Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गडचिरोली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गडचिरोली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, जुलै १४, २०२३

विपिन राऊत यांच्या कृषीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर संशोधनाला आचार्य पदवी

विपिन राऊत यांच्या कृषीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर संशोधनाला आचार्य पदवी

आचार्य पदवीने विपिन कालिदास राऊत सन्मानीत


गडचिरोली :- गोंडवाना विद्यापीठात (Gondwana) निवड श्रेणी लिपीक या पदावर कार्यरत असलेले विपीन कालीदास राऊत यांनी मानवविज्ञान विद्याशाखेअंतर्गत आर्चाय पदवीसाठी शोधप्रबंध सादर केला होता. त्या शोधप्रबंधाच्या परिक्षणानंतर गोंडवाना विद्यापीठाने त्यांना आर्चाय पदवी बहाल केली होती. 

Vipin Raut's Acharya Degree in Research Application of Modern Technology in Agriculture 

विद्यापीठाचा दहावा दीक्षांत समारंभाला मुख्य अतिथी म्हणुन महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत पार पडला. विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात (दीक्षांत समारंभ) विपीन राऊत यांना आर्चाय पदवीने सन्मानित करण्यात आले. त्यांनी नेवजाबाई हितकारीणी, महाविद्यालय ब्रम्हपुरी येथील उपप्राचार्य डॉ.दिगांबर पारधी यांच्या मार्गदर्शनात " चंद्रपूर जिल्हयातील कृषीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व कृषी विकासाचा स्तर एक कालिक व अभिक्षेत्रीय विश्लेषण १९९१- २०११" या विषयावर संशोधन केले होते. 


सदर पदवीदान करताना गोंडवाना विद्यापीठाचे. कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, अधिष्ठाता डॉ. अनिल चिताडे, डॉ. चंद्रमौली व प्रभारी संचालक . देवेंन्द्र झाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य, डॉ. एन. एस. कोकोडे, डॉ. दिगांबर पारधी, प्रा. आशिष साखरकर तसेच आई-वडील, पत्नी सौ. निलीमा विपीन राऊत तसेच राऊत व नागरकर परिवाराला दिले आहे

शनिवार, जून ०३, २०२३

 वैनगंगा नदी पात्रात मृतदेहाचे सांगाडे | Chandrapur Gadchiroli Wainganga river

वैनगंगा नदी पात्रात मृतदेहाचे सांगाडे | Chandrapur Gadchiroli Wainganga river

वैनगंगा नदी पात्रात पाणी ओसरल्याने दिसू लागले मृतदेहाचे सांगाडे | Chandrapur Gadchiroli Wainganga river

वैनगंगा नदी पात्रात पाणी ओसरल्याने दिसू लागले मृतदेहाचे सांगाडे | Chandrapur Gadchiroli Wainganga river

वैनगंगा नदी पात्रात मृतदेह दफन विधी तथा अंत्यसंस्कार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नदी पात्रतील पाणी ओसरल्याने मृतदेहाचे सांगाडे दिसू लागले आहेत. हा प्रकार जिल्हातील सावली तालुक्यात घडला आहे. 


गडचिरोली व चंद्रपूर (Chandrapur Gadchiroli Wainganga river )या दोन जिल्ह्यांच्या मधून वाहणार्‍या वैनगंगा नदीतून शेकडो गावांना पाणी पुरवठा केला जातो. याच नदीचं पाणी प्यावं लागत असल्याने स्थानिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. पावसाळ्यात ही नदी दोन्ही बाजूला तुडुंब भरून असते. त्यामुळे या नदीचे पात्र दिसत नाही. मात्र उन्हाळ्यात नदी पात्र कोरडे पडलेले असते. दोन्ही बाजूला नदी पात्रात रेती दिसून येते. या नदीच्या पूर्व दिशेच्या काठावर गडचिरोली तालुका, तर नदीच्या पश्चिम दिशेच्या काठावर सावली तालुका आहे. 


दफनविधीसाठी आरक्षित केलेल्या जागेमध्ये मृतदेहाचे दफन न करता चक्क नदीपात्रामधील रेतीत मृतदेह दफन करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नदी पात्र ओसरल्याने मृतदेहाचे सांगाडे दिसू लागले आहेत. आता या वाळूतूनही मृतांचे सांगाडे बाहेर आले आहेत. वाळूतून चालताना पायाला सांगाडे लागत असल्याने भीती निर्माण झाली आहे. (Dead Body Skeleton)


मंगळवार, मे ०९, २०२३

फॅमिली हेल्थ कार्ड ठरणार आरोग्याचा पासबुक : डॉ. शिलू चिमुरकर | Family Health Card

फॅमिली हेल्थ कार्ड ठरणार आरोग्याचा पासबुक : डॉ. शिलू चिमुरकर | Family Health Card

 जोगीसाखरा येथे पार पडले आरोग्य शिबीर 


जोगीसाखरा येथे ग्रामस्थांना फॅमिली हेल्थ कार्डचे वितरण 

अनुसया हॉस्पिटल आरमोरी आणि ग्रामपंचायत कार्यालय जोगीसाखरा यांचा उपक्रम




गडचिरोली : अनुसया हॉस्पिटल (anusaya Hospital) आरमोरी आणि ग्रामपंचायत कार्यालय जोगीसाखरा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद उच्च श्रेणी प्राथमिक शाळा जोगीसाखरा येथे नुकतेच मोफत रोगनिदान शिबिर पार पडले. आरोग्य शिबिरामध्ये सर्व ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करून, उपस्थित ग्रामस्थांना फॅमिली हेल्थ कार्डचे (Family Health Card) वितरण करण्यात आले. 



