Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गडचिरोली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गडचिरोली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, जुलै १४, २०२३

विपिन राऊत यांच्या कृषीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर संशोधनाला आचार्य पदवी

विपिन राऊत यांच्या कृषीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर संशोधनाला आचार्य पदवी

आचार्य पदवीने विपिन कालिदास राऊत सन्मानीत


गडचिरोली :- गोंडवाना विद्यापीठात (Gondwana) निवड श्रेणी लिपीक या पदावर कार्यरत असलेले विपीन कालीदास राऊत यांनी मानवविज्ञान विद्याशाखेअंतर्गत आर्चाय पदवीसाठी शोधप्रबंध सादर केला होता. त्या शोधप्रबंधाच्या परिक्षणानंतर गोंडवाना विद्यापीठाने त्यांना आर्चाय पदवी बहाल केली होती. 

Vipin Raut's Acharya Degree in Research Application of Modern Technology in Agriculture 

विद्यापीठाचा दहावा दीक्षांत समारंभाला मुख्य अतिथी म्हणुन महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत पार पडला. विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात (दीक्षांत समारंभ) विपीन राऊत यांना आर्चाय पदवीने सन्मानित करण्यात आले. त्यांनी नेवजाबाई हितकारीणी, महाविद्यालय ब्रम्हपुरी येथील उपप्राचार्य डॉ.दिगांबर पारधी यांच्या मार्गदर्शनात " चंद्रपूर जिल्हयातील कृषीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व कृषी विकासाचा स्तर एक कालिक व अभिक्षेत्रीय विश्लेषण १९९१- २०११" या विषयावर संशोधन केले होते. 


सदर पदवीदान करताना गोंडवाना विद्यापीठाचे. कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, अधिष्ठाता डॉ. अनिल चिताडे, डॉ. चंद्रमौली व प्रभारी संचालक . देवेंन्द्र झाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य, डॉ. एन. एस. कोकोडे, डॉ. दिगांबर पारधी, प्रा. आशिष साखरकर तसेच आई-वडील, पत्नी सौ. निलीमा विपीन राऊत तसेच राऊत व नागरकर परिवाराला दिले आहे

शनिवार, जून ०३, २०२३

 वैनगंगा नदी पात्रात मृतदेहाचे सांगाडे | Chandrapur Gadchiroli Wainganga river

वैनगंगा नदी पात्रात मृतदेहाचे सांगाडे | Chandrapur Gadchiroli Wainganga river

वैनगंगा नदी पात्रात पाणी ओसरल्याने दिसू लागले मृतदेहाचे सांगाडे | Chandrapur Gadchiroli Wainganga river

वैनगंगा नदी पात्रात पाणी ओसरल्याने दिसू लागले मृतदेहाचे सांगाडे | Chandrapur Gadchiroli Wainganga river

वैनगंगा नदी पात्रात मृतदेह दफन विधी तथा अंत्यसंस्कार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नदी पात्रतील पाणी ओसरल्याने मृतदेहाचे सांगाडे दिसू लागले आहेत. हा प्रकार जिल्हातील सावली तालुक्यात घडला आहे. 


गडचिरोली व चंद्रपूर (Chandrapur Gadchiroli Wainganga river )या दोन जिल्ह्यांच्या मधून वाहणार्‍या वैनगंगा नदीतून शेकडो गावांना पाणी पुरवठा केला जातो. याच नदीचं पाणी प्यावं लागत असल्याने स्थानिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. पावसाळ्यात ही नदी दोन्ही बाजूला तुडुंब भरून असते. त्यामुळे या नदीचे पात्र दिसत नाही. मात्र उन्हाळ्यात नदी पात्र कोरडे पडलेले असते. दोन्ही बाजूला नदी पात्रात रेती दिसून येते. या नदीच्या पूर्व दिशेच्या काठावर गडचिरोली तालुका, तर नदीच्या पश्चिम दिशेच्या काठावर सावली तालुका आहे. 


दफनविधीसाठी आरक्षित केलेल्या जागेमध्ये मृतदेहाचे दफन न करता चक्क नदीपात्रामधील रेतीत मृतदेह दफन करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नदी पात्र ओसरल्याने मृतदेहाचे सांगाडे दिसू लागले आहेत. आता या वाळूतूनही मृतांचे सांगाडे बाहेर आले आहेत. वाळूतून चालताना पायाला सांगाडे लागत असल्याने भीती निर्माण झाली आहे. (Dead Body Skeleton)


मंगळवार, मे ०९, २०२३

फॅमिली हेल्थ कार्ड ठरणार आरोग्याचा पासबुक : डॉ. शिलू चिमुरकर | Family Health Card

फॅमिली हेल्थ कार्ड ठरणार आरोग्याचा पासबुक : डॉ. शिलू चिमुरकर | Family Health Card

 जोगीसाखरा येथे पार पडले आरोग्य शिबीर 


जोगीसाखरा येथे ग्रामस्थांना फॅमिली हेल्थ कार्डचे वितरण 

अनुसया हॉस्पिटल आरमोरी आणि ग्रामपंचायत कार्यालय जोगीसाखरा यांचा उपक्रम




गडचिरोली : अनुसया हॉस्पिटल (anusaya Hospital) आरमोरी आणि ग्रामपंचायत कार्यालय जोगीसाखरा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद उच्च श्रेणी प्राथमिक शाळा जोगीसाखरा येथे नुकतेच मोफत रोगनिदान शिबिर पार पडले. आरोग्य शिबिरामध्ये सर्व ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करून, उपस्थित ग्रामस्थांना फॅमिली हेल्थ कार्डचे (Family Health Card) वितरण करण्यात आले. 



