Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, फेब्रुवारी २८, २०२२

सौंदड राज्यस्तरीय कवी संमेलनात 'वर्षाव प्रेमाचा' काव्यसंग्रहाचे प्रकाशन थाटात





चंद्रपूर: नवभारत विद्यालय मूल ता मूल जि चंद्रपूर येथील शिक्षिका कवयित्री वर्षा भांडारकर यांच्या 'वर्षाव प्रेमाचा' या कविता संग्रहाचे जागतिक मराठी भाषा दिनी दि २७ फेब्रुवारी रोजी पँराडाईज इंग्लिश स्कूल, सौंदड जि गोंदिया येथे आयोजित राज्यस्तरीय कवी संमेलनात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते थाटात प्रकाशन संपन्न झाले.

विं वा शिरवाडकर यांच्या जन्मदिनी सौंदड येथे मराठी भाषा गौरव दिन सोहळा नागपूरच्या मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्थेने आयोजित केला होता. संस्थेचे संपादक अध्यक्ष राहुल पाटील सविता पाटील यांनी संपादित केलेल्या 'माय मराठी' प्रातिनिधिक कविता संग्रहासोबत मूल येथील कवयित्री वर्षा भांडारकर यांच्या 'वर्षाव प्रेमाचा' या कविता संग्रहाचे प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप मोदी प्रमुख अतिथी अभिनेत्री प्राजक्ता , राजू नवनागे, प्रभाकर दहिकर मुन्ना नंदागवळी संतोष राऊत, किशोर बनसोड केवलचंद शहारे यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेच्या वतीने कवयित्री वर्षा भांडारकर व सुभाष भांडारकर यांचा शाल सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. वर्षाव प्रेमाचा या कविता संग्रहास प्रसिद्ध कवयित्री लेखिका समीक्षक सविता पाटील ठाकरे सिलवासा दादरा नगर हवेली यांची प्रस्तावना लाभली आहे.

याप्रसंगी सौंदड येथील साहित्यिक काव्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन कवयित्री मुख्य परीक्षक वैशाली अंड्रस्कर यांनी केले तर आभार प्रा तारका रूखमोडे यांनी मानले.


A collection of poems titled 'Varshav Premacha' is being published at the state level poets' convention

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.