या शिबिराला अनुसया हॉस्पिटलच्या डॉ. शिलू चिमुरकर, डॉ. महेश कोपुलवार, जोगीसाखराचे सरपंच संदीप ठाकूर यांनी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य ज्योती घुटके, वैशाली चापले, प्रतिभा मोहुर्ले, करिष्मा मानकर, अश्विनी घोडाम, गुरुदेव कुमरे, स्वप्नील गरफडे, देविदास ठाकरे यांची उपस्थिती होती. 



शिबिरामध्ये महिला पुरुषांशी निगडित आजारांवर उपस्थित डॉक्टरांनी मार्गदर्शन करीत तपासणी करण्यात आली. नॉर्मल आणि सिजर डिलिव्हरी, वंध्यत्व, पाईल्स, अपेंडिक्स, हायड्रोसिल, कॅन्सर, हर्निया आणि फिशर आदी रोगांसंदर्भातही जागृती करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते नागरिकांना फॅमिली हेल्थ कार्डचे वितरण करण्यात आले. हे फॅमिली हेल्थ कार्ड (Family Health Card) नागरिकांच्या आरोग्याची सर्व माहिती देणार असून, आरोग्याचा पासबुक ठरणार आहे. ज्या नागरिकांनी फॅमिली हेड कार्डमध्ये नोंदणी केली, त्यांच्या कुटुंबीयांना सवलतीत आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या हेल्थ कार्डमध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्य माहिती नोंद करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. शिलू चिमुरकर यांनी दिली. फॅमिली हेल्थ कार्ड नोंदणी मोफत असून, परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गुरुवार, जानेवारी २६, २०२३

 डॉक्टरने दिले महिला रुग्णांना "आरोग्याचे वाण"  occasion of Makar Sankranti Armori

डॉक्टरने दिले महिला रुग्णांना "आरोग्याचे वाण" occasion of Makar Sankranti Armori


मकरसंक्रातीनिमित्त पार पडला आगळावेगळा हळदी कुंकू

बालिका दिनानिमित्त रुग्णालयात जन्मलेल्या बाळांची संक्रातीनिमित्त लूट

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिलू चिमुरकर यांनी केले निरोगी आरोग्यावर मार्गदर्शन

अनुसया मॅटर्निटी सर्जिकल अँड नर्सिंग होमचा उपक्रम



गडचिरोली (दिनांक २६ जानेवारी) : Makar Sankrantiमकरसंक्रांती म्हटली की,‎ महिलांचा जिव्हाळ्याचा विषय‎ येतो. संक्रांतीनिमित्त महिला‎ आपल्या घरी हळदी कुंकू कार्यक्रम‎ ठेवत वाण म्हणून एकमेकींना‎ भेटवस्तू देतात. या पारंपारिक पद्धतीमध्ये‎ थोडा बदल करत अनुसया मॅटर्निटी सर्जिकल अँड नर्सिंग होमने आगळावेगळा उपक्रम आयोजित केला. रुग्णालयात आजवर उपचारासाठी आलेल्या महिला, विविध आजारासाठी शस्रक्रिया झालेल्या रुग्नांना एकत्रित आणत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिलू चिमुरकर (Dr. Sheelu Chumurkar) यांनी "आरोग्याचे वाण" वाटले. विशेष म्हणजे वाण म्हणून एखादी भेटवस्तू न देता व्हिटॅमिन, कॅल्शिअम आणि निरोगी आरोग्यासाठी आवश्यक गोळ्या आणि औषधी वितरित केली.




स्त्रियांमध्ये आणि समाजामध्ये स्वतःच्या आरोग्याबद्दल कमालीची अनास्था असल्यामुळे आजार बळावतो. महिलांना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, यावर मार्गदर्शन करण्यासाठी मकरसंक्रांतीनिमित्त आरमोरी येथील अनुसया मॅटर्निटी सर्जिकल अँड नर्सिंग होममध्ये २५ जानेवारी रोजी "आरोग्याचे वाण" या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या वसुधा कोपुलवार, शकुंतला गंटावार, सेवानिवृत्त शिक्षिका चव्हाण, बघमारे यांची उपस्थिती होती. Makar Sankranti

यावेळी डॉ. शिलू चिमुरकर यांनी सर्व महिलांना आरोग्यासाठी तीळ-गुळाचे महत्व, दैनंदिन जीवनात घ्यावयाची काळजी आणि निरोगी आरोग्यावर मार्गदर्शन केले. यावेळी उपचारासाठी आलेल्या महिला, प्रसूती झालेल्या स्तनदा माता आणि विविध आजारावर शस्रक्रिया झालेल्या महिला रुग्नांना व्हिटॅमिन, कॅल्शिअम गोळ्या आरोग्याचं वाण म्हणून देण्यात आले. बालिका दिनाचे औचित्य साधून रुग्णालयात जन्मलेल्या दोन बाळांची संक्रातीनिमित्त लूट करण्यात आली.




