयडीसी ना पाठवलेल्या प्रस्तावांची उच्चस्तरीय समितीद्वारे पाहणी करून जलद निर्णय घेण्यात येईल अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील उद्योग आणि रोजगार क्षेत्राचा आढावा त्यांनी घेतला तसेच औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींची संवाद साधला.  


या जिल्ह्यात येणार पाऊस 

rain weather forecast । पुढच्या काही तसाच नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी  हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात खामगाव शहरात काल रात्रीपासून सुरू आहे सततच्या पावसामुळे आज पहाटे साडेतीनशे सुमारास खामगाव शहरात जलंब नाका परिसरात एका घराचे नुकसान झालं.  येत्या काही तासात नागपूर वर्धा यवतमाळ भंडारा चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात खामगाव शहरात काल रात्रीपासून पावसाची सतत धार सुरू असून अनेक दिवसांपासून गायब असलेला पाऊस सुरू झाल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येतोय सततच्या पावसामुळे आज पहाटे साडेतीनच्या सुमाराला खामगाव शहरात जलंब नाका परिसरात एका घराची भिंत कोसळून त्याच्यात असा उद्वस्त झालं मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. 


Aditya-L1 ने केला हा टप्पा पूर्ण 

Aditya-L1 Launch: देशाची पहिली सौर मोहीम आदित्य एल वन आज पहाटे नियंत्रित हालचालींचा तिसरा टप्पा पूर्ण केला बंगळूरूच्या केंद्रावरून पाठवण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन यानाने केलं.  बंगळूर बरोबरच पोट ब्लेअर आणि मॉरिशस मधल्या निरीक्षण केंद्रांमधून या हालचालि आल्यात या पुढचा टप्पा येत्या 15 सप्टेंबरच्या पहाटे दोन वाजता नियोजित आहे अशी माहिती दिली पृथ्वीभोवतालच्या 16 दिवसांच्या प्रवासात हे यात पाच टप्पे पूर्ण करेल. 

या रुग्णांना 112 कोटी 12 लाख रुपयांची आर्थिक मदत

Chief Minister's Relief Fund । मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षा मार्फत गोर गरीब आणि गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी अर्थसहाय्य केले जात आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत्या कक्षाने अवघ्या 14 महिन्यात 13000 पेक्षा अधिक गोरगरीब आणि गरजू रुग्णांना एकूण 112 कोटी 12 लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये अनेक विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश दिवटे यांनी दिली. 


ही समिती करणार भूगर्भातील बदलांचा अभ्यास 

Committee for Establishment of Landslide Monitoring and Study Institute । पहिल्या राज्यस्तरीय भूस्खलन देखरेख आणि अभ्यास संस्थेच्या स्थापनेसाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत.  राज्यात पावसाळ्यात भूस्खलनाच्या घटना दरवर्षी घडत असून माळीण आणि तळी नंतर यावर्षी पावसाळ्यात खालापूर इथल्या इरसाळवाडी येथे भूस्खलन होऊन अनेक बळी गेले पश्चिम घाट आणि सह्याद्री प्रदेशासह शहरी आणि ग्रामीण डोंगराळ प्रदेशातील भूस्खलनाचा अभ्यास आणि निरीक्षण करण्यासाठी भूगर्भात होत असलेल्या बदलांचा  अभ्यास करण्याची गरज आहे त्यासाठी भूस्खलन देखरेख आणि अभ्यास करणारी राज्याची स्वतंत्र संस्था असावी अशी मागणी विविध विषयांवर संशोधन आणि अभ्यास करणाऱ्या ब्रह्मा संशोधन प्रतिष्ठान या संस्थेचे संचालक आणि निवृत्त आयएएस अधिकारी डॉक्टर विजय पागे यांनी केली होती. 


नुकसान भरपाई रक्कम दोन कोटी 96 लाख

National Lok Adalati । चंद्रपूरच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा समृद्धी भीष्म यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्हा न्यायालय आणि सर्व तालुक्यातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालती चे आयोजन करण्यात आलं होतं चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय लोक अदालतींमध्ये 2336 प्रकरण यशस्वीपणे निकाली काढण्यात आली. या प्रलंबित प्रकरणांमध्ये मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरण 20 प्रकरण निकाली काढण्यात आली असून नुकसान भरपाई रक्कम दोन कोटी 96 लाख 82 हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. 


येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या

Kopardi gangrape and murder । अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे यांनी आज पहाटे येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली गेल्या पाच वर्षांपासून तो येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत होता कोपर्डीतील शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी त्याच्यासह तीन आरोपींना न्यायालयांना वर्ष 2017 मध्ये दोषी ठरवलं होतं. 


मोडेलर ऑपरेशन थिएटर्स उद्घाटन 

Government Medical College and Hospital । यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात रुग्णांसाठी चांगल्या सुविधा निर्माण करा त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही असा प्रतिपादन राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री तसेच यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चार मोडेलर ऑपरेशन थिएटर्स उद्घाटन राठोड यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते या अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटरमध्ये संपूर्ण डिजिटल यंत्र बसविण्यात आली असून शल्य क्रिया दरम्यान संसर्गाचा धोका टाळणं शक्य होणार असून डॉक्टरांना देखील योग्य वातावरणात शस्त्रक्रिया करता येणार आहेत या चार मॉडेलर ऑपरेशन थिएटर साठी संजय राठोड यांनी 15 कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजनातून उपलब्ध करून दिला आहे. 


