Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जून २४, २०२२

"या" कारणासाठी आ. किशोर जोरगेवार यांनी दिला एकनाथ शिंदे गटाला पाठींबा



महाविकास आघाडीसोबत असतांनाही "हा" विषय आपण वारंवार उचलला. आताही सत्तेसोबत राहून तिथेही "हा" विषय प्रखरतेने मांडणार असल्याचेही आमदार किशोर जोरगेवार स्पष्ट केले आहे. 
महाविकास आघाडी सरकार सोबत काम करतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व इतर सहकार्यांचे मोठे सहकार्य लाभले. त्यामुळे त्यांचा आदर हा नेहमीच राहील. मात्र राजकीय परिस्थिती बदलत असतांना "मतदार संघाचा अधिकाधिक विकास करण्यासाठी "मी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा देण्याचे ठरविले  असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.
चंद्रपूर मतदार संघाचा सर्वसमावेशक विकास करायचा असेल तर सत्तेसोबत राहणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रातुन व्यक्त केली आहे. 

आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, काल गुरुवारी सांयकाळी सर्व बाजु तपासुन आणि मतदार संघातील नागरिकांशी चर्चा करुन मी एकनाथ शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेत असतांना चंद्रपूर मतदार संघाचा विकासासह येथील प्रलंबित मागण्यापूर्ण करणे हा एकमात्र उद्देश होता. साधारणत: मतदार संघातील कामे करण्यासाठी अपक्ष हा सत्तेबरोबर राहत असतो. मागील अडीच वर्षात सत्तेसोबत असल्यामुळे कोरोणा काळातही मतदार संघातील विकासासाठी आपण मोठा निधी खेचुन आणाला.असल्याची प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रातुन व्यक्त केली आहे.  



अपक्ष आमदार जोरगेवार यांनी २०१४  भाजपकडे विधानसभेची उमेदवारी मागितली होती. ती न मिळ्याल्याने ते शिवसेनेकडून निवडणूक लढले व पराभूत झाले. त्यांना ५० हजार मते मिळाली होती. २०१९ ची निवडणूक ते अपक्ष म्हणून लढले. त्यांनी १ लाख २० हजार मते घेतली होती. ७७ हजार मतांनी ते विजयी झाले होते. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होत असताना त्यांनी आघाडीतील घटक पक्ष सेनेला पाठिंबा देत सहयोगी सदस्यत्वही स्वीकारले. नुकत्याच झालेल्या राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीत जोरगेवार यांनी नेमके कोणाला मतदान केले याबाबत संशय व्यक्त केला जातो. 



चंद्रपुरातील एक आमदार गुवाहाटीत दाखल; एकनाथ शिंदेची घेतली भेट | 
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार गुवाहाटीत दाखल

चंद्रपूर : महविकास आघाडीसोबत असलेले चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा मंगळवारी रात्री फोन आला होता. जोरगेवार शिंदे यांच्या संपर्कात होते. मतदार संघाचा आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याचे जोरगेवार यांनी सांगितले होते. राज्यामध्ये राजकीय भूकंप सुरू असताना चंद्रपूर येथील अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एवढेच नव्हे तर ते थेट गुवाहाटी दाखल होऊन एकनाथ शिंदे यांची गुवाहाटी (Guwahati) येथे भेट घेतली. गुवाहाटी हे आसाम राज्याच्या राजधानीचे शहर आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रपरिषदेत जोरगेवार यांचे नाव घेतल्यापासून ते चर्चेत आहेत. सेनेत बंडखोरी झाल्यावर शिंदे यांनी जोरगेवार यांच्याशी संपर्क साधला होता. मतदारांचा कौल घेऊन कळवतो, असे त्यांनी शिंदे यांना सांगितले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरुवारी ते गुवाहटी येथे दाखल झाले. त्यापूर्वी फडणवीस आणि शिंदे यांनी संपर्क साधल्याचे जोरगेवार यांनी सांगितले.#Guwahati #MLA #MH 



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.