आरमोरी येथील वडसा मार्गावर असलेल्या अनुसया मॅटर्निटी सर्जिकल अँड नर्सिंग होमची मागील ४ महिन्याआधी सुरवात झाली. प्रारंभीपासून सामाजिक सेवेचे व्रत घेऊन आरोग्यसेवा दिली जात आहे. या भागात आरोग्याची अत्याधुनिक सुविधा नव्हती. त्यामुळे इथल्या रुग्णांना दूरच्या मोठ्या शहरात जावे लागायचे. मात्र, अनुसया मॅटर्निटी सर्जिकल अँड नर्सिंग होमची स्थापना झाल्यापासून इथल्या रुग्णांची गैरसोय दूर झाली आहे. तेव्हापासून आरमोरी, वडसा, कुरखेडा, कोरची या नक्षलग्रस्त भागातील रुग्ण येथे उपचारासाठी येऊ लागलीत. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिलू चिमुरकर यांनी अवघ्या ४ महिन्यात आतापर्यंत ११ यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. यातील ८ शस्त्रक्रिया या गर्भाशयाशी निगडित होत्या. महिलांना अनेक कारणांमुळे गर्भपिशवी साफ करावी लागते. अशा जोखमीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे हाताळून महिलांना जीवनदान देण्याचे काम डॉ. शिलू चिमुरकर यांनी केले. महिलांना अंगावर पांढरे जाणे, मासिक पाळीच्या तारखा चुकणे, खाज सुटणे, संबंधानंतर लाल जाणे आदी समस्यांचे निराकरण त्यांनी केले.  
Makar Sankranti



शुक्रवार, डिसेंबर ३०, २०२२

चंद्रपूर जिल्ह्यात कोळशावर आधारित उद्योगाला मंजुरी; 20 हजार कोटींची गुंतवणूक | Coal In Chandrapur

चंद्रपूर जिल्ह्यात कोळशावर आधारित उद्योगाला मंजुरी; 20 हजार कोटींची गुंतवणूक | Coal In Chandrapur



चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे कोळसा खनिजावर आधारित हायड्रोजन, मिथेनॉल, अमोनिया युरिया निर्मितीचा वीस हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे दहा हजार लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील दोन खाणींमध्ये सोने असल्याचेही केंद्राच्या खनीकर्म मंत्रालयाला अहवाल पाठवण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच विदर्भाला सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.  Chief Minister Eknath Shinde.




त्यांनी सांगितले की खनिज साठ्यांची ई लिलाव एकूण 28 खान पट्ट्यांचा यशस्वी लिलाव झालेला आहे. विदर्भातील खनिज संपत्तीचे योग्य तो उपयोग राज्याच्या विकासासाठी व्हावा, यासाठी राज्याची नवीन खनिज धोरण घोषित करण्यात येईल. त्यामुळे विदर्भातील खनिक्रम उद्योग व्यवसायिकांना अधिक गती मिळेल. 

यावेळी त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील 70 टक्के खनिज संपत्ती एकट्या विदर्भात आहे. विशेषता गडचिरोली जिल्ह्यामध्ये उच्च दर्जाच्या लोह खनिजाचा साठा आहे. सुरजागड येथे 14 हजार कोटी रुपये व पाच हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे दोन नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. 

या प्रकल्पाव्यतिरिक्त आणखी एक पंधराशे कोटी रुपये एवढी गुंतवणूक असलेला स्टील प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यात येणार आहे. या तीन प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे दहा हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. प्रकल्प सुरू करणे हे शासनाची प्राथमिकता आहे. त्यामुळे त्यात कुणी आडकाठी आणण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच जशास तसे उत्तर देऊ. नक्षलवाद मोडून काढू. त्या भागातील नागरिकांच्या हाताला काम देऊ. त्यासाठी केंद्राचे ही सहकार्य मिळत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

An investment project of 20 thousand crore rupees has been approved for the production of hydrogen, methanol, ammonia urea based on coal ore at Bhadravati in Chandrapur district. Therefore, about ten thousand people will get direct and indirect employment in Chandrapur district, a report has also been sent to the Union Ministry of Mines that there is gold in two mines of Chandrapur district. Therefore, Vidarbha will soon have its golden days, asserted Chief Minister Eknath Shinde.

शुक्रवार, डिसेंबर २३, २०२२

Gadachiroli breaking news : गडचिरोलीत पोलीस-नक्षल चकमक, दोन नक्षलवादी ठार

Gadachiroli breaking news : गडचिरोलीत पोलीस-नक्षल चकमक, दोन नक्षलवादी ठार


Gadachiroli breaking news : गडचिरोलीत पोलीस-नक्षल चकमक, दोन नक्षलवादी ठार

गडचिरोली, gadachiroli२३ डिसेंबर :- जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील दामरंचा जंगल परिसरात पोलिस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे. गडचिरोली आणि छत्तीसगड राज्यातील बिजापूर पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली.
Aheri अहेरी तालुक्यातील दामरंचा जंगल क्षेत्रातील छत्तीसगड राज्याच्या सीमेवर गडचिरोली पोलीस आणि बिजापूर पोलीस संयुक्त अभियान राबवत होते. दरम्यान नक्षलवाद्यांसोबत चकमक उडाली. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले असून मृतांमध्ये एका महिला नक्षलीचा समावेश असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली. घटनास्थळावर सर्चिंग ऑपरेशन सुरू असून आणखी काही नक्षली मारले गेल्याचा अंदाज पोलीस दलाने व्यक्त केला आहे. Gadachiroli Maharashtra India naxal Movement 


Maharashtra Police in the jungles of Aheri in Gadchiroli district  


मंगळवार, डिसेंबर २०, २०२२

एमआयडीसी मध्ये केंद्र शासनाच्या वतीने कौशल्य विकास केंद्र उभारणार> MIDC | Central Government

एमआयडीसी मध्ये केंद्र शासनाच्या वतीने कौशल्य विकास केंद्र उभारणार> MIDC | Central Government

*उद्योगांना चालना देण्यासाठी चंद्रपूर येथे फेब्रुवारीत राज्य उद्योग मित्र परिषद घेणार*




*ना सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारास उद्योग मंत्री सामंत यांच्या कडून सकारात्मक प्रतिसाद*

