18 ऑक्टोबर रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन
नामांकित कंपन्यामार्फत 2 हजारपेक्षा जास्त पदे भरण्यात येणार
चंद्रपूर, दि. 11 ऑक्टोबर: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूरतर्फे मंगळवार, दि. 18 ऑक्टोबर, 2022 रोजी सकाळी 11 वाजता ज्युबली हायस्कुल, चंद्रपूर येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र स्टार्ट अप, रोजगार व उद्योजकता सप्ताहानिमीत्त या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून जिल्हातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने,राज्यांतील नामांकित उद्योजकांचा थेट नोकरीस इच्छुक उमेदवारांशी संपर्क करण्याच्या दृष्टीने, सदर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे.
या रोजगार मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या सहभागी होत असून या माध्यमातून विविध नामांकित कंपन्यामार्फत 2 हजारपेक्षा जास्त पदे भरण्यात येणार आहे. या मेळाव्यातून उमेदवारांना नागपूर, चंद्रपूर, कोल्हापूर औरंगाबाद, पूणे व अमरावती या जिल्ह्याच्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. या कंपन्यामध्ये विविध पदे असल्याचे उद्योजकांकडुन कळविण्यात आले आहे.
मेळाव्याकरीता उमेदवारांनी आधारकार्ड, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राचे छायाकिंत कमीत-कमी तीन प्रतींसह उपस्थित राहावे. मेळाव्यामध्ये सहभागी होण्याकरीता https://rojgar.mahaswayam.gov.