चंद्रपूर : चंद्रपूर शहरात गणेश विसर्जन Ganesh Utsav 2023 आणि इद ए मिलाद (Eid-e-Milad ) हे दोन्ही सण 28 सप्टेंबर रोजी एकाच दिवशी येत आहेत. यामुळे दोन्ही सणांचे उत्सव साजरे करण्यास अडचण निर्माण होणार होती. मात्र, मुस्लिम समाजाच्या निर्णयाने ही अडचण दूर झाली आहे. हे सण उत्साहात साजरे व्हावे यासासाठी इद ए मिलादची मिरवणूक २८ सप्टेंबर रोजी २९ रोजी मिरवणूक काढण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे गणेश विसर्जन आणि इद ए मिलाद या दोन्ही सणांचे उत्सव उत्साहात साजरे होण्यास मदत होईल.
दादमहाल मदरसा येथे मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी आणि मशीद प्रमुख यांची बैठक पार पडली. या बैठकीत गणेश विसर्जन आणि इद ए मिलाद या दोन्ही सणांचे उत्सव उत्साहात साजरे व्हावे यासाठी निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, इद ए मिलादची मिरवणूक 28 सप्टेंबर रोजी न काढता 29 सप्टेंबर रोजी काढण्यात येणार आहे.
चंद्रपूरमध्ये गणेश विसर्जन आणि इद ए मिलाद Eid-e-Milad एकाच दिवशी, मुस्लिम समाजाने मिरवणुकीचा निर्णय पुढे ढकलला आहे. गणेश विसर्जन 28 सप्टेंबर रोजी होत असून, गांधी चौक ते जटपुरा गेट आणि जटपुरा गेट ते कस्तुरबा रोड गिरनार चौक या मार्गावर मिरवणूक होईल. या निर्णयाचे चंद्रपूर शहरातील सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. या निर्णयामुळे हिंदू-मुस्लिम सलोखा वाढण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले जात आहे.