 पावसाच्या स्थितीवरच सामन्याचं भविष्य

asia cup tournament 2023 ।  सध्या श्रीलंकेतील कोलंबो इथे सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेवर आजही पावसाचा चावट आहे भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये आज दुपारी हा सामना सुरू झाला पाकिस्तान संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला भारताच्या सलामी वीरांनी मजबूत सुरुवात करीत 24 षटकात दोन गडी बाद 147 धावा केल्यात सलामी वीर शुभमंगल यांनी 58 धावा तर कर्णधार रोहित शर्मा याने 56 धावा काढल्या शुभम किल्ला शहंशाह आफ्रिदीनेच रोहित शर्माला शादाब ने बाद केलं 24 व्या शतकानंतर के एल राहुल 17 धावांवर तर विराट कोहली आठ धावांवर खेळत होते सध्या सामन्यात पाऊस सुरू झाल्याने खेळ थांबला असून पावसाच्या स्थितीवरच सामन्याचं भविष्य अवलंबून आहे

 

एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव | Har Har Mahadev

एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव | Har Har Mahadev

एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव | Har Har Mahadev

शेतकर्‍यांचे वैभव असलेला बैलांचा दिवस म्हणजे पोळा. वर्षभर राबणार्‍या बैलांची पिठोरी अमावश्येच्या दिवशी पूजा करून कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण उत्साहाने साजरा केला जातो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांदे शेकणीचा कार्यक्रम असतो. बैलांचे खांदे तूप किंवा तेल, हळद लावून शेकतात. 'आज आवतन घ्या अन् उद्या जेवायला या' या शब्दात बैलांना पोळ्याचे आमंत्रण दिले जाते. 

पोळ्याच्या दिवशी 'झडत्या'ची लोकसंस्कृती ही एक प्राचीन परंपरा आहे. या परंपरेत, पोळ्याच्या दिवशी, महिला आणि मुली नैसर्गिक रंगांपासून बनवलेल्या झडत्या बनवतात आणि त्या आपल्या घरांच्या प्रवेशद्वारावर, खिडक्यांच्या चौकटीवर आणि दारांच्या चौकटीवर लावतात. या झडत्यांमुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि घर सुंदर दिसते अशी समजूत आहे.

'वाटी रे वाटी खोबर्‍याची वाटी, 
महादेव रडे दोन पैशासाठी, 
पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी, 
देव कवा धावला गरिबांसाठी' 
एक नमन गोरा पार्वती, 
हर बोला हर-हर महादेव'. 
(Har Har Mahadev)

झडत्या बनवण्याची प्रक्रिया ही एक कला आहे. महिला आणि मुली या झडत्यांमध्ये विविध प्रकारच्या नमुने आणि आकार वापरतात. काही झडत्यांमध्ये फुलांच्या नमुने असतात, तर काही झडत्यांमध्ये देवी-देवतांच्या प्रतिमा असतात. झडत्या बनवण्यासाठी, महिला आणि मुली नैसर्गिक रंगांपासून बनवलेल्या रंगांचा वापर करतात. या रंगांमध्ये गवार, कडुनिंब, बेल, हिरवी मिरची इत्यादींचा समावेश होतो.

पोळ्याच्या दिवशी झडत्या लावण्याची परंपरा ही एक सुंदर आणि पारंपारिक परंपरा आहे. ही परंपरा महाराष्ट्रात आणि इतर अनेक ठिकाणी पाळली जाते.


'गणा रे गणा, 

गण गेले वरच्या राणा, 
वरच्या राणातून आणली माती, 
ते दिली गुरूच्या हाती, 
गुरूनं घडविला महानंदी, 
तो नेला हो पोळ्यामंदी, 
एक नमन कावळा पारबती, 
हर बोला हर-हर महादेव' 

सुर्यास्ताच्यावेळी गावाबाहेरील मोकळ्या जागेवर आम्रपानांच्या तोरणाखाली बैलांना उभे केल्यावर गावातील मान्यवर व्यक्तींचा मानाचा बैल येईपर्यंत पोळा फुटत नाही. ढोल ताशांच्या गजरात शेतकर्‍यांनी सीमेवर बैल आणले की, झडत्यांचा दुय्यम सामना सुरू होतो. पोळ्याच्या दिवशी बैलांला बेगड, गेरू, गाठी, मटाक्या, घुंगरू, झूल आदी साहित्य बैलांसाठी वापरल्या जातो. ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्यांची लोकसंस्कृती असली तरी त्यातून सर्व सामन्य शेतकर्‍यांनी परिस्थिती झडत्यातून विशद होते.  Har Har Mahadev


'वाटी रे वाटी खोबर्‍याची वाटी, महादेव रडे दोन पैशासाठी, पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी, देव कवा धावला गरिबांसाठी' एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव'. नापिकीत ही झडती त्यातून महत्वाचे असे. त्यातूनही दुसर्‍यांवर मात करून झडतीद्वारे आनंद घेतला जात असे. पोळय़ाच्या अक्षता कपाळाला लावून एकमेकांना अलिंगण देऊन शेतकरी स्नेहभाव प्रकट करतात. पूर्वीच्या काळी गावातील पाटलांची बैलजोडी वाजत गाजत निघत होती. आता ही प्रथा काळाच्या ओघात लोप पावली.


