Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जुलै ०५, २०२३

दोन मित्रांनी केला खून; हे कारण ऐकून थक्क व्हाल! Murder case news




ब्रम्हपुरी:- आपसी वादातून दोन मित्रांनी चाकुने भोसकून सहकारी मित्रांची हत्या केल्याची धक्कादायक घटना ब्रम्हपुरी येथे घडली आहे.

या घटनेमुळे ब्रम्हपुरी शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. ब्रम्हपुरी शहरातील गुजरी वार्ड चौकात ४ जुलै च्या रात्री १०:३० वाजता दरम्यान घटना घडली.
कपील खुशाल भैसारे वय (२२) वर्षे रा. गुजरी वार्ड ब्रम्हपुरी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर मुन्ना राऊत वय (४५)वर्ष व रोहित भैसारे वय (३२) वर्षे रा. गुजरी वार्ड ब्रम्हपुरी असे आरोपीचे नाव आहे. सदर प्रकरणात दोन्ही आरोपींना ब्रम्हपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


काल कपील भैसारे व मुन्ना राऊत, रोहित भैसारे हे तिघेही मित्र दारू पिऊन गुजरी वार्ड चौकात बसुन आपआपसात चर्चा करत होते. या चर्चेचा रुपांतर कपील सोबत वादात झाले. आणि मुन्ना राऊत यांचा राग अनावर झाले आणि त्यांच्या कडे असलेल्या धारधार चाकुने कपील भैसारेच्या छातीवर दोन- तिन वार केला. तिथून पळून गेला. काही वेळात कपील भैसारे याचा भाऊ फिरायला बाहेर आला असता कपील हा खाली रक्ताच्या थारोळ्यात पडुन दिसला. त्यांने गंभीर जखमी अवस्थेत कपील भैसारेला ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांला मृत घोषित केले.

घटनेची माहिती ब्रम्हपुरी पोलिसांना देण्यात आली. त्या अनुषंगाने मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. ब्रम्हपुरी पोलिसांनी दोन्ही आरोपींना आज पहाटे सुमारास नागभीड पोलीस स्टेशन मधून ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपींविरोधात कलम ३०२,३४ भादवी अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा ३,२,वि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे करीत आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.