Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, डिसेंबर ०७, २००९

तेलाची फोडणी डोळ्यांत आणणार पाणी

तेलाची फोडणी डोळ्यांत आणणार पाणी
सकाळ वृत्तसेवा
Sunday, November 01, 2009 AT 10:08 PM (IST)
Tags: chandrapur, soyabin, agriculture
चंद्रपूर - खरीप हंगामातील सोयाबीन पूर्णतः हातून गेल्यानंतर रब्बीवरची आशाही दुरावल्याने मोठ्याप्रमाणात उत्पन्न घटण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या काळात सोयाबीन तेलाचे भाव भडकण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. आजच्या घडीला सोयाबीनचे खुले खाद्यतेल 50 रुपये किलो; तर पॅकेटबंद 56 रुपये प्रतिकिलो आहे.

गेल्या दोन-तीन वर्षांच्या काळात नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळला. चांगले उत्पन्न मिळाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला होता. मात्र, गतवर्षी तंबाखूची पाने खाणाऱ्या अळीने जिल्ह्यातील संपूर्ण सोयाबीन फस्त केले. त्यातून सावरत नाही तोच यंदा कोरड्या दुष्काळाने शेतकऱ्यांना लाथ मारली. त्यामुळे शेतकरीवर्ग कर्जाच्या खाईत सापडला आहे. रब्बीतून काहीतरी फायदा होईल, अशी आशा होती. मात्र, अपेक्षाभंग झाला आहे. गेल्या सात-आठ वर्षांपूर्वी ग्रामीण भागात जवस तेलाची मोठी मागणी होती. तेव्हा 30 ते 36 रुपये प्रतिकिलो दर होते. त्यात सोयाबीन तेलाची गोडी लागताच जवस तेलाची मागणी घटली. तेव्हा सोयाबीनचे तेल 40 रुपये किलोने मिळायचे. असे असतानादेखील पाच ते सहा रुपयांनी महाग असलेले सोयाबीन तेल प्रतिष्ठेचे समजून खायचे. आता भाजी किंवा पदार्थांमध्ये सोयाबीनशिवाय चालतच नाही. शिवाय जवसाचे उत्पन्नच बंद झाल्याने तेल शोधूनही सापडत नाही. आता दुर्मिळ झालेल्या जवसाचे दर 60 रुपये किलो, तर सोयाबीन तेल त्यापेक्षा पाच ते सहा रुपयांनी कमी दरात उपलब्ध होत आहे. सोयाबीनचे खुले खाद्यतेल 50 रुपये किलो, तर पॅकेटबंद तेल 56 रुपये किलो आहे. 15 लिटरच्या पिंपाचा दर 705 रुपये आहे. महागाईचा कळस असतानाच सोयाबीनचे उत्पन्न घटले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.