'बळी रे बळी लिंब बनी, अशी कथा सांगेल कोणी', 'राम-लक्ष्मण गेले हो वनी, राम-लक्ष्मणाने आणली वनफुले', ते महादेव पारबतीच्या हाती, तिनशे साठ नंदी एक नमन.. याप्रकारे वर्णन करून अनेक पौराणिक दाखले झडत्यातून देत असत. झडती म्हणारा आपली झडती पूर्ण करीत आला की, लगेचच लोक 

'एक नमन कवळा पारबती. हर.. हर.. बोला, हर-हर महादेव, असे जोराने ओरडतात. त्यानंतर 

'मेंढी रे मेंढी 
शेंबडी मेंढी 
ते खाते आला-पाला
तिचा गुरू माहा चेला 
लाथ मरून सरका केला
' एक नमन कवळा पारबती
हर बोला हरहर महादेव 

आदी झडत्या गायल्या जातात. विविध विषयांवर झडत्या होत असल्या तरी पोळा फोडण्यासाठी विशेष झडती म्हटली जाते.  Har Har Mahadev

एक नमन‌ गोरा पार्वती हर बोला हर हर महादेव ll Ram kshirsagar live ll

नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव

पोळ्याच्या दिवशी, झडत्या लावताना महिला आणि मुली 'नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव' असे म्हणतात. या म्हणीचा अर्थ असा की, गोऱ्या पार्वतीला नमस्कार, आणि हर-हर महादेव. या म्हणीमुळे देवी पार्वती आणि भगवान शिवांना वंदन केले जाते.

पोळ्याच्या दिवशी झडत्या लावणे ही एक सुंदर आणि पारंपारिक परंपरा आहे. ही परंपरा महाराष्ट्रात आणि इतर अनेक ठिकाणी पाळली जाते.

 पोळ्याचा आनंद शेतकर्‍यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप बदलत चालले असले तरी ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्यांची लोकसंस्कृती आजही कायम आहे. पोळ्यात 'झडत्या' आवर्जून म्हटल्या जातात. पोळ्यात म्हणण्यात येणार्‍या झडत्या हा लोकसाहित्यातील महत्वपूर्ण घटक आहे.


बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

शेतीसाठी अविभाज्य अशा बैलांचा आदर व्यक्त करण्यासाठी साजरा होणारा बैलपोळा हा सण आपल्या कृषीप्रधान संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. या दिवशी बैलाला आंघोळ घालून, त्याला सजवून, त्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून त्याचे आभार मानले जातात.

बैलपोळा हा सण आपल्याला मुक्या प्राण्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यास शिकवतो. बैलांशिवाय शेती करणे अशक्य आहे. ते आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा देतात. त्यांच्या कठोर परिश्रमांमुळेच आपण सुखी जीवन जगतो.

बैलपोळ्याच्या या शुभ प्रसंगी आपण सर्वांनी बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करूया आणि त्यांना चांगल्या प्रकारे सांभाळूया.

पुढील काही शुभेच्छा संदेश खालीलप्रमाणे आहेत:

  • आला बैलपोळा, सण आनंदाचा, बैलाला पुरणपोळीचा नैवेद्य, बैलाच्या कठोर परिश्रमांसाठी कृतज्ञता व्यक्त.
  • बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा! बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करूया, त्यांना चांगल्या प्रकारे सांभाळूया.
  • बैलपोळा हा सण आपल्या कृषीप्रधान संस्कृतीचा अभिमान आहे. या दिवशी आपण बैलांवर प्रेम आणि आदर व्यक्त करूया.
  • बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा! बैलांमुळेच आपण सुखी जीवन जगतो. त्यांच्या कठोर परिश्रमांसाठी त्यांना धन्यवाद.

आपल्या सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!


झडत्यांची लोकसंस्कृती

झडत्या ही एक लोकसंस्कृती आहे. या झडत्यांमुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि घर सुंदर दिसते अशी समजूत आहे. झडत्या बनवण्याची प्रक्रिया ही एक कला आहे. महिला आणि मुली या झडत्यांमध्ये विविध प्रकारच्या नमुने आणि आकार वापरतात. झडत्या बनवण्यासाठी, महिला आणि मुली नैसर्गिक रंगांपासून बनवलेल्या रंगांचा वापर करतात.

झडत्यांचे महत्त्व

पोळ्याच्या दिवशी झडत्या लावण्याचे अनेक महत्त्व आहे.

  • झडत्यांमुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते.
  • झडत्यांमुळे घर सुंदर दिसते.
  • झडत्या बनवण्याची प्रक्रिया ही एक कला आहे.
  • झडत्या बनवून महिला आणि मुली त्यांच्या कलागुणांना वाव देतात.

Pola is a thanksgiving festival celebrated by farmers in Maharashtra and Chhattisgarh, to acknowledge the importance of bulls and oxen, who are a crucial part of agriculture and farming activities. It falls on the day of the Pithori Amavasya in the month of Shraavana.


शनिवार, सप्टेंबर ०९, २०२३

पर्यावरणवीर : बंडू धोतरे | Environmentalist: Bandu Dhotre

पर्यावरणवीर : बंडू धोतरे | Environmentalist: Bandu Dhotre

 





जीतने वाले कोई अलग काम नहीं करते,
वह हर काम को अलग ढंग से करते हैं.


