लॉकडाऊनचा दुर्दैवी परिणाम
सावली तालुक्यातील उपरी येथिल दुसरी घटना
निफन्द्रा (रवींद्र कुडकावार)
जग भरात चालु असलेल्या कोरोना विषाणू च्या महामारी ने सध्या लॉकडाऊन सुरू आहे त्या मुळे पतीचे अंत्यसंस्कारासाठी जीवनसाथी पोहचू न शकल्याची दुखद घटना सावली तालुक्यातील उपरी येथे नुकतीच घडली.
पती पत्नीचे नाते हे जन्मोजन्माचे समजले जाते. पती असो की पत्नी कितीही दूर असले तरी शेवटच्या क्षणी मात्र वाट पाहिल्याशिवाय अंत्यसंस्कार होत नाही. मात्र सद्या भारत देशात कोरोनाच्या प्रभावामुळे संचार बंदी व लॉकडाऊन चा फटका अनेकाना बसत आहे . त्यामुळे
मजूर असलेली पत्नी पतीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकली नाही.
मूळचे सावली तालुक्यातील उपरी येथील मयताचे नावे नरेंद्र पत्रूजी पेंडलवार वय 35/ .मयत नरेंद्र पेंडलवार यांचा विवाह 13 वर्षांपूर्वी मु . सालेकसा जी .गडचिरोली येथील अश्विनी हिचेशी प्रेम प्रकरणातून अंतर जातीय विवाह झाला. परंतु पती ला छोटा सा दुकान होते परिवाराचे उदर निर्वाह होत नसल्याने पत्नी सतत रोजी रोटी करायची . त्यामुळे संसाराचा गाडा चालविण्याचा भार अश्विनी हिच्यावर होता. मोल मजुरी करून आपल्या 13-10 वर्षाच्या मुलासह पती .सासरा .सासू उपरी ला राहायचे मजुरी करून कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत होती. मिरची तोडण्याचे कामाकरिता तेलंगणा राज्यात आपल्या पती .सासू .व मुलाला घरी ठेऊन ही माऊली आपल्या सासरे सोबत मिरची ला गेली.
जगात कोरोनाचे संकट आले. देशात, राज्यात संचारबंदी लागू झाली. त्यामुळे या कुटुंबालाही फ टका बसला त्यातच पती नरेंद पत्रुजी पेंडलवार याची तब्येत अचानकपणे बिघडली व त्याला गडचिरोली येथील सरकारी सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले .तो आठ दिवस गडचिरोली ला भरती होता त्याला गड .येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डिस्चार्ज दिले व तो उपरी ला आपल्या घरी होता मात्र प्रक्रुती अधिकच खालावली. त्यामुळे पत्नी नसताना नातेवाईकांनी दि 17/ला रात्रौ 10वा शासकीय रुग्णालयात चंद्रपूर ला नेऊन भरती केले. मात्र तब्येत खालावत असल्याने जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी भरती करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा सकाळी 4;30दरम्यान मृत्यू झाला.
तिकडे पत्नीला व वडिलांना कळवले मात्र लॉकडाऊनमुले येणे शक्य नव्हते. अश्रूशिवाय काहीच तिच्याकडे पर्याय नव्हता. नातेवाईकांना जीवनसाथी अर्धांगिनी व स्वत:च्या वडीला शिवाय लहान बालकांना आपल्या आई व आजोबा विना अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ आली हि सावली तालुक्यातील दुसरी घटना असून अनेकांच्या नातेवाइकाना तेलंगाना राज्यात कामाला . जाणे हे दुर्दैव ठरले .