*"प्लग अँड प्ले" तत्वावर होणार पोंभूर्णा एमआयडीसीचा विकास*

*नवीन एमआयडीसीत महिला उद्योजकांसाठी भूखंड राहणार आरक्षित*





नागपूर : चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील नवउद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी येत्या फेब्रुवारी महिन्यात चंद्रपूर येथे "राज्य उद्योग मित्र परिषद" घेण्यात येणार असून औद्योगिक विकासाला चालना मिळावी यासाठी एम. आय. डी. सी. मध्ये असलेल्या उद्योगांना बळ देऊन नवीन मोठे उद्योग या दोन जिल्ह्यात यावेत यासाठी आज उद्योग मंत्री श्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज नागपूर येथे हरिसिह वन सभागृहात बैठक झाली. वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूरचे पालकमंत्री ना श्री सुधीर मुनगंटीवार यांनी या बैठकीसाठी पुढाकार घेतला होता. State Industry Friends Council | Nagpur Chandrapur and Gadchiroli

 या बैठकीत अधिकाऱ्यांशी चर्चा करताना उद्योगाला चालना देण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय झाले. 

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक विकासावर चर्चा करताना ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांनी एमआयडीसी मध्ये आवंटीत करण्यात आलेल्या ज्या भूखंडांवर ५ वर्षांनंतरही उद्योग उभारले नाहीत, अश्या भूखंडांची चौकशी करावी व माहीती घ्यावी अशी सूचना मांडली; त्याला उद्योग मंत्री ना उदय सामंत यांनी तात्काळ होकार दिला व संबंधितांना कार्यवाही चे निर्देश दिले.

नव उद्योगांना चालना मिळावी तसेच एमआयडीसी मध्ये नवीन उद्योग यावेत यावर भर देण्याची मागणी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केली ; त्यावर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य उद्योगमित्र परिषद येत्या फेब्रुवारी महिन्यात चंद्रपूर येथे घेण्याचे निर्देश उद्योग मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

उद्योगांना कौशल्यपूर्ण मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी एमआयडीसी मध्ये केंद्र शासनाच्या वतीने कौशल्य विकास केंद्र उभारणार असल्याचे ना सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.
एमआयडीसी मधील कामगारांना त्याच भागात घरकुलासाठी भूखंड उपलब्ध करुन देण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली.

जिल्ह्यातील पोंभूर्णा औद्योगिक क्षेत्राच्या विकासाकरिता आदिवासी क्षेत्र असल्याने "प्लग अँड प्ले" तत्वावर काम करण्यात येणार असून यामुळे या तालुक्यासह परिसराच्या विकासाला गती येणार आहे.
घुग्गुस आणि भद्रावती येथील औद्योगिक विकासाच्या संदर्भात उद्योग मंत्र्यांशी ना. मुनगंटीवार यांनी चर्चा केली.

आदिवासी क्षेत्र असल्याने एमआयडीसी करीता विशेष निधी !

गडचिरोली आणि चंद्रपूर हे आदिवासी बहुल क्षेत्र असून या भागातील औदयोगिक विकासाला चालना मिळावी म्हणून एमआयडीसीतील पायाभूत मूलभूत सुविधांसाठी विशेष निधी मंजूर करावा अशी मागणी व सूचना ना. सुधीर मुनगंटीवार यांनी करताच उद्योग मंत्री ना उदय सामंत यांनी मान्यता दिली.  या बैठकीला उद्योग विभागाचे प्रधान सचिव, एमआयडीसी चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्वच प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

#industry #engineering #industrial #technology #business #design #manufacturing #construction #automation #engineer #machine #music #science #innovation #production #tech #equipment #tools #mechanicalengineering #architecture #photography #work #energy #instagram #mechanical #art #steel #factory #love #india 

रविवार, डिसेंबर ११, २०२२

गडचिरोलीत डिजिटल मीडिया परिषदेची कार्यकारणी गठीत

गडचिरोलीत डिजिटल मीडिया परिषदेची कार्यकारणी गठीत

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद चे डिजिटल मीडिया परिषद गडचिरोली जिल्ह्याध्यक्षपदी मनीष कासर्लावार तर महासचिवपदी राजेंद्र सहारे यांची निवड

कार्याध्यक्ष म्हणून प्रवीण चन्नावार तर उपाध्यक्ष म्हणून प्रा. संतोष सुरपाम यांची निवड

जिल्हयातील सर्व तालुक्यातही अध्यक्षांची निवड



प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : स्वातंत्र्याचा अगोदर पासून पत्रकारांसाठी लढणारा एकमात्र अशी संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदचे डिजिटल मीडिया परिषदेचा नुकतेच कार्यकारिणी घोषित करण्यात आली .

Akhil bharatiy marathi patrakar parishad

मराठी पत्रकार परिषदचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबडे , डिजिटल मिडिया चे कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल मीडिया परिषदेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष म्हणून विदर्भ न्यूज एक्सप्रेस चे संपादक ऍड. मनिष कासर्लावार तर जिल्हा सचिव म्हणून राईट टाईम न्यूज चे संपादक राजेंद्र सहारे ,जिल्हा कार्याध्यक्ष वृत्तवानी न्यूज चे संपादक प्रवीण चन्नावार जिल्हा उपाध्यक्ष म्हणून एस. भारत न्यूज चे संपादक प्रा. संतोष सुरपाम जिल्हा संघटक म्हणून ए . व्ही, बी. न्यूज चे संपादक अनिल बोधलकर आणि सदस्य म्हणून महाभारत न्यूज चे संपादक उदय धकाते, सत्यशोधक न्यूज २४ चे संपादक दीपक बोलीवर, लोकप्रवाह चे संपादक किशोर खेवले यांची निवड करण्यात आली तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तालुकाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे.

