*माजी मंत्री वडेट्टीवार यांचा पुढाकार - विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वितरण*
ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना घरातील हलाखीची परिस्थिती व आर्थिक अडचणीमुळे यशस्वी जीवन घडविण्याची क्षमता असतांनाही स्पर्धा परीक्षांना मुकावे लागते. तसेच स्पर्धा परीक्षांबद्दल योग्य मार्गदर्शन अभावी ग्रामीण विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याच्या मार्गावर अडसर ठरत असल्याने अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाचा मार्ग सुकर करण्यासाठी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, आ. विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकारतून आधार फाउंडेशन च्या माध्यमातून निःशुल्क करियर मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा मोफत पुस्तके वितरणाचा कार्यक्रमाचे उद्या दि. २४ डिसेंबर रोजी श्रवण लॉन सिंदेवाही येथे आयोजन करण्यात आले आहे. Aadhaar Foundation
याप्रसंगी प्रामुख्याने कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार,तर प्रमुख वक्ते म्हणून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक डॉ. विनोद आसूदानी, तसेच प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी विजय वडेट्टीवार प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी माजी मंत्री वडेट्टीवार यांच्या पुढाकारातून आधार फाउंडेशन च्या वतीने पहिल्या टप्प्यात ब्रह्मपुरी येथे इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भावी जीवनात यश संपादन करणे हेतू एमएचटी- सीइटी, जेईई - नीट या स्पर्धा परीक्षांचे झुल्क करिअर मार्गदर्शन व मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तकांची वितरण करण्यात आले होते. तसेच दुसऱ्या टप्प्यात माजी मंत्री वडेट्टीवार यांच्या पुढाकारातून आधार फाउंडेशन च्या वतीने सिंदेवाही येथील श्रवण लॉन येथे उद्या सकाळी ११ वाजता होणाऱ्या निशुल्क करियर मार्गदर्शन शिबिरात सिंदेवाही, मुल, सावली, चिमूर तालुक्यातील इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पुस्तकांची मोफत वितरण व करिअर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आयोजित कार्यक्रमास अधिकाधिक विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आधार फाउंडेशनचे दिनेश लिमये व मुकेश चौबे यांनी केले आहे.