चंद्रपूर हे महाराष्ट्रातील एक औद्योगिक शहर आहे. या शहराला समृद्ध वनसंपत्तीचा वारसा लाभला आहे. मात्र, औद्योगिकरणामुळे शहर प्रदूषित झाले आहे. अशा परिस्थितीत पर्यावरण आणि सामाजिक कार्यात ज्वलंत आशा असलेल्या बंडू धोतरे यांचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे. बंडू धोतरे हे इको प्रो या पर्यावरण प्रेमी संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी वन्यजीव रक्षण, सामाजिक कार्य आणि निसर्गमय आरोग्य या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आहे.

लगभग १८ वर्ष पूर्वीची गोष्ट. 2005 मध्ये मी सकाळमध्ये बातमीदार असताना सापाची एक बातमी करण्यासाठी मी बंडूभाऊंना भेटायला गेलो. सकाळचे माझे तत्कालीन वरिष्ठ, जिल्हा बातमीदर संजय तुमराम यांनी ही असाइन्मेंट दिली होती. साहेबांनी सांगितले की, सर्पमित्र बंडू यांनी पावसाच्या पुरात वाहून आलेल्या अनेक सापांना जीवदान दिले आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात साप पकडले आहेत. त्याची बातमी करायची आहे. मी माझी सायकल घेऊन बंडू भाऊच्या ऑफिसमध्ये पोहोचलो. कोतवाली वॉर्डांत रामदेव बाबा मंदिराच्या शेजारील गल्लीमध्ये ऑफिस होते. भाऊसोबत ही पहिली भेट होती. यापूर्वी त्यांचे नाव ऐकले नव्हते. त्यांच्या ऑफिसमध्ये बघतो तर काय चॉकलेटच्या रिकाम्या डब्यांमध्ये साप ठेवले होते. ते बघून मी पूर्णतः घाबरलो. सापाचा नुसता फोटो बघितला तरी माझा थरकाप उडतो. अशास्थितीत मला साप ठेवलेल्या डब्या शेजारच्या खुर्चीवर बसायला सांगितले. त्यांनी पुरातून वाहून आलेल्या सापांची माहिती दिली. त्यानंतर ते सापांना निसर्ग मुक्त करण्यासाठी लोहारा जंगलाकडे निघून गेले. 

दुसऱ्या दिवशी त्या सापांसंदर्भातील बातमी मी प्रकाशित केली. बातमी छान लिहिली म्हणून फोन करून त्यांनी आभार व्यक्त केले. पुढे गणेश फेस्टीव्हल, दिवाळी, होळी आणि विविध सणांचा संदर्भात पर्यावरणपूरक सण कसे साजरे करावे, या संदर्भातील त्यांनी माहिती दिली. त्या आधारावर मी बातम्या तयार केल्या. बातमीच्या निमित्ताने माझ्या भेटी वाढत होत्या. त्यातूनच माझ्यामध्ये देखील सामाजिक कार्य आणि निसर्गाबद्दलची ओढ निर्माण झाली. नंतरच्या काळात जुनोना तलाव, जुनोना जंगल, लोहारा, ताडोबा आदी ठिकाणी जंगल भ्रमंतीसाठी सोबत नेले. तेव्हापासूनच मी इको-प्रो संस्थेचा सदस्य झालो. 


लोहारा येथे अदानीची कोळसा खाण (Adani Coal Mine) प्रस्तावित होती. ही खाण होऊ नये यासाठी बंडू भाऊंचे आंदोलन सुरू झाले होते. या उपोषणदरम्यानच्या सर्व उपक्रमांच्या बातम्या तयार करणे आणि फोटो काढण्याची जबाबदारी माझ्यावर आली. या उपोषणाच्या दरम्यान मी बंडूभाऊंच्या पूर्वआयुष्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होतो. इको प्रोची स्थापना कशी झाली आणि तो पर्यावरण क्षेत्रामध्ये कसा आला, याबद्दल जाणून घेताना "नागोबा ते वाघोबा" (Nagoba to Waghoba)  हा लेख लिहिला होता.


विठ्ठल मंदिर वॉर्ड मध्ये राहणारा बंडू सीताराम धोतरे (Bandu Sitaram Dhotre) हा तरुण सैन्यात जाण्यासाठी उराशी स्वप्न बाळगून होता. त्यासाठी त्याने शालेय जीवनात राष्ट्रीय छात्र सेनेत सहभाग घेतला. पण, काही कारणांनी सेनेत जाता आले नाही. ही सल मनात कायम होती. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात साप निघायचे. अस्वच्छता आणि झाडाझुडपामुळे सापांचे होते तो वाढत होते. एखादवेळी साप घरात आला किंवा तो दिसला की लोक घाबरून त्याला मारायचे. ही बाब त्याला व्यतीत करीत होती. सापांचे संरक्षण झाले पाहिजे या उद्देशाने बंडूने साप पकडण्याची कला अवगत केली आणि पुढे सर्पमित्र झाला. अशातच तरुणांची ओळख होऊ लागली. साप पकडत असल्याचे बघून अनेक जण आपणही ते शिकावे म्हणून जुळू लागले होते. यातूनच एक युवकांचा गट एकत्रित आला आणि ती इको-प्रो नावाच्या संस्थेचा जन्म झाला.

