www.Tukdojimaharaj.com संकेतस्थळ
गुरुकुंज आश्रम (वार्ताहर)-
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे साहीत्य जगामध्ये उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र व राज्यसरकारच्या तसेच कार्पोरेट क्षेत्रातील कंपन्यांचे जनसंर्पकाचे कामकाज करणाऱ्या द पीआर टाईम्स लिमिटेड कंपनीने सामाजिक उत्तरदायित्व म्हणुन www.Tukdojimaharaj.com असे संकेतस्थळ तयार केले आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 114 व्या ग्रामजंयतीच्या पर्वावर संकेतस्थळाचे अनावरण अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई बोंडे व सर्वाधीकारी लक्ष्मण गमे यांच्या हस्ते गुरुकुंज आश्रम येथे करण्यात आले.
उद्दिष्टे
या संकेतस्थळाच्या निमिर्तीची संकल्पना द पीआर टाईम्स लिमिटेडचे संचालक निखीलेश सावरकर,कंपनीच्या माध्यम व जनसंपर्क संचालिका भूमिता सावरकर यांची असुन, कंपनीचे वेब डेव्हलपर निशांत मल्होत्रा,अमित बोरकर,स्वप्नील भोगेकर,रोहीत अतकरे,प्रतीक घोगले,सृष्टी पटेल,स्पनील डोंगरवार ही चमु संकेस्थळाला जागतिक किर्तीमान मिळुन देण्यासाठी अहोरात्र झटत असुन महाराजाच्या पुण्यतिथी पर्वापर्यंत पुर्णपणे संकेतस्थळ विकसित होणार आहे. संकेतस्थळाच्या औपचारीक अनावरणा प्रसंगी अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे उपसर्वाधीकारी दामोदर पाटील,प्रचारप्रमुख प्रकाश वाघ, सेवाश्रम समिती प्रमुख डॉ राजाराम बोथे, आरोग्य विभाग प्रमुख डॉ पुरुषोत्तम पाळेकर दिलीप कोहळे,सुशिल वणवे,डॉ दिगंबर निघोंट यांच्यासह केंद्रीय कार्यकारीणीचे सर्व पदाधीकारी,कार्यकर्ते व भाविक यावेळी उपस्थित होते.