आचार्य पदवीने विपिन कालिदास राऊत सन्मानीत
गडचिरोली :- गोंडवाना विद्यापीठात (Gondwana) निवड श्रेणी लिपीक या पदावर कार्यरत असलेले विपीन कालीदास राऊत यांनी मानवविज्ञान विद्याशाखेअंतर्गत आर्चाय पदवीसाठी शोधप्रबंध सादर केला होता. त्या शोधप्रबंधाच्या परिक्षणानंतर गोंडवाना विद्यापीठाने त्यांना आर्चाय पदवी बहाल केली होती.
Vipin Raut's Acharya Degree in Research Application of Modern Technology in Agriculture
विद्यापीठाचा दहावा दीक्षांत समारंभाला मुख्य अतिथी म्हणुन महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत पार पडला. विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात (दीक्षांत समारंभ) विपीन राऊत यांना आर्चाय पदवीने सन्मानित करण्यात आले. त्यांनी नेवजाबाई हितकारीणी, महाविद्यालय ब्रम्हपुरी येथील उपप्राचार्य डॉ.दिगांबर पारधी यांच्या मार्गदर्शनात " चंद्रपूर जिल्हयातील कृषीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व कृषी विकासाचा स्तर एक कालिक व अभिक्षेत्रीय विश्लेषण १९९१- २०११" या विषयावर संशोधन केले होते.
सदर पदवीदान करताना गोंडवाना विद्यापीठाचे. कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, अधिष्ठाता डॉ. अनिल चिताडे, डॉ. चंद्रमौली व प्रभारी संचालक . देवेंन्द्र झाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य, डॉ. एन. एस. कोकोडे, डॉ. दिगांबर पारधी, प्रा. आशिष साखरकर तसेच आई-वडील, पत्नी सौ. निलीमा विपीन राऊत तसेच राऊत व नागरकर परिवाराला दिले आहे