सीमेवर जाता नाही आले, याचे शल्य नेहमीच बंडूच्या मनात होते. पण देशसेवा करायची असेल तर ती सोबतच देशात राहूनही करता येऊ शकते आणि परिवर्तन घडविता येऊ शकते, याचा विचार करून सैनिक दल उभे केले. सर्पमित्र म्हणून काम करत असतानाच सापांना वाचविण्यासाठी लोकांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम हे त्यांनी केले.


ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प (Tadoba Andhari Tiger Reserve) आणि सभोवतालच्या परिसरात वाढत्या वाघांच्या संख्येमुळे मानव वन्यजीव संघर्ष वाढला होता. बंडू धोतरे यांनी या संघर्षाचे निराकरण करण्यासाठी काम केले. त्यांनी अनेक रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला आहे. तसेच, त्यांनी वन्यजीवांबद्दल जनजागृतीसाठीही काम केले आहे. चंद्रपूर शहरातील प्रदूषण रोखण्यासाठीही काम केले. त्यांनी शहरातील विविध ठिकाणी आंदोलने केली आहेत. तसेच, लोहारा येथे प्रस्तावित अदानी कोळसाखान विरोधात मोठे आंदोलन केले. 

बंडू धोतरे यांनी आपले आरोग्य आपल्या हाती या मोहिमेअंतर्गत निसर्गमय आरोग्य आणि जीवन समृद्ध करण्यासाठी जनजागृती केली आहे. त्यांनी चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन किल्ला स्वच्छता अभियान राबवले. या अभियानाचे कौतुक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही मन की बात मध्ये केले होते.


बंडूभाऊकडून अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्यात. आदर्श नागरिक, चांगले आरोग्य, सामाजिक कार्य या गोष्टी त्याच्या विविध उपक्रमातून आणि मार्गदर्शन मिळत होत्या. विशेषता संकटांना घाबरून जाऊ नये, त्यावर कशी मात करायची हे अनेक प्रत्यक्ष घटनांमधून शिकायला मिळाले. मग ते रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान वाघाचा हल्ला असो की साप पकडताना प्रसंगावधान. यातही एक विशेष आठवण म्हणजे आम्ही चार मित्र हेमलकसा येथे डॉ. प्रकाश आमटे (Dr. Prakash amte) यांना भेटायला गेलो होतो. परत येताना आम्हाला पुराने वेढले. सकाळी नऊ वाजेपासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आम्हाला कारमध्येच बसून राहावे लागले. सोबत खाण्यापिण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. अशावेळी घाबरून न जाता येणाऱ्या संकटावर मात कशी करायची याची शिकवण या घटनेतून मिळाली. पुराने वेढा घातला असताना पिण्यासाठी पाणी नव्हते. अशावेळी बिसलरीच्या रिकाम्या बॉटलमध्ये पावसाचे पाणी जमा करून ते प्यावे लागले होते. शिवाय पूर कमी न झाल्यामुळे पुलावरून आम्हाला दोरखंडाच्या सहाय्याने काढण्यात आले. या प्रसंगात देखील बंडूभाऊंनी मनातील भीती दूर करून संकटातून मार्ग कसा काढावा हे शिकवले. इतकेच नव्हेतर गोंडकालीन उंच भिंतीवर चढणे असेल किंवा त्यावरून चालणे, यातून देखील मनाची भीती दूर केली. 

जीतने वाले कोई अलग काम नहीं करते, 
वह हर काम को अलग ढंग से करते हैं. 

मोटिवेशनल स्पीकर शिव खेड़ा यांचे हे वाक्य बंडूभाऊ नेहमीच स्मरणात ठेवून तरुणांना त्या दृष्टीने काम करण्यासाठी प्रेरित करीत असतो. 


बंडू धोतरे हे एक माझ्यासह तरुणासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी पर्यावरण आणि सामाजिक कार्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यामुळे चंद्रपूर शहर आणि परिसरात पर्यावरण आणि सामाजिक परिस्थिती सुधारण्यास मदत झाली आहे. या कार्याची दखल घेऊन देशातील नामांकित राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित बंडू भाऊचा राज्यातील विविध सामाजिक संस्थांकडून पुरस्कार आणि सत्कार झाला. आज पुरस्कारांचे स्मृतिचिन्ह लावण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. समाजाच्या भल्यासाठी त्याच्या अनेक उपक्रमात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या मी सहयोग देण्याचा प्रयत्न करीत असतो.

9 सप्टेंबर रोजी आज वाढदिवसानिमित्त मित्र, मार्गदर्शक आणि तरुणांचा प्रेरणास्थान पर्यावरणप्रेमी बंडू भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

- देवनाथ गंडाटे




शुक्रवार, सप्टेंबर ०८, २०२३

कुणबी ओबीसी (Kunbi OBC) करिता आवश्यक कागदपत्रे | Cast Certificate

कुणबी ओबीसी (Kunbi OBC) करिता आवश्यक कागदपत्रे | Cast Certificate

ब्रेकिंग ! - मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारकडून जीआर जारी



🧐 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरवाली सराटी या गावात उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे. 

📝 या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनंतर अधिकृत जीआर सरकारकडून जारी करण्यात आला आहे. नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी दाखले देण्यात येणार असा हा जीआर आहे. 

पहा कसा आहे जीआर

📜 ज्यांकडे निजामकालीन कुणबी अशा नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते. त्यानंतर आता राज्य सरकारकडून याबाबतचा अधिकृत जीआर काढण्यात आला आहे.