यात आरमोरी तालुका अध्यक्ष म्हणून मिथुन धोडरे ,देसाईगंज तालुका अध्यक्ष म्हणून गौरव नागपूरकर सचिव म्हणून भुवन बोन्डे , धानोरा तालुका अध्यक्ष म्हणून दिवाकर भोयर , भामरागड तालुका अध्यक्ष म्हणून मनीष येमूलवार ,कोरची तालुका अध्यक्ष म्हणून सुरज हेमके चामोर्शी तालुका अध्यक्ष म्हणून गणेश शिंगाडे तर सचिव म्हणून संदीप जोरगलवार अहेरी तालुका अध्यक्ष म्हणून आशिष सुनतकर, एटापल्ली तालुका अध्यक्ष म्हणून मणिकंठ गादेवार मुलचेरा तालुका अध्यक्ष म्हणून आकाश तुराणकर तर सचिव गुलशन मल्लमपल्ली यांची निवड करण्यात आली असून सदर संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील डिजिटल मीडियात काम करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचा हितासाठी प्रयत्न करणार तसेच दिल्लीत एका डिजिटल मीडियातील प्रतिनिधीला अधिस्वीकृती मिळालेली असून त्याच धर्तीवर जिल्ह्यातील डिजिटल मीडियात काम करणाऱ्या प्रतिनिधींना अधिस्वीकृती धारण मिळविण्याकरिता प्रयत्नरथ असणार आहे आणि जिल्ह्यातील डिजिटल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांनी सदर संघटनेत सामील होऊ इच्छित असल्यास जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .

Working group of Digital Media Parishad in Gadchiroli

शुक्रवार, नोव्हेंबर ११, २०२२

दि. १४ नोव्हेंबर रोजी शास.औ. प्र. संस्थेत पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी मेळाव्याचे भव्य आयोजन

दि. १४ नोव्हेंबर रोजी शास.औ. प्र. संस्थेत पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी मेळाव्याचे भव्य आयोजन




गडचिरोली (प्रतिनिधी) - शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे येत्या दि. १४ नोव्हेंबर रोजी (दिवस- सोमवार) दुपारी ११ वाजता, सीओई इमारतीत, जिल्हास्तरीय भव्य " पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी मेळावा " आयोजित करण्यात आलेला आहे .


सदर मेळावा सर्व उत्तीर्ण माजी प्रशिक्षणार्थांसाठी असून सर्व व्यवसायाच्या उमेदवारांना यात सहभागी होता येईल. महाराष्ट्रातील नामांकित कंपन्याचे प्रतिनिधी भरती मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहे . शिकाऊ उमेदवारी करता निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार कंपनी तर्फे फॅसिलिटी उपलब्ध असणार आहे . सदर मेळाव्याचे आयोजन बीटीआरआय चंद्रपूर यांच्या सहकार्याने होत असून याकरिता इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी बीटी.आर.आय.सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार प्रणाली दहाटे (मोबा.9049763336) यांचेशी संपर्क साधावा ,असे आवाहन संस्थेचे प्राचार्य संतोष साळुंके यांनी केले.तसेच जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थांनी या मेळाव्यास उपस्थिती दर्शवून मेळाव्याचा लाभ घ्यावा असेही त्यांनी आवाहन केले आहे.


. On November 14, Govt. Q. Grand organization of Prime Minister's National Apprenticeship Candidacy Fair at the institute 

शनिवार, ऑक्टोबर २९, २०२२

 बरोबर एक वर्षांनी गडचिरोली जिल्हा पुन्हा हादरला

बरोबर एक वर्षांनी गडचिरोली जिल्हा पुन्हा हादरला


Maharashtra's Gadchiroli district an earthquake

गडचिरोली जिल्ह्याचा दक्षिण भागातील सिरोंचा आणि अहेरी तालुक्यात आज मध्यरात्रीनंतर १२.४५ वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू सिरोंचा तालुक्यातील उमानूर ते झिंगानूर, बामणी परिसरातील तमंदला गावापासून जंगलात पाच किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती आहे. ३.८ रिश्टर स्केल इतकी होती या सौम्य भूकंपाची तीव्रता होती.  (Gadchiroli earthquake) मागील वर्षी ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी याच भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. 

Sironcha taluka of Maharashtra's Gadchiroli district an earthquake of ३.८ magnitude.  No damage to property or loss of life was reported due to it, a district official said. "The earthquake measured ३.८ on the Richter scale.  

सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर, मेडाराम चेक व अन्य काही गावांना ३.८ रिश्टर स्केल तीव्रतेचे Gadchiroli earthquake भूकंपाचे हादरे बसले. यामुळे परिसरातील नागरिक घाबरले. मात्र, कोणतेही नुकसान झाले नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू झिंगानूर परिसरातील तमंदला गावापासून पाच किलोमीटर अंतरावरील जंगलात असल्याचा अंदाज आहे. भूकंपाची खोली जमिनीपासून १० किलोमीटर आत असल्याची माहिती नवी दिल्ली येथील नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलाजी संस्थेने दिली आहे. हा परिसर तेलंगणा राज्याला लागून असल्याने तेथेही काही ठिकाणी सौम्य धक्के जाणवले आहेत. सिरोंचा तालुक्यात धक्के बसण्यापूर्वी रात्री साडे अकरा ते बारा वाजताच्या सुमारास अहेरी तालुक्यातील मरपल्ली, उमानूर, जिमलगट्टा, तिमरम, जोगनगुडा या गावांमध्येही भूकंपाचे हादरे बसले.