या शिबिराला अनुसया हॉस्पिटलच्या डॉ. शिलू चिमुरकर, डॉ. महेश कोपुलवार, जोगीसाखराचे सरपंच संदीप ठाकूर यांनी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य ज्योती घुटके, वैशाली चापले, प्रतिभा मोहुर्ले, करिष्मा मानकर, अश्विनी घोडाम, गुरुदेव कुमरे, स्वप्नील गरफडे, देविदास ठाकरे यांची उपस्थिती होती. 



शिबिरामध्ये महिला पुरुषांशी निगडित आजारांवर उपस्थित डॉक्टरांनी मार्गदर्शन करीत तपासणी करण्यात आली. नॉर्मल आणि सिजर डिलिव्हरी, वंध्यत्व, पाईल्स, अपेंडिक्स, हायड्रोसिल, कॅन्सर, हर्निया आणि फिशर आदी रोगांसंदर्भातही जागृती करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते नागरिकांना फॅमिली हेल्थ कार्डचे वितरण करण्यात आले. हे फॅमिली हेल्थ कार्ड (Family Health Card) नागरिकांच्या आरोग्याची सर्व माहिती देणार असून, आरोग्याचा पासबुक ठरणार आहे. ज्या नागरिकांनी फॅमिली हेड कार्डमध्ये नोंदणी केली, त्यांच्या कुटुंबीयांना सवलतीत आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या हेल्थ कार्डमध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्य माहिती नोंद करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. शिलू चिमुरकर यांनी दिली. फॅमिली हेल्थ कार्ड नोंदणी मोफत असून, परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गुरुवार, जानेवारी २६, २०२३

 डॉक्टरने दिले महिला रुग्णांना "आरोग्याचे वाण"  occasion of Makar Sankranti Armori

डॉक्टरने दिले महिला रुग्णांना "आरोग्याचे वाण" occasion of Makar Sankranti Armori


मकरसंक्रातीनिमित्त पार पडला आगळावेगळा हळदी कुंकू

बालिका दिनानिमित्त रुग्णालयात जन्मलेल्या बाळांची संक्रातीनिमित्त लूट

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिलू चिमुरकर यांनी केले निरोगी आरोग्यावर मार्गदर्शन

अनुसया मॅटर्निटी सर्जिकल अँड नर्सिंग होमचा उपक्रम



गडचिरोली (दिनांक २६ जानेवारी) : Makar Sankrantiमकरसंक्रांती म्हटली की,‎ महिलांचा जिव्हाळ्याचा विषय‎ येतो. संक्रांतीनिमित्त महिला‎ आपल्या घरी हळदी कुंकू कार्यक्रम‎ ठेवत वाण म्हणून एकमेकींना‎ भेटवस्तू देतात. या पारंपारिक पद्धतीमध्ये‎ थोडा बदल करत अनुसया मॅटर्निटी सर्जिकल अँड नर्सिंग होमने आगळावेगळा उपक्रम आयोजित केला. रुग्णालयात आजवर उपचारासाठी आलेल्या महिला, विविध आजारासाठी शस्रक्रिया झालेल्या रुग्नांना एकत्रित आणत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिलू चिमुरकर (Dr. Sheelu Chumurkar) यांनी "आरोग्याचे वाण" वाटले. विशेष म्हणजे वाण म्हणून एखादी भेटवस्तू न देता व्हिटॅमिन, कॅल्शिअम आणि निरोगी आरोग्यासाठी आवश्यक गोळ्या आणि औषधी वितरित केली.




स्त्रियांमध्ये आणि समाजामध्ये स्वतःच्या आरोग्याबद्दल कमालीची अनास्था असल्यामुळे आजार बळावतो. महिलांना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, यावर मार्गदर्शन करण्यासाठी मकरसंक्रांतीनिमित्त आरमोरी येथील अनुसया मॅटर्निटी सर्जिकल अँड नर्सिंग होममध्ये २५ जानेवारी रोजी "आरोग्याचे वाण" या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या वसुधा कोपुलवार, शकुंतला गंटावार, सेवानिवृत्त शिक्षिका चव्हाण, बघमारे यांची उपस्थिती होती. Makar Sankranti

यावेळी डॉ. शिलू चिमुरकर यांनी सर्व महिलांना आरोग्यासाठी तीळ-गुळाचे महत्व, दैनंदिन जीवनात घ्यावयाची काळजी आणि निरोगी आरोग्यावर मार्गदर्शन केले. यावेळी उपचारासाठी आलेल्या महिला, प्रसूती झालेल्या स्तनदा माता आणि विविध आजारावर शस्रक्रिया झालेल्या महिला रुग्नांना व्हिटॅमिन, कॅल्शिअम गोळ्या आरोग्याचं वाण म्हणून देण्यात आले. बालिका दिनाचे औचित्य साधून रुग्णालयात जन्मलेल्या दोन बाळांची संक्रातीनिमित्त लूट करण्यात आली.