👉 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल निर्देश दिल्याप्रमाणे मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा - कुणबी, कुणबी - मराठा जात प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी-

🗣️ निवृत्त न्यायमूर्तींची समिती नेमण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. याशिवाय मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घ्यावे अशी विनंती देखील एकनाथ शिंदे यांनी केली आहे. 

LATEST POSTS


 कुणबी .बी..सी (OBC) करिता आवश्यक कागदपत्रे :-

कुणबीसाठी साधारण ८० ते १०० वर्षापूवीर्ंपासूनची वंशावळ, 

  • शाळा सोडल्याचा दाखला, जन्म-मृत्यूचा दाखला, ७/१२ चा उतारा, 
  • फेरफार नोंदणी, वारसा, महसूल पुरावा, 
शिधापत्रिका, प्रतिज्ञापत्र आणि कुणबी असल्याचे दोन ते तीन पुरावे आवश्यक 
शाळा सोडल्याचा दाखला मिळणे काहीसे मुश्कील असते. त्यामुळे खरेदीखत व इतर कागदपत्रांमध्ये कुणबीच्या पुराव्यासह अर्ज दाखल केला जातो. अर्जदाराचा वंशावळीचा पुरावा जुळल्यानंतर तसेच मोडी लिपीमध्ये कुणबी आदी कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळविण्याच्या वाटचालीला सुरुवात होते. कुळासह अन्य कागदपत्रे दाखल केल्यानंतर आणि त्याचा अहवाल सादर झाल्यानंतर कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असल्यास ती फाईल पुन्हा तहसील कार्यालयात जाते          

  कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पुढील प्रमाणे करा

१) पुर्वतयारी – जातीचा पुरावा काढणे
२) आवश्यक कागदपत्रे जमा करणे
३) प्रक्रिया – सेतु केंद्रातुन जातीचा दाखला काढणे

विहित नमुन्यातील अर्ज कोर्ट फी स्टँप सह.प्रतिज्ञा पत्र  नातेवाईकाचे प्रतिज्ञापत्र

शालासोडल्याचा दाखला जर अर्जदार अशिक्षित असेल तर मुलाचे मुलीचे शाळेचा दाखला.प्राथमिक शाळेचा प्रवेश निर्गम उतारा.

शासकीय संस्थेत असल्यास सेवा पुस्तिकेच्या पहिल्या पानाचा प्रमाणित उतारा.

आजोबा,वडील,सख्या भाऊ-बहिण यांची जात नमूद असलेला दाखला म्हणजेच त्यांचा शालेय पुरावा.

अर्जदार परराज्यातील स्थलांतरीत असल्यास तेथील जातीचे दाखल्याची प्रत.

मंडळ अधिकारी यांचा गृह चौकशी अहवाल.

लाईटबिल,घर कर पावती,भाडेपत्र,शिधापत्रिका उतारा.

मागील तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला.

वरील प्रमाणे कागदपत्रे पुरावे नसतील तर सम्बन्धित व्यक्तीला खालील प्रमाणे कागदपत्राची पूर्तता करणे आवश्यक राहील.

खापर पंजोबा आणि पंजोबा यांचे जुने कुणबी उल्लेख असलेले पुरावे.उदा.रेकॉर्डरूम तहसील कार्यालय येथे गाव नं.१४ चा उतारा ज्यात नाव  कुणबी उल्लेख आढळतो.साधारणता ते सन १९६१ पूर्वीचे असावेत.

१०जुने खरेदीखत त्याच बरोबर वंशावळ  प्रतिज्ञापत्र

११अर्जदाराने सादर केलेले दस्तऐवज मोडी लिपीतील असतील तर मोडींमधील दस्तऐवजांचे शासनमान्यता प्राप्त मोडी वाचकाकडून मराठीत रुपांतर करून तसे प्रतिज्ञापत्र स्टम्प पेपरवर करावे. मूळप्रत जोडावी .

१२जातीचा दाखला प्राप्त करण्यासाठी वयाची अट नसते .जातीचा दाखल्याच्या वेळी जे प्रतिज्ञा द्यावे लागते.ते अर्जदार वय १८ पूर्ण नसल्यास त्याचे पालक सादर करून जातीचा दाखला प्राप्त करू शकतात.

यासाठी लागणार कालावधी :- १५ दिवस.                        

-----------------------

👉आवश्यक कागदपत्रे जमा करणे
● जातीचा पुरावा – अर्जदाराचा किंवा रक्तसंबंधातील नातेवाईकाचा कुणबी जातीचा पुरावा (संबंधित नातेवाईक जर मृत असेल तर त्याच्या मृत्युचा दाखलाही काढावा.)

● रहिवासी पुरावा – १३ ऑक्टोबर १९६७ किंवा त्यापुर्वीच्या सर्वसाधारण कायमस्वरुपी रहिवासाच्या ठिकाणाचा लेखी पुरावा.

