अँड्रॉइड मोबाइल अभावी अनेक विद्यार्थी मात्र वंचित
संजीव बडोले/नवेगावबांध.
दिनांक 18 एप्रिल 2020.
नवेगावबांध:-सम्राट अशोक विद्यालय उमरी येथील इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्याचा आँनलाईन स्टडीत सक्रिय सहभाग घेतला आहे.सध्या महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शाळेला सुट्टी आहे.दरम्यान विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये. म्हणून जिल्हा परीषद गोंदिया प्राथमिक शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांच्या संकल्पनेतून व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट ) यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील् इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आँनलाईन स्टडी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. परंतु ग्रामीण भागात बऱ्याच पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्यामुळे, अनेक विद्यार्थी या ऑनलाइन चाचणी पासून वंचित आहेत. सम्राट अशोक विद्यालय उमरी येथील इयत्ता पाचवी ते आठवी च्या विद्यार्थ्यांचा यात उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे.शिक्षणाधिकारी यांच्या निर्देशानुसार वर्ग शिक्षकांनी इयत्ता निहाय वाटस् अॅप गृप तयार केले असून, दररोज सकाळी नऊ वाजता एक लिंक स्वतंत्रपणे दिली जाते. त्यात प्रामुख्याने भाषा,गणित व इंग्रजी विषयांचा समावेश आहे. चाचणी सोडवतांना विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्यास संबंधित विषय शिक्षकाकडून त्याचे निराकरण केले जाते.
बाकटी केंद्राचे केंद्रप्रमुख रतनपुरे व मुख्याध्यापक एस. एस. टेंभुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली आँनलाईन स्टडी उपक्रम राबविला जात आहे.यात इयत्ता पाचवी ते आठवी चे वर्ग शिक्षक एस.व्ही. बडोले, जे. एस. हटवार, एस. ए. नंदेश्वर, एम. यु. घरोटे, आर. के. खेडकर यांनी वर्ग निहाय वाटस् अॅप गृप तयार करून यात इयत्ता पाचवी चे आठवीचे विद्यार्थी नियमित आँनलाईन स्टडी उपक्रम अंतर्गत चाचणी सोडवित आहेत. या करीता तंत्र शिक्षक,पालक, विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे . विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एस. टेंभुर्णे व शिक्षकांनी या सहकार्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले आहे. तसेच उर्वरित विद्यार्थ्यांनी सुद्धा यात सहभाग वाढवावा असे आवाहन केले आहे.