आरमोरी येथील वडसा मार्गावर असलेल्या अनुसया मॅटर्निटी सर्जिकल अँड नर्सिंग होमची मागील ४ महिन्याआधी सुरवात झाली. प्रारंभीपासून सामाजिक सेवेचे व्रत घेऊन आरोग्यसेवा दिली जात आहे. या भागात आरोग्याची अत्याधुनिक सुविधा नव्हती. त्यामुळे इथल्या रुग्णांना दूरच्या मोठ्या शहरात जावे लागायचे. मात्र, अनुसया मॅटर्निटी सर्जिकल अँड नर्सिंग होमची स्थापना झाल्यापासून इथल्या रुग्णांची गैरसोय दूर झाली आहे. तेव्हापासून आरमोरी, वडसा, कुरखेडा, कोरची या नक्षलग्रस्त भागातील रुग्ण येथे उपचारासाठी येऊ लागलीत. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिलू चिमुरकर यांनी अवघ्या ४ महिन्यात आतापर्यंत ११ यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. यातील ८ शस्त्रक्रिया या गर्भाशयाशी निगडित होत्या. महिलांना अनेक कारणांमुळे गर्भपिशवी साफ करावी लागते. अशा जोखमीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे हाताळून महिलांना जीवनदान देण्याचे काम डॉ. शिलू चिमुरकर यांनी केले. महिलांना अंगावर पांढरे जाणे, मासिक पाळीच्या तारखा चुकणे, खाज सुटणे, संबंधानंतर लाल जाणे आदी समस्यांचे निराकरण त्यांनी केले.  
Makar Sankranti



शुक्रवार, डिसेंबर ३०, २०२२

चंद्रपूर जिल्ह्यात कोळशावर आधारित उद्योगाला मंजुरी; 20 हजार कोटींची गुंतवणूक | Coal In Chandrapur

चंद्रपूर जिल्ह्यात कोळशावर आधारित उद्योगाला मंजुरी; 20 हजार कोटींची गुंतवणूक | Coal In Chandrapur



चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे कोळसा खनिजावर आधारित हायड्रोजन, मिथेनॉल, अमोनिया युरिया निर्मितीचा वीस हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे दहा हजार लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील दोन खाणींमध्ये सोने असल्याचेही केंद्राच्या खनीकर्म मंत्रालयाला अहवाल पाठवण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच विदर्भाला सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.  Chief Minister Eknath Shinde.




त्यांनी सांगितले की खनिज साठ्यांची ई लिलाव एकूण 28 खान पट्ट्यांचा यशस्वी लिलाव झालेला आहे. विदर्भातील खनिज संपत्तीचे योग्य तो उपयोग राज्याच्या विकासासाठी व्हावा, यासाठी राज्याची नवीन खनिज धोरण घोषित करण्यात येईल. त्यामुळे विदर्भातील खनिक्रम उद्योग व्यवसायिकांना अधिक गती मिळेल. 

यावेळी त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील 70 टक्के खनिज संपत्ती एकट्या विदर्भात आहे. विशेषता गडचिरोली जिल्ह्यामध्ये उच्च दर्जाच्या लोह खनिजाचा साठा आहे. सुरजागड येथे 14 हजार कोटी रुपये व पाच हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे दोन नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. 

या प्रकल्पाव्यतिरिक्त आणखी एक पंधराशे कोटी रुपये एवढी गुंतवणूक असलेला स्टील प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यात येणार आहे. या तीन प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे दहा हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. प्रकल्प सुरू करणे हे शासनाची प्राथमिकता आहे. त्यामुळे त्यात कुणी आडकाठी आणण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच जशास तसे उत्तर देऊ. नक्षलवाद मोडून काढू. त्या भागातील नागरिकांच्या हाताला काम देऊ. त्यासाठी केंद्राचे ही सहकार्य मिळत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

An investment project of 20 thousand crore rupees has been approved for the production of hydrogen, methanol, ammonia urea based on coal ore at Bhadravati in Chandrapur district. Therefore, about ten thousand people will get direct and indirect employment in Chandrapur district, a report has also been sent to the Union Ministry of Mines that there is gold in two mines of Chandrapur district. Therefore, Vidarbha will soon have its golden days, asserted Chief Minister Eknath Shinde.