● अर्जदाराचा आणि अर्जदाराच्या रक्तसंबंधातील नातेवाईकाचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनफाईड सर्टिफिकेट (जन्मतारीख व जन्मस्थान यांचा उल्लेख आवश्यक)

● ओळखीचा पुरावा (कोणताही एक) – अर्जदाराचा फोटो असणाऱ्या आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा तत्सम अधिकृत ओळखपत्राची साक्षांकित प्रत.
आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट
● पत्त्याचा पुरावा (कोणताही एक) – रेशनकार्ड, लाईट बिल, मिळकत कर पावती, ७/१२ किंवा ८अ उतारा, फोन बिल, पाणीपट्टी किंवा घरपट्टीची साक्षांकित प्रत.
● विहित नमुन्यातील अर्ज व त्यावर १०₹ चे कोर्ट फी स्टॅम्प/तिकीट आणि अर्जदाराचा फोटो

● अर्जदाराचे स्वतःच्या कुणबी जातीबाबत आणि रक्तसंबंधातील ज्या नातेवाईकाचा कुणबी जातीचा पुरावा सादर केला आहे त्याच्यासोबत असणारे नाते दर्शवणाऱ्या वंशावळीबाबत १००₹ च्या स्टॅम्प पेपरवर स्वयं घोषणापत्र/शपथपत्र/प्रतिज्ञापत्र
● १९२० पर्यंतची महसुली कागदपत्रे बहुतांशकरुन मोडी लिपीतील असतात. अर्जदाराने जातीचा पुरावा म्हणुन सादर केलेले कागदपत्र जर मोडी लिपीतील असेल तर त्या कागदपत्राचे शासन मान्यताप्राप्त मोडी लिपी वाचकाकडुन मराठीत भाषांतर केल्याचे प्रमाणपत्र घ्यावे आणि त्यात दिलेल्या माहितीबाबत १००₹ च्या स्टॅम्प पेपरवर स्वयं घोषणापत्र/शपथपत्र/प्रतिज्ञापत्र तयार करावे.

● एखाद्याच्या कागदपत्रातील नावात किंवा आडनावामध्ये किरकोळ बदल, वगैरे असल्यास त्याबाबत १००₹ स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र तयार करावे.

● गृहचौकशी अहवाल – पुर्वीच्या काळी शिक्षणाविषयी आस्था नसल्याने लोक शिकत नसत. तसेच जन्ममृत्युच्या नोंदी ठेवण्याचीही लोकांना गरज वाटत नसे. त्यामुळे जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी कागदपत्रांची जमवाजमव करताना खुप अडचणी येतात. खुप प्रयत्न करुनही जातीचा उल्लेख असणारा सक्षम पुरावा उपलब्ध न झाल्याने अर्जदाराचा अर्ज फेटाळला जातो. या बाबीचा विचार करुन २००४ मध्ये एक शासन निर्णय घेण्यात आला. जर एखाद्या अर्जदाराचा जातीविषयी पुरावा उपलब्ध होत नसेल तर सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत संबंधित अर्जदाराच्या कुटुंबाची सखोल गृहचौकशी करुन त्याच्या जातीच्या दाव्याची खातरजमा करावी असा तो शासननिर्णय आहे. त्यानुसार तहसीलदार हा मंडल अधिकाऱ्याच्या मार्फत अर्जदाराच्या कुटुंब, शाळा, कागदोपत्रे, जमीनविषयक बाबी, जातीविषयक चालीरीती, प्रथा, परंपरा, कुलदैवत, इत्यादींची गृहचौकशी करुन त्याच्या कायमस्वरुपी वास्तव्य आणि जातीबाबत खातरजमा करतो. तसेच मंडल अधिकाऱ्याच्या गृह चौकशी अहवालाचे अवलोकन अर्जदाराच्या अर्जाबाबत निर्णय घेतो. शक्य असल्यास या गृहचौकशी अहवालाची एक प्रत घ्यावी.
आता आपण तयारी करू

👉अ) पुर्वतयारी – जातीचा पुरावा मिळवणे
.

कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुमच्याकडे १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्याच्य आधी जन्म झालेल्या तुमच्या रक्तनातेसंबंधातील नातेवाईक (तुमचे वडील/चुलते/आत्या, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा, वडिलांचे चुलते/आत्या, आजोबांचे चुलते/आत्या, पणजोबांचे चुलते/आत्या, खापर पणजोबांचे चुलते/आत्या, इत्यादि) यापैकी कुठल्याही एका नातेवाईकाचा कुणबी जात सिद्ध करणारा जातीचा पुरावा असणे आवश्यक आहे. हा जातीचा पुरावा मिळवण्यासाठी पुढीलपैकी पर्याय तपासावेत

आ) रक्तसंबंधातील नातेवाईकाचा प्राथमिक शाळा प्रवेश निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला काढुन त्यावर कुणबी नोंद आहे का ते तपासावे.

इ) स्वातंत्र्यपुर्व काळात गावातील प्रत्येकाच्या जन्ममृत्युची नोंद त्याच्या जातीसह कोतवाल बुक किंवा गाव नमुना नं.१४ मध्ये ठेवली जात असे. पुर्वी या नोंदी दरमहा तहसील कार्यालयात पाठवल्या जायच्या. १ डिसेंबर १९६३ पासुन कोतवाल पद महसुल विभागाकडे वर्ग झाल्यानंतर हे काम ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडे देण्यात आले. आपल्या रक्तनातेसंबंधातील नातेवाईकाचा जन्म किंवा मृत्यु झालेल्या गावाशी संबंधित तहसील कार्यालयात अर्ज करुन त्याच्या नावाच्या गाव नमुना नं.१४ किंवा कोतवाल बुकाची नक्कल मागणी करावी. त्यात कुणबी नोंद आहे का ते तपासावे.

