Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जुलै १४, २०२३

खातेवाटप जाहीर; आता कोणाकडे काय खातं! Maharashtra Mantrimandal

खातेवाटप जाहीर; आता कोणाकडे काय खातं!


राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री
@mieknathshinde  यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. वित्त व नियोजन विभागाचा पदभार स्वीकारत उपमुख्यमंत्री यांनी मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरील त्‍यांच्या ५०३ दालनात वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, अतिरिक्त मुख्य सचिव व्यय ओमप्रकाश गुप्ता यांच्याकडून राज्याच्या आर्थिक स्थितीची माहिती जाणून घेतली.

राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील. इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे: ✅ छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण ✅ दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार ✅ राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास ✅ सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय ✅ हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य ✅ चंद्रकांतदादा बच्चू पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य ✅ विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास ✅ गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन ✅ गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता ✅ दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) ✅ संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण ✅ धनंजय पंडितराव मुंडे – कृषि ✅ सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार ✅ संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन ✅ उदय रविंद्र सामंत- उद्योग ✅ प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण ✅ रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) ✅ अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन ✅ दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा ✅ धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन ✅ अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण ✅ शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क ✅ कु. अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास ✅ संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे ✅ मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता ✅ अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.