ग्रंथदिंडीने दुमदुमली चांदानगरी
Live from Vidarbha Sahitya Sammelan |
विदर्भ साहित्य संघाच्या ( Vidarbha Sahitya Sangha) शताब्दी वर्षानिमित्ताने चंद्रपुरात ६८वे विदर्भ साहित्य संमेलनास आजपासून प्रारंभ झाला. शुक्रवार दि. १६ डिसेंबर ला सकाळी ८ वाजता सरदार पटेल महाविद्यालयाच्या संयोजनात शिवाजी चौक येथून ग्रंथदिंडी निघाली. गांधी चौक येथे महात्मा गांधी पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बरी. राजाभाऊ खोब्रागडे पुतळा, जटपूरा गेट येथे महात्मा गांधी पुतळा, पाणी टॉकी चौकात इंदिरा गांधी पुतळा येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, जिल्हाधिकारी विवेक गौडा यांची उपस्थिती होती.
चंद्रपूरातील अग्रणी शिक्षण संस्था सर्वोदय शिक्षण मंडळ, गोंडवाना विद्यापीठ व सुर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने १६, १७ व १८ डिसेंबरला प्रख्यात विचारवंत आणि लेखक डॉ. वि. स. जोग यांचे अध्यक्षतेत स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात सदर साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.
ग्रंथदिंडी पोहोचल्यानंतर संमेलनाचे उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ६७ वे विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वि. स. जोग, स्वागताध्यक्ष कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, आमदार अभिजीत वंजारी, वेदप्रकाश मिश्रा, अड. फिरदौस मिर्झा, श्रीधर काळे, माजी आमदार सुदर्शन निमकर, श्रीराम कावळे, इको प्रो अध्यक्ष बंडू धोत्रे, प्रा. अशोक जीवतोडे, प्रशांत पोटदुखे, प्रदीप दाते,
सुर्यांश चे अध्यक्ष इरफान शेख, माजी कुलगुरू कीर्तीवर्धन दीक्षित यांची मंचावर उपस्थित होते.
प्रास्ताविक डॉ. प्रमोद काटकर यांनी केले.