निफंद्रा(रविद्र कूडकावार)
विदयार्थ्याच्या व शाळेच्या विकासासाठी व प्रगतीसाठी आपुले आयुष्या खर्ची घालून सेवेतून निवृत झालेल्या सावली तालुक्यातील खाजगी शाळेतील मुख्याध्यापकांचा सत्कार समांरभ सावली तालुका माध्यमिक व उच्चा माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने मार्कडेय विदयालय बोथली येथे आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून चंद्रपूर जिल्हा मा.व उच्च्.माध्यमिक शाळा मु.संघाचे अध्यक्ष श्री.मधुकर चापले,विशेष अतिथी म्हणून सौ.संध्या गोहोकार,प्रमूख अतिथी श्री.उराडे सर,श्री.खाडे सर,चंद्रपूर जिल्हा मु.संघाचे सचिव श्री.विनोद पिसे.उपाध्यक्ष श्री.भारत मेश्राम. श्री. जगदीश ठाकरे.कोषाध्यक्ष अरविंद राउुत,सदस्य दिपक बोकडे, अनिल वासेकर, श्री.पारलेवार प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वप्रथम दिवंगत मुख्याध्यापकांना श्रंदधाजली अपर्ण करण्यात आली.
याप्रसंगी विश्वा शांती विदयालय तथा कनिष्ठ महाविदयालय सावलीचे एस.बी.शुक्ला. डी.वी. चटप,एम.एल.बुर्रीवार रमाबाई आबेंडकर विदयालय तथा कनिष्ठा महाविदयालय सावली चे यु.एच.भैसारे.नवभारत विदयालय अंतरगावचे कु.एस.एल.इंदूरकर,नवभारत विदयालय तथा कनिष्ठ महाविदयालय व्याहाडच्या लता पारेलवार,जीवन विकास विदयालय हराबांचे पी.एस.डोईजङ.सिदधार्थ विदयालय लोढोंलीचे पी.एम.बोदलकर.विकास विदयालय तथा कनिष्ठा महाविदयालय विहीरगावचे एस.एस. धारणे या सर्वाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ,स्मूतीचिन्ह देउुन यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य पी.एस.समर्थ,संचालन प्राचार्य रवींद्र कुडकावार.आभार प्राचार्य व्ही.बी लोखंडे यांनी मानले. या कार्यक्रमाला सावली तालुक्याती सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
-