Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

चंद्रपूर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चंद्रपूर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ऑक्टोबर ०५, २०२३

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र

शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भात व कर्मचारी नियुक्ती बाबत संविधान विरोधी घेतलेला निर्णय रद्द करण्यात यावा अशा मागणीचे पत्र राष्ट्रीय पुरोगामी संघ, भद्रावतीने तहसीलदार भद्रावती यांचे मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री, जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना देण्यात आले.

सरकारी शाळा हे उद्योगपतींना देऊन शिक्षणाचे खाजगीकरण करण्याचा, सरकारी शाळा बंद करण्याचा, शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही खाजगी कंपन्या मार्फत कंत्राटी पद्धतीने भरण्याचा संविधान विरोधी निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला आहे. हा घेतलेला निर्णय संविधान विरोधी असून सामान्य, वंचित, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचे षडयंत्र आहे.

पुरोगामी महाराष्ट्रात बहुजनांना शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अन्य समाजसुधारक यांनी बहुजनांच्या हितासाठी शिक्षण सुरू केले. मात्र भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शिवाजी महाराजांच्या जन कल्याणकारी, पुरोगामी महाराष्ट्रात शिक्षण विरोधी धोरण अवलंबिले आहे. शून्य ते वीस पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद होत आहेत. सरकारी शाळा उद्योगपतींना दत्तक देण्यात येणार आहेत. सरकारी कामकाज ज्या कर्मचारी वर्गाकडून पूर्ण होतो ती नोकर भरती ही कंत्राटी पद्धतीने खाजगी कंपन्या मार्फत केली जाणार आहे. यात कर्मचाऱ्यांना नोकरी ची शाश्वती असणार नाही. हे संविधान विरोधी असून पुरोगामी महाराष्ट्राला कलंकित करणारे आहे.
एकीकडे संविधानाने मोफत शिक्षणाचा अधिकार मुलांना दिला आणि दुसरीकडे मात्र सरकारी शाळा बंद करण्याचा घाट यामार्फत चाललेला आहे. आपण घेतलेला शाळा बंद करण्याचा, शाळा दत्तक देवून खाजगीकरण करण्याचा तसेच खाजगी कंपन्यांमार्फत कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नियुक्ती करण्याचा आदेश त्वरित रद्द करावा.

या आपल्या निर्णयावर सामान्य माणसाला असुरक्षितपणा, आपल्या पाल्यांच्या भविष्याची चिंता त्रस्त करीत आहे. राज्य सरकारचे ध्येय जनकल्याणासाठी कार्य करीत राहणे हे आहे. तेव्हा राज्य सरकारने घेतलेला संविधान विरोधी, जनकल्याण विरोधी निर्णय त्वरित रद्द करावा. असे पत्र पुरोगामी पत्रकार संघ, भद्रावतीने तहसीलदार अनिकेत सोनावणे यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले.

यावेळी पुरोगामी पत्रकार संघ, भद्रावती चे अध्यक्ष प्रविण चिमुरकर, डॉ. ज्ञानेश हटवार, मनोज मोडक, हर्षल रामटेके, उमेश कामडे, शिरीष उगे, आशीष कोटकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा  #Goverment #School

सोमवार, सप्टेंबर ११, २०२३

गणेश विसर्जननिमित्त मुस्लिम समाजाने घेतला 'असा' निर्णय | Muslim Eid-e-Milad  Ganesh Utsav 2023

गणेश विसर्जननिमित्त मुस्लिम समाजाने घेतला 'असा' निर्णय | Muslim Eid-e-Milad Ganesh Utsav 2023

चंद्रपूर : चंद्रपूर शहरात गणेश विसर्जन Ganesh Utsav 2023 आणि इद ए मिलाद (Eid-e-Milad ) हे दोन्ही सण 28 सप्टेंबर रोजी एकाच दिवशी येत आहेत. यामुळे दोन्ही सणांचे उत्सव साजरे करण्यास अडचण निर्माण होणार होती. मात्र, मुस्लिम समाजाच्या निर्णयाने ही अडचण दूर झाली आहे. हे सण उत्साहात साजरे व्हावे यासासाठी इद ए मिलादची मिरवणूक २८ सप्टेंबर रोजी २९ रोजी मिरवणूक काढण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे गणेश विसर्जन आणि इद ए मिलाद या दोन्ही सणांचे उत्सव उत्साहात साजरे होण्यास मदत होईल.

दादमहाल मदरसा येथे मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी आणि मशीद प्रमुख यांची बैठक पार पडली. या बैठकीत गणेश विसर्जन आणि इद ए मिलाद या दोन्ही सणांचे उत्सव उत्साहात साजरे व्हावे यासाठी निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, इद ए मिलादची मिरवणूक 28 सप्टेंबर रोजी न काढता 29 सप्टेंबर रोजी काढण्यात येणार आहे.

चंद्रपूरमध्ये गणेश विसर्जन आणि इद ए मिलाद Eid-e-Milad  एकाच दिवशी, मुस्लिम समाजाने मिरवणुकीचा निर्णय पुढे ढकलला आहे. गणेश विसर्जन 28 सप्टेंबर रोजी होत असून, गांधी चौक ते जटपुरा गेट आणि जटपुरा गेट ते कस्तुरबा रोड गिरनार चौक या मार्गावर मिरवणूक होईल. या निर्णयाचे चंद्रपूर शहरातील सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. या निर्णयामुळे हिंदू-मुस्लिम सलोखा वाढण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले जात आहे.