ई) आपल्या कुळातील जुन्या महसुली कागदपत्रांपैकी वारस नोंदी (६ ड नोंदी), जमीन वाटप नोंदी, ७/१२ उतारे, ८अ उतारे, फेरफार, खरेदीखत, भाडेपट्टा, सातबारा अंमलात येण्याआधी असणारे क.ड.ई.पत्र, सुडपत्र, खासरा पत्रक, हक्कपत्रक किंवा तत्सम इतर कुठल्याही महसुली कागदपत्रांमध्ये कुणबी जातीचा उल्लेख आहे का ते शोधावे आणि असेल तर ते कागदपत्र काढुन घ्यावे.
आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट
उ) रक्तसंबंधातील नातेवाईक शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत असल्यास सर्व्हिस बुकच्या पहिल्या पानावर संबंधित कार्यालयाने त्या नातेवाईकाची कुणबी जात नोंद केलेली असल्यास त्याचा साक्षांकित केलेला उतारा घ्यावा.
ऊ) रक्तसंबंधातील नातेवाईकाने अगोदरच कुणबी जात प्रमाणपत्र काढले असेल तर त्याचे कुणबी जात प्रमाणपत्र आणि समाज कल्याण खात्याच्या छाननी समितीने वैध ठरवलेले त्याचे कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र हे सुद्धा जातीचा पुरावा म्हणुन चालेल.

‼️सेतु केंद्रातुन कुणबी जात प्रमाणपत्र काढणे
सेतु/नागरी सुविधा केंद्र/तहसील कार्यालयामधुन कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक असणारा फॉर्म घ्यावा. त्यातील सर्व माहिती अचुकपणे भरुन तुमची सही करावी. त्यावर १०₹ किंमतीचे कोर्ट फी स्टँप/तिकीट लावावे. तुमचा फोटो लावावा. या फॉर्मसोबत वर यादीत दिलेली सर्व आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडावीत. हा पुर्ण भरलेला व आवश्यक कागदपत्रे जोडलेला फॉर्म सेतु/नागरी सुविधा केंद्र/तहसील कार्यालयमध्ये/मे.प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावा. फॉर्म सादर केल्यावर त्याची पोचपावती/टोकन घ्यावे. सदर टोकन वर तुमचे जात प्रमाणपत्र मिळण्याची तारीख दिली जाते. हे टोकन जपुन ठेवावे आणि टोकनवर दिलेल्या दिवशी येऊन टोकन दाखवुन आपले जात प्रमाणपत्र घ्यावे. त्यावर मे.प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी यांची सही-शिक्का असल्याची खात्री करावी. जात प्रमाणपत्र मिळाल्यावर त्याच्या आवश्यक तेवढ्या झेरॉक्स काढुन सत्यप्रत (True Copy) तयार करुन ठेवाव्यात.
जात प्रमाणपत्र मिळाल्यानंतर शेवटी जात पडताळणी करावी लागते. जात पडताळणी झाल्यानंतरच जात वैधता प्रमाणपत्र मिळते.
-
👉या सुचना लक्षात ठेवा
१) १३ ऑक्टोबर १९६७ पुर्वीपासुन महाराष्ट्रात वास्तव्यास असलेला महसुली पुरावा (उदा.जमीन, घर वगैरे) किंवा शैक्षणिक पुरावा (उदा.शाळा सोडल्याचा दाखला, प्रवेश निर्गम उतारा वगैरे) असे दोन पुरावे मागितले जातात. हे दाेन्ही पुरावे ज्यांना देणे शक्यच नाही, त्यांनी नियमाप्रमाणे शपथपत्र लिहुन द्यावे. त्यात पुरावा न देण्याची सबळ कारणे स्पष्ट करावीत. सक्षम प्राधिकारी त्यावर गृहचौकशी करुन अहवाल मागवतो. त्या अहवालाचा विचार करुन, त्याची शहानिशा करुन तो संबंधितांना जात प्रमाणपत्र देण्याचा किंवा टाळण्याचा निर्णय घेईल अशी तरतुद आहे.

२) जातीचा पुरावा काढताना तो १३ ऑक्टोबर १९६७ च्या अगोदरचा असेल तरच महत्वाचा असतो. नंतरचे पुरावे दुय्यम मानले जातात.
अर्जदाराने धर्मांतर केले असल्यास त्याचा धर्मांतरापुर्वीचा जातीचा पुरावा घ्यावा.

४) अर्जदार जर विवाहीत स्त्री असेल तर तिने अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडावीत.
अ) तिची विवाहापुर्वीची जात सिध्द करणारा कोणताही एक जातीचा पुरावा
ब) विवाहाचा पुरावा म्हणुन विवाह नोंदणी दाखला किंवा लग्नपत्रिका किंवा पोलीस पाटलाचा दाखला.
क) राजपत्र/गॅझेटमध्ये प्रसिध्द झालेला नावातील बदल, इत्यादि.


Cryptocurrency

NFT

Metaverse

Web3

Blockchain

Investing

Personal Finance

Business

Marketing

Entrepreneurship

Health and Wellness

Travel

मराठवाडयातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये सुसुत्रता येण्यासाठी व यावर अभ्यास करून अहवाल देण्यासाठी / शिफारशी करण्यासाठी अपर मुख्य सचिव (महसूल) यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापण्याबाबत..

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202305291712412907.pdf

कुणबी (OBC) ची Cast Certificate कशी काढावी ?


लोक हेदेखील ‍व‍िचारतात