इस्रोच्या भेटीत चिंचोली येथील सानिया विनोद भगत हिचा समावेश
राजुरा/प्रतिनिधी
जिल्हा परिषद अंतर्गत घेण्यात आलेल्या नवरत्न स्पर्धेतील चमकदार कामगिरी करणाऱ्या 35 विद्यार्थ्यांना नुकतेच बेंगलोर येथील इस्रो (ISRO) या वैज्ञानिक संस्थेला व इतर स्थळांना भेटी देण्याचा योग आला.
यामध्ये राजुरा तालुक्यातील चार विद्यार्थ्या समावेश आहे .यात चिंचोली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील इयत्ता सातवी शिकणारी विद्यार्थिनी सानिया विनोद भगत हिचा समावेश आहे. दिनांक 25 ते 29 एप्रिल दरम्यान जिल्हा परिषद चंद्रपूर येथे ही भेट बेंगलोर येथे घडवून आणले. (Indian Space Research Organisation (ISRO
) )
जिल्हा परिषद अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दरवर्षी नवरत्न स्पर्धांचे आयोजन करण्यात येते यामध्ये कथाकथन, एकपात्री प्रयोग, भाषण ,बुद्धिमापन, सुंदर हस्ताक्षर, स्वयंस्फुर्त लेखन, स्मरणशक्ती यासारख्या स्पर्धांचे आयोजन केल्या जाते. या विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांतील सुप्त गुणांना चालना दिली जाते व त्यांच्या आत्मविश्वास निर्माण केला जातो. या स्पर्धा शालेय स्तरापासून तर केन्द्र, बीट स्तरापर्यंत व तालुका स्तरावरील विजेत्या विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेत समाविष्ट केल्या जाते. यावर्षी 2022-23 अंतर्गत जिल्ह्यातील वेगवेगळ्या स्पर्धातील चमकदार कामगिरी करणाऱ्या 35 विद्यार्थ्यांची निवड बेंगलोर येथील वैज्ञानिक संस्थेला भेट देण्यासाठी करण्यात आली यामध्ये इतर तालुक्यातील विविध स्पर्धातील विजेत्यांचे सहभाग होता. बेंगलोर येथील इसरो (Indian Space Research Organisation (ISRO)
वैज्ञानिक संस्थेला भेट देणाऱ्या चमूत मध्ये चिंचोली येथील इयत्ता सातवी शिकणारी सानिया भगत हिचा समावेश होता. बालवयात प्रत्यक्ष इस्रो संस्थेला भेट देणे हे तिच्यासाठी स्वप्नवत होते.
हे स्वप्न या स्पर्धेच्या माध्यमातून पूर्ण झाल्याचे मनोगत सानिया भगत आणि सकाळची बोलताना व्यक्त केले. बेंगलोर येथील भेटी दरम्यान इस्रो या वैज्ञानिक संस्थेसोबत इतर ऐतिहासिक व दर्शनीय स्थळांना भेटी दिल्या त्यातून बरेच काही शिकायला मिळाले असे तिने सांगितले.
बालवयात मिळालेली ही संधी आयुष्यासाठी मोठी सुवर्णसंधी आहे तसेच या आठवणी सदैव प्रेरणा देणाऱ्या आहेत भविष्यात डॉक्टर व्हायला आवडेल अशी प्रतिक्रिया सानिया विनोद भगत हीने दिली. हिच्या निवडीबद्दल गटशिक्षणाधिकारी शंकर कोसिनी, शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक पी पी उईके, के एस पडोळे ,आनंद चलाक, तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय चिडे, सतीश कुळसंगे,राठोड यांनी विद्यार्थिनी व पालकांचे अभिनंदन केले आहे.