Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, सप्टेंबर ०८, २०२३

कुणबी म्हणजे काय रे भाऊ? कुणबी दाखला कागदपत्रे कसे मिळणार (Kunbi- Maratha)

कुणबी म्हणजे काय रे भाऊ? कुणबी दाखला कागदपत्रे कसे मिळणार (Kunbi- Maratha)

महाराष्ट्रातील कोणत्याही खेड्यात जाऊन कोणत्याही शेतकऱ्याला विचारा, "कुणबी म्हणजे काय रे भाऊ?" तर तो शेती असंच उत्तर देईल. पण प्रश्न असा विचारला जातो, मग कुणबी आणि मराठा हा समाज एक आहे का? काही लोक आपल्या नावात फक्त मराठा लिहितात, तर काही लोक कुणबी मराठा असे लिहितात, तर काही फक्त कुणबी लिहितात. हा काय प्रकार आहे? चला जाणून घेऊया या लेखामध्ये. (Kunbi- Maratha) Maratha reservation controversy


मराठा समाजाची ओळख
मित्रांनो, मराठा हा शब्द उच्चारला की आपल्याला वाटते की मस्त पंधरा-वीस एकर उसाचं वावर, गडगंज संपत्ती, पिळदार शरीर, ताऊ मारलेल्या मिशा आणि पाटलांचा वाडा अशी एकंदर मराठा समाजाची प्रतिमा समाजामध्ये निर्माण झालेली आहे. पण खरं तर, मराठा समाज हा शेती समाज म्हणून ओळखला जातो आणि बहुसंख्येने हा समाज लष्करी सेवेत होता. आपल्या राज्यावर होत असलेले परकीयांची आक्रमण रोखणे आणि राज्याचे संरक्षण करणे हे मुख्य कर्तव्य मराठ्यांचे होते.


कुणबी ओ.बी. .सी (Kunbi OBC) करिता आवश्यक कागदपत्रे
मराठा समाज आणि कुणबी समाज (Kunbi- Maratha)
परंतु, मराठ्यांना प्रत्येक वेळेस रणांगणात युद्ध करावे लागेल असे नाही. शांततेच्या काळात महाराष्ट्रातील मराठा समाज नांगर घेऊन काम करत असे आणि युद्धाच्या काळात सुद्धा हा तलवार घेऊन लढण्यात पटाईत असे. याच वर्गातून आलेले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं. मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एक फोटो आपण सर्वांनी बघितलेला असेल ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हातामध्ये नांगर धरलेला आहे आणि मासाहेब जिजाऊ त्यांच्या पाठीमागे उभे आहेत. हा फोटो मराठा आणि कुणबी या शब्दाचा अर्थ आपल्याला समजून सांगतो.


कुणबी समाजाची ओळख (kunbi caste certificate documents in marathi)
कुणबी म्हणजे शेती करणारी व्यक्ती. कृषी आणि पशुपालन हा व्यवसाय करणारे लोक आणि त्यामुळेच कुणबी वर्ग मूळचा वैश्य समजला जातो. पूर्वपार वैश्य समाजात मोडणारे जे कृषी होते ते महाराष्ट्रात कुणबी, गुजरात आणि मावळकडे कंदी, बिहार आणि पूर्वांचलात कुरमे आणि कर्नाटकात व कलिंगा आंध्र प्रदेशात कापू असे त्यांना म्हटले जाते.


कुणबी समाजाचा इतिहास
History of the Kunbi and Maratha societies
मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य आणि नंतरचे साम्राज्य या काळात कुणबी मराठ्यांचा लष्करी पेशा वाढत जाऊन त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय भर पडली होती. मोगलाईच्या मुलखातून मिळणाऱ्या चौथाईच्या हक्काने मराठा समाजात आर्थिक समृद्धी आली होती. नंतर अठराशे अठरा शतकात इंग्रजांनी मराठ्यांचे स्वराज्य घडवले. नंतर महसूल च्या स्वरूपात मिळणारे मराठ्यांचे उत्पन्न बंद झाले आणि हा समाज पूर्णपणे शेतीवर विसंबून राहू लागला. आणि म्हणूनच जो शेती करतो तो कुणबी या न्यायाने मराठा समाज म्हणून ओळखला जाऊ लागला.


