40 मजली इमारतीची लिफ्ट
कोसळली; सहा कामगार ठार
महाराष्ट्र: ठाणे में बड़ा हादसा, 40 मंजिला इमारत की लिफ्ट गिरी; 6 लोगों की मौत
#maharashtra #majoraccidentinthane #peoplediedthane #mumbaiaccident #thanenews #maharashtrapoice #crimenews
ठाणे, 10 सप्टेंबर 2023: (#Maharashtra #Thane) ठाण्यातील बाळकुम परिसरात 40 मजली इमारतीची लिफ्ट कोसळून सहा कामगार ठार झाले आहेत. या दुर्घटनेत आणखी काही कामगार जखमी झाले आहेत. इमारतीच्या छतावर वॉटरप्रूफिंगचे काम सुरू होते. हे काम संपवून कामगार खाली येत असताना हा अपघात घडला. लिफ्ट थेट इमारतीच्या तळाशी कोसळली.
या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, पोलीस, स्थानिक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.घटनास्थळी ०७ - कामगारांना अपघात ग्रस्त लिफ्ट मधून बाहेर काढण्यात आले असून त्यातील ०६ - कामगार मृत व ०१- कामगार जखमी अवस्थेत होता. जखमीला उपचाराकारिता निपुण रुग्णालय, ठाणे याठिकाणी पाठविण्यात आले आहे व मृतांना जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे येथे पुढील कार्यवाही करिता पाठविण्यात आले आहे.
मृत कामगारांची नावे
जखमींची नावे खालीलप्रमाणे :-*
श्री. सुनिल कुमार दास (पु / वय २१ वर्षे )
*मृतांची नावे खालील प्रमाणे :-*
*१)* महेंद्र चौपाल (पु / वय ३२ वर्षे )
*२)* रुपेश कुमार दास (पु / वय २१ वर्षे )
*३* हारून शेख (पु / ४७ वर्षे )
*४* मिथलेश (पु / ३५ वर्षे )
*५)* कारिदास (पु / ३८ वर्षे )
*६)* अज्ञात (पु)
या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
आज दिनांक १०/०९/२०२३ रोजी १७:३५ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार (घटनेची माहिती देणारे:- बाळकुम अग्निशमन केंद्र) रुणवाल कॉम्प्लेक्स, बाळकूम, ठाणे (प.) याठिकाणी आयरीन बिल्डिंगच्या (तळ + ४० मजली बांधकाम सुरु असलेली इमारत + भूमिगत ०३ मजली पार्किंग) चाळीसव्या मजल्यावर लिफ्टचा रोप तुटल्याने अपघात होऊन सदर लिफ्ट भूमिगत पार्किंगच्या बेसमेन्ट मध्ये कोसळली असून ०७ कामगार अडकले होते. *सदर घटनास्थळी मा. उपायुक्त सो., मा. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान ०१ - इमर्जन्सी टेंडर व ०७ - रुग्णावाहिकांसह उपस्थित होते.