रविवार, सप्टेंबर १०, २०२३

या जिल्ह्यात येणार पाऊस  | Nagpur, Chandrapur, Gondia, Bhandara, Gadchiroli

या जिल्ह्यात येणार पाऊस | Nagpur, Chandrapur, Gondia, Bhandara, Gadchiroli

या जिल्ह्यात येणार पाऊस

rain weather forecast । पुढच्या काही तसाच नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात खामगाव शहरात काल रात्रीपासून सुरू आहे सततच्या पावसामुळे आज पहाटे साडेतीनशे सुमारास खामगाव शहरात जलंब नाका परिसरात एका घराचे नुकसान झालं. येत्या काही तासात नागपूर वर्धा यवतमाळ भंडारा चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात खामगाव शहरात काल रात्रीपासून पावसाची सतत धार सुरू असून अनेक दिवसांपासून गायब असलेला पाऊस सुरू झाल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येतोय सततच्या पावसामुळे आज पहाटे साडेतीनच्या सुमाराला खामगाव शहरात जलंब नाका परिसरात एका घराची भिंत कोसळून त्याच्यात असा उद्वस्त झालं मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

नागपूर, 10 सप्टेंबर 2023: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांत (10 आणि 11 सप्टेंबर) पूर्वविदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नागपुर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली (Nagpur, Chandrapur, Gondia, Bhandara, Gadchiroli) या पाच जिल्ह्यांत पुढील पाच दिवस (6 ते 10 सप्टेंबर) आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

11 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. 7 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. 10 आणि 11 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

गडचिरोली जिल्ह्यात पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ ते पूर्णता ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 11 ते 12 सप्टेंबर रोजी सर्वत्र ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. 9 आणि 10 सप्टेंबर रोजी बहुदा सर्वत्र ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हवामान विभागाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदी, नाले, धरणांच्या काठावरून सुरक्षित अंतर ठेवावे. तसेच, घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज घेऊन बाहेर पडावे.

अतिवृष्टीमुळे होणारे संभाव्य नुकसान

  • पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता
  • रस्ते, पुल, इमारतींचे नुकसान
  • शेतीचे नुकसान
  • जीवितहानी

अतिवृष्टीपासून बचाव

  • नदी, नाले, धरणांच्या काठावरून सुरक्षित अंतर ठेवा
  • घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज घेऊन बाहेर पडा
  • मुसळधार पावसाच्या वेळी घरातच रहा
  • आवश्यक असल्यास, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या
  • पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती त्वरित द्या
  • Heavy rain
  • Eastern Vidarbha
  • Nagpur, Chandrapur, Gondia, Bhandara, Gadchiroli
  • Cloudy sky
  • Light to moderate rain
  • Thunderstorm with lightning
  • Possibility of flooding
  • Safety measures to be taken during heavy rain
मराठा आरक्षणाला विरोध; 17 सप्टेंबरला महा आंदोलन |Maratha reservation

मराठा आरक्षणाला विरोध; 17 सप्टेंबरला महा आंदोलन |Maratha reservation

मराठा आरक्षणाविरोधात 17 सप्टेंबरला संपूर्ण तेली समाज ओबीसीच्या महामोर्चात रस्त्यावर उतरेल

चंद्रपूर : राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाबाबत 17 सप्टेंबरला गांधी चौक येथून निघणाऱ्या ओबीसी महामोर्चात तेली समाज मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आज तेली समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

आज स्व. खासदार बाळूभाऊ धानोरकर अभ्यासिकेत तेली समाजाची आढावा बैठक घेण्यात आली. या प्रसंगी शेकडो तेली समाज बांधव उपस्थित होते.

बैठकीत बोलताना तेली समाजाचे नेते प्रा. सुर्यकांत खनके यांनी सांगितले की, मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्याचे निमित्त करून सरसकट मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये. मराठा समाजाला कुणबी जातीचा दाखला देण्याचा निर्णय घेतल्यास कुणबी समाज ओबीसीमध्ये असल्यामुळे तेली समाजासह अन्य समाजावर देखील हा अन्याय होणार आहे. त्या मुळे तेली समाज रस्त्यावर उतरून सरकारचा विरोध करणार आहे.

याप्रसंगी विदर्भ तेली समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सूर्यकांत खणके, प्राध्यापक डॉ. नामदेवराव वरभे, प्रा. प्रवीण पोटदुखे, डॉ. संजय बेले, विदर्भ तेली समाज महासंघ शहर अध्यक्ष गोपाल अमृतकर, विदर्भ तेली समाज महासंघ गोविल मेहरकुरे, माजी नगरसेवक आकाश साखरकर, ओमप्रकाश पोटदुखे, रवींद्र जुमडे, प्रा. पांडुरंग मोहरकर, भूपेश गोठे, नरेंद्रजी बुरांडे, डॉ. प्रसाद पोटदुखे, गणेश येरणे, यश बांगडे, अशोक रहाटे, चंद्रशेखर घटे, मनीष खनके, नितेश जुमडे, योगेश देवतळे, सचिन किरमे, गणेश तिघारे, पुरुषोत्तम मोगरे, अजय खनके, गोपीभाऊ खोब्रागडे, हरिदास नागपुरे, संजय कुकडे, सुनील बुटले, भूपेंद्र खनके, भरत कुंडले, संजय बिजवे, गणेश पोहाणे, विनोद निखाते, अक्षय किरमे, ॲड. मुरलीधरराव बावनकर, उमेश मोगरे, कैलास राहटे, ओमप्रकाश पोटदुखे, प्रा. पांडुरंग मोहरकर, महेश टीपले, मनीष तपासे, सुभाष निखाते यांची उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित असलेल्या तेली समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमताने निर्णय घेतला की, 17 सप्टेंबरला निघणाऱ्या ओबीसी महामोर्चात संपूर्ण तेली समाज मोठ्या संख्येने सहभागी होईल.

बैठकीत तेली समाजाच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी तेली समाजाच्या सर्व मागण्या मान्य करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी तेली समाजाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.