Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रोजगार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रोजगार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ऑगस्ट ०८, २०२३

वंजारी फाऊंडेशनच्या जॉब कार्ड विषयी माहिती आहे का? नोकरीसाठी होणार फायदा | Job Card

वंजारी फाऊंडेशनच्या जॉब कार्ड विषयी माहिती आहे का? नोकरीसाठी होणार फायदा | Job Card



नागपूर: गुरूवार दि.10 ऑगष्ट 2023 रोजी नागपूर विभागांतर्गत सर्व जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाखेतील पदवीधर युवकांसाठी गोविंदराव वंजारी फाऊंडेशनच्या वतीने जॉब कार्ड वितरणाचा कार्यक्रम होऊ घातला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष आ. नानाभाऊजी पटोले यांच्या शुभहस्ते होणार असून मुख्य अतिथी म्हणून नागपूर शहर कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, नागपुरचे जिल्हाधिकारी डॉ. नितीन इटनकर तसेच पोलीस आयुक्त अमितेशकुमारजी याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.

Job Card Distribution Program on behalf of Govindrao Vanjari Foundation

स्व.आमदार गोविंदरावजी वंजारी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाची संकल्पना नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाचे आमदार अँड.अभिजित गो. वंजारी यांची आहे. तसेच याप्रसंगी देशातील सर्व प्रकारच्या युपीएससी, एमपीएससी, बँकीग, रेल्वे, सहकार क्षेत्र, तत्सम प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची अचूक व महत्वपूर्ण माहिती असणान्या अभ्यासिकेचे विमोचन सुध्दा याप्रसंगी होणार आहे. गोविंदराव वंजारी फाऊंडेशन व पुण्यातील जॉब फेअर इंडियाच्या संयुक्त विद्यमाने जॉब कार्ड वितरणाचा कार्यक्रम आयोजित कैलेला आहे. यामध्ये राज्यातील व देशातील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील नोकरीची संधी बेरोजगार पदवीधरांना उपलब्ध होणार असून यामध्ये सर्व प्रकारचे पदवीधर त्यामध्ये इंजिनिअरिंग, फार्मसी, लॉ, बी.ए., बी.कॉम., बी.एससी, बीबीए, बीसीसीए, बीसीएस तसेच अनेक प्रकारच्या पदवीधरांचा समावेश करण्यात आलेला आहे.

या जॉब कार्डच्या माध्यमातून कार्ड अक्टीवेट झाल्यानंतर त्या पदवीधर युवकाला वर्षाच्या 365 दिवसापैकी किमान दोनशेपेक्षा अधिक दिवस दररोज एसएमएस द्वारे वेगवेगळ्या कंपनीतील नोकरीची माहितीची उपलब्धता होणार असून या माध्यमातून होतकरू अशा पदवीधर युवकांना योग्य ठिकाणी सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे. आतापर्यंत या जॉब कार्डकरिता 10000 पेक्षा अधिक युवक-युवतींनी Abhijitwanjarri.jobfairindia.in या लिंकवर रजिस्ट्रेशन केलेले आहे. तसेच अजूनही या लिंकद्वारे विद्यार्थ्यांना या सुवर्णसंधीमध्ये सहभाग घेता येईल. असे आवाहन पदवीधर मतदार संघाचे आमदार अभिजित वंजारी यांनी केले आहे.

गुरुवार, जुलै १३, २०२३

नागपूर महानगरपालिकेत शिक्षकांची पदभरती; आजच संपर्क साधा #nmc #nmcschools #teacher #education #job

नागपूर महानगरपालिकेत शिक्षकांची पदभरती; आजच संपर्क साधा #nmc #nmcschools #teacher #education #job




नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकरिता माध्यमनिहाय व विषयनिहाय कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरुपात शिक्षकांची पदभरती शालेय सत्र 2023-24 मध्ये 11 महिन्यांच्या कालावधीकरिता प्रत्यक्ष मुलाखतीव्दारे करण्यात येत आहे.इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज प्रमाणपत्राच्या मूळ प्रतीसह प्रत्यक्ष मुलाखतीस नमूद वेळेत कार्यालयात उपस्थित राहावे.
अधिक माहितीकरिता www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या .
.
.
.
.
#nmc #nmcschools #teacher #education #job #employment #schooleducation #highereducation #principal #learning #school #students #study #student #knowledge #children #college #india #teaching #success

मंगळवार, एप्रिल ११, २०२३

चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये  ७६ जागांसाठी भरती| #chandrapur #indianordnancefactories #government #governmentjob

चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये ७६ जागांसाठी भरती| #chandrapur #indianordnancefactories #government #governmentjob

ऑर्डनन्स फॅक्टरी भरती २०२३| चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये पदवीधर आणि टेक्निशियन अप्रेंटिस पदांकरिता ७६ जागांसाठी भरती|

 Ordnance Factory Chandrapur Bharti 2023 is announced for 76 Graduate Apprentice and Technician Apprentice Posts.

ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये पदवीधर आणि टेक्निशियन अप्रेंटिस पदांकरिता ७६ जागांसाठी भरती जाहिर करण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण, अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख, अधिकृत वेबसाइट लिंक, जाहिरात pdf, पदांची नावे एकूण रिक्त जागा इत्यादी माहितीसाठी खालील तपशील वाचावे.

٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠

Total Post / एकूण पद : ७६ जागा
Job Location / नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर
٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠
Name of the Post & Details / पदांची नावे आणि तपशील :

क्रमांक पदांची नावे एकूण जागा
१ ग्रेजुएट अप्रेंटिस (ग्रेजुएट इंजिनिअर) ६
२ ग्रेजुएट अप्रेंटिस (जनरल) ४०
३ ग्रेजुएट अप्रेंटिस (डिप्लोमा धारक) ३०
एकूण ७६

٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠
Educational Qualification / शैक्षणिक पात्रता :

क्रमांक पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
१ १ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल /सिव्हिल अभियंता पदवी
२ २ बॅचलर ऑफ साइयंस/ बॅचलर ऑफ कॉर्मस/ बॅचलर ऑफ कंप्युटर एप्लीकेशन
३ ३ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल /सिव्हिल अभियंता डिप्लोमा

٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠
Stipend / मानधन :
पद क्रमांक स्टायपेंड (मानधन)
१ Rs.९०००/- प्रति महिना
२ Rs.९०००/- प्रति महिना
३ Rs.८०००/- प्रति महिना
٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠٠

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख / Last date of sending application form ३० एप्रिल/April



शुक्रवार, डिसेंबर २३, २०२२

आधार फाऊंडेशन तर्फे सिंदेवाही येथे करियर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन | Career Guidance Camp

आधार फाऊंडेशन तर्फे सिंदेवाही येथे करियर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन | Career Guidance Camp

*माजी मंत्री वडेट्टीवार यांचा पुढाकार - विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वितरण*


ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना घरातील हलाखीची परिस्थिती व आर्थिक अडचणीमुळे यशस्वी जीवन घडविण्याची क्षमता असतांनाही स्पर्धा परीक्षांना मुकावे लागते. तसेच स्पर्धा परीक्षांबद्दल योग्य मार्गदर्शन अभावी ग्रामीण विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याच्या मार्गावर अडसर ठरत असल्याने अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाचा मार्ग सुकर करण्यासाठी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, आ. विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकारतून आधार फाउंडेशन च्या माध्यमातून निःशुल्क करियर मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा मोफत पुस्तके वितरणाचा कार्यक्रमाचे उद्या दि. २४ डिसेंबर रोजी श्रवण लॉन सिंदेवाही येथे आयोजन करण्यात आले आहे. Aadhaar Foundation

याप्रसंगी प्रामुख्याने कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार,तर प्रमुख वक्ते म्हणून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक डॉ. विनोद आसूदानी, तसेच प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी विजय वडेट्टीवार प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी माजी मंत्री वडेट्टीवार यांच्या पुढाकारातून आधार फाउंडेशन च्या वतीने पहिल्या टप्प्यात ब्रह्मपुरी येथे इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भावी जीवनात यश संपादन करणे हेतू एमएचटी- सीइटी, जेईई - नीट या स्पर्धा परीक्षांचे झुल्क करिअर मार्गदर्शन व मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तकांची वितरण करण्यात आले होते. तसेच दुसऱ्या टप्प्यात माजी मंत्री वडेट्टीवार यांच्या पुढाकारातून आधार फाउंडेशन च्या वतीने सिंदेवाही येथील श्रवण लॉन येथे उद्या सकाळी ११ वाजता होणाऱ्या निशुल्क करियर मार्गदर्शन शिबिरात सिंदेवाही, मुल, सावली, चिमूर तालुक्यातील इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पुस्तकांची मोफत वितरण व करिअर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आयोजित कार्यक्रमास अधिकाधिक विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आधार फाउंडेशनचे दिनेश लिमये व मुकेश चौबे यांनी केले आहे.

गुरुवार, नोव्हेंबर २४, २०२२

 स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड चंद्रपूर (SAIL) येथे पदभरती ।  Current Job Openings

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड चंद्रपूर (SAIL) येथे पदभरती । Current Job Openings

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड चंद्रपूर (SAIL) येथे पदभरती । 

Current Job Openings

SAIL, a Central Public Sector Enterprises (CPSE) is India’s largest steel producer with around 17.43 MT of Hot Metal and 16.15 MT of Crude Steel production. With Annual Turnover of more than Rs. 61000 crores in 2019-20, SAIL is one of the ‘Maharatna CPSE’ of country and has been the pivot of the domestic steel industry has continuously moved with the times to carve a niche for itself among the leading steel producers of the World.


SAIL Plants together produce the widest spectrum of steel products in the country, covering both flat and long product segments, providing cost-effective and superior quality of products and services.



पोस्ट : वरिष्ठ सल्लागार, सल्लागार, वैद्यकीय अधिकारी, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, खाण फोरमॅन, सर्वेक्षक, ऑपरेटर कम टेक्निशियन, मायनिंग मेट, अटेंडंट कम टेक्निशियन, फायरमन.


शैक्षणिक पात्रता : DM/DNB,MBBS, पदव्युत्तर पदवी, BE / B.Tech (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)

एकूण जागा : 259

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 डिसेंबर 2022

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

नोकरीचं ठिकाण : चंद्रपूर

अधिकृत वेबसाईट : www.sailcareers.com 


https://ucanapplym.s3.ap-south-1.amazonaws.com/sail/pdf/PDT.pdf


संबंधित शोध