Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मार्च १४, २०२०

चंद्रपूर जिल्हा कारागृहात कोरोना- विषाणू जनजागृती व उपाययोजना शिबीर

 चंद्रपूर जिल्हा कारागृहात कोरोना- विषाणू जनजागृती व उपाययोजना शिबीर


चंद्रपूर -  कोरोन विषाणूचा संपूर्ण जगामध्ये वाढता प्रभाव लक्षात घेता चंद्रपूर जिल्हा कारागृह वर्ग-१येथे जिल्हा सामान्य रुग्णालय, यांचे वतीने कोरोना- विषाणू जनजागृती व उपाययोजना शिबीराचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाला अध्यक्ष म्ह्णून कारागृह अधीक्षक वैभव आगे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय येथील फिजीशियन डॉ.सचिन धगडी,एम.डी मेडीसीन, डॉ.अमित डांगेवार, कारागृह वैद्यकीय अधिकारी, प्रमुख उपस्थितीमध्ये श्री. रविंद्र जगताप,वरीष्ठ तुरुंगाधिकारी, श्री.सुनिल वानखडे, तुरुंगाधिकारी, श्री. ललित मुंडे, तुरुंग शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरवातीलाप्रमुख मान्यवरांचे कारागृहाचे वतीने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविकेतून डॉ.अमित डांगेवार यांनी मान्यवरांचापरीचय व जगनागृती शिबीरातील कोरोना विषाणू बाबत प्राथमिक माहिती सांगीतली. तदनंतर प्रमुख मार्गदर्शक तथा विशेष अतिथी डॉ.सचिन धगडी यांनी कोरोना विषाणू बाबत माहिती देतांना सांगीतले की जगभरात ०१ लक्ष पेक्षा जास्त पसरलेला कोरोषा विषाणू हा एक सांसर्गजन्य आजार असून बाधित व्यक्तीच्या संपर्कात येणा-या आलेल्या व्यक्तींमध्ये वेगाने पसरत आहे. कोरोना विषाणूची लक्षणे ही मुख्यत: श्वसन संस्थेशी संबधित असून त्यामध्ये खोकला, श्वास घेण्यास त्रास, निमोनिया, ताप इत्यादी आहेत. सदर आजाराचे अनुषंगाने वय वर्षे ५० पेक्षा जास्त असणा-या व्यक्ती,गरोदर माता, लहान बालके,मधुमेह, कॅन्सर व किडणीचा आजार असलेल्या लोकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी वेळोवेळी विशेष: जेवण्यापूर्वी नियमितपणे साबनाने स्वच्छ हात धुवावेत, शिंकताना व खोकलतांना रुमालाचा वापर करावा जर रुमाल नसेल तर शर्टच बाहीचा वापर करावा व तळहातांचा आधार घेणे टाळावा, चेहरा ,नाक, डॊळे यांना वारंवार हाताने स्पर्श करु नये इत्यादी बाबत सुचना दिली. अध्यक्षीय भाषनातून कारागृहाचे अधीक्षक श्री. वैभव आगे यांनी कारागृहातील बंदी हे बॅरेक मध्ये एकत्र समुहाने राहत असल्याने त्यांचा एकमेकांसोबत जवळून संपर्क येतो त्यामुळे त्यांनी दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे व आपली बॅरेक व कारागृह परीसर हा स्वच्छ ठेवावा तसेच शिंकताना व खोकलतांनाच्या योग्य पध्दती कोणत्या याबाबत माहिती दिली व सर्वांना एकमेकांना सहकार्य करण्याचे निर्देशीत केले. सदर कार्यक्रमाचे कारागृहातील यशस्वी आयोजन व सुत्रसंचलन तुरुंग शिक्षक ललितमुंडे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता तुरुंगाधिकारी श्री. सुनिल वानखडे, सुभेदार देवाजी फलके, शिवराम चवळे, शिपाईसिध्दार्थ खंडारे, विजय बन्सोडे, जगदिश कोहाड, इत्यादीं सह इतर कारागृह कर्मचारी यांनी विशेष परीश्रम घेतले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.