संबंधित शोध

गुरुवार, ऑक्टोबर २७, २०२२

श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या वार्षिक महोत्सवानिमित्त व्यसनमुक्तीपर पोस्टर प्रदर्शनी - गडचिरोली वासियांनी घेतला लाभ

श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या वार्षिक महोत्सवानिमित्त व्यसनमुक्तीपर पोस्टर प्रदर्शनी - गडचिरोली वासियांनी घेतला लाभ


गडचिरोली (प्रतिनिधी )-
   व्यसनमुक्तीचा विचार पटवून देत जनतेला योग्य दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य नशाबंदी मंडळ प्रामाणिकपणे करीत आहे. मानवी स्वास्थांविषयक विचार घेऊन स्वच्छता आणि व्यसनमुक्ती विषयावरील सुंदर जनजागृतीपर चित्र प्रदर्शनी श्री गुरुदेव मंडळाच्या प्रांगणात लावलेली होती. महाराष्ट्र नशाबंदी मंडळ जिल्हा शाखेचे संघटक संदीप कटकुरवार आणि जिल्हा प्रमुख उदय धकाते यांनी हे प्रदर्शन येणाऱ्या जनतेसाठी आयोजित केलेले होते.

 समाजातील वाढती व्यसनाधिनता आणि सिगारेट ,तंबाखू , दारू या सारख्या व्यसनांपासून संसाराची कशी राखरांगोळी होते हे चित्र प्रदर्शनी मधून समजून घेता आले. महापुरूषांचे व्यसनमुक्ती संदर्भातील विचार वाचनीय असून ते शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकरीता उपयोगी असल्याने त्यासंबंधी पत्रके वाटण्यात आले. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे , डॉ. शिवनाथ कुंभारे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी नशाबंदी मंडळाचे ह्या कार्याबद्दल कौतुक केले. चित्रप्रदर्शनीच्या आयोजनासाठी श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या सदस्यगणांनी तसेच श्री गुरुदेव शाळेच्या शिक्षकांनी सहकार्य केले.

मंगळवार, ऑक्टोबर ११, २०२२

 आयटीआय प्रवेशास १५ आक्टोबरपर्यंत पुन्हा मुदतवाढ | ITI Adminition

आयटीआय प्रवेशास १५ आक्टोबरपर्यंत पुन्हा मुदतवाढ | ITI Adminition



 गडचिरोली (प्रतिनिधी)-

विहित मुदतीत प्रवेश अर्ज सादर करू न शकलेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरीत संधी उपलब्ध करून देण्यासाठी  औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये  प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय  द्वारा प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ दि.  १७ आक्टोबर पर्यंत दिलेली आहे . नव्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे व प्रवेश निश्चित करणे  १७  आक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे. सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील रिक्त जागा संस्थास्तरीय समुपदेशन फेरीद्वारे भरण्यासाठी  एकत्रित गुणवत्ता यादी   दि. १८ आक्टोबर प्रसिद्ध केली जाईल.  नोंदणीकृत उमेदवारांनी दि. १९ ते ३० आक्टोबर  यादरम्यान संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत व्यक्तीश:  हजर राहून समुपदेशन फेरीकरिता हजेरी नोंदवावी. नोंदवलेल्या उमेदवारांमधून संस्थास्तरावर गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल व त्यानुसार प्रवेशासाठी उपलब्ध जागा लक्षात घेऊन त्याच दिवशी उमेदवारांना प्रवेशासाठी जागांचे वाटप करण्यात येईल आणि प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही करण्यात येईल. संपुर्ण प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन  पद्धतीने करण्यात येत असून प्रवेशाची सविस्तर माहिती itiadmission@dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी लाभ घ्यावा असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संतोष साळुंके यांनी केले आहे.

 शास.औ. प्र. संस्थेत राष्ट्रसंतांना अभिवादन

शास.औ. प्र. संस्थेत राष्ट्रसंतांना अभिवादन


 गडचिरोली(प्रतिनिधी)- मानवतेचे महान पुजारी,थोर तत्त्वचिंतक, ग्रामगीतेचे लेखक  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५४ व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने अभिवादन करण्यात आले. गडचिरोली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रसंतांच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्यार्पन  संस्थेचे प्राचार्य संतोष साळुंके यांचे हस्ते करण्यात आले.  प्रास्ताविक गटनिदेशक बंडोपंत बोढेकर यांनी केले तर सूत्रसंचालन गटनिदेशक भास्कर मेश्राम यांनी केले.  आभार प्रदर्शन गटनिदेशक आनंद मधुपवार यांनी केले.  या कार्यक्रमास गटनिदेशक केशव डाबरे ,निदेशक कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक प्रामुख्याने हजर होते.

सोमवार, ऑक्टोबर १०, २०२२

मेक इन गडचिरोलीच्या नावाखाली करोडो रुपयांनी फसवणूक

मेक इन गडचिरोलीच्या नावाखाली करोडो रुपयांनी फसवणूक

मेक इन गडचिरोलीच्या नावाखाली अनेक 
बेरोजगार महिलांची व युवकांची करोडो रुपयांनी फसवणूक


मुख्य सूत्रधार मोरक्या प्रोजेक्ट प्लानर श्रीनिवास दोंतुला [वारंगल तेलंगणा ] व प्रेणेते गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव होळी यांनी करोडोची फसवणूक केली, याच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे.