कुणबी आणि मराठा या समाजाची एकरूपता
मुळात हा समाज शेतकरी मराठा असल्याकारणाने त्यांच्या नावात मराठा आणि शेती करत असल्याने कुणबी असे दोन्ही शब्द लोक जोडून लिहू लागले. तर काही लोक आपल्या नावामध्ये नुसते कुणबी शब्द प्रयोग करू लागले तर काहींनी कुणबी मराठा या दोन्ही शब्दांची वापरायला सुरुवात केली.


कुणबी समाजाला ओबीसी आरक्षण
मराठा समाजाचा भाग असलेल्या कुणबींना यादी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळालेले आहे. मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात एक समिती गठीत करण्यात आली होती. त्या समितीचे अध्यक्ष हे केंद्रीय मंत्री नारायण राणे होते. नारायण राणे समितीने असे म्हटले की सगळेच मराठी कुणबी आहेत त्यामुळे ते सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टीने मागास आहेत. कारण कुणबी समाज हा शेती करतो आणि शेती हा मागास व्यवसाय आहे. त्यामुळे मराठा समाजालाही ओबीसी आरक्षण द्यावे असे त्यांनी शिफारस केली होती.


मराठा आरक्षण वाद
मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात खूप चर्चेचा विषय आहे. काही लोकांचा असा तर्क आहे की मराठा समाज हा मागास समाज नाही आणि त्यांना आरक्षण देण्याची गरज नाही. तर काही लोकांचा असा तर्क आहे की मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टीने मागास समाज आहे आणि त्यांना आरक्षण द्यावे.


निष्कर्ष
कुणबी आणि मराठा या दोन समाजांचा इतिहास खूप जवळचा आहे. दोन्ही समाज शेती करतो आणि दोन्ही समाजाला ओबीसी आरक्षण (OBC reservation) मिळालेले आहे. परंतु, अजूनही या दोन समाजामध्ये काही मतभेद (Maratha reservation controversy) आहेत. मला आशा आहे की या दोन समाजामध्ये एकता निर्माण होईल आणि ते एकत्रितपणे महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करतील. (OBC reservation)

Kunbi
kunbi caste certificate documents in marathi
कुणबी जात प्रमाणपत्र कागदपत्रे
Maratha
OBC reservation
Maratha reservation controversy
History of the Kunbi and Maratha societies
Social and economic status of the Kunbi and Maratha societies
Challenges faced by the Kunbi and Maratha societies
Contributions of the Kunbi and Maratha societies to Maharashtra
searches
Kunbi caste certificate documents in marathi pdf
Kunbi caste certificate documents in marathi download
Kunbi caste certificate documents in marathi online
कास्ट सर्टिफिकेट डॉक्यूमेंट मराठी pdf
caste certificate documents list
obc caste certificate documents in marathi
caste certificate documents pdf
maratha caste certificate documents in marathi
Caste Verification - कुणबी मराठा दाखला कसा मिळवावा?
कुणबी(OBC) ची Cast Certificate कशी काढावी ? ...
Is Kunbi upper caste?
Are Kunbi and Maratha same?
Who are known as Kunbis?
कुणबी दाखला कागदपत्रे
कुणबी मराठा जात प्रमाणपत्र
एरंडेल तेल उपयोग पोटासाठी
kunbi caste certificate documents in marathi
kunbi certificate
kunbi maratha caste certificate documents
kunbi dakhla documents
how to get kunbi maratha certificate
कुणबी जात प्रमाणपत्र
kunbi praman patral

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.