मुख्य सूत्रधार व मोरक्या श्रीनिवास दोंतुला तसेच प्रणेते गडचिरोली विधानसभाचे क्षेत्राचे आमदार देवराव होळी यांच्यावर गणेश नामदेव वासेकर यांनी आरोप लावलेला आहे. नागपूर पत्रकार भवनात पत्रकार परिषदेमध्ये गणेश नामदेव वासेकर यांच्या नेतृत्वात पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी गंगाधर शेडमाके, हेमलता मशाखेत्री, प्रवीण चौधरी, प्रदीप मंडल, रवींद्र चिमाडे, वनिता राखळे, ललिता गरकाळे, शालिनी सोनकर, कल्पना कोलते, सौ. किरण कोलते, राजेंद्र कोहपरे, मिलिंद घोगरे, अमोल घोगरे, यासर्वांची उपस्थिती होती.


Fraud of crores of rupees Make in Gadchiroli

रविवार, ऑक्टोबर ०९, २०२२

 बल्लारशाह-सुरजागड रेल्वे मार्गाकरिता पाठपुरावा करा | BALLARSHAH-ALAPALLI-SURJAGAD RAILWAY LINE

बल्लारशाह-सुरजागड रेल्वे मार्गाकरिता पाठपुरावा करा | BALLARSHAH-ALAPALLI-SURJAGAD RAILWAY LINE


राज्य शासनाने पुढाकार घेवून केंद्राकडे पाठपुरावा करावा - हंसराज अहीर
गोंडपिंपरी महामार्गालगत सर्विस रोड व शहराबाहेर बायपास निर्मितीची मागणी

 

 BALLARSHAH-ALAPALLI-SURJAGAD RAILWAY LINE
गडचिरोली/चंद्रपूर:- सुरजागड लोह खनिज प्रकल्प कार्यान्वीत झाले असल्याने महाराष्ट्र शासनाने सुरजागड ते बल्हारशाह रेल्वे लाईन निर्मिती करीता केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा यासाठी प्रकल्प व्यवस्थापनाकडून 50 टक्के वाटा घेवून राज्य व केंद्राच्या माध्यमातून प्रत्येकी 25 टक्के आर्थिक तरतूद करुन या रेल्वे लाईनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.
लाॅयड मेटल्स या कंपनीद्वारे सुरजागड प्रकल्पातील लोह खनिजाची वाहतूक रात्रंदिवस जड  वाहनांनी केली जाते. शेकडोच्या संख्येतील वाहने रहदारीच्या मार्गाने कच्च्या मालाची वाहतूक करीत असल्याने अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असून या अपघातांमुळे लोकांमध्ये प्रचंड रोष व आक्रोश व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सुरजागड-बल्हारशाह रेल्वे लाईनची निर्मिती होणे आवश्यक असल्याचे अहीर यांनी म्हटले आहे.
1997 सालापासून या रेल्वेलाईनचा विषय अहीर यांनी लोकसभेत उपस्थित केला होता. त्यांच्या सतत प्रयत्नामुळे केंद्रीय अर्थसंकल्पात सन 2007-08 मध्ये प्राथमिक सर्वेक्षणाकरीता मान्यता देण्यात आली होती हे विशेष! सुरजागड येथील जड वाहतुकीमुळे अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आल्यामुळे लोह खनिजाच्या सुलभ वाहतुकीसाठी आता राज्यशासनाने सुरजागड-बल्हारशाह रेल्वे लाईनकरिता पुढाकार घ्यावा व केंद्रशासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी अहीर यांनी सदर पत्रातून केली आहे.
सुरजागड प्रकल्पातून कच्च्या मालाची वाहतूक करणाऱ्या  जड वाहनांमुळे अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. दिवस रात्र सुरु असलेली ही वाहतूक चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी या शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 बी वरुन होत असल्याने तालुक्याचे स्थान असलेल्या या शहरातील नागरिकांचे जीवन या जड वाहतुकीमुळे धोक्यात आले आहे. या शहरांमधेही आतापर्यंत अनेक अपघात घडले आहेत. त्यामुळे या महामार्गालगत सर्व्हिस रोड ची निर्मिती करुन लोकांना    धोकादायक ठरलेल्या वाहतुकीपासून संरक्षण देण्यात यावे.
गोंडपिपरी शहरात सव्र्हीस रोड व बायपास ची उभारणी करावी.
ही जड वाहतुक अनेक शहरातुन व लगतच्या गावामधून होत असल्याने लोकांच्या सुरक्षिततेकरिता आवश्यकतेनुसार सव्र्हीस रोडची उभारणी करण्याची मागणी करुन गोंडपिपरी शहराची वाढती लोकसंख्या, वाढती रहदारी व या तालुक्यात शासकीय व अन्य कामकाजाकरिता येणाऱ्या  ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी गोंडपिपरी शहराबाहेरुन नव्या बायपास रोडची उभारणी करण्यात यावी अशी विनंती हंसराज अहीर यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना लिहिलेल्या पत्रातुन केली आहे.

. central railway started hauling of iron ore mined from surjagad mines. first rake of mineral ore was loaded at ballarshah, ...

शुक्रवार, सप्टेंबर ०९, २०२२

वडेगाव (मेंढा) येथे ग्रामनवनिर्माण अभियान: व्यसनमुक्तीपर पोस्टर प्रदर्शनी तथा रोगनिदान शिबिर

वडेगाव (मेंढा) येथे ग्रामनवनिर्माण अभियान: व्यसनमुक्तीपर पोस्टर प्रदर्शनी तथा रोगनिदान शिबिर

वडेगाव (मेंढा) येथे ग्रामनवनिर्माण अभियान: व्यसनमुक्तीपर पोस्टर प्रदर्शनी तथा रोगनिदान शिबिराचे यशस्वी आयोजन




गडचिरोली ( प्रतिनिधी)-
ग्रामगीता प्रणित ग्रामनवनिर्माण अभियानाअंतर्गत वडेगाव मेंढा येथे रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन समाजसेवी डॉ. चंद्रकांत लेनगुरे (गडचिरोली) यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते.‌ प्रमुख अतिथी म्हणून वैद्यकिय अधिकारी डॉ. भूवन मेश्राम, ज्येष्ठ श्रीगुरुदेव प्रचारक प्रल्हादजी खुणे (आंधळी) , नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक संदीप कटकुरवार, पोलिस पाटील जगदीश वनवे (डोंगरतमाशी), सत्यसाई सेवा समितीचे सेवादल फार्माशिष्ट नामदेव लाकुडवाहे , डोमाजी गेडाम, प्रभाकर भागडकर , दीपक बद्दलवार , निहार रायपुरकर आदीमान्यवर प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक ज्येष्ठ श्री गुरुदेव प्रचारक उदाजी बावणे महाराज यांनी केले. मनुष्यांनी स्वतःची कशी काळजी घ्यावी आणि आपले आरोग्य कसे जपावे यासंदर्भात डॉ.‌लेनगूरे यांनी समयोचित मार्गदर्शन केले. ग्रामगीता प्रणित ग्रामनवनिर्माण अभियान हा ग्रामविकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम असून लोकसहभागातून मानवसेवेचे उत्तम कार्य या माध्यमातून होते आहे,ही अभिनंदनीय बाब असल्याचे ग्रामगीताचार्य बोढेकर म्हणाले.  
 ग्रामनवनिर्माण अभियान समितीतर्फे वडेगाव येथील इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्राविण्य प्राप्त केलेल्या आशिष दुगे, कु.  मयुरी कुमरे, मयुर हलामी यांचा सन्मानपत्र व ग्रामगीता भेट देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. शिवनाथ कुंभारे अमृत महोत्सवी कार्यगौरव पुरस्कार उदाजी बावणे महाराज यांना देण्यात आला. तर वडेगाव येथे ग्रामनवनिर्माण कार्यात सहभाग देणारे शामराव हजारे,वामन जोशी, नामदेव कोवे, सुधाकर जोशी, लक्ष्मीबाई कुमरे आदींना ग्रामगीता देऊन सन्मानित करण्यात आले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  कवी नंदकिशोर मसराम यांनी केले.
     या कार्यक्रमात श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे आरमोरी तालुका सेवाधिकारी म्हणून उदाजी बावणे महाराज यांची निवड करण्यात येऊन नियुक्ती पत्र देण्यात आले. युवा वर्ग व्यसनांच्या आहारी जाऊ नये. स्वतःवर संयम ठेवावा,दारू - तंबाखू या सारख्या घातक व्यसनांपासून दूर राहावे असे जनजागृती करणारे पोस्टर प्रदर्शन वडेगाव येथे नशाबंदी मंडळाचे वतीने लावण्यात आले होते. या पोस्टर प्रदर्शनीचा आणि सत्य साई सेवा मंडळाच्या वतीने आयोजित  रोगनिदान शिबिराचा लाभ वडेगाव, डोंगरतमाशी आणि कुरंडी चक येथील ११६ लोकांनी घेतला तर १६ रूग्णांचे रक्त नमुने घेण्यात आले, हे विशेष.

सोमवार, ऑगस्ट २२, २०२२

Maharashtra Samruddhi Mahamarg | समृद्धी महामार्ग आता गडचिरोलीपर्यंत

Maharashtra Samruddhi Mahamarg | समृद्धी महामार्ग आता गडचिरोलीपर्यंत


हिंदुहृदयसम्राट #बाळासाहेबठाकरे समृद्धी महामार्ग Maharashtra Samruddhi Mahamarg हा नागपूर ते भंडारा, गोंदिया आणि नागपूर ते गडचिरोलीपर्यंत पुढे वाढविण्यात येणार आहे. गडचिरोलीपर्यंतच्या टप्प्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याचे काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. eknath Shinde |  extend-nagpur-to-gadchiroli-bhandara-gondia 




समृद्धी महामार्गाचा नागपूर ते भंडारा-गोंदियापर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. तसेच नागपूर आणि गडचिरोली देखील समृद्धी महामार्गाने जोडले जाणार आहे. त्यामुळे गडचिरोली ते मुंबई अंतर खूप कमी वेळात कापता येणार आहे. तसेच गोंदियावरून देखील मुंबईला लवकर पोहोचता येईल. त्यासाठी या मार्गाचे विस्तारीकरण करण्यात आले आहे, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.


नागपूर- मुंबईतील अंतर कमी होण्यासाठी समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला आहे. यासाठी नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम व बुलडाणा या जिल्ह्यातील ८ हजार ३६४ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले. या महामार्गाचे बांधकाम सोळा टप्प्यात पूर्ण होत असून सुमारे 60 टक्क्यापेक्षा जास्त रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे.


नागपूर ते मुंबईमध्ये ७०० किलोमीटर अंतर असून १५० किमी वेगाने हे अंतर पार करता येणार आहे. हा मार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे व मुंबई या 12 जिल्ह्यांना जोडणार आहे. आता हाच महामार्ग भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना देखील या रस्त्यांचा फायदा होणार आहे.


The Mumbai–Nagpur Expressway or Nagpur–Mumbai Super Communication Expressway (officially known as Hindu